// श्री स्वामी समर्थ //
" सिध्दिविनायक मंदिर "
कोलकाता येथील "अल्ट्राटेक सिमेंट दानकुनी "या कारखान्यात या युनिटचे प्रमुख नारायण जोशी यांच्या हस्ते "गणेश मंदिराची " प्रतिष्ठापना झाली. पुण्यातील शंकराचार्य मठात कार्यरत असणारे घनपाठी गुरुजी "अमित जोशी "यांच्या व्यक्तीगत मार्गदर्शना खाली होमहवन आणि प्रतिष्ठापनेचा सोहळा यथासांग पार पडला. सर्व संकल्प सिध्दिला नेणाऱ्या अशा या गजाननाच्या किंवा सिध्दिविनायकाच्या आशिर्वादामुळेच अतिशय प्रसन्न अशा मंदिराची स्थापना झाली. श्री गणेशाची मुर्ती गुरुजींनी शास्रोक्त पध्दतीने बनवून घेतली आहे . कोट्यावधी सूर्यांचे तेज असलेल्या आणि सर्व कामे निर्विघ्नपणाने करुन घेणाऱ्या या बुध्दीच्या देवतेला मनःपूर्वक साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏
विनायक आणि कल्याणी जोशी
9423005702
19 June 2017
electrochikatha.blogspot.com
सोमवार, १९ जून, २०१७
सिध्दिविनायक मंदिर प्रतिष्ठापना ,कोलकाता दानकुनी अल्ट्राटेक सिमेंट
शनिवार, १७ जून, २०१७
" दादा " Fathers Day
// श्री स्वामी समर्थ //
" दादा "
" प्रभाकर गणेश जोशी "
गणेश आणि सरस्वती जोशी या लोणावळा येथे राहणाऱ्या दांम्पत्याला २२ फेब्रुवारी १९३० या दिवशी पहिला मुलगा झाला तो म्हणजे आमचे 'दादा'.आई -वडील आणि धाकटा भाऊ पद्माकर यांच्या बरोबर अतिशय आनंदात बालपण गेले. आजोबांची सोलापूर येथे बदली झाल्यामुळे दादांचे शिक्षण सोलापूर येथील हरिभाई देवकरण प्रशाला या शिक्षण प्रसारक मंडळाच्या उत्तम शिक्षक असलेल्या दर्जेदार विद्यालयात झाले.मॕट्रीकची परीक्षा उत्तम रितीने पास झाल्यानंतर दयानंद काॕलेज मधून BA पूर्ण केले. याच कालखंडात रेल्वे मध्ये नोकरी लागली आणि मंगळवेढा येथील रावसाहेब मायदेव यांच्या मुली बरोबर म्हणजेच यमु मायदेव हिच्या बरोबर विवाह बध्द झाले. अतिशय उत्तम पणाने आणि निष्ठेने कोणतेही काम करायचे या त्यांच्या सहजवृत्तीमुळे अल्पावधीतच नोकरी मध्ये प्रमोशन्स मिळत गेली. १९५९ साली म्हणजेच वयाच्या २९ व्या वर्षीच आजोबांच्या मार्गदर्शना खाली सोलापूर येथील आदर्शनगर मध्ये स्वतंत्र घर बांधून "गुरुप्रसाद" या वास्तूत प्रवेश केला.अक्कलकोट येथील देवअण्णा जोशी यांच्या कडून वयाच्या ३५व्या वर्षी पारमार्थिक अनुग्रह मिळाल्यामुळे अतिशय समाधानी आणि संयमित आयुष्याची वाटचाल झाली.कोणत्याही प्रकारचा भ्रष्ट कारभार न करता किंवा तत्त्वांशी अजिबात तडजोड न करता ३६ वर्षे सरकारी नोकरीत काम केले. आम्ही पाच भावंडे आणि आजी आजोबा अशा ९ जणांची कोणत्याही प्रकारची हेळसांड न करता आदर्शवत संसार केला.बालगंधर्वांपासून ते सोलापूरच्या फैय्याज पर्यंत सर्वांची संगीत नाटके त्यांनी आनंदाने बघितली होती , पतौडीच्या फिल्डींग पासून ते सेहवागच्या बॕटींग पर्यंत आवडणारे अनेक विषय त्यांच्या खात्यात होते , रामदास स्वामींच्या करुणाष्टका पासून ते लाॕर्ड टेनिसनच्या कवितां पर्यंत अनेक गोष्टी त्यांना मुखोद्गत होत्या. रिटायरमेंट नंतर मात्र नातवंडांच्या बरोबरीने खेळत खेळत त्यांच्या स्वतःच्या अत्यंत आवडत्या क्षेत्राचा म्हणजे परमार्थाचा खोलवर अभ्यास त्यांनी केला. समर्थांच्या शिवथरघळीत राहून दासबोधाचा अभ्यास केला.सखोल दासबोध किंवा गीता दर्शन यांच्या अभ्यासाने स्वतःची पारमार्थिक उन्नती करुन घेतली. पहाटे ब्राह्म मुहूर्तावर उठून नामस्मरणाने दिवसाची सुरुवात करणाऱ्या आणि काया - वाचा - मनाने अतिशय निर्मळ व्यवहार करणाऱ्या दादांची आठवण येत नाही असा आमचा एकही दिवस जात नाही .......!
विनायक जोशी (VP)
9423005702
electronchikatha.blogspot.com
प्रभाकर गणेश जोशी
(१९३०-२००४)
९५२ , "गुरुप्रसाद "
आदर्शनगर ,
सोलापूर
४१३००३