शनिवार, २ जानेवारी, २०२१

चैतन्यमुर्ती बुलेट

 // श्री स्वामी समर्थ //


     *चैतन्य मुर्ती डाॕबरमन*


           *बुलेट*


     २ जानेवारी २०२१

  


विनायक जोशी

💬9423005702 


बरोबर एक वर्षापूर्वी दक्षिण भारतात तू प्रगट झालास आणि दोन महिने आई जवळ राहून पुण्यातील विठ्ठलवाडी येथील तावडेंच्या आनंदभवन येथे मुक्कामाला जाणे निश्चित झाले .....


अनपेक्षित अशा प्रवासबंदी मुळे तूझा मातृगृही मुक्काम लांबला . याच ठिकाणी तुझ्या सौंदर्यात भर पडावी म्हणून कानाची छोटी शस्त्रक्रिया झाली . या नंतर मात्र कोव्हिड टेस्ट पास करुन पुण्यात आगमन झाले .....


आनंदभवन येथे वावरायला असलेली प्रशस्त जागा आणि घरात दिसलेली श्रीया , साईश आणि साईली यांच्या मुळे आपण या ठिकाणी आनंदाने राहू शकतो याची  तूला मनोमन खात्री पटली ......


दाक्षिणात्य भाषेतून मराठीत यायला थोडा वेळ लागला परंतु  मुलांच्या मुळे तू ते लवकर आत्मसात केलेस 


जर्मन रक्त असलेल्याला डाॕबरमनला ट्रेनर कडून इंग्रजी शिकावे लागणे हा कमालीचा कंटाळवाणा प्रकार तू नाराजी लपवत पार पाडत आहेस ...


तूझा दमदार आवाज ऐकून मंगलधाम मधील सिंबा पवार आणि खंडू पाटील हे चतुष्पाद मित्र आनंदीत झाले आहेत ...


तळजाई ते ट्रेडमिल हा तूझा चालू असलेला प्रवास किंवा घरातील अनेक गोष्टींची तोडफोड , थोडेसे पोट दुखले तर गच्ची वरील ओव्याचे पूर्ण झाड संपविणे वगैरे बाललीला चालू आहेत बघून मजा वाटते .


हे लहानपण परत येत नाही त्यामुळे अत्यंत अनपेक्षित असे अनेक अविष्कार दाखवत तावडेंच्या आनंदभवनात आनंदाने बागडत रहा  ......


विनायक जोशी (vP)

💬9423005702 

electronchikatha.blogspot.com

मंगळवार, २४ नोव्हेंबर, २०२०

आनंदयात्री विनायक जोशी

 // श्री स्वामी समर्थ //

    *आनंदयात्री*

विनायक प्रभाकर जोशी


     *विनायक जोशी (vp)*

 💬9423005702

 📱9834660237 


माझ्याकडे आनंदी स्वभाव नावाचे एक साधे सोप्पे साधन होते . त्याच्या मदतीने मी सहजतेने छान काम करायला सुरूवात केली . आपल्या सहवासात येणारी माणसे किंवा आपण वापरत असलेल्या  वस्तू किंवा वास्तू यांच्या बरोबर प्रेमाने काम करणे एवढे एकच व्रत पाळले . 


एका वेगळ्या अनुभवाच्या जगात प्रवेश केला . कोणत्याही गोष्टींची अथवा माणसांची भिती सहजपणे संपुष्टात आली .कोणालाही फाॕलो करावे किंवा कोणीही आपला आदर्श ठेवावा असे वाटले नाही . 


दररोज  उत्साहाने आणि आनंदाने  काम सुरू करणे आणि काम उत्तम पणे पूर्ण करणे एवढाच दिनक्रम ठेवला . चांगल्या किंवा आनंददायी गोष्टींच्या लाटा मनापासून अनुभवल्या . व्यावहारिक मोजमापाच्या पट्यांच्या जवळ जायचा मोह टाळला .


 स्वतःला स्वतःचा कंटाळा येईल असा वागलो नाही . आपले स्वतःला आवडणारे काम थांबल्या नंतर सहजपणे १०० दिवस आपण आपल्या घरात आनंदाने राहू शकतो याचा अनुभव घेतला . 


 स्वतःवरती प्रेम आणि स्वतःवरती विश्वास या मूलभूत गोष्टी आपोआप जोपासल्या गेल्या .


कोणत्याही संकल्पनेच्या दोन ओळींमधील दडलेला अर्थ सहजपणे  वाचायला यायला लागला की मिळणारी आनंदाची अनुभूती अनुभवली .खूप वर्षे आनंदाने काम केल्यामुळे छान अशा समाधानाच्या अनेक पायवाटा तयार झाल्या आहेत . या नंतर मात्र आनंदयात्री बनण्यासाठीचा महामार्ग स्वच्छ आणि स्पष्टपणे दिसायला लागला .


एकदा या रस्त्यावरचा प्रवास सुरू झाला म्हणजे त्या नंतर मात्र तुम्हाला कोणाही कडून काहिही नको असते.

फक्त आनंदाचे डोही आनंद तरंग अनुभवायचे आपल्या छोट्याशा मंगलमय आणि समृद्ध अशा घरट्यात शांतपणे कल्याणी बरोबर ....


*विनायक जोशी(vp)*

 💬9423005702

 📱9834660237 

१२५७ , मंगलधाम ,बी ३ , विठ्ठलवाडी ,हिंगणे खुर्द ,लेन नं ४ , पुणे ५१

*electronchikatha.blogspot.com*

चैतन्यमुर्ती हरिभाऊ भावे काका

 // श्री स्वामी समर्थ  //

     *चैतन्य मुर्ती*

     *हरिभाऊ भावे काका*


विनायक जोशी (vP)

💬9423005702 

📱9834660237 



साधारणपणे १९८४ मध्ये वयाची साठी गाठलेल्या या तरुणाची आणि माझी पहिली भेट झाली.


लष्करातील आणि रेल्वे मधील नोकरी मुळे शेकडो अनुभवांचा खजिना त्यांच्या कडे होता .वयाच्या ५२ व्या वर्षी दोन हार्ट अॕटॕक पाठोपाठ येऊन सुध्दा केवळ अत्यंत आनंदी स्वभाव , निरपेक्ष वृत्ती , स्वाभिमानी बाणा यामुळे वयाच्या ९२व्या वर्षापर्यंत त्यांना प्रकृती किंवा परिस्थिती बद्दल कुरकुरताना कधीही बघितले नाही. 


सर्व आहार विहारात कमालीची शिस्त ते पाळत . एकमेकांच्या पासून कितीही लांब किंवा दूर अंतरावर असलो तरी आनंदी माणसांच्या मध्ये  काहीही न बोलता  विचारांची देवाणघेवाण होऊ शकते याची प्रचीती यांच्यामुळेच आली. ज्या ठिकाणी जातील तेथे आनंदाच्या असंख्य लाटांची निर्मिती ते सहजतेने  करत असत. 


शेवटच्या काळात त्यांनी जोडीदार गेल्याचे दुःख कसोशीने लपवून ठेवले होते. सोलापूर मधील वैशंपायनांच्या सहवासात अध्यात्माचे गिरवलेले धडे यावेळी त्यांना कमालीचे उपयोगी पडले.


  महिन्यातून कमीतकमी एकदा  दुपारच्या वेळी अचानकपणे मी त्यांना भेटायला म्हणून  जायचो . ते एकटे असायचे .भरपूर मोकळ्या गप्पा मारायचो . प्रचंड हसायचो .छान पैकी पाठ चेपून द्यायचो .त्यांची नजर अंधूक झाली होती तरी फक्त आवाज ओळखून आलेल्या माणसांशी ते आनंदाने बोलत असत. 


२०१५ सालच्या  जानेवारीत राव हाॕस्पिटल या दवाखान्यात त्यांना भेटायला गेलो . त्या वेळी त्यांना न्युमोनिया झालेला होता. एका isolated room मध्ये त्यांना ठेवले होते. आता परतीचा रस्ता नव्हता .

मरणाला अजिबात न घाबरता ते स्थितप्रज्ञा सारखे सामोरे गेले.दवाखान्यातून स्वतःहून डिसचार्ज घेऊन घरी आले आणि शांतपणाने २५ जानेवारी २०१५ या दिवशी पत्नीला भेटायला स्वर्गाकडे निघून गेले.


 ३२ वर्षांच्या आमच्या मैत्री मध्ये कोणत्याही गोष्टी साठी कधीही उदासवाणे बसलेले मी त्यांना बघितले नाही.

 काळानुरुप स्वतःमध्ये बदल करुन कायम आनंदी राहिलेल्या आणि आमची आयुष्ये मनाच्या श्रीमंतीने समृद्ध करणाऱ्या या ९२ वर्षाच्या  जगन्मित्राची म्हणजे हरिभाऊ भावे या आनंदी माणसाची छोटीशी  आठवण .......!!


(Google weather मध्ये आकाश निरभ्र असे दाखवत असतानाच अचानक आठवणींचे ढग जमा होतात आणि कोसळून मोकळे होतात.....गुगलला नकळत)


*विनायक जोशी (vp)*

💬9423005702 

📱9834660237 

१२५७ , मंगलधाम , बी ३ , विठ्ठलवाडी , हिंगणेखुर्द , लेन नं ४ , पुणे ५१

*electronchikatha.blogspot.com*

Lazy Morning अनिल जोशी

 *अनिल पद्माकर जोशी*

१२ जूलै २०२०


Lazy morning 

As the rains drizzled on, any thoughts I had about going out melted away speedily. The next best option was to make tea with ginger and sit at the window. The setting, perfect with Sunday newspaper and songs on YouTube. YouTube AI seems to understand my preferences reasonably well - but it slowly drags away from the theme! So after giving it a start with श्रावणात घन निळा ..it moved on to  ओ सजना बरखा बहार छाई making me conflicted between looking out the window, reading Loksatta or watching Sadhana! The treat continued with 

 नैनो में बदरा छाए followed by a shift  to 

तेरे सुर और मेरे गीत transporting into another era altogether ...and now it has come to my all time favourite -  दीवाना हूअा बादल.  I paused this. After a long time we have the flute vendor on our street. I don't know how many flutes he sells but he entertains all of us with his songs. Has been doing for several years! Since the time before Kimaya was born ..so at least 11 years ! 

Today he is playing different songs apart from the Hero tune and others. A brief sample I could record of  पंख होते तो उड् आती रे .. 

The tea is over and the magic is fading, cleaning beckons. 

Ciao

मीनरास असलेले विनायक जोशी

 // श्री स्वामी समर्थ //


 *मीनरास असलेले विनायक जोशी*


विनायक जोशी (vP)

💬9423005702 

 📱9834660237 


मीन म्हणजे जलचर किंवा पाण्यात आनंदाने राहणारी मंडळी . त्यामुळे आम्ही आनंद सागरात आनंदाने रहात आहोत .


डाॕ.धनंजय केळकर यांचा जलनेती या विषयावरचा व्हिडियो बघितला आणि अॕमेझाॕन कडून तावडेंच्या आनंदभुवन मधून जलनेतीचे ऐतिहासिक पात्र आज आमच्या घरी आले ....



जलनेती मधल्या जल किंवा पाणी या शब्दामुळे जलचर अशा मीन राशीकडे त्रयस्थ म्हणून बघायचा प्रयत्न करत आहे .


 माझी मीन रास असल्यामुळे मीन राशीची किंवा माझी काही वैशिष्ट्ये लिहिताना सोप्पे गेले 😜👍


आरंभशूर , अव्यावहारीक , निरुपद्रवी , कोणतेही दिर्घकालीन ध्येय नसलेली , कमालीची प्रेमळ , भरपूर अंधश्रध्दायुक्त परमार्थ जोपासणारी , कोणत्याही विषयाची चिकित्सा न करणारे , भूतकाळा बद्दल कधीही न हळहळणारे आणि भविष्याची अजिबात चिंता न करणारे , अजातशत्रू , हळवेपणा ओतप्रोत भरलेले , दांडगा जनसंपर्क असलेले , निर्हेतूकपणे काम करणारे , कोणत्याही परिस्थितीत समाधान हुडकुन काढणारे , विश्रांती प्रिय , आपल्या म्हणून मानलेल्या लोकांच्यावर ते गुदमरून जातील इतके प्रेम करणारे , सर्व निर्णय भावनेच्या आधारावर घेणारे , अंथरुण पाहून पाय पसरणारे , पापभिरु वृत्ती असलेले , वादविवाद टाळण्याकडे कल असलेले ........वगैरे वगैरे 


सर्वसामान्य माणसे आनंदात हसतात आणि दुःखात रडतात .

 मीनराशीचा माणूस  आनंदात मोकळेपणाने हसतो आणि दुःखात मात्र विनाकारण मोठ्या मोठ्याने हसत रहातो एकटाच  ......


मीनराशीवाले vP

💬9423005702

📱9834660237 

१२५७ , मंगलधाम , बी ३ , विठ्ठलवाडी , हिंगणेखुर्द , पुणे ५१

*electronchikatha.blogspot.com*

आनंदयात्री संदेश तावडे

 // श्री स्वामी समर्थ //


  *आनंदयात्री*

      *संदेश तावडे*


विनायक जोशी (vP)

💬9423005702 

📱9834660237 


आनंदभुवन या आनंदी वास्तूतील चैतन्य मुर्ती ,  तळजाईचा नियमित वारकरी , तांत्रिक कामात विशेष रस असणारा , कोणतेही नवीन काम आव्हान म्हणून स्विकारणारा आणि सहज पेलणारा ,  आई , शलाका , श्रीया यांना कमालीच्या प्रेमाने जपणारा , पाळीव प्राणी या विषयात खोलवर काम करणारा , जबरदस्त आणि दीर्घकाळ चालणारा शंखनाद करुन कामाला निघत आहे याची दमदार ग्वाही देणारा , आधुनिक तंत्रज्ञान सहज आत्मसात करणारा , कामगार मंडळींच्या बरोबरीने काम करुन प्राॕडक्शन लाईन सुरळीत चालू ठेवणारा , "दादा" अशी कमालीची प्रेमळ हाक मोठ्या भावाला मारणारा , ब्राम्हमुहुर्तावर ऊठून बुलेटला फिरवून आणणारा , समाजकारणात रुची असलेला , शिवरायांची निसिःम भक्ती करणारा अशा *संदेश* ला वाढदिवसाच्या आमच्या कडून  मनःपूर्वक शुभेच्छा 

💐💐🎂🎂💐💐


विनायक आणि कल्याणी जोशी

💬9423005702 

 📱9834660237 

१२५७ , मंगलधाम , हिंगणेखुर्द , विठ्ठलवाडी , पुणे ५१

*electronchikatha.blogspot.com*

मोबाईल बँकिंग

 // श्री स्वामी समर्थ //

   

  *मोबाईल बँकिंग*


विनायक जोशी (vP)

💬9423005702 

 📱9834660237 


बँकिंग या विषयातील मी तज्ञ नाही . तज्ञ मंडळींनी मोबाईल बँकिंग या गोष्टींबद्दल आपले स्पष्ट मत मांडावे ...


चेक बुक , डेबिट कार्ड , क्रेडिट कार्ड असे करत करत आपण भारतीय बनावटीचे रुपे कार्ड वगैरे प्रकार वापरत आहोत .....


सध्या काही राष्ट्रीयकृत बँकांनी डेबिट कार्ड शिवाय पैसे काढता येतील अशी ATM चालू केली आहेत .,


*Digital Payment  व्यवहार ही अत्यंत उपयुक्त आणि जरुरीची गोष्ट आहे*. त्या मधील खाचाखोचा समजून घेऊन आणि योग्य त्या सुरक्षितता पाळून वापरणे महत्त्वाचे आहे ...


याच बरोबर नेट बँकिंग नावाचा प्रकार अनेक वर्षे चालू आहे . सध्याच्या काळात  मोबाईल बँकिंग आणि याच बरोबर 24 * 7 घरबसल्या पैसे ट्रान्सफर करणारे upi याचा वापर भरपूर चालू आहे


या मोबाईल बँकिंग साठी आपल्याला आपल्या खात्याला रजिस्टर्ड केलेला मोबाईल नंबर द्यावा लागतो आणि त्याच्या रेफरन्सनेच पुढचे सर्व व्यवहार घडतात ....


मोबाईल बँकिंग साठी यूजर नेम हे फोन नंबर आहे आणि पासवर्ड किंवा पिन नंबर ४ आकडी फक्त .


वेगवेगळ्या संस्था अत्यंत आकर्षक पध्दतीने *कॕशबॕक* हे गाजर आपल्या तोंडासमोर धरतात आणि त्यांचेच अॕप वापरायची सवय लावतात .....


मोबाईल मध्ये नवीन अॕप लोड करताना फोटो गॕलरी वगैरे अनेक प्रकारच्या परवानग्या आपण फारसा विचार न करता देत असतो ......


*आपल्या मुख्य खात्याला जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर असेल ते खाते मोबाईल बँकिंग किंवा upi वगैरे दैनंदिन गोष्टींना वापरु नये असे मला वाटते* . 


*त्याच्या साठी एखादे सेकंडरी अकाउंट उघडावे आणि दुसरा फोन नंबर त्याला लिंक करावा व त्याच्या मध्ये काही हजारांपेक्षा जास्त बॕलन्स ठेवू नये हे माझे वैयक्तिक मत आहे* .....


सध्या लाॕकडाऊन मध्ये अनेक तज्ञ मंडळी आर्थिक घोटाळे करत आहेत अशावेळी आपले कष्टाचे पैसे आपणच सुरक्षितरीत्या वापरावेत अशी इच्छा ....


कॕशबॕक वगैरे विनोदी गोष्टींसाठी विवेकबुध्दी गहाण टाकू नये म्हणून हा प्रयत्न 




विनायक जोशी (vP)

💬9423005702 

 📱9834660237