मंगळवार, २४ नोव्हेंबर, २०२०

आनंदयात्री विनायक जोशी

 // श्री स्वामी समर्थ //

    *आनंदयात्री*

विनायक प्रभाकर जोशी


     *विनायक जोशी (vp)*

 💬9423005702

 📱9834660237 


माझ्याकडे आनंदी स्वभाव नावाचे एक साधे सोप्पे साधन होते . त्याच्या मदतीने मी सहजतेने छान काम करायला सुरूवात केली . आपल्या सहवासात येणारी माणसे किंवा आपण वापरत असलेल्या  वस्तू किंवा वास्तू यांच्या बरोबर प्रेमाने काम करणे एवढे एकच व्रत पाळले . 


एका वेगळ्या अनुभवाच्या जगात प्रवेश केला . कोणत्याही गोष्टींची अथवा माणसांची भिती सहजपणे संपुष्टात आली .कोणालाही फाॕलो करावे किंवा कोणीही आपला आदर्श ठेवावा असे वाटले नाही . 


दररोज  उत्साहाने आणि आनंदाने  काम सुरू करणे आणि काम उत्तम पणे पूर्ण करणे एवढाच दिनक्रम ठेवला . चांगल्या किंवा आनंददायी गोष्टींच्या लाटा मनापासून अनुभवल्या . व्यावहारिक मोजमापाच्या पट्यांच्या जवळ जायचा मोह टाळला .


 स्वतःला स्वतःचा कंटाळा येईल असा वागलो नाही . आपले स्वतःला आवडणारे काम थांबल्या नंतर सहजपणे १०० दिवस आपण आपल्या घरात आनंदाने राहू शकतो याचा अनुभव घेतला . 


 स्वतःवरती प्रेम आणि स्वतःवरती विश्वास या मूलभूत गोष्टी आपोआप जोपासल्या गेल्या .


कोणत्याही संकल्पनेच्या दोन ओळींमधील दडलेला अर्थ सहजपणे  वाचायला यायला लागला की मिळणारी आनंदाची अनुभूती अनुभवली .खूप वर्षे आनंदाने काम केल्यामुळे छान अशा समाधानाच्या अनेक पायवाटा तयार झाल्या आहेत . या नंतर मात्र आनंदयात्री बनण्यासाठीचा महामार्ग स्वच्छ आणि स्पष्टपणे दिसायला लागला .


एकदा या रस्त्यावरचा प्रवास सुरू झाला म्हणजे त्या नंतर मात्र तुम्हाला कोणाही कडून काहिही नको असते.

फक्त आनंदाचे डोही आनंद तरंग अनुभवायचे आपल्या छोट्याशा मंगलमय आणि समृद्ध अशा घरट्यात शांतपणे कल्याणी बरोबर ....


*विनायक जोशी(vp)*

 💬9423005702

 📱9834660237 

१२५७ , मंगलधाम ,बी ३ , विठ्ठलवाडी ,हिंगणे खुर्द ,लेन नं ४ , पुणे ५१

*electronchikatha.blogspot.com*

चैतन्यमुर्ती हरिभाऊ भावे काका

 // श्री स्वामी समर्थ  //

     *चैतन्य मुर्ती*

     *हरिभाऊ भावे काका*


विनायक जोशी (vP)

💬9423005702 

📱9834660237 



साधारणपणे १९८४ मध्ये वयाची साठी गाठलेल्या या तरुणाची आणि माझी पहिली भेट झाली.


लष्करातील आणि रेल्वे मधील नोकरी मुळे शेकडो अनुभवांचा खजिना त्यांच्या कडे होता .वयाच्या ५२ व्या वर्षी दोन हार्ट अॕटॕक पाठोपाठ येऊन सुध्दा केवळ अत्यंत आनंदी स्वभाव , निरपेक्ष वृत्ती , स्वाभिमानी बाणा यामुळे वयाच्या ९२व्या वर्षापर्यंत त्यांना प्रकृती किंवा परिस्थिती बद्दल कुरकुरताना कधीही बघितले नाही. 


सर्व आहार विहारात कमालीची शिस्त ते पाळत . एकमेकांच्या पासून कितीही लांब किंवा दूर अंतरावर असलो तरी आनंदी माणसांच्या मध्ये  काहीही न बोलता  विचारांची देवाणघेवाण होऊ शकते याची प्रचीती यांच्यामुळेच आली. ज्या ठिकाणी जातील तेथे आनंदाच्या असंख्य लाटांची निर्मिती ते सहजतेने  करत असत. 


शेवटच्या काळात त्यांनी जोडीदार गेल्याचे दुःख कसोशीने लपवून ठेवले होते. सोलापूर मधील वैशंपायनांच्या सहवासात अध्यात्माचे गिरवलेले धडे यावेळी त्यांना कमालीचे उपयोगी पडले.


  महिन्यातून कमीतकमी एकदा  दुपारच्या वेळी अचानकपणे मी त्यांना भेटायला म्हणून  जायचो . ते एकटे असायचे .भरपूर मोकळ्या गप्पा मारायचो . प्रचंड हसायचो .छान पैकी पाठ चेपून द्यायचो .त्यांची नजर अंधूक झाली होती तरी फक्त आवाज ओळखून आलेल्या माणसांशी ते आनंदाने बोलत असत. 


२०१५ सालच्या  जानेवारीत राव हाॕस्पिटल या दवाखान्यात त्यांना भेटायला गेलो . त्या वेळी त्यांना न्युमोनिया झालेला होता. एका isolated room मध्ये त्यांना ठेवले होते. आता परतीचा रस्ता नव्हता .

मरणाला अजिबात न घाबरता ते स्थितप्रज्ञा सारखे सामोरे गेले.दवाखान्यातून स्वतःहून डिसचार्ज घेऊन घरी आले आणि शांतपणाने २५ जानेवारी २०१५ या दिवशी पत्नीला भेटायला स्वर्गाकडे निघून गेले.


 ३२ वर्षांच्या आमच्या मैत्री मध्ये कोणत्याही गोष्टी साठी कधीही उदासवाणे बसलेले मी त्यांना बघितले नाही.

 काळानुरुप स्वतःमध्ये बदल करुन कायम आनंदी राहिलेल्या आणि आमची आयुष्ये मनाच्या श्रीमंतीने समृद्ध करणाऱ्या या ९२ वर्षाच्या  जगन्मित्राची म्हणजे हरिभाऊ भावे या आनंदी माणसाची छोटीशी  आठवण .......!!


(Google weather मध्ये आकाश निरभ्र असे दाखवत असतानाच अचानक आठवणींचे ढग जमा होतात आणि कोसळून मोकळे होतात.....गुगलला नकळत)


*विनायक जोशी (vp)*

💬9423005702 

📱9834660237 

१२५७ , मंगलधाम , बी ३ , विठ्ठलवाडी , हिंगणेखुर्द , लेन नं ४ , पुणे ५१

*electronchikatha.blogspot.com*

Lazy Morning अनिल जोशी

 *अनिल पद्माकर जोशी*

१२ जूलै २०२०


Lazy morning 

As the rains drizzled on, any thoughts I had about going out melted away speedily. The next best option was to make tea with ginger and sit at the window. The setting, perfect with Sunday newspaper and songs on YouTube. YouTube AI seems to understand my preferences reasonably well - but it slowly drags away from the theme! So after giving it a start with श्रावणात घन निळा ..it moved on to  ओ सजना बरखा बहार छाई making me conflicted between looking out the window, reading Loksatta or watching Sadhana! The treat continued with 

 नैनो में बदरा छाए followed by a shift  to 

तेरे सुर और मेरे गीत transporting into another era altogether ...and now it has come to my all time favourite -  दीवाना हूअा बादल.  I paused this. After a long time we have the flute vendor on our street. I don't know how many flutes he sells but he entertains all of us with his songs. Has been doing for several years! Since the time before Kimaya was born ..so at least 11 years ! 

Today he is playing different songs apart from the Hero tune and others. A brief sample I could record of  पंख होते तो उड् आती रे .. 

The tea is over and the magic is fading, cleaning beckons. 

Ciao

मीनरास असलेले विनायक जोशी

 // श्री स्वामी समर्थ //


 *मीनरास असलेले विनायक जोशी*


विनायक जोशी (vP)

💬9423005702 

 📱9834660237 


मीन म्हणजे जलचर किंवा पाण्यात आनंदाने राहणारी मंडळी . त्यामुळे आम्ही आनंद सागरात आनंदाने रहात आहोत .


डाॕ.धनंजय केळकर यांचा जलनेती या विषयावरचा व्हिडियो बघितला आणि अॕमेझाॕन कडून तावडेंच्या आनंदभुवन मधून जलनेतीचे ऐतिहासिक पात्र आज आमच्या घरी आले ....



जलनेती मधल्या जल किंवा पाणी या शब्दामुळे जलचर अशा मीन राशीकडे त्रयस्थ म्हणून बघायचा प्रयत्न करत आहे .


 माझी मीन रास असल्यामुळे मीन राशीची किंवा माझी काही वैशिष्ट्ये लिहिताना सोप्पे गेले 😜👍


आरंभशूर , अव्यावहारीक , निरुपद्रवी , कोणतेही दिर्घकालीन ध्येय नसलेली , कमालीची प्रेमळ , भरपूर अंधश्रध्दायुक्त परमार्थ जोपासणारी , कोणत्याही विषयाची चिकित्सा न करणारे , भूतकाळा बद्दल कधीही न हळहळणारे आणि भविष्याची अजिबात चिंता न करणारे , अजातशत्रू , हळवेपणा ओतप्रोत भरलेले , दांडगा जनसंपर्क असलेले , निर्हेतूकपणे काम करणारे , कोणत्याही परिस्थितीत समाधान हुडकुन काढणारे , विश्रांती प्रिय , आपल्या म्हणून मानलेल्या लोकांच्यावर ते गुदमरून जातील इतके प्रेम करणारे , सर्व निर्णय भावनेच्या आधारावर घेणारे , अंथरुण पाहून पाय पसरणारे , पापभिरु वृत्ती असलेले , वादविवाद टाळण्याकडे कल असलेले ........वगैरे वगैरे 


सर्वसामान्य माणसे आनंदात हसतात आणि दुःखात रडतात .

 मीनराशीचा माणूस  आनंदात मोकळेपणाने हसतो आणि दुःखात मात्र विनाकारण मोठ्या मोठ्याने हसत रहातो एकटाच  ......


मीनराशीवाले vP

💬9423005702

📱9834660237 

१२५७ , मंगलधाम , बी ३ , विठ्ठलवाडी , हिंगणेखुर्द , पुणे ५१

*electronchikatha.blogspot.com*

आनंदयात्री संदेश तावडे

 // श्री स्वामी समर्थ //


  *आनंदयात्री*

      *संदेश तावडे*


विनायक जोशी (vP)

💬9423005702 

📱9834660237 


आनंदभुवन या आनंदी वास्तूतील चैतन्य मुर्ती ,  तळजाईचा नियमित वारकरी , तांत्रिक कामात विशेष रस असणारा , कोणतेही नवीन काम आव्हान म्हणून स्विकारणारा आणि सहज पेलणारा ,  आई , शलाका , श्रीया यांना कमालीच्या प्रेमाने जपणारा , पाळीव प्राणी या विषयात खोलवर काम करणारा , जबरदस्त आणि दीर्घकाळ चालणारा शंखनाद करुन कामाला निघत आहे याची दमदार ग्वाही देणारा , आधुनिक तंत्रज्ञान सहज आत्मसात करणारा , कामगार मंडळींच्या बरोबरीने काम करुन प्राॕडक्शन लाईन सुरळीत चालू ठेवणारा , "दादा" अशी कमालीची प्रेमळ हाक मोठ्या भावाला मारणारा , ब्राम्हमुहुर्तावर ऊठून बुलेटला फिरवून आणणारा , समाजकारणात रुची असलेला , शिवरायांची निसिःम भक्ती करणारा अशा *संदेश* ला वाढदिवसाच्या आमच्या कडून  मनःपूर्वक शुभेच्छा 

💐💐🎂🎂💐💐


विनायक आणि कल्याणी जोशी

💬9423005702 

 📱9834660237 

१२५७ , मंगलधाम , हिंगणेखुर्द , विठ्ठलवाडी , पुणे ५१

*electronchikatha.blogspot.com*

मोबाईल बँकिंग

 // श्री स्वामी समर्थ //

   

  *मोबाईल बँकिंग*


विनायक जोशी (vP)

💬9423005702 

 📱9834660237 


बँकिंग या विषयातील मी तज्ञ नाही . तज्ञ मंडळींनी मोबाईल बँकिंग या गोष्टींबद्दल आपले स्पष्ट मत मांडावे ...


चेक बुक , डेबिट कार्ड , क्रेडिट कार्ड असे करत करत आपण भारतीय बनावटीचे रुपे कार्ड वगैरे प्रकार वापरत आहोत .....


सध्या काही राष्ट्रीयकृत बँकांनी डेबिट कार्ड शिवाय पैसे काढता येतील अशी ATM चालू केली आहेत .,


*Digital Payment  व्यवहार ही अत्यंत उपयुक्त आणि जरुरीची गोष्ट आहे*. त्या मधील खाचाखोचा समजून घेऊन आणि योग्य त्या सुरक्षितता पाळून वापरणे महत्त्वाचे आहे ...


याच बरोबर नेट बँकिंग नावाचा प्रकार अनेक वर्षे चालू आहे . सध्याच्या काळात  मोबाईल बँकिंग आणि याच बरोबर 24 * 7 घरबसल्या पैसे ट्रान्सफर करणारे upi याचा वापर भरपूर चालू आहे


या मोबाईल बँकिंग साठी आपल्याला आपल्या खात्याला रजिस्टर्ड केलेला मोबाईल नंबर द्यावा लागतो आणि त्याच्या रेफरन्सनेच पुढचे सर्व व्यवहार घडतात ....


मोबाईल बँकिंग साठी यूजर नेम हे फोन नंबर आहे आणि पासवर्ड किंवा पिन नंबर ४ आकडी फक्त .


वेगवेगळ्या संस्था अत्यंत आकर्षक पध्दतीने *कॕशबॕक* हे गाजर आपल्या तोंडासमोर धरतात आणि त्यांचेच अॕप वापरायची सवय लावतात .....


मोबाईल मध्ये नवीन अॕप लोड करताना फोटो गॕलरी वगैरे अनेक प्रकारच्या परवानग्या आपण फारसा विचार न करता देत असतो ......


*आपल्या मुख्य खात्याला जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर असेल ते खाते मोबाईल बँकिंग किंवा upi वगैरे दैनंदिन गोष्टींना वापरु नये असे मला वाटते* . 


*त्याच्या साठी एखादे सेकंडरी अकाउंट उघडावे आणि दुसरा फोन नंबर त्याला लिंक करावा व त्याच्या मध्ये काही हजारांपेक्षा जास्त बॕलन्स ठेवू नये हे माझे वैयक्तिक मत आहे* .....


सध्या लाॕकडाऊन मध्ये अनेक तज्ञ मंडळी आर्थिक घोटाळे करत आहेत अशावेळी आपले कष्टाचे पैसे आपणच सुरक्षितरीत्या वापरावेत अशी इच्छा ....


कॕशबॕक वगैरे विनोदी गोष्टींसाठी विवेकबुध्दी गहाण टाकू नये म्हणून हा प्रयत्न 




विनायक जोशी (vP)

💬9423005702 

 📱9834660237

मैत्र जीवाचे

 // श्री स्वामी समर्थ //


     *मैत्र जीवाचे*


        2 August 2020

             *विनायक जोशी(vp)*

💬9423005702 

📱9834660237 


"कर्माचा सिद्धांत " या पुस्तकात मागील जन्मातील "कर्मांच्या " बद्दल विस्तृत माहिती आहे. मला स्वतःला मात्र माझ्या आयुष्यात आलेल्या अनेक मित्रमैत्रिणींचा आणि माझा मागच्या जन्मातील राहिलेला सहवास होता असे कायम वाटते.


 सहवास ही स्नेहाची पहिली पायरी असली तरी कायम आपले चांगले व्हावे म्हणून झटणारी , सर्व मर्यादा ओलांडून वाहून घेणारी, निरपेक्षपणे वाटेल ते काम करणारी बरीच जिवलग मंडळी  माझ्या आयुष्यात आहेत. 


असंख्य मित्रांच्या बरोबरीने  आयुष्यभर पुरतील अशा आनंददायी आठवणीं मुळे समृद्ध आणि समाधानी आयुष्य जगता येत आहे.अतिशय आवडणारे क्षेत्र आणि उत्तम सहकारी यांच्या बरोबरीने  काम करायला मिळाल्या मुळे वेगवेगळ्या प्रकारचे आनंददायी अनुभव मनात कोरले गेले आहेत. 


अत्यंत एकाग्रपणे स्वतःला आवडणारे काम वेगळेपणाने आणि वेगाने करणाऱ्या किंवा ज्यांचे काम बघणे हा सुध्दा आनंददायी अनुभव वाटायचा अशा अनेक कलंदर मित्रांचा मनस्वीपणा अनुभवता आला ! या सर्वांनी हातचे काहिही राखून न ठेवता बरेच बारकावे मला शिकविले .त्या सर्व अव्यवहारी वेडेपणा करणाऱ्या मित्रांची आज आलेली ही आठवण आहे.


 "अमृततुल्य चहा"नावाच्या स्वर्गीय टपरीवर "कटिंगचहा"  मित्रांच्या बरोबर घेणे हा न संपणारा अलौकिक योग मी असंख्य वेळेला अनुभवला आहे. 


 बेफिकीर आणि मनसोक्त अशा प्रकारे जगलेल्या असंख्य  मजेदार आणि आनंददायी आठवणींचा तुफान असा पाऊस कोसळायला लागतो आणि श्रावणमासी हर्ष मानसी या ओळी हात धरून नाचायला लागतात. 


साधारणपणे आमच्याकडे क्लासला येणाऱ्या पाचवीच्या गँग पासून ते नव्वदी सहजपणे पार केलेल्या दिलदार देशमुखां पर्यंत असा मोठ्ठा मित्र परीवार छान आनंदाने कार्यरत आहे .


  *मैत्र*" या कॕटेगरी मध्ये असलेल्या असंख्य मंडळीं मध्ये  आणि माझ्यात असलेला एकमेव घट्ट दुवा म्हणजे *अत्यंत मनस्वीपणा फक्त* ! !

 


   *विनायक जोशी ( vp )*

   💬9423005702

  📱9834660237 


१२५७ , मंगलधाम , बी ३, विठ्ठलवाडी , हिंगणेखुर्द , लेन नंबर ४ , पुणे ५१

*electronchikatha.blogspot.com*

राखी पौर्णिमा

 // श्री स्वामी समर्थ  //

       

*राखीपौर्णिमा*

           3/08/2020


*प्रतिभ , सुनित , मंगल*


कायमस्वरुपी समजूतदारपणा दाखवून भावांचे कमालीचे कौतुक  करणाऱ्या बहिणी.


 परमेश्वराने आयुष्यभरासाठी दिलेली आनंददायी साथ म्हणजे बहिणी.


 प्रतिभ , सुनित आणि मंगल अशा तीन बहिणींचे जबरदस्त नशीबवान भाऊ म्हणजेच *विंठ्या आणि नान्या*


*विनायक आणि नारायण* 

💬9423005702 

📱9834660237

सोमवारचे सोमनाथ दर्शन

 //श्री स्वामी समर्थ //

   *सोमवार*


      3/8/2020


साधारणपणे गेली चाळीस ते पन्नास वर्षे मोठ्ठी ताई सोमवारचा उपवास मनापासून करत आहे . दोन तीन वर्षापूर्वी ती अमेरिका दौऱ्यावर निघाली होती . तो दिवस नेमका सोमवार होता संध्याकाळी मुंबई अबुधाबी फ्लाईट होते . त्याच्याआधी ३ तास मुंबई विमानतळावर हजेरी लावायची होती .

 

तिच्या विमानाच्या प्रवासाची स्थिती कळावी म्हणून फ्लाईट ट्रॕकर वरती मी तिचे विमान बघत होतो . नियोजित वेळी विमानाने मुंबई वरुन  टेकआॕफ केले . थोड्याच वेळात विमान गुजराथ वरुन जाऊ लागले आणि काही वेळात ते सोमनाथ या ठिकाणा वरुन जाणार हे लक्षात आले .


 विमान बरोबर सोमनाथ वर असताना फ्लाईट ट्रॕकर वरुन  स्क्रिनशाॕट घेतला आणि ताईला पाठवला व मेसेज दिला......

*विमान बरोबर सोमनाथच्या जवळ आहे . शंभूमहादेवांचे स्मरण कर आणि उपवास सोड*

🙏🙏🙏


विनायक जोशी (vP)

💬9423005702 

📱9834660237 

१२५७ , मंगलधाम , बी ३ , विठ्ठलवाडी , हिंगणेखुर्द , पुणे ५१

*electronchikatha.blogspot.com*

स्वर्गिय मुन्नार

 // श्री स्वामी समर्थ //


    *स्वर्गीय मुन्नार*


       4/8/2020

          

       *विनायक जोशी (vp)*

 💬9423005702

 📱9834660237 



   केरळ मधील अतिशय सुंदर असे डोंगरावरचे गाव म्हणजेच *मुन्नार*.या गावाच्या  जवळचे चहाचे मळे टाटांनी विकत घेतले  होते. साधारणपणे शंभर वर्षांपूर्वी इंग्रजांनी आणि तेथील मूळ स्थानिक लोकांच्या मधील *कानन आणि देवन* या बंधूनी डोंगर उतारावर चहाची असंख्य झाडे अत्यंत शिस्तबद्ध पध्दतीने लावलेली होती.


टाटांनी हे मळे विकत घेतले त्यावेळी चहाची काही झाडे १०० वर्ष जुनी होती. मी ज्यावेळी "मुन्नार " मध्ये गेलो होतो त्यावेळी तेथे फक्त दोन हाॕटेल्स होती .ज्यांचा वापर टाटांच्या कडे येणाऱ्या पाहुण्यांसाठी होत असे. गावामध्ये एक अत्यंत सुंंदर चर्च होते. त्या ठिकाणी धीरगंभीर अशा आवाजाची एक प्रचंड घंटा होती.दिवसभर ढगांचे पांढरे शुभ्र थवे एकामागून एक असे येऊन पूर्ण मुन्नारला भेट देऊन जात असत.


इंग्रजांच्या काळातील एकमेकांच्या पासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर  दूर असे अनेक बंगले आणि त्यांच्या नोकर वर्गाची घरे  अशा प्रकारच्या अनेक  वस्त्या होत्या. चहाच्या मळ्यात पाने खुडणाऱ्या बायकांच्या पाठीवर पाने गोळा करण्यासाठी टोपल्या असत आणि हातात मार्कर स्टीक.चहाची पाने कोणत्या लेव्हल पर्यंत तोडायची याची अनुभव सिध्द पध्दत होती.


या चहाच्या मळ्यांच्या आसपास असंख्य उंच उंच अशा वृक्षांचे जंगल होते.या जंगलात पक्षांच्या पेक्षा हत्ती जास्त होते. या डोंगराच्या मधील दरीत पांढरी शुभ्र अशी "टाटा टी" ही चहाची फॕक्टरी होती.


या ठिकाणी खुडलेल्या पानांच्या पासून  वेगवेगळ्या दर्जाची चहाची पावडर तयार करायचे अनेक  विभाग होते.या येथेच भारतातील पहिले असे चहा पावडर पाॕलिथीन बॕगे मध्ये भरायचे मशिन होते.टाटांनी या क्षेत्रात पाॕलिथीन बॕग मधील चहा ही संकल्पना घेऊन प्रवेश केला होता. त्या पहिल्या वहिल्या मशीन साठी आम्ही तेथे गेलो होतो .


त्या वेळी पर्यटकांना उपयुक्त अशा कोणत्याही सुविधा मुन्नार मध्ये नव्हत्या.

"मल्याळम तरीयादे" एवढे एकच वाक्य पाठ करुन मी  भारतातील या अत्यंत निसर्ग संपन्न डोंगराळ भागात आमच्या मशिनसाठी गेलो होतो. येथील जंगल ,चहाचे मळे, ढगांची शाळा आणि अत्यंत शांत वातावरणात माझा  " Signal Processing " या विषयाचा प्रॕक्टीकल अभ्यास सुरु झाला.


 सलग पंचवीस दिवस मी येथे होतो. इलेक्ट्रॉनिक्स मधील आणि अॕटोमॕटीक पॕकेजिंग मशीन्स मधील *अतिशय मूलभूत प्रॕक्टीकल असे ज्ञान या गावात मिळाले* आणि हे  शिक्षण देणारा गुरु म्हणजे जर्मन बनावटीचा Automatic weigher होता. ज्याचे नाव होते *Automa* 


*विनायक जोशी (vp )*

💬9423005702

📱9834660237 

१२५७,मंगलधाम , बी३, हिंगणेखुर्द , लेन नंबर ४ , पुणे ५१.

*electronchikatha.blogspot.com*

मंगेशकर भक्त रसिक बाळूकाका फाटक

 // श्री स्वामी समर्थ //


   *मंगेशकर भक्त*


  *रसिक बाळूकाका*


        *विनायक जोशी (vp)*

💬9423005702

📱9834660237


कोणत्याही कलावंताचा आत्मा म्हणजे रसिक असा प्रेक्षक असतो. दैनंदिन आयुष्यात जगण्यासाठी म्हणून कलावंताना मानधनाची पाकिटे घ्यावी लागत असली तरी संतुष्ट अशा रसिकांची मिळणारी दाद ही जास्त अनमोल असते.


अशाच एका अत्यंत कलासक्त असलेल्या किंवा जुन्या गाण्यांची ओळन् ओळ पाठ असलेल्या रसिक माणसाची आणि माझी गाठ पडली होती.


 घरामध्ये अजिबात संगीताचे वातावरण नसताना या सद्गृहस्थाला मात्र या मधील बारकावे अतिशय बारकाईने कळत .गाण्याचा लहेजा  किंवा गाण्याच्या  मधील ठेहराव ,गाण्यातील शब्दांचे योग्य जागी होणारे अचूक लँडींग या बाबतीत कमालीची खोल जाण त्यांना होती. 


कलाकारांना सुध्दा बऱ्याच वेळेला आपली कला सादर करताना समोरून तसाच उत्तम दर्जाचा प्रतिसाद मिळत गेला तर ती कलाकृती सर्वांचीच भरभरून दाद घेऊन जाते. वेडे रसिक या कॕटेगरी मध्ये बसणारा हा अत्यंत हूशार गृहस्थ व्यवहारी जगापासून फारच दूर होता. 


*लता मंगेशकर* यांनी गायलेली बहूतांश गाणी ही त्या मधील सर्व बारकाव्यां सकट त्यांना पाठ होती.सकाळी उठल्या पासून त्याच नादात अगदी मध्यरात्र होई पर्यंत .कोणतेही जादा कष्ट न करता सहजपणे डाॕक्टर होईल अशा प्रकारची कुशाग्रता असलेला हा माणूस अभ्यास सोडून वेगवेगळ्या कार्यक्रमाना हजेरी लावत फिरत होता.


त्यांचा आदर्श असलेल्या मंगेशकरांच्या *प्रभूकुंज* ला सुध्दा त्यांनी भेट दिलेली होती आणि अर्थातच कुरुंदवाडचे पेढे त्यांना द्यायला म्हणून नेत असत.मंगेशकर कुटुंबातील तिसऱ्या पिढीची मंडळी सुध्दा या रसिक माणसाला कोठेही भेटली तरी आदराने ओळख देत असत. 


पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिलेल्या गाण्यातील वाद्यांबद्दल त्यांच्या कडूनच जादाची माहिती ते घेत असत .वेष असावा बावळा , परी अंतरी नाना कळा अशा प्रकारे राहणाऱ्या  या जबरदस्त संगीतप्रेमी माणसाला वेळेचे,व्यवहाराचे किंवा शिस्तबद्ध आयुष्याचे अजिबात भान नव्हते . 


 साचेबध्द , संस्कारी वगैरे प्रकारे आयुष्य जगणाऱ्या आणि त्यालाच यशस्वी म्हणणाऱ्या आमच्या सारख्या सामान्य माणसांची ही "वादळे "अजिबात पर्वा करत नाहीत .ती येतात .त्यांना पाहीजे तशी विन्मुक्त पणे राहतात आणि अचानक एके दिवशी स्वर्गीय संगीत ऐकण्यासाठी स्वर्गाकडे निघून जातात अगदी  आमच्या बाळूकाकांच्या सारखी म्हणजेच कुरुंदवाडच्या *अनंत जगन्नाथ फाटक* या अवलिया सारखी !


*विनायक जोशी (vp )*

 💬9423005702

  📱9834660237

१२५७ , मंगलधाम , बी ३, विठ्ठलवाडी , हिंगणेखुर्द , लेन नं ४ , पुणे ५१

*electronchikatha.blogspot.com*

डेंजरस ड्रायव्हर्स साॕफ्टवेयर मंदारी आणि टीम

 *DSP मास्टर अशा आपल्या मंदार सोवनी*

 यांनी इमेज ग्रॕबिंग मधील आधुनिक  तंत्रज्ञानाचा वापर करुन डेंजरस कार ड्रायव्हर्स ओळखण्याचे तंत्र विकसित केले आहे ..याच्या ट्रायल्स मार्च पासून चालू होत्या . बेल्ट न लावता गाडी चालवणे किंवा गाडी चालवत असताना मोबाईलवर बोलणे हे आता अॕटोमॕटीक डिटेक्ट होईल . हे युनीट सेनसेन कंपनीने डेव्हलप केले आहे . साॕफ्टवेयर कोड  पूर्णपणे  मंदारने लिहिला आहे आणि फोटोत असलेल्या गाडी मध्ये तोच बसून या युनीटची उपयुक्तता दाखवत आहे @ मेलबर्न आॕस्ट्रेलिया

👏👏👏👍

९५२ , गुरुप्रसाद , आदर्श नगर सोलापूर

 // श्री स्वामी समर्थ //

        *९५२ , गुरुप्रसाद*

 आदर्श नगर , सोलापूर 


   २७ जुलै २०२० 


  *विनायक जोशी (vp)*

💬9423005702

 📱9834660237


*२ एप्रिल १९५९* या दिवशी "गुरुप्रसाद" या आठ खोल्यांच्या आनंदी वास्तूत आज्जी-आजोबा , आई-दादा आणि प्रतिभ , सुनीत यांनी गृहप्रवेश केला.

सोलापूर मधील अतिशय सुंदर अशा आदर्शनगर या काॕलनी मधे आमचे घर आहे.


 या घराला बेले महाराज , देवअण्णा जोशी , चिदंबरस्वामींचे वंशज दिक्षित यांचे आशिर्वाद लाभले आहेत .या ठिकाणी रामनवमी सारखे उत्सव अत्यंत उत्साहाने पार पडले आहेत .


 घराच्या आवारात भालदार चोपदारा सारखे उभे असे दोन औदुंबर आहेत.त्यांना खेटून हिरवागार कडूनिंब आहे. औषधी करंजी आहे , लालबुंद बदाम आहे , अशोक आणि आंबा एकमेकांशी स्पर्धा करत आहेत. प्रत्येक सोमवारी लागणारा बेल आहे.आवळा आणि शेवगा एकटेच ऊभे आहेत.सिताफळ आणि काटेरी वाघनखे असलेला गजगा आहे.तगरी ,जास्वंद ,अबोली आणि पारिजातक यांच्या वेगळ्या गप्पा चालू आहेत.


दारात तुळशी वृंदावन आहे.सोनचाफा मात्र  स्थितप्रज्ञा सारखा पाहतो आहे. असंख्य पक्षांची घरटी आहे.भरपूर खारी आहेत .कावळे , साळूंक्या आणि पोपट आहेत.सतत रंग बदलणारे सरडे आहेत .रात्री मात्र सर्व पक्षी झोपले की वटवाघुळांचे राज्य चालू होते. 


औदुंबराच्या पारावर आईच्या असंख्य आठवणी आहेत . देवघरात वडीलांचे अस्तित्व आहे. घराच्या दरवाजात ऊभे राहून कायम कोणाची तरी काळजी करत वाट बघणाऱ्या आजीच्या आठवणी आहेत .या *एकसष्ठी* पूर्ण  केलेल्या घरात आमच्या  सर्वांच्या असंख्य आठवणी आहेत. आजही सोलापूरला गेल्यावर संध्याकाळी ऊदबत्ती लावून भीमरुपी , रामरक्षा वगैरे मोठ्याने म्हणून घेतले किंवा  पहाटेच्या वेळी घराच्या आवारात शुभशकुनी अशी भारद्वाजांची तुकतुकीत जोडी दिसली म्हणजे  सोलापूरला आल्याचे चीज झाले असे वाटते ..........


(या वर्षी २५ एप्रिल ते २५ मे असा वेळ या घराच्या डागडूजीसाठी ठेवला होता )


   *विनायक प्रभाकर  जोशी ( vp)*

💬9423005702

📱9834660237


९५२ , गुरूप्रसाद ,आदर्शनगर,   सदरबझार , सोलापूर ४१३००३


*electronchikatha.blogspot.com*

श्रावण २०२० vP

 // श्री स्वामी समर्थ //


    *श्रावण*


   5/8/2020


*प्रिय*, 


        मी ब्राॕडकास्ट लिस्टच्या माध्यमातून  पाठविलेले मजकूर कमालीच्या सहनशीलतेने आणि संयम ठेवून वाचतात त्या सर्वांसाठी "प्रिय" हा शब्द राखीव ठेवला आहे ....


 श्रावणात येणारा छान पाऊस सध्या सर्वत्र पडत आहे . या चैतन्य पूर्ण ऋतूत आपणही छान काहीतरी करावे असा प्रयत्न मी सध्या  करत आहे.......


आपल्या शास्रानुसार विधिलिखित किंवा डेस्टीनी आपण बदलू शकत नाही कारण ती पूर्व नियोजित आहे. परंतु या निमित्ताने आपल्या दैनंदिन सहवासात येणारा प्रत्येक जीव किंवा आपल्या बाबतीत घडणाऱ्या सर्व गोष्टी उत्साहवर्धक , अविस्मरणीय कशा होतील हे पाहणे आपल्या हातात आहे आणि या वास्तवाची  मला अगदी तरुण असतानाच माहिती झाली होती ...


१९६३ ते १९८४ या काळातील  समृध्द असे बालपण , तरुणपण आणि १९८४ ते २०२० अशी ३६ वर्षे  आपल्याला अत्यंत आवडणारे काम मी कमालीच्या आनंदाने आणि कोणत्याही प्रकारची तडजोड न करता केले आहे ...


माझा स्वभाव कमालीचा पाॕझिटीव्ह किंवा आशादायी असा आहे परंतु उद्या या गोष्टी बद्दल मला फारसे ज्ञान नाही . त्यामुळेच आजच्या गोष्टीला आजच छान , उत्तम अशी दाद मनमोकळेपणाने द्यायची मला सवय लागली आहे ....


सोशल मिडिया वरती परफाॕर्म करावे किंवा रेंगाळत बसावे असे मला कधीही वाटत नाही किंवा वाटले नाही . माझा मूळ स्वभाव हा माणसांच्यात रमणारा आहे परंतु मला शांततेशी गप्पा मारायला कमालीच्या आवडतात . त्यामुळे गेल्या ४ महिन्यात जास्तीत जास्त वेळ घरात राहून सुध्दा एक क्षणही कंटाळवाणा गेला नाही .......


 आनंदयात्री


    *विनायक जोशी (vP)*

💬9423005702 

📱9834660237 

१२५७ , मंगलधाम , बी ३ , विठ्ठलवाडी , हिंगणेखुर्द , पुणे ५१

*electronchikatha.blogspot.com.*

आभाळमाया "आज्जी"

 // श्री स्वामी समर्थ //

      *आभाळमाया*


     *सरस्वती दातार*


  *विनायक जोशी (vp)*

💬9423005702

📱9834660237


सुप्रसिद्ध  संगीतकार अशोक पत्की यांचा कार्यक्रम आणि देवकी पंडीत यांचा जबरदस्त आवाज. झी टीव्ही वरती गाजलेल्या अनेक मालिकांची शीर्षक गीते सादर होत होती. याच कार्यक्रमात

*जडतो तो जीव*

*लागते ती आस*

*बुडतो तो सूर्य*

*उरे तो आभास*

 हे आभाळमायाचे शीर्षक ऐकून कमालीच्या प्रेमळ अशा व्यक्तीची हूरहूर लावणारी आठवण जागृत झाली .


सहवासाने वृध्दिंगत होते ते प्रेम .

फक्त दर्शन झाले तरी आनंद होतो ते प्रेम. काहिही न बोलता सर्व काही समजते ते म्हणजे प्रेम .चैतन्याचा साक्षात्कार होतो ते प्रेम.


मोठ्ठा चष्मा घालणारी , हातात नावापुरती जपमाळ  धरणारी ,जेवणाच्या मध्ये  मिरचीचा खरडा खाणारी ,कायम कामात असणारी , प्रत्येक वेळेला पगार किती ते विचारणारी आणि चांगला आहे  हे कळल्यावर कमालीची आनंदी होणारी,असंख्य मऊ सुरकुत्या हातावर असलेली,एकही शब्द न बोलता सर्व गोष्टी समजून घेणारी , पुण्यातील लक्ष्मी रोड वरील कुंटे चौकातील दातार वाड्यात माहेर असलेली , लोकमान्य टिळकांना जवळून पाहिलेली ,  १९०३ मध्ये जन्माला आलेल्या आणि आभाळमाये सारखे प्रेम करणाऱ्या  *सरस्वती गणेश जोशी* नावाच्या एका अत्यंत प्रेमळ स्त्री वरती माझे प्रचंड प्रेम होते कारण ती माझी *आज्जी* होती.

 


*विनायक जोशी (vp)*

  💬9423005702 

  📱9834660237

मंगलधाम , हिंगणेखुर्द ,

पुणे ५१

*electronchikatha.blogspot.com*

सोमवार, २३ नोव्हेंबर, २०२०

खंडाळा बोगदे बालपणीचे

 // श्री स्वामी समर्थ //


    *श्रावण*

     7/8/2020


     *खंडाळा बोगदे*


     *विनायक जोशी (vp)*

💬9423005702 

📱9834660237 


लहानपणी मे महिन्याच्या सुट्टीत मुंबईला जाताना येथील वीस - पंचवीस बोगदे बघत जायला फार मजा येत असे.हे सर्व बोगदे सुरू होण्याच्या  आधीच दुसरे इंजीन जोडणे - काढणे वगैरे कार्यक्रम बघायला पूर्ण गाडी प्लॕटफार्म वरती उतरलेली असे.


 त्या नंतर मात्र बोगदे सुरु झाले की लख्ख प्रकाश - आणि अंधार यांचा खेळ आणि डोंगरावरुन वाहणारे  पाण्याचे प्रवाह  दिसत असत. 


आमच्या एका खोपोलीच्या  मित्राच्या घरी जाताना मात्र  हे बोगदे कसे बघायचे याचे प्रशिक्षण मिळाले. अतिशय हळूहळू जाणाऱ्या गाडीने प्रवास करायचा. शक्यतो दरवाज्या मधे पायऱ्यांवर बसायचे आणि मनमोकळेपणाने हा थरार अनुभवायचा. 


साधारणपणे 'मंकी हिल' येथे गाडी थांबली की माकडांना लाजवेल अशा लवचिक आणि जिद्दी कातकरी किंवा मावळा मधील त्या शूर विरांचे स्मरण करायचे . इंग्लिश मंडळींच्या हाताखाली हे बोगदे बांधताना शेकडो कारागीर मरण पावलेले आहेत.त्या वेळी उपलब्ध अवजारांनी निसर्गाशी दिलेला लढा दिसायला लागला. घोरपडी सारखी घट्ट पकड असलेले तळकोकणातील हे असामान्य  वीर दिसायला लागले.


 निसर्गाचा समतोल न बिघडवता या निसर्ग पुत्रांनी मेहनतीने बांधलेले हे चिरंतन बोगदे आहेत. तुम्हाला सुद्धा कधी हा आनंद घ्यावा वाटला तर एसी डबा , लॕपटाप  वगैरे गोष्टी घरी ठेवून मोकळ्या मनाने हे बोगदे बघायचा आनंद घ्या.. बोगद्यातील गडद अंधार किंवा  त्या मधून बाहेर आल्यावर  दिसणारा  हिरवागार निसर्ग , पाण्याचे कोसळणारे धबधबे आणि त्या बरोबरच रुळांमधून ऐकू येणारे त्या अनाम शूर विरांचे धिरगंभीर तालातील गीत *"कशासाठी पोटासाठी खंडाळ्याच्या घाटासाठी"*

 

  *विनायक जोशी (vp)*

   💬9423005702

  📱9834660237 

१२५७ , मंगलधाम , बी३, विठ्ठलवाडी , हिंगणेखुर्द , लेन नंबर ४ , पुणे ५१

*electronchikatha.blogspot.com*

द्वारकाधीश

 // श्री स्वामी समर्थ //

    

 *द्वारकाधिश*

      🙏🙏🙏


विनायक जोशी(vp)

💬9423005702

 📱9834660237 


 स्वातंत्र्य पूर्व काळात जेल मधील कैद्यांना मानसिक दृष्ट्या बळकट ठेवण्यासाठी विनोबा भावे गीता सोप्या भाषेत सांगत असत. गीता ऐकताना बऱ्याचशा कैद्यांना ही गीता इंग्रजांनी सुद्धा ऐकावी असे वाटत असे .परंतु विनोबांना कल्पना होती कि इंग्रजांचा कर्मयोगाचा सराव कित्येक शतके आधीच चालू झाला होता. 


ऐका सर्वश्रेष्ठ धनुर्धराला मानसीक दृष्ट्या कणखर बनवून युद्धासाठी तयार करण्यासाठी कृष्णाने केलेला संवाद म्हणजे गीता.महाभारता मधील या महान सूत्रधाराचे व्दारकेत जाऊन दर्शन घेणे हा अलौकिक योग आहे. 


गुजरात मध्ये गोध्रा दंगलीच्या काळात आई आणि दादांना घेऊन नारायण  सोमनाथ , द्वारका वगैरे तीन दिवसांच्या दौऱ्यावर गेला होता.


 आयुष्यातील बराच काळ गीता धर्म मंडळाचे काम हिरीरीने करणारे दादा आणि त्यांच्या मागे खंबीर पणे उभा असलेला

योगेश्वर कृष्ण या मुळे दर्शन मनाजोगते झाले.


 द्वारकेत पोचले त्या वेळी देवांच्या नैवेद्याची वेळ असल्यामुळे देवा समोरचा पडदा लावलेला होता. साधारणपणे २० मिनिटांनी अतिशय तेजस्वी आणि प्रसन्न अशा देवांचे दर्शन झाले. या प्रसंगी दादांच्या डोळ्यातून आनंदाश्रूंची धार लागलेली होती . 

गेली कित्येक वर्षे पहाटेच्या वेळी केलेली मानसपूजा फळाला आली होती.

 आई - वडिलांचे पाय उन्हात भाजू नयेत म्हणून हातात त्यांच्या चपला घेऊन पळणारा नारायण आणि कृष्णाला बघून भाव समाधी लागलेले वडिल आपापले कर्म अत्यंत समाधानकारक पणाने पार पाडत होते !

🙏🙏🙏


  *विनायक जोशी (vp)*

💬9423005702

📱9834660237 

१२५७ , मंगलधाम , बी३, विठ्ठलवाडी , हिंगणेखुर्द ,लेन नंबर ४ , पुणे ५१

*electronchikatha.blogspot.com*

पुरुषौत्तम काळे साकुर्डे

 // श्री स्वामी समर्थ //

      *आनंदयात्री*

   *पुरुषौत्तम काळे*


     13/08/2020


         *विनायक जोशी (vp)*

💬9423005702 

📱9834660237 


 जेजूरीच्या खंडेरायांच्या कृपाछत्रामुळे पावन झालेल्या पावन भूमीत म्हणजेच साकुर्डे येथे शेतावरील वस्तीवर राहणारा , गावातल्या डोंगरावरच्या आणि उत्तम शिक्षक असलेल्या शाळेत शिकलेला , आई वडीलांच्या उत्तम संस्कारात वाढलेला , इलेक्ट्रॉनिक्स या विषयात रुची असल्यामुळे इंजिनियरींगचे शिक्षण घेण्यासाठी शहरात आलेला , मित्र आणि मैत्री यांची मनापासून जपणूक करणारा "यारों का यार ", कोणतेही काम धडाडीने , मनापासून आणि जबाबदारीने करणारा , मांजरांची आवड असलेला , सर्व भावंडांच्या मध्ये आनंदाने रममाण होणारा , कंपनीच्या कामानिमीत्त विदेशवारी करुन आलेला , वडील आणि मामा यांचा आदर्श बाळगणाऱ्या "वैभव" उर्फ *पुरुषौत्तम काळे* याला आज १३ आॕगस्ट रोजी *प्रतिक्षा* बरोबर संपन्न होणाऱ्या *विवाह बंधनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा* !

 

💐💐💐🙏🙏🙏



   *विनायक आणि कल्याणी जोशी ( VP )*

  💬9423005702 

  📱9834660237

  १२५७ , मंगलधाम , विठ्ठलवाडी , हिंगणेखुर्द , पुणे ५१ 

*electronchikatha.blogspot.com*

Matriarchy book by Monica joshi

 // श्री स्वामी समर्थ //

           श्रावण

  *MATRIARCHY*


      *मोनिका जोशी* (पार्कर) 

     ओटावा , कॕनडा.

      14/08/2020


आपल्या विवेक आणि सुरेखा जोशी यांची सुरेख मोठ्ठी मुलगी म्हणजे मोनिका .सध्याची मोनिका जेसन पार्कर सध्या ती ओटावा येथे रहात आहे .


क्वीन्स यूनव्हर्सिटी मधून फिलाॕसाॕफी आणि इंग्लिश हे विषय घेऊन पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे . भाषा हा तिचा अत्यंत आवडता विषय आहे . फ्रेंच विषयाचे सुध्दा तीला उत्तम ज्ञान आहे .


सध्या ती ओटावा येथे राहते आणि एडिटिंग या विषयात व्यावसायिक म्हणून  काम करत आहे . याच बरोबर कॕनेडियन सिटिझनशिप मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या इंग्रजी परीक्षांसाठीचे कोचिंग क्लास गेली ४ वर्षे ती घेत आहे ...


या २१ आॕगस्टला तीने लिहिलेले MATRIARCHY हे वेगळ्या विषयाचे पुस्तक प्रदर्शित होत आहे . अॕमेझाॕन किंडल वरती सध्या हे पुस्तक मिळू शकते . याची लिंक खाली देत आहे 


*https://www.amazon.ca/MATRIARCHY-Monica-Joshi-ebook/dp/B08F9V7RD7*


MATRIARCHY

या मोनिकाच्या पुस्तकाला आमच्या  मनःपूर्वक शुभेच्छा 



विनायक जोशी (vP)

💬9423005702 

📱9834660237 


१२५७ , मंगलधाम , बी ३ , विठ्ठलवाडी , हिंगणेखुर्द , पुणे ५१

*electronchikatha .blogspot.com.*

पहिला स्वातंत्र्य दिन १५ आॕगस्ट १९६३

 // श्री स्वामी समर्थ //


 *१५ आॕगस्ट १९६३*


१० आॕगस्ट या दिवशी सोलापूर येथील वाडिया हाॕस्पिटल मध्ये माझा जन्म झाला . सर्व गोष्टी नाॕर्मल असल्यामुळे डाॕक्टरांनी तिसऱ्या दिवशी घरी जायला परवानगी दिली ...परंतू आज्जीच्या नियमानुसार आम्हाला पाच दिवसांनी गृहप्रवेशाचा योग होता .


वाडिया हाॕस्पिटल च्या गच्चीवर स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम होता . बरोबर सकाळी सात वाजता साजरा झालेल्या या कार्यक्रमाला मी आई आणि अंबूबाई यांच्या बरोबर हजेरी लावली ...


आयुष्यातील पहिल्या  स्वातंत्र्य दिवसाला पाचव्या दिवशीच हजेरी लावली. अत्यंत स्वाभिमानी अशा आईच्या कडेवर बसून ......


..........प्रभाकर जोशी

    या दिवशी मला अजून नाव मिळाले नव्हते 😀😜👍

फरिदा अमरोलिवाला

 // श्री स्वामी समर्थ //


       श्रावण

 

*फरिदा अमरोलिवाला*


    16/08/2020


विनायक जोशी (vP)

💬9423005702 

📱9834660237 


सोलापूर येथील लष्कर मारुती मंदिराच्या जवळ राहणाऱ्या अमरोलिवालांची सून . मंगलची जिवलग मैत्रीण. कमालीचा आनंदी स्वभाव असलेली . जबरदस्त पाॕझिटिव्ह विचारधारा असलेली . घरातील आणि बाहेरील अनेक जबाबदाऱ्या लिलया पेलणारी . सध्या पुण्यात वास्तव्य असलेली अशा फरिदाला आणि कुटुंबियांना आमच्या कडून पारशी नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ......


विनायक आणि कल्याणी जोशी (vP)

💬9423005702 

📱9834660237 

१२५७ , मंगलधाम , विठ्ठलवाडी , हिंगणेखुर्द ,पुणे ५१..

*electronchikatha .blogspot.com*

ABB आॕफ कडप्पा

 // श्री स्वामी समर्थ //

        श्रावण

      *कडप्पा*

    16/08/2020

     

  *विनायक जोशी (vp)*

💬9423005702

📱9834660237 


*डिझाईन्स या क्षेत्रात फिल्ड मध्ये जाऊन अनुभव घेतल्या शिवाय परफेक्शन येत नाही याचा वास्तववादी  अनुभव* *ABB* च्या  कडप्पा येथील कारखान्यामुळे परत एकदा मनापासून 

घेतला


   *कडप्पा*


बुधवारी दुपारी एका मिटींग साठी कडप्पा येथील झुआरी सिमेंट या कारखान्यात जायला निघालो. संदीप कुलकर्णी हा अत्यंत आनंदी जोडीदार बरोबर होता. 


बंगलोर येथे संचारबंदी असल्यामुळे मध्यरात्री तेथे पोचायचे आणि पहाटे बंगलोर पासून २६० किलोमीटर दूर अशा कडप्पाला जायला निघायचे ठरविले होते.


पुण्याच्या छोट्याशा विमानतळावर असंख्य प्रकारचे प्रवासी होते. पर्यटक या सदरात असलेली असंख्य मंडळी बंगलोर मधील परिस्थिती मुळे चिंतातूर होती.


इंडिगोने त्यांच्या प्रथेनुसार वेळेवर उड्डाण केले आणि वेळेवर पोचलो. नेव्हीगेशनने सुसज्ज असलेल्या टॕक्सीजमुळे लवकरच हाॕटेल मध्ये पोचलो. उत्तम दर्जाचे रस्ते आणि रात्री सुध्दा शिस्तबद्ध रितीने चाललेली वाहने. दोन तास मुक्काम करुन पहाटे बंगलोर सोडले आणि  बंगलोर हैद्राबाद हायवे वरुन प्रवास सुरु झाला.


बऱ्याच मल्टीनॕशनल कंपन्यांच्या आॕफीसेसना बघत बघत बंगलोर सोडले.एका तासाने छानशा हाॕटेल मध्ये नाष्टा घेतला. स्वच्छता , पदार्थाची चव आणि हसतमुखपणाने देण्याची पद्धत लाजवाब. थोड्याच वेळात रस्याच्या कडेला सत्य साईबाबा यांच्या मठाचा उल्लेख असलेले बॕनर दिसायला लागले. अल्प दरात अतिशय उत्तम दर्जाची वैद्यकीय सेवा देणारे त्यांचे दवाखाने आणि साईबाबा गेल्यानंतरचा सचिन तेंडूलकर आठवला.


आन्ध्र मध्ये परवानगी घेऊन प्रवेश केला. रस्त्याच्या कडेला असलेली दाक्षिणात्य पध्दतीने बांधलेली देवळे , टेकड्या असाव्यात असे छोटे डोंगर आणि घाट रस्ता पार करुन कडप्पा या जिल्ह्यात पोचलो.


 खनिज संपत्ती मुळे अत्यंत समृद्ध असलेल्या या भागात बरेचसे सिमेंटचे कारखाने आहेत.दुपारी काम आटोपल्यावर कारखान्या जवळच्या एका छोट्या गावात राहिलो. या गावातील सर्व रेस्टाॕरंट्स आणि बार एकत्र  नांदत  होते. दुसऱ्या दिवशी प्रचंड पाऊस पडत असताना कडप्पा सोडले.


बंगलोर विमानतळावर लवकर पोचायचे असल्यामुळे गुगलचे नेव्हीगेशन आणि जीपीएस यांचा योग्य ताळमेळ साधत वेळेच्या आधीच बंगलोर विमानतळावर पोचलो. कर्फ्यू मुळे विमानतळावर अतिशय कमी गर्दी होती. 


KFC पासून ते विमानाच्या स्टाफ पर्यंत सर्वांना गप्पागोष्टी करायला भरपूर वेळ होता. अत्यंत उत्तम दर्जाची तांत्रिक टीम असलेल्या Go India Go म्हणजेच Indigo च्या चिमुकल्या अशा विमानातून  प्रवास वेळेवर पार पडला.सातशे ऐंशी किलोमीटर चे अंतर पार करुन संध्याकाळी सहा वाजता पुण्यात पोचलो.


 रिक्षावाल्यांच्या बरोबरील वाद न मिटल्यामुळे आम्ही आरक्षित केलेली गाडी विमानतळाच्या बाहेर उभी होती. 


रिमझिम पडणारा पाऊस ,बेशिस्त वाहने यांच्या मधून सहनशक्ती बघणारा प्रवास चालू झाला. वैताग घालवण्यासाठीचा सोपा उपाय म्हणून संदीपने किशोर कुमारचे गाणे गुणगुणायला सुरवात केली.


आमच्या गाडीचा ड्रायव्हर हा किशोरकुमार यांचा परमभक्त असल्यामुळे पुढील एक तास एका मागून एक अशी किशोरची गाणी म्हणून त्याने आमच्या प्रवासाचा उत्तरार्ध संपूच नये अशा अवस्थेत आणून ठेवला.


कडप्पा या गावाच्या जवळ येईपर्यंत न दिसलेला कडाप्पा , सत्यसाईबाबांचा मठ , मेगावॕट मध्ये पाॕवर घेणाऱ्या इलेक्ट्रिक मोटर्स , इडली- सांबार वगैरे अतिशय हसतमुख पणाने देणारे आणि हात जोडून आदराने व आनंदाने नमस्कार करणारे वेटर्स, प्रचंड पावसात सुध्दा रस्त्यातील पाण्यातून नेव्हिगेशनच्या आधारे व्यवस्थित नेणारा आमचा नरसिंह हा गाडीचा चालक, गुगल मॕप्सचे मार्गदर्शन , ढगांच्या वरुन परावर्तित होणारे ऊन , टेक आॕफ आणि लँडींगच्या वेळी वेगवेगळ्या प्रकारचे येणारे इंजिनचे आवाज , कमालीच्या प्रेमाने वागणारी आणि प्रोसेस मध्ये लढावू वृत्तीने लढणारी झुआरी सिमेंट येथील ABB ची माणसे आणि सर्वात शेवटी आमच्या वाटेला आलेला दिलदार असा ओला कॕबचा किशोरकुमार  .......!


*विनायक जोशी (vp)*

💬9423005702

 📱9834660237 

१२५७ , मंगलधाम , हिंगणेखुर्द , लेन नंबर ४ , पुणे ५१

*electronchikatha.blogspot.com*

दक्षिणद्वार @ नृसिंहवाडी

 // श्री स्वामी समर्थ //     

     *नरसोबाची वाडी*

         *दक्षिणद्वार*


*विनायक जोशी (vp)*

📱9423005702


   पश्चिम महाराष्ट्रातील अतिशय सधन आणि निसर्ग संपन्न अशा भागात सांगली - मिरजे पासून २०-२२ किलोमीटर अंतरावर नृसिंहवाडी नावाचे नितांत सुंदर गाव आहे.या ठिकाणी  श्री नृसिंह सरस्वती यांनी तपश्चर्या केली होती.आसपासच्या गावात भिक्षा मागून ते रहात असत.इथे अतिशय सुंदर असे मंदिर आहे.तेथे दत्त महाराजांच्या जागृत अशा पादुका आहेत.मंदिरामधे पहाटेच्या काकड आरती पासून रात्रीच्या शेजारती पर्यंत सर्व कार्यक्रम वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींनी ठरवून दिलेल्या पद्धतीने पार पडत आहेत.या पूर्ण गावावरती दत्त महाराजांचा समाधानकारक आशिर्वाद आहे.देवळाच्या परिसरात ओवऱ्या आहेत. तेथे बसून गुरुचरित्राचे पारायण करता येते .कृष्णा आणि पंचगंगेचा संगम जवळ असल्यामुळे पावसाळ्यात नदीचे पाणी पादुकां वरुन वाहते आणि दक्षिणेकडून बाहेर पडते यालाच *दक्षिणद्वार* असे म्हणतात .या पादुकांवरुन येणाऱ्या पाण्यात स्नान करण्यासाठी असंख्य भाविक येथे जमतात.पाऊस जास्त झाला तर मात्र येथील सर्व परिसर जलमय होतो आणि त्याला एखाद्या बेटाचे स्वरुप येते. पूर सदृश परिस्थितीत उत्सव मुर्ती मात्र गावातील मानाच्या पुजाऱ्यांचा घरी हलवली जाते.या ठिकाणी अत्यंत कडक अशा सोवळ्यामधे पूजाअर्चा चालू असते.दुपारच्या वेळी होणारी महापूजा आणि रात्रीची पालखी बघणे हा फार आनंददायी असा अनुभव आहे.माघ महिन्यात या ठिकाणी कृष्णावेणीच्या उत्सवात वेगवेगळे नामवंत कलाकार दत्त महाराजांच्या समोर अत्यंत श्रद्धा पूर्वक आपली सेवा रुजू करतात. "दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा" या जपाने पावन झालेल्या या भूमीत तुम्ही अवश्य जाऊन यावे !


*विनायक जोशी (vp)*

 📱9423005702

मंगलधाम , हिंगणेखुर्द  लेन नंबर ४ , पुणे ५१ *electronchikatha.blogspot.com*

गणपती बाप्पा मोरया भाद्रपद २०२०

 // श्री स्वामी समर्थ //

         भाद्रपद


   *गणपती बाप्पा मोरया*

        🙏🙏🙏


विनायक जोशी (vP)

💬9423005702 

📱9834660237 


अत्यंत आनंदी आणि प्रसन्न मनाने २२ आॕगस्ट २०२० या दिवशी म्हणजेच या गणेश चतुर्थीला येणाऱ्या  बाप्पांच्या स्वागताची मनापासून सिध्दता करावयाची आहे . 


संपूर्ण घराची स्वच्छता किंवा डेकोरेशनचे काम वगैरे रसरशीतपणे करुन सार्वजनिक मरगळ या प्रकाराची साखळी तोडायची आहे ...


अर्थात आपल्या घरात अत्यंत तेजस्वी अशा बुध्दीच्या देवतेचे आगमन होत आहे. त्यामुळे बुध्दीचा पुरेपूर वापर करुन आपण हा सण उत्साहाने साजरा करायचा आहे ....


*कोरोनाच्या या कालखंडात सार्वजनिक ठिकाणी आपण कसे वागायला पाहिजे .या विषयी गेले ४ महिने जो उपयुक्त सराव झाला आहे .त्याच्यात कोणतीही तडजोड न करता उत्सव साजरा करायचा आहे*


श्रीगणेशांची प्रतिष्ठापना करण्यासाठी या वेळी गुरुजी जर उपलब्ध होऊ शकले नाहीत तरी काळजी करू नये . या पूजे संबंधित मार्गदर्शक असे अनेक व्हिडियो यू ट्यूब वरती सहज उपलब्ध आहेत ....


गणेश स्थापना या विषयीचा व्हिडियो पूजेच्या एक दिवस आधी शांतपणे पाहिल्यास तयारी उत्तम करता येईल आणि पूजेच्या दिवशी कोणत्याही प्रकारची गडबड न होता पूजा संपन्न होईल .....



*मंगलमुर्ती मोरया , गणपती बाप्पा मोरया*


🙏🙏🙏🙏🙏


*विनायक जोशी (vP)*

💬9423005702 

*electronchikatha.blogspot.com*

मंत्रजागर

 // श्री स्वामी समर्थ //


     *मंत्र जागर*

       .      23/08/2020


  *विनायक जोशी (vp)*

 💬9423005702

 📱9834660237 


गौरी आणि गणपती या दोघांच्या आगमनाने घरात अत्यंत उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण तयार होते .


साधारणपणे चार वर्षांपूर्वी 

सारसबागेच्या किंवा तळ्यातल्या गणपतीच्या उजव्या बाजूला असलेल्या कांचीच्या शंकराचार्यांच्या मठातून नारायणचा मंत्र जागर करायचा का असा फोन आला .


 "ऋग्वेदा" मधील साधारणपणे साडेदहाहजार मंत्र किंवा लाखभर पदे मुखोदगत असलेले "घनपाठी" ब्राह्मण हे मंत्र म्हणायला येणार होते. 


पहाटे पासून अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने तयारी सुरु केली.कमालीची पाॕझीटीव्ह शक्ती असलेला नारायण आणि त्या नंतर थोड्याच वेळात ब्रह्मवृंद दाखल झाला.


 आमच्या घराच्या दरवाजावर Tuition असा फलक असल्यामुळे सुरवात "सरस्वती " च्या मंत्रांपासून झाली. त्या नंतर चाळीस मिनीटे वेगवेगळ्या प्रकारच्या  मंत्रांचा आविष्कार बघायला आणि ऐकायला मिळाला. 


या नंतर सर्वांची ओळख आणि त्या नंतर प्रमुख गुरुजींनी वेदशास्त्रां बद्दल  माहिती सांगितली . या घनपाठी गुरुजींच्या मधील जे गेली अनेक वर्षे हेच मंत्र म्हणत आहेत अशी मंडळी मात्र  थोर शास्त्रीय गायकां सारखे  उत्तम रीतीने मंत्रांचे सादरीकरण करत होते.


 गुरुकुल पध्दतीने राहून पंधरा सोळा वर्षे अध्ययन करुन त्या नंतर परीक्षेत पास होणारे हे " घनपाठी " गुरुजी वेगळेच वाटले.


 आपण ज्या वास्तू मधे राहतो ती वास्तू कायम आपल्याला *तथास्तु* असा आशिर्वाद देत असते याची पूर्ण जाणीव ठेवून आम्ही सर्वांनी म्हणजेच अत्यंत आनंदी असे अनेक स्नेही , मी , नारायण आणि कल्याणी यांनी या " ऋग्वेदातील मंत्रांच्या " मधून निघणाऱ्या स्पंदनांचा अनुभव घेतला  . 


गणपतीच्या काळात मंत्र जागर झाल्यामुळे सोलापूरच्या गणपतीच्या आठवणी जागृत झाल्या.आचार्य फडके गुरुजी आणि त्यांचे दहा सहकारी यांच्या मंत्र जागराची आठवण आली....


*विनायक जोशी ( vp )*

  💬9423005702

 📱9834660237 

 १२५७ ,मंगलधाम , बी ३ , विठ्ठलवाडी , हिंगणेखुर्द , लेन नं ४ , पुणे ५१

*electronchikatha.blogspot.com*

नेने काका माणिकबाग

 // श्री स्वामी समर्थ //


      *नेने काका*


साधारणपणे दहा बारा वर्षांपूर्वी सकाळच्या फिरणे या कार्यक्रमाच्या वेळी विठ्ठलवाडी बसस्टाॕप येथे आनंदात बसलेल्या काका काकूंची पहिली भेट झाली ......


पहिल्याच भेटीत वेव्हलेंग्थ जमून आली . औपचारिकपणा हा प्रकार फारसा रेंगाळला नाही . जे बोलायचे ते स्पष्ट , आनंदी , मनमोकळेपणे , रोकठोक त्यामुळे छान वाटायचे .....


रस्त्यावरील गर्दीमुळे आम्ही तळजाईला फिरायला जाऊ लागलो आणि भेटीगाठी कमी झाल्या .......


असेच एकदा हिंगण्याच्या मागील बाजूस झालेल्या नवीन ट्रॕक वरती त्यांची भेट झाली आणि मागचा गप्पांचा बॕकलाॕग भरुन काढला .......


आमच्या घरी आल्यानंतर कल्याणीच्या क्लासची जागा वगैरे गोष्टी कमालीच्या आस्थेने आणि प्रेमळपणाने त्यांनी बघितल्या होत्या .


एकदा अचानक त्यांच्या माणिकबागेतील घराला भेट द्यायचा योग आला . एकदम व्यवस्थित आणि सुटसुटीत अशा त्या घरातील कोपरान कोपरा आनंदी वास्तू या प्रकाराची जाणीव करुन देत होता ....


माणिकबागेतील गणेशोत्सवातील दणदणाटा पासून ते अमेरिके पर्यंत अनेक विषयावर सहज गप्पा मारणारे , त्यावेळी वाट्याला येणारा वैताग घालवायसाठी विनोदी शब्दांचा अचूक वापर करणारे , कमालीचा पाॕझिटीव्ह दृष्टिकोन असलेले अशा नेने काकांची छोटीशी  आठवण ......


विनायक जोशी

💬9423005702 

📱9834660237

कामा बद्दलचे प्रेम

 // श्री स्वामी समर्थ //

         *प्रेम*


कामावरती प्रचंड प्रेम पाहिजे . जबाबदारी घ्यायची तयारी पाहिजे . अपयश चाखायची तयारी पाहिजे . यश आनंदाने सगळ्यांना बरोबर घेऊन साजरे करायाची सवय पाहिजे . अपूर्णतेची किंवा अज्ञानाची जाणीव पाहिजे . नाविन्याची आवड पाहिजे . मानसीक आणि शारीरिक लवचिकता पाहिजे . सहवासात येणाऱ्या प्रत्येक गोष्टी बद्दल आपुलकी , जिव्हाळा पाहिजे . स्वतःच्या चुकां बद्दल गडगडाटी हसता यायला पाहिजे . कठिण गोष्टी साध्य झाल्यानंतर सहजतेने काया , वाचा ,मनाने आनंदाच्या आरोळ्या ठोकता यायला पाहिजेत ....


विनायक जोशी (vP)💬9423005702

📱9834660237

आनंददायी अमावस्या

 // श्री स्वामी समर्थ // 


 *आनंददायी अमावस्या*


*विनायक जोशी (vP)*

💬9423005702

📱9834660237


माझ्या लहानपणी "अमावस्या" ही तिथी किंवा हा दिवस आनंददायी करायचे पूर्ण श्रेय वडवळच्या नागनाथ महाराजांना आहे. सोलापूर पासून साधारणपणे  ३०-३२ किलोमीटर अंतरावर असलेले हे देवस्थान .


 देवळाला पारंपारिक पध्दतीने बांधलेले दगडी कंपाउंड आणि आतल्या बाजूला  गाभाऱ्यात अत्यंत तेजस्वी अशा स्वयंभू अवतारातील नागनाथ महाराजांचे अस्तित्व .


 देवळाच्या बाहेर टोपल्यांमध्ये जिवंत नाग घेऊन बसलेली असंख्य मंडळी उपस्थिती लावायची . अमावस्येला नागनाथ महाराजांची यात्रा असल्यामुळे पूर्ण वडवळ गावात उत्साहाचे वातावरण असे.


आईच्या बरोबरीने अनेक वेळेला आम्ही  वडवळला गेलो आहोत . सोलापूर रोड वरती वडवळ फाट्याला उतरुन पायवाटेने शेतांच्या मधून या देवळात जाताना छान वाटत असे.


नागनाथ महाराजांच्या या यात्रेमुळे अमावस्या हा दिवस रहस्यमय किंवा निराशेचा न जाता आनंदाने पार पडत असे.


माझ्या वैयक्तिक आयुष्यात सुध्दा अनेक चांगली कामे अमावस्येला पार पडली आहेत. अनेकदा प्रवास सुध्दा या दिवशी सुखकर झाला आहे.


 श्रध्दा आणि आनंद या गोष्टींची  कधीही चिकित्सा न केल्यामुळे कोणतीही तिथी असली तरी आपला दिवस म्हणजे एकदम प्रसन्न  ..... !

🙏🙏🙏


----------------------------


 ( आज सर्वपित्री अमावस्या आहे . या निमित्ताने आपल्या  पूर्वजांचे आठवणीने आणि शांतपणे स्मरण करायचा हा दिवस आहे . 


आपल्या पूर्वजांची मृत्यूतिथी माहिती  नसली तरी आजच्या दिवशी म्हणजे सर्वपित्री अमावस्येला अत्यंत श्रध्देने करायचे कर्म किंवा श्राध्दकर्म करावे असा हा दिवस  .....

🙏🙏🙏)


*विनायक जोशी ( vp )*

 💬9423005702

📱9834660237


१२५७ , मंगलधाम , बी ३ , विठ्ठलवाडी , हिंगणेखुर्द , पुणे ५१.

*electronchikatha.blogspot.com*

नारायण मंदार बद्दल

 *नारायण जोशी*

सिनियर व्हाईस प्रेसिडेंट अल्ट्राटेक


     *मंदारी बद्दल*

Many in this group engage themselves in Research basic or applied. Also they have proven themselves to be extremely successful in their ongoing journey. They are the creators, motivators, originators and seekers if something more than on their dish of passion. *Mandar Suresh Sovani* is one such who has a big following in his chosen field.

नारायण गुरुपौर्णिमा

 *नारायण जोशी*


 *गुरुपौर्णिमे निमित्त*

 

Aai, dada, Vinu, Avi, Appa,  my first boss L Rajashekhar, V M Muralidharan, Sanju, Sonu, Narmada Colleagues Kamalnayan Chhaya, Kanungo, Bhalerao, Phatak, Kemkar, Dankuni Project Colleagues Sanjay Agarwal, Kiran Patil, Kochar, Mahendra Kumar, Dr Mukherjee, Ratan Shah all these people taught me goods and bads in real life and what should be my approach to various situations in life keeping my life values intact.

Pranam all Gurus

Brothers Day

 // श्री स्वामी समर्थ //


*Brother's Day*

      २४ मे २०२०


आज २४ मे हा भावांसाठी राखीव असा राष्ट्रीय दिवस. मला असाच एक छान छोटा भाऊ आहे . सध्या तो अल्ट्राटेक सिमेंट या कंपनीत सिनियर व्हाईस प्रेसिडेंट आहे . या अत्यंत छोट्या लेखाचा उत्तरार्ध आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ञ डाॕ.अजित पाटील यांनी कमालीच्या आपलेपणाने केला आहे ...

नान्या तो नारायण जोशी हा प्रवास मला सुध्दा रेखाटायचा आहे . अत्यंत आनंदाने आणि शांतपणे एक आनंदयात्री म्हणून फक्त .....


      *आनंदयात्री*

*नारायण प्रभाकर जोशी*


        विनायक जोशी (vp)

💬9423005702 

 📱9834660237 


३ नोव्हेंबर १९६५ या दिवशी सोलापूर मधील वाडिया हाॕस्पिटल येथे जन्माला आलेल्या , गुरूप्रसाद आदर्शनगर येथे राहणाऱ्या, सिध्देश्वर प्रशाला आणि हरिभाई देवकरण हायस्कूल मध्ये शिकलेल्या , दहावीच्या परिक्षेत शाळेत पहिला आणि काॕलेज मध्ये दुसरा आलेला , अत्यंत लहान वयात लार्सन आणि टुब्रो या कंपनीत जनरल मॕनेजर पदावर विराजमान झालेल्या आणि त्या नंतर अल्ट्राटेक मध्ये *AVP व Unit Head* अशी पदे भुषवणाऱ्या नारायण प्रभाकर जोशी यांच्या बद्दल डाॕ.अजित पाटील या शालेय जीवनातील मित्राने स्वयंस्फुर्तपणे मांडलेले मत . डाॕ.अजित पाटील यांच्या वरती सरस्वती मातेचा अनुग्रह झालेला आहे त्या मुळे LinkedIn वरती 72 आर्टीकल्स त्यांनी लिहीली आहेत . *The Top Voice of LinkedIn 2017* म्हणून त्यांना गौरवण्यात आले आहे.


*डाॕ.अजित पाटील*

 *यांच्या नारायणला शुभेच्छा*


*Dear Narayan,* 


 You proved many assumptions as myths in your career. You are the best example of what a talent can do in the corporate world when out in the hard work and sacrifice. You are the role model not only for us but for the next generation. You foiled the belief that only the IIT or IIM degree can help in climbing the corporate ladder. You are our inspiration, you are our pride possession, you are our torch bearer. Narayana we love your talent, modestly and brotherly affection. Remember distance is inversely proportionate to the affection and Kolkata is far from here. Hahaha......

💐🎂💐


*विनायक जोशी (vp)*

💬9423005702 

 📱9834660237 

१२५७ 'मंगलधाम , हिंगणेखुर्द , लेन नंबर ४ , पुणे ५१.

*electronchikatha.blogspot.com*

रविवार, २२ नोव्हेंबर, २०२०

जिनियस कपल केदार आणि गौरी

 // श्री स्वामी समर्थ //

    *जिनीयस कपल*

  *केदार आणि गौरी*


१८ एप्रिल २००८ या दिवशी कोल्हापूरच्या केदार सोवनी आणि अकोल्याच्या गौरी दामले या दोघांनी आयुष्यभर अत्यंत आनंदाने एकमेकांच्या बरोबरीने राहायचा निर्णय सर्व नातेवाईकांच्या उपस्थितीत घेतला. बारावीच्या परीक्षेत दोघेही जण बोर्डात आले होते.पुढील शिक्षण दोघांनीही पुण्यातच पूर्ण केले आणि अर्थातच उत्तम अशा कंपन्यांच्या मध्ये उत्तम प्रकारे काम केले . केदार सध्या टेक्निकल डायरेक्टर या पदावर कार्यरत आहे. गौरीने HSBC , Cognizent वगैरे कंपन्यात उत्तम काम करून सध्या ती *इरा सोवनी* नावाच्या प्रोजेक्ट मध्ये बीझी आहे .मनाचा उमदेपणा किंवा  दिलदारपणा दोघांच्याही अंगात असल्यामुळे मित्र आणि मैत्रिणींचा यांच्या घरी मोठ्या प्रमाणात राबता आहे . अत्यंत व्यस्त अशा कार्यक्रमातून वेळ काढून सर्व सणवार किंवा घरगुती कार्यक्रम कोल्हापूर किंवा पुण्यात उत्तम रीतीने पार पाडत आहेत. इंदिरा किड्स येथे शिकणारे

" इरा" हे सहा वर्षाचे  सुरेख आणि आनंदी असे पिल्लू त्यांना कायम उत्साही राहण्यासाठी मदत करत आहे. *इरा आणि अदू* यांच्या अभ्यासा पासून ते अत्यंत आधुनिक  तंत्रझाना बद्दल ज्ञान संपादन करण्यासाठी मस्तपणे गौरी , केदार यांच्या  घराकडे म्हणजेच  बाणेर मधील "व्हिस्परींग विंड" येथील कायम स्वागतोत्सूक अशा घरट्याकडे मनात येईल तेंव्हा निघायचे ! ( अर्थातच येडगंबूचा गोंधळ बघण्यासाठी ).

गौरी आणि केदारला ,     दशकपूर्तीच्या मनःपूर्वक  शुभेच्छा !

💐💐💐


   मामा आणि कल्याणी मामी          

      *विनायक जोशी ( vp)*

    9423005702

मंगलधाम , हिंगणेखुर्द , पुणे५१

*electronchikatha.blogspot.com*

गौरी दामले यांचे अकोल्यातील घर

 // जय गजानन //

 *गौरी*

 संत गजानन महाराजांचे फक्त पंधरा मिनीटात अतिशय शांतपणाने दर्शन झाले. घरच्या मोदकांचा आणि करंज्यांचा मला नैवेद्य दाखवता आला. या नंतर विनाथांबा बसने आम्ही तुमच्या घरी गेलो. अतिशय ऊत्साहाने व आनंदाने आई आणि आज्जी आमची वाट बघत होत्या. या नंतरचे दोन तास कसे गेले ते कळलेच नाहीत. तुमच्या प्रसन्न घरातील व्हरांडा हा तेथे एकेकाळी असलेल्या लायब्ररीची आठवण करून देत होता. प्रशस्त हाॕल आणि त्या ठिकाणी कोपऱ्यात असलेला गणपती , याच बरोबर दगडावर रंगवलेली नृसिंहसरस्वतींची मुर्ती किंवा माळ्यावरती असलेल्या नैसर्गिक अशा लाकडी आकाराच्या वस्तूं मधील हत्ती किंवा गणपती याच बरोबर हूबेहूब दिसणारा साप वगैरे बघितले . अतिशय स्वच्छ आणि टापटीप असलेले स्वयंपाकघर किंवा त्याच्या समोर असलेली बेडरूम आणि त्याच्या पलीकडे भारदस्त अशी कोठीची खोली . मागच्या बाजूला धूण्याचा दगड , बोअरची मोटार याच बरोबर तेथे शांतपणे उभा असलेला गोडलींब किंवा कढिलींब आणि लिंबाचे दर्शन घडले. वरच्या मजल्यावर राहणाऱ्या समजूतदार अशा भाडेकरूंची सोबत छानच आहे. घराच्या प्रवेशद्वारातच असलेली आणि लहान लाल टोमॕटो सारखी दिसणारी मिरची , जवळच असलेला जास्वंद वगैरे झाडां प्रमाणेच कडूनिंबाच्या छायेत ऊभा असलेला झोपाळा बघितला. आई आणि आज्जींनी वेगवेगळ्या पदार्थांचा जबरदस्त आग्रह केला. चैतन्य आणि समाधानाने ओतप्रोत भरलेल्या त्या वास्तूतून बाहेर पडताना कमालीची शांतता अनूभवता आली. आज्जींनी अतिशय उत्तम ठेवलेली ही जून्या पध्दतीची वास्तू मनापासून  सांभाळून ठेवणे हे नवीन पिढीचे काम आहे.


*विनायक मामा*

२६ / ११ /२०१७

हेमंत खोले

 // श्री स्वामी समर्थ //


     आनंदयात्री

   *हेमंत खोले*

     23/09/2020


विनायक जोशी (vP)

💬9423005702


साधारणपणे वीस बावीस वर्षांपूर्वी हेमंत खोले या तरुण इंजिनीयरची कामानिमित्ताने भेट झाली. या वीस वर्षाच्या कालखंडातील त्याचा Engineering ते Inner Engineering हा प्रवास जवळून बघता आला ....


मेकॕनिकल इंजिनियरींग या क्षेत्रात त्याला श्री. मुकुंद कोंडवीकर यांच्या सारखे अतिशय खोल ज्ञान असलेले गुरू लाभले आहेत .


गेली १५ ते १७ वर्षे तो कृष्णमुर्ती पध्दतीने ज्योतिष या विषयाचा अभ्यास करत आहे . वेगवेगळ्या प्रसंगात अनेक मंडळींना त्याने ज्योतिषाच्या दृष्टीकोनातून अचूक मार्गदर्शन केले आहे ..


ज्योतिष या शाखेसाठी आवश्यक असलेल्या अभ्यासा बरोबरच पारमार्थिक बैठक लागते याची त्याला जाणीव आहे . या साठी त्याने गुरुचरित्राची पारायणे केली आहेत . गिरनारच्या वाऱ्या केल्या आहेत . तिरुपतीच्या बालाजींचे दर्शन घेतले आहे . करवीरनिवासिनीच्या दर्शनासाठी पायी चालत वारी केली आहे . थोडक्यात अनेक प्रकारच्या उपासना तो करत आहे ......


सकाळी लवकर  उठणे , शारीरिक व्यायामासाठी म्हणून तळजाईचा आठ किलोमीटरचा दौरा करणे , सत्तर सुर्यनमस्कार घालणे , शांतपणे पूजापाठ करणे आणि त्यानंतर आपल्या दैनंदिन कामाला सुरुवात करणे असा दिनक्रम आहे ...


आधुनिक संगणकाचा जन्मपत्रिका तयार करण्यासाठी वापर करणे , खोलवर उपासना केल्यामुळे प्राप्त झालेली संपर्क शक्ती किंवा त्या संबंधित Intution चा होणारा सहज वापर , उपासनेमुळे आलेली एकाग्रता या गोष्टी  भविष्य सांगणे या साठी खूप उपयोगी पडत आहेत .....


तळजाई मातेचे अधिष्ठान लाभलेल्या तळजाई टेकडीवर आम्ही चालायला जातो त्यावेळी त्याची भेट होते......


प्रभू श्रीराम यांचा कृपाशिर्वाद लाभलेल्या वास्तूमध्ये म्हणजे श्रीराम अपार्टमेंट येथे राहणाऱ्या आनंदी , उत्साही , सरळमार्गी , व्यायामाची आवड असलेल्या *हेमंत खोले* यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 

💐💐🎂🎂💐💐


विनायक जोशी (vP)

💬9423005702 

📱9834660237 

मंगलधाम , बी ३ , विठ्ठलवाडी , हिंगणेखुर्द , पुणे ५१.

electronchikatha.blogspot.com.

ऋणानुबंध मिलिंद भावे

 // श्री स्वामी समर्थ //

       ऋणानुबंध

    *मिलिंद भावे*

    25/09/2020


बरोबर ३७ वर्षांपूर्वी म्हणजे साधारणपणे १९८३ साली मिलिंद भावे या अत्यंत हरहून्नरी माणसाची पहिली भेट झाली . थोड्याच दिवसात त्याच्या आई बाबांची ओळख झाली आणि त्याचे बाबा किंवा हरीभाऊ भावे नावाचा अत्यंत आनंदी मित्र मला मिळाला ....


मिलिंदला तीन बहिणी . या तिघींची छान ओळख झाली . कालांतराने त्यांची लग्ने झाली आणि त्यामुळे गोरे , भागवत , पाटील यांच्या घरात माझा आनंददायी प्रवेश झाला .....


भावेंच्या आयुष्यात भाचरांचा प्रवेश झाला आणि त्यांच्या बरोबरच मला कायम आनंददायी गोंधळ घालणारा विनायक मामा असा हूद्दा प्राप्त झाला आणि अर्थातच भरपूर  प्रेम मिळाले ....


मिलिंदचे लग्न झाले . काणे कुटुंबांशी ऋणानुबंध जुळून आले . मन्या किंवा वेदांगचा जन्म झाला आणि गंपती काका या नात्याची सुरुवात झाली ......


काळानुरुप मिलिंदची भाच्चे कंपनी मोठ्ठी झाली . त्यांची लग्ने झाली आणि भिडे , गोडबोले , दामले , गद्रे असा परिवार वाढला .....


भाच्चे कंपनीला मुले झाल्यावर मात्र मामा आजोबा झालो 😜😀


आता आमच्यासाठी "मिलिंद भावे" म्हणजे  ऋणानुबंधानी कायम स्वरुपी जोडलेला पूर्ण परीवार आहे . 

भावे , गोरे , भागवत , पाटील , काणे , फडके , भिडे , गोडबोले , दामले , गद्रे .....असा कमालीचा आनंदी आणि कायम सर्वांच्या हिताचे चिंतणारा अत्यंत समाधानी परिवार .....


आमचे लग्न झाल्यावर कल्याणीला कमालीच्या सहजतेने त्यांनी सामावून घेतले आणि भरभरून  प्रेम दिले .....


कायम उत्साही असणाऱ्या आणि चिरतरुण दिसणाऱ्या मिलिंद हरिभाऊ भावे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 

💐💐🎂🎂💐💐

 

*विनायक आणि कल्याणी (vP)*

💬9423005702 

📱9834660237 

1257 , Mangaldham , B3 , Vitthalwadi , Hingenekhurd , Pune 51

electronchikatha.blogspot.com

चक्रपाणी काका गुरुजी

 // श्री स्वामी समर्थ //


  *गणिताचे गुरुजी*


  विनायक जोशी (vP)

  💬9423005702

  📱9834660237 


अत्यंत हुशार आणि उमदे व्यक्तिमत्त्व. तरुण वयातच अनपेक्षित अशा आजारपणामुळे कायमचे शारीरिक  परावलंबीत्व आले . या नंतर त्यांनी घरातच काॕलनी मधील मुलांना गणित हा विषय शिकवायचे ठरविले .


 अनामिका आणि शेजारच्या बोटा मध्ये मागील बाजूने पाटीवरील पेन्सिल धरायची आणि गणिते सोडवायची अशा पध्दतीने ते लिहित असत. काकांच्या समोर बसलेल्या पाच सहा विद्यार्थ्यांनी त्या प्रमाणे स्वतःच्या वहीत गणिते सोडवायची . कोणत्याही प्रकारचे संभाषण नसलेल्या या निशब्द क्लास मध्ये फक्त काकांच्या पाटीवर चालणाऱ्या पेन्सिलचाच आवाज यायचा . 

काका प्रत्येक गणित स्वतः सोडवत असत आणि आम्ही विद्यार्थी अत्यंत एकाग्रता पूर्वक त्यांची गणिते सोडवण्याची पध्दत आचरणात आणत असू. गणित या विषयाची गोडी लागण्याची किंवा अजिबात भिती न वाटण्याचे श्रेय पूर्णपणे चक्रपाणी काका या आमच्या काॕलनीतील गणितांच्या गुरुंनाच आहे . 


गुरू आणि शिष्य यांच्यात संवाद साधण्यासाठी शब्दांची अजिबात जरूरी पडत नाही याचा पहिला वस्तूनिष्ठ धडा दहावीत असतानाच मिळाला...

🙏🙏🙏


 *विनायक जोशी (vp)*

 💬9423005702

  📱9834660237 

 मंगलधाम , हिंगणेखुर्द ,लेन नं ४, पुणे ५१

electronchikatha.blogspot.com

गुरुपौर्णिमा

 //श्री स्वामी समर्थ //


     *गुरुपौर्णिमा*

  *गुरुजनांचे स्मरण*


*विनायक जोशी (vp)*

📱9423005702


सर्वसाक्षी परमेश्वर  , संतमहंत, आई - वडिल , शिक्षक या सर्वांना मनःपूर्वक साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏

स्वामी विवेकानंद , शिवाजी महाराज ,लोकमान्य टिळक , स्वातंत्र्यवीर सावरकर , कार्व्हर यांच्या पासून.....ते चार्ली चॕप्लिन , पु.ल.देशपांडे यांच्या पर्यंतची सर्व मंडळी माझ्या उत्तम आयुष्यासाठी कायमस्वरुपी गुरुस्थानी आहेत.


 विनायक जोशी (vp)

 💬9423005702

 📱9834660237 


दत्त महाराजांना अनेक गुरु होते.स्वामी विवेकानंदाना रामकृष्णां सारखे अनुभुति संपन्न गुरु होते.ज्ञानदेवांना निवृत्तिनाथांसारखे जाणकार गुरु होते.या सर्व गुरुजींना आपल्या विद्यार्थ्यांचा वकूब माहिती असल्यामुळे त्यांनी आपल्या शिष्यांना उत्तम प्रतिचे मार्गदर्शन केले. 


 आपल्याला आनंदी आयुष्य जगण्यासाठी उपयुक्त असे संस्कार ज्यांनी केले अशा आई वडिलांचे किंवा असंख्य लहान अथवा मोठ्या गुरुंचे स्मरण करायचे.  उत्तम दर्जाचे गणित शिकवणारे गुरुजी किंवा मूलभूत इलेक्ट्रॉनिक्स मनोरंजक प्रकारे शिकवणारे गुरुजी यांची मला प्रकर्षाने आठवण येते. 

चार्ली चॕप्लिन यांच्या  पासून ते पु.ल.देशपांडे यांच्या पर्यंत सर्वांनी आनदी जीवनाचा भक्कम पाया तयार करुन घेतला .


या जगात अत्यंत मोकळेपणानं जगताना कायम आपला तोल सांभाळणारे गुरु किंवा मुक्त तालात जगण्यासाठी प्रेरीत करणारे गुरु , अशा असंख्य गुरुंच्या कडे आपण नक्की काय मागायचे हे *गुरु ठाकूर* " यांनी छान आणि मोजक्या शब्दांत सांगितले आहे .


  *तू बुद्धी दे , तू तेज दे* !

   *नवचेतना विश्वास दे* !

   *जे सत्य सुंदर सर्वदा* !       

*आजन्म त्याचा ध्यास दे*


*विनायक जोशी ( vp )*

 💬9423005702

 📱9834660237 

 १२५७ , मंगलधाम , बी३ , विठ्ठलवाडी , हिंगणेखुर्द, लेन नंबर ४ , पुणे५१

*electronchikatha.blogspot.com*

बूट एक छानसा साथिदार

 // श्री स्वामी समर्थ //

         *बुट एक*

    *जिवलग साथीदार*

             👟👟

    *विनायक जोशी (vp)*

💬9423005702

📱9834660237 


तळजाईच्या टेकडीवरती साधारणपणे १३५० ते १४०० पाऊले चालणे झाले कि एक किलोमीटर होतो आणि ६९०० पाऊले चाललो की ५ किलोमीटर. असे महिनाभर चालणे झाले म्हणजे  साधारणपणे दोन लाख पाऊले होतात. वर्षाला २५ लाख पाऊले . 


डांबरी रस्ता , सिमेंटचा रस्ता , मातीचा रस्ता , चिखलाचा रस्ता , दगडगोट्यांचा रस्ता , चढ उताराचा रस्ता अशा सर्व ठिकाणी कमालीचा आत्मविश्वास देणारा क्रमांक एकचा साथीदार म्हणजे आपल्या पायातल्या बुटांची जोडी. कधीही आणि कोणत्याही प्रकारे दगाफटका न करणारे , परिस्थिती प्रमाणे लवचिकता दाखवणारे असे हे बुट . आदिदास , नायके वगैरे वंशावळीतले आणि दोन ते तीन हजारां मध्ये मिळणारे हे बुट आम्हाला साधारणपणे दिड वर्षे किंवा ३७ लाख विश्वासाची पावले टाकायला प्रेरीत करतात . 


या नंतर त्यांना आनंदाने निरोप वेगवेगळ्या अनुभवांच्या आठवणीसह देतो .

 

निरोपाच्या दिवशी लेस काढून वेगळी करायची आणि त्याला सन्मानाने बंधमुक्त करायचे . *त्याच्या नवीन वंशजाला त्याच्या जवळ ठेवून फोटो काढायचा आणि एक पूर्ण दिवस दोघांना एकमेकांच्या जवळ ठेवायचे .प्रदीर्घ अनुभवाचे बोल ऐकण्यासाठी फक्त*....

.👟👟👟👟


*विनायक जोशी (vp)*

 💬9423005702 

 📱9834660237 

१२५७ ,मंगलधाम , बी ३, विठ्ठलवाडी  हिंगणे खुर्द,लेन नं ४

पुणे ५१

*electronchikatha.blogspot.com*

आनंदयात्री कारखानदार स्वप्निल तावडे

 // श्री स्वामी समर्थ //


   *आनंदी जगन्मित्र*


      *स्वप्निल तावडे*


विनायक जोशी (vP)

💬9423005702 

📱9834660237 


 अंतर्बाह्य सुंदर व्यक्तीमत्व असलेला , साईबाबांचे कृपाशिर्वाद लाभलेला , व्यवसायातील नीतीमुल्ये जपणारा , स्वतःची उच्च दर्जाची तत्वे असलेला , स्पष्ट विचारधारा असलेला , स्वतःचे वेगळे अस्तित्व न दाखवता अनेक जणांच्या आयुष्यात आनंदाची कारंजी निर्माण करणारा , कंपनीतील कर्मचारी वर्गाशी सहृदयतेने वागणारा , माणसांच्या जगातील दुर्मिळ होत चाललेली माणूसकीचा सहज अविष्कार घडवणारा , कणखरपणा आणि हळवेपणा हे दोन सहजगुण असलेला , मनाने गर्भश्रीमंत असलेला , साहित्य , संगीत , कला या गोष्टींमध्ये उत्तम अभिरूची जपणारा ,  आनंदभुवन या अत्यंत आनंदी आणि प्रसन्न वास्तूत सर्व कुटुंबियांवरती अत्यंत काळजीने काळजीपूर्वक प्रेमाची दादागीरी करणारा अशा अनेक गुणवैशिष्ठ्याने संपन्न असलेल्या स्वप्निलला आमच्या जोशी परीवारातर्फे मनःपूर्वक शुभेच्छा .......


आनंद भुवन या आनंदी वास्तूतील कमालीचा आनंद आणि समाधान या गोष्टी  स्वप्निल , संदेश , स्नेहल , शलाका , सायली , साईश आणि श्रेया या अतिशय सुंदर अशा सप्तसुरांच्या मुळे आणि आईंच्या आशिर्वादामुळे  चिरंतन राहिला आहे आणि कायमस्वरुपी राहणार आहे .....


 अध्यात्मिक वृत्तीमुळे गुरुकृपा लाभलेला आणि Man with Golden Heart असलेल्या आमच्या स्वप्निलला , कल्याणी आणि माझ्या कडून वाढदिवसाबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा .....


💐💐🎂🎂💐💐


(बुलेट 🦮 , या नवीन बाळाने आनंदभुवन मध्ये प्रवेशा केला आहे . त्याचे अभिनंदन . त्याचा उल्लेख राहिला तर रात्री तो दमदार आवाजात निषेध व्यक्त करेल )


विनायक जोशी (vP)

💬9423005702

📱9834660237 

१२५७ , मंगलधाम , विठ्ठलवाडी , हिंगणेखुर्द , लेन नं ४ , पुणे ५१

*electronchikatha .blogspot.com*

आनंदयात्री उज्वला पाटील वाईकर

 //श्री स्वामी समर्थ//

   *आनंदयात्री*

    *सौ.उज्वला पाटील वाईकर*


     25/08/2020


     *विनायक जोशी (vp)*

💬9423005702 

 📱9834660237 


डहाणूकर काॕलनीत राहणाऱ्या आणि टेलिफोन खात्यात आॕफीसर असलेल्या पाटील साहेबांची ही मुलगी . लांब केस आणि सुरेख व्यक्तीमत्व असलेली ,अभ्यासपूर्ण स्पष्ट मत मांडणारी , विनोदाची उत्तम जाण असलेली , MIT काॕलेज मध्ये शिकलेली , उत्तम दर्जाचे साॕफ्टवेयर लिहिणारी ......


पी .जे. इलेक्ट्रॉनिक्स कंपनीतील संशोधन आणि विकास विभागातील महत्वाची जबाबदारी लीलया पार पाडणारी ,कंपनीतील त्या वेळी काम करणाऱ्या सर्व मुलींना योग्य सल्ला देणारी असे बहूआयामी आणि आनंदी  व्यक्तिमत्त्व म्हणजे  उज्वला पाटील .


 मायक्रोप्रोसेसर तंत्रज्ञानाचा तिचा अत्यंत सखोल अभ्यास होता . Assembly language चा सुयोग्य वापर करून कंट्रोलर आणि प्रिंटर यांच्या मध्ये उच्च दर्जाचे प्रोग्रॕमिंग स्किल्स वापरून साधलेला संवाद अद्वितीय होता .


 या बद्दल डाॕ.मराठे यांनी अत्यंत कौतुकाने दिलेली शाबासकी बरेच दिवस आमच्या लक्षात राहिली.CBC किंवा क्लच , ब्रेक असेंब्लीच्या बद्दल प्रिंटरवर येणारा डेटा अभ्यासून , फिलिप्स कंपनीला अनेक मेकॕनिकल सुधारणा करणे सहज शक्य झाले होते.


प्रोग्रॕमिंग मधील शास्त्रीय गायन म्हणजे Assembly language याचे अनेक उच्च दर्जाचे आलाप घेणारी ही अत्यंत आनंदी आणि समाधानी मुलगी सुयोग्य वेळी शनिवारात राहणाऱ्या वाईकरांच्या जीवनात आणि पाॕवर इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रात सहजपणे सामावून गेली...


आज वाढदिवसा  निमित्ताने उज्वलाजींना मनःपूर्वक शुभेच्छा ....


💐💐🎂🎂💐💐



*विनायक जोशी (vp)*

 💬9423005702

 📱9834660237 

१२५७ , मंगलधाम , बी ३ , विठ्ठलवाडी , हिंगणेखुर्द ,

पुणे ५१

*electronchikatha.blogspot.com*

व्हाईस प्रेसिडेंट संजू सरवटे

 // श्री स्वामी समर्थ //


     *आनंदयात्री*


        *संजय मधुकर सरवटे*

         

*Vice President M.P. Birla Group* 

          

        26 August 2020


               *विनायक जोशी(vp)*

 💬9423005702

 📱9834660237


बिलासपूर येथे राहणारे , परंतु मुळचे नागपूर येथील मधुकर आणि मालती सरवटे या दांपत्याचे चुणचुणीत चिरंजीव म्हणजे संजय सरवटे. संजूला वडिलांच्या कडून संगीत व आई कडून कला आणि मामाकडून इलेक्ट्रॉनिक्स या गोष्टींचे उपजत ज्ञान प्राप्त झाले आहे .


 संजूला दोन भाऊ विजय आणि दिलीप .सर्वात मोठ्ठी बहिण म्हणजे ताई . अतिशय हुशार अशा ताईने खोखो , बॕडमिंटन या खेळात विशेष प्राविण्य मिळवले होते . ती नागपूर रेडियोस्टार होती . शिक्षण संपल्यावर राजीव पांडेजी या भारदस्त व्यक्तीची अर्धांगिनी झाली. 


 साधारणपणे तीस वर्षांपूर्वी संजयची आणि माझी ओळख विदर्भातील  "आवारपूर" या ठिकाणी लार्सन आणि टुब्रो च्या सिमेंट प्लान्ट मध्ये झाली. 


बिलासपूरहून आलेला , MSC झालेला  , चारशे ते पाचशे गाण्यांच्या मधील संगीताच्या पीसेसचे सखोल ज्ञान असलेला , अतिशय उत्कृष्ठ अशा पध्दतीने  गुळाच्या पोळ्या, लाडू , श्रीखंड  वगैरे प्रकार लिलया करणारा , सुरेख अशी पेंटींग्ज काढणारा .........


 प्रोसेस कंट्रोल प्लान्ट मध्ये एक तास जरी प्रोसेस बंद पडली तरी लाखो रुपयांचे नुकसान होते याची वस्तुनिष्ठ जाणीव असलेल्या टीमचा तो एक भाग होता. 


संजयला एक असे वरदान मिळालेले आहे कि हा मुलगा एकाच वेळेला तीन किंवा चार गोष्टींचा खोलवर विचार करुन प्राॕब्लेम सोडवत असे , अगदी Quad Core Processor सारखे एकाचवेळी पण स्वतंत्रपणे .


त्या काळात  परदेशी बनावटीच्या PLC च्या आतील साॕफ्टवेयरचा छडा लावून व ते पूर्णपणे आत्मसात करुन कंपनीला आत्मनिर्भरतेचा आनंद  त्याने सहजपणे मिळवून  दिला होता.


 आवारपूरच्या अत्यंत खडतर अशा हवामानात प्रोसेस प्लाॕन्ट मध्ये काम केलेले हे सर्व डेयर डेव्हिल्स आज वेगवेगळ्या ग्रुपचे AVP, VP,  Unit Head वगैरे जबाबदाऱ्या उत्तम प्रमाणे निभावत आहेत . 


त्याची अत्यंत आनंदी अशी अर्धांगिनी म्हणजे निशा ही वास्तूशास्त्र आणि टॕरो कार्डस या विषयात तज्ञ म्हणून काम करत आहे . मुलगा प्रथम हैद्राबाद येथे  मायक्रोसाॕफ्ट मध्ये कार्यरत आहे  आणि मुलगी इला शिकत आहे . गाण्याची तीला खूप आवड आहे .


 एकदा एका कार्यक्रमासाठी संजय सोलापूर मध्ये आमच्या घरी आला होता. अर्थातच दोन जिवलग मित्र एकत्र आल्यामुळे आईने गाणे म्हणण्याची फर्माईश केली. 


थोड्याच वेळात संजू सरवटे आणि  नारायण जोशी या दोघांनी मिळून " हृदयनाथ मंगेशकरांनी संगीत दिलेल्या " जैत रे जैत " मधले "आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखरं..." गाणे म्हणायला सुरवात केली आणि पूर्ण घर चैतन्याने भारुन गेले......  


 अर्थातच लता मंगेशकर, स्मिता पाटील ,जब्बार पटेल यांच्या सुरेख अशा सिनेमाची आणि या सिनेमातील गाणी आम्हाला म्हणून दाखवणाऱ्या *लोढा सिमेंट चे Vice Precident  असलेल्या संजय मधुकर सरवटे* या अनेकाग्रतेचा आशिर्वाद लाभलेल्या अवलियाची ही एक छोटीशी आठवण  !


*विनायक जोशी ( vp )*

  💬9423005702 

  📱9834660237

१२५७ , मंगलधाम , बी ३ , विठ्ठलवाडी , हिंगणेखुर्द , लेन नंबर ४ , पुणे ५१

*electronchikatha.blogspot.com*

स्वेयाचे बाबा कपिल साठे

 // श्री स्वामी समर्थ //

     *स्वेयाचे बाबा*


      *कपिल साठे*


  🎸🎸🎸🎸🎸


      29/08/2020


 कपिल आणि प्राजक्ता हे दोन्ही मुक्त पक्षी सध्या स्टाॕकहोम मध्ये  निसर्गाच्या सानिध्यात अत्यंत प्रेमाने आपल्या अत्यंत  गोड अशा स्वेया बरोबर रहात आहेत. 


कपिलने Agnels काॕलेज मधून इंजिनियरींग पूर्ण केले .त्या नंतर  IIM अहमदाबाद मधून MBA. 


तो उत्तम दर्जाचा Biker आहे.आपल्या आवडत्या गाडीवरुन प्राजला घेऊन  बंगलोर - उटी - मुन्नार असे दौरे केलेले आहेत.


आदित्य बिर्ला पासून सुरवात करुन सध्या तो एरीकसन या कंपनी मध्ये स्टाॕकहोम नावाच्या  " नोबेल" सीटी मध्ये  नोकरी करत आहे. 


स्विडन येथील  अत्यंत देखण्या अशा निसर्गाच्या सानिध्यात अत्यंत आनंदाने ते तिघे रहात आहेत.


 संगीताची उत्तम जाण असणाऱ्या कपिलला सध्या स्वेयाचा नवनवीन प्रकारचा जबरदस्त अविष्कार दररोज पहायला मिळत आहे .....


आज वाढदिवसा निमित्ताने त्याला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 

🎸🎸🎸🎸🎸


*विनायक जोशी (vp)*

  💬9423005702

 📱9834660237 

१२५७ , मंगलधाम , बी ३ , हिंगणेखुर्द , विठ्ठलवाडी , पुणे ५१.

*electronchikatha.blogspot.com*

तळजाई सप्टेंबर २०२०

 *@ तळजाई*


बारीकसारीक पावसात छानपैकी दहाहजार पावलांची वारी करुन आलो . बऱ्याच ठिकाणी खांद्या पर्यंत गवत आणि फक्त पावसाळ्यात प्रगट होणारी अनेक झाडे शांतपणे बघता आली . चिखलाची पायवाट असल्यामुळे सांभाळून सावकाश चक्कर मारुन आलो . साधारणपणे पन्नास ते सत्तरफूट उंचीची अनेक जूनीजाणती झाडे आनंदात उभी आहेत . मोर आहेत , मुंगुस आहेत , ससे आहेत , खारी आहेत . आपल्याच नादात जाणाऱ्या धामणी आहेत . ध्यानाचे दगड आहेत . सत्तावीस किलोमीटर अंतरावर ढगांची शाळा भरलेल्या अवस्थेतील सिंहगड दृष्टीपथात आहे . दोन सुंदर कॕनाॕल आहेत . हजार चिमण्या मुक्कामाला असलेली झाडे आहेत . येथे काहिही साध्य करायला जायचे नाही . हे फक्त  परफेक्ट साथीदारा बरोबर अनुभवायचे जग आहे ..


*विनायक जोशी (vP)* 

💬9423005702

📱9834660237

जनरल मॕनेजर उमेश कुलकर्णी

 // श्री स्वामी समर्थ //


        आनंदयात्री

    *उमेश कुलकर्णी*


*विनायक जोशी (vp)*

💬9423005702

📱9834660237 


 इंटलेक्स या कंपनी मध्ये जनरल मॕनेजर संशोधन विभाग या पदावर ते कार्यरत असताना पहिल्यांदा भेट झाली. कामाची सुस्पष्ट मांडणी , स्पष्ट विचार याच बरोबर इंडस्ट्रियल डाॕक्युमेंटेशन मध्ये अत्यंत तरबेज. 


अनन्या अॕकेडमी नावाची स्वतःची संस्था काढून सध्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस देत आहेत. याच बरोबर समाज कार्य सुध्दा उत्तम पणे करत आहेत. 


प्रकाश आमटे यांच्या श्रमसंस्कार शिबिराला सुध्दा त्यांनी उपस्थिती लावली आहे. आपली आई आणि सर्व कुटुंबीयांबरोबर अत्यंत आनंदाने राहणाऱ्या उमेश कुलकर्णी यांची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो याच कायम स्वरुपी शुभेच्छा . आज १४ सप्टेंबर या दिवशी असलेल्या त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी  मनःपूर्वक शुभेच्छा

💐💐🎂🎂💐💐


*विनायक जोशी ( vp )*

💬9423005702 

📱9834660237 

१२५७ , मंगलधाम , विठ्ठलवाडी , हिंगणेखुर्द , पुणे ५१


*electronchikatha.blogspot.com*

कर्मयोगी बाबा फाटक

 // श्री स्वामी समर्थ //


जागतिक फार्मासिस्ट दिन ....२५ सप्टेंबर २०१९


        *बाबा*

    *श्री. प्रभाकर जगन्नाथ फाटक*


M/S PHATAK MEDICALS 

     Kurundwad


                    

  विनायक जोशी (vp)

💬9423005702

📱9834660237 


कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात असलेले आणि कृष्णा व पंचगंगेच्या संगमामुळे पावन झालेले गाव म्हणजे *कुरुंदवाड*


या गावात दर्ग्या मध्ये शिवजयंतीला शिवचरित्रा वरती किर्तन ठेवणारा किंवा पेशंटला औषधे वेळेवर उपलब्ध व्हावीत म्हणून नदीच्या पुरातून पोहून पलीकडे जाणारा असा एक धैर्यवान माणूस रहात होता.या अत्यंत दिलदार माणसाचा पंचक्रोशी मध्ये *राजा फाटक* म्हणून दबदबा होता.


या राजा फाटकांचा मोठा मुलगा  म्हणजे *प्रभाकर फाटक*.


१९४८ च्या जळीतात सर्वस्व गमावल्या नंतर हताश किंवा निराश न होता फिनीक्स पक्ष्याप्रमाणे त्यांनी अविरत आणि कल्पक कष्टाने व्यवसायाची वृध्दी केली.


गेली पन्नास वर्षे सकाळच्या वेळी एक किलोमीटर अंतरावर असलेल्या नृसिंहवाडीच्या नदीत पोहणे आणि त्यानंतर दत्त महाराजांना मनोभावे नमस्कार करुन दुकाने उघडणे हा त्यांचा नित्यक्रम आहे.


या सकाळच्या कार्यक्रमात शरद उपाध्यें पासून आमिरखान पर्यंत  असंख्य लोकांशी त्यांची मुलाखत झाली आहे.


कायम सकारात्मक विचार करण्याची त्यांची विलक्षण हातोटी आहे. ट्रॕव्हल कंपनीच्या बसमधून चारधाम यात्रा असो किंवा नेपाळ अथवा वैष्णोदेवी वगैरे प्रवास कोणत्याही प्रकारची कुरकुर न करता *एकदम बेस्ट* असे म्हणत त्यांनी पार पाडला आहे.


 लहान दोन भाऊ आणि चार बहिणींना कायम मोठ्या भावाला साजेसा आधार दिला आहे.


अतिशय समाधानी आणि हुशार अशा सौ.प्रतिभा फाटक या सहचारिणी मुळे कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता अनेक अवघड संकल्प सिध्दीस नेलेले आहेत . आज सहस्त्रचंद्र दर्शन सहजपणे बघितलेल्या आणि त्र्याऐंशीव्या वर्षात पदार्पण करण्यासाठी हा मनाने तरुण असलेला कर्मयोगी आनंदाने तयार आहे.


देश विदेशात सुध्दा असंख्य लोकांशी जनसंपर्क असलेला , नातवंडात रमणारा , आजही दिवसातले किमान नऊ तास काम करणारा किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात ज्येष्ठ फार्मासीस्ट अशी ख्याती असलेला, स्वतः विषयी  फारच कमी बोलणाऱ्या या कर्मयोग्याला जागतिक फार्मासिस्ट दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!!


( २००५ आणि २०१९ साली आलेल्या महापूराला त्यांनी अत्यंत संयमाने  आणि धीराने तोंड दिले आहे )


१८ जानेवारी २०२० या दिवशी त्यांच्या  शेजारी बसून पुनर्वाचन केले अत्यंत आनंदाने 


 *विनायक जोशी (vp )*

💬9423005702

📱9834660237 

१२५७ ,

मंगलधाम , बी ३ , हिंगणेखुर्द ,लेन नं ४, पुणे ५१

*electronchikatha.blogspot.com*

आमची खिडकी ...स्वप्निल तावडे

 *जय गजानन*


*खिडकी*

      *स्वप्निल तावडे*

📱9822253810

    

 ३१ जूलै २०२०

  

देणाऱ्याने देत जावे

घेणाऱ्याने घेत जावे 

घेणाऱ्याने घेता घेता 

देणाऱ्याचे हात बनावे

या ओळींना समर्पक अशी एक खिडकी मज नशीबवान माणसाकडे आहे. 


या खिडकी पलीकडील दाम्पत्याने  निस्वार्थी भावनेने फक्त आणि फक्त दिलेच आहे. तेही उजव्या हाताने दिले तर डाव्या हाताला पत्ता न लागता.


सकाळी सकाळी या खिडकीतून उत्तम संस्कृतमधील श्लोक, सुभाषिते विद्यार्थ्यांच्या तोंडून ऐकू येतात. एक उत्तम गुरु आपल्या सर्व शिष्यांना एक समान वागणूक देऊन ज्ञानदानाचे पवित्र कार्य खिडकीतूनच बघायला मिळते. प्रातःकाळी मन प्रसन्न होऊन दिवसाच्या सर्व कार्यांना तयार होते. 

मग कधी या खिडकीतून अगदी आपुलकी, आस्था  असलेली आणि अकृत्रिम भावनेने चौकशी होते तर कधी वडीलकीच्या नात्याने दिलेले सल्ले अगदी मुक्तहस्ते मिळतात.


 कधी अध्यात्मिक पुस्तके आणि त्याच सरळ सोप्या अध्यात्माने केलेल्या पूजेचा प्रसाद तृप्त भावनेने दिला जातो. ही खिडकी जणू वैचारिक  व्यासपीठाचे प्रवेशद्वारच आहे. कुठलीही अडचण मांडा समोरून सकारात्मक उत्तरच मिळेल. बहुदा नव्हे नव्हे निश्चितच ही दातृत्वाची वृत्ती अनुवंशिकच आहे.


अशा खिडकीचा शेजार आम्हास लाभला आहे ही आमच्यावर सद्गुरू कृपा होय. 

ही खिडकी गतजन्मीच्या ऋणानुबंधाना वर्तमानातील व्यक्तींमध्ये रुजू करण्यासाठी असलेली एक वाटच आहे.

आणि ही खिडकी आहे मंगलधाम या इमारतीत राहणाऱ्या *सौ कल्याणी जोशी आणि श्री विनायक जोशी* या दाम्पत्याच्या समाधानी सदनाची.



*स्वप्निल चंद्रकांत तावडे*

📱9822253810

आशिश दायमा मार्केटींग हेड एलटेक

 // श्री स्वामी समर्थ //

      *आनंदयात्री*

    *आशिष दायमा*

 📱9923876856

    मार्केटींग मॕनेजर

          एलटेक

     १६/१०/२०२०


विनायक जोशी (vP)

📱9423005702 

           

 परभणीच्या जवळील सेलू हे आशिषचे गाव . ढोलकी , बासुरी , हार्मोनियम वगैरे उत्तम वाजवणारे आणि नाटकात काम केलेले रसिक असे वडील , कृष्णं शरणं मम असा ध्यास असलेली किंवा  हनुमान चालीसा म्हणणारी आणि अखंड कामात व्यस्त असलेली आई , चार प्रेमळ बहिणी आणि नऊ भाच्यांच्या सहवासात आनंदाने रहात असलेला आणि महर्षि दधिची ऋषींचा कृपाशिर्वाद लाभलेला असा हा *आशिष दायमा*


जयसिंगपूर येथील मगदूम काॕलेज मधून इंजिनियर झालेला , हैद्राबाद येथे औषधाच्या कंपनीत पहिली नोकरी करणारा , साधारणपणे ३ वर्षे सांगलीत स्वतःचा इलेक्ट्रॉनिक्स  मधील व्यवसाय करणारा तरुण उद्योजक म्हणजे आशिष.


 त्यानंतर भविष्या बद्दल व्यावहारिक दृष्टीकोन बाळगून तो पुण्यात आला . सेटको स्पिंडल्सचे मॕनेजिंग डायरेक्टर राजेश मंडलीक यांच्या ओळखीमुळे इंडिटेक मध्ये त्याचा प्रवेश झाला. इंडीटेक या कंपनीत श्री.कट्टी या अनुभव समृद्ध सरांच्या मार्गदर्शना खाली मार्केटींगचे मुलभुत धडे गिरवून तो तयार झाला.


 सध्या  एलटेक या कंपनीत  विजय बढे यांच्या कल्पनेतील औद्योगिक मार्केटींगसाठी सर्वस्व झोकणारा , आनंदी व पाॕझिटीव्ह व्यक्तीमत्व असलेला आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अत्यंत आनंदी अशा *मेघना* बरोबरच  सात महिन्यांच्या छोट्याशा *उर्जा* मुळे प्रचंड उत्साह प्राप्त झालेला अशा *आशिषला २८व्या वाढदिवसा निमित्त अनेक शुभेच्छा*

💐💐🎂🎂💐💐


विनायक जोशी (vp)

📱9423005702

*electronchikatha.blogspot.com*

इंडिटेक अकाउंट हेड रुपाली मॕडम

 // श्री स्वामी समर्थ //

    *आनंदयात्री*

   *रुपाली मॕडम*

    28/09/2020


   विनायक जोशी (vP)

  💬9423005702

  📱9834660237 


अतिशय आनंदी आणि प्रसन्न व्यक्तीमत्व लामलेल्या , कंपनीच्या अर्थखात्याची जबाबदारी सचोटीने आणि काळजीपूर्वक सांभाळणाऱ्या , आपण कामासाठी ज्या ठिकाणी बसतो ती वास्तू आपल्याला तथास्तु असा आशिर्वाद देते याची जाणीव ठेवून कायम पाॕझिटीव्ह विचार करणाऱ्या,  सिंगापूर वगैरे देशांची परदेशवारी असो किंवा पंढरपूरची आषाढातील वारी सारख्याच समरसतेने करणाऱ्या, छान अशी अध्यात्मिक बैठक  असलेल्या , पैशांचे सोंग करता येत नाही किंवा "अर्थ खात्याचा " अर्थ योग्य प्रकारे माहिती असलेल्या अशा चैतन्य मुर्ती म्हणजेच *इंडीटेक मधील अकाउंटस् हेड रुपाली मॕडम* यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 

💐💐🎂🎂🎈💐💐


   *विनायक आणि कल्याणी (vp)*

  💬9423005702

  📱9834660237 

 १२५७ , मंगलधाम , बी३ ,विठ्ठलवाडी , हिंगणेखुर्द , पुणे ५१

*electronchikatha.blogspot.com*

योगस्पर्श दिपक देशपांडे

 // श्री स्वामी समर्थ //

      *योग स्पर्श*

  *दिपक उर्फ नारायण देशपांडे*

    29/09/2020

  📱9762440657


विनायक जोशी (vP)

💬9423005702 

📱9834660237 



दीपक देशपांडे  यांनी बरीच वर्षे इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रात काम केले आहे. अतिशय उत्तम दर्जाचे काम करण्याबद्दल त्यांची प्रसिद्धी होती. तांत्रिक काम करत असतानाच एका अनपेक्षित प्रसंगा मुळे त्यांना आयुर्वेद आणि मसाज या विषयी उत्सुकता निर्माण झाली. 


साधारणपणे २००८ सालापासून मात्र  लक्ष्मी रोडवरील शगुनच्या जवळ असलेल्या सुप्रसिद्ध अशा "लिमये" सरांच्या कडे  शास्त्रोक्त मसाज  करण्याचा सराव चालू केला.


कोणतेही काम अत्यंत मनापासून करणे या स्वभावाला अनुसरून थोड्याच दिवसात  आजारी लोकांना उपयोगी पडेल अशा पध्दतीचा मसाज करायला शिकले.  अर्थातच यातून मिळत असलेल्या समाधानामुळे  मेडीकल मसाजच्या याच लाईन मध्येच आयुष्यभर काम करायचे त्यांनी ठरविले . 


अर्थातच इलेक्ट्रॉनिक्स या अत्यंत आवडीच्या कामाला कायमचा निरोप दिला. त्या नंतर आयुर्वेदीक तज्ञांबरोबर काम करुन "पंचकर्म" या

विषयाचे सुध्दा ज्ञान मिळवले. आजच्या घडीला वेगवेगळ्या प्रकारची औषधी तेले तयार करणे . त्यांचा योग्य वापर करुन रोग्याला आराम वाटेल असा मसाज करणे . सतत स्वतःला अपडेट ठेवणे वगैरे कामे अत्यंत आनंदाने आणि समाधानकारक पध्दतीने ते करत आहेत.


 "स्वामी समर्थ" यांचे निःसीम भक्त असल्यामुळे हे काम निष्ठेने आणि श्रद्धा पूर्वक  करत आहेत. अत्यंत सज्जन आणि दिलदार असे दिपक देशपांडे आज "योगस्पर्श" च्या माध्यमातून आणि स्वामींच्या आशीर्वादा मुळे असंख्य रूग्णांच्या वेदना कमी करायला मदत करत आहेत किंवा वेदनामुक्तीचा यज्ञ मनोभावे पार पाडत आहेत.


आज २९ सप्टेंबर या दिवशी असलेल्या त्यांच्या वाढदिवसा बद्दल मनःपूर्वक शुभेच्छा 

💐💐🎂🎂💐💐


        *विनायक जोशी (vp)*

💬9423005702 

📱9834660237 

१२५७ , मंगलधाम , बी३ , विठ्ठलवाडी , हिंगणेखुर्द , पुणे ५१

*electronchikatha .blogspot.com

  

*electronchikatha.blogspot.com*

Creativity सर्जनशिलता

 // श्री स्वामी समर्थ //

      *Creativity*

      किंवा *सर्जनशीलता*


  *विनायक जोशी (vp)*

 💬9423005702

 📱9834660237 


अतिशय उच्च दर्जाच्या Creator ने जबरदस्त creativity वापरून केलेले creation म्हणजे आपण आहोत याची जाणीवपूर्वक जाणीव झाली की आनंददायी अनुसंधानाचा प्रवास चालू होतो.

परमेश्वराने प्रत्येक सजीवाला दिलेल्या सर्जनशीलतेचा थोडासा जरी आनंददायी अनुभव आला तर आयुष्य म्हणजे

*आनंदाचे डोही आनंद तरंग* "

           *Creativity*


1) अपूर्णतेकडून पूर्णत्वाकडे

2)अनेकाग्रते कडून एकाग्रतेकडे

3)प्रचंड वेदना देणारी

4) कायम अस्वस्थ ठेवणारी

5)बाह्य संवेदना बंद ठेवणारी

6)खुप गर्दीत सुध्दा शांतपणा देणारी 

7)अलौकिक आनंद देणारी

8)अतार्किक अनूभव देणारी

9)क्षणभर दिव्यत्वाची अनुभूती देणारी

10)परमेश्वराशी अनुसंधान

11) ऐहीक गोष्टींची अनासक्ती वाढवणारी

आणि या सर्व असामान्य अनुभवा नंतर *व्यवहारी जगात सामान्य ठेवणारी* गोष्ट म्हणजेच "Creativity "


     *विनायक जोशी (vp)*

  💬 9423005702 

 📱9834660237 

 १२५७, मंगलधाम , बी ३, विठ्ठलवाडी , हिंगणेखुर्द , पुणे ५१

*electronchikatha.blogspot.com*

सहृदयी हृदयाचा पंप

 // श्री स्वामी समर्थ //


  *सहृदयी हृदय*


विनायक जोशी (vp)

💬9423005702 

📱9834660237 


 हृदय नावाचा एक सहृदयी पंप आपल्या प्रत्येकाच्या शरीरात कार्यरत आहे. शुद्ध रक्त सर्व शरीरभर योग्य दाबाने पाठवणारा हा पंप हे सामान्य माणसासाठी फार मोठे कोडे आहे. 


या पंपाला परमेश्वराने स्टार्ट करुन आपल्याला दिला आहे. या पंपाचा वेग मात्र माझा *मी* पणा कंट्रोल करत आहे. 


माझा सर्व आनंद मला मिळणाऱ्या  "आदर " या गोष्टी भोवती केंद्रित आहे. चुकून जरी कोणीही विरोध केला किंवा "अपमान " केला की संतापाने या पंपाचा वेग वाढतो. त्या मुळे *जास्त दाबाने* रक्त प्रवाह सर्व बारीकसारीक रक्तवाहिन्यां मधून वाहायला लागतो.


 या मधील काही नाजूक नळ्या या जास्त दाबामुळे फुटतात . अर्थातच हे फुटलेले पाईप नैसर्गिक रीतीने दुरूस्त केले जातात आणि बहूतेक वेळेला या कामा मधूनच  Blockages किंवा अडथळे  तयार होतात. 


आपल्या शरीरातील हा पंप दिर्घ काळ व्यवस्थित चालू ठेवण्यासाठी चालणे , व्यायाम वगैरे गोष्टींच्या बरोबरच आपल्या अपेक्षां मध्ये थोडासा बदल करायची तयारी पाहिजे  .


वयाची ५५ वर्षे  ओलांडून पुढे गेलेल्या मंडळींनी कोणतीही गोष्ट सिद्ध करायच्या भानगडीत पडू नये. सर्व ठिकाणी आपले स्वतःचे काम स्वतः करणे. साफ सफाई कामगारांच्या पासून ते उच्चपदस्थ मंडळीं पर्यंत सर्वांच्या कामाचा आदर राखणे. जास्तीत जास्त शारीरिक कष्ट आनंदाने करणे हे जरुरीचे आहे.


 

पु.ल. देशपांडे , लता मंगेशकर , श्रीनिवास खळे , मंगेश पाडगावकर , भिमसेन जोशी वगैरे असंख्य मंडळींनी अपरंपार आनंदाचा ठेवा आपल्यासाठी ठेवला आहे त्याचा मनापासून आस्वाद घेणे. 


 आपल्या आसपास घडणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टींना उत्साहाने दाद देऊन आनंदी रहाणे . अशा गोष्टीं मधूनच आपल्या हृदयाचा पंप कमी किंवा जास्त असे भावनिक धक्के उत्तम रीतीने सहन करुन कार्यक्षमतेने चालू शकतो .


 कायम सकारात्मक विचार करुन या पंपाला निवांत राहू द्यायचे एवढेच आजच्या दिवशी स्मरण ठेवायचे

👍❤👍


   *विनायक जोशी (vp)*

   💬9423005702

   📱9834660237 

 मंगलधाम , बी३ , विठ्ठलवाडी , हिंगणेखुर्द , लेन नं ४ , पुणे ५१. 

*electronchikatha.blogspot.com*

वेळणेश्वर समुद्र

 // श्री स्वामी समर्थ  //

        श्रावण

      *वेळणेश्वर समुद्र*

        12/08/2020

    

   *विनायक जोशी (vp)*

 💬9423005702

  📱9834660237 


शिवाजीपार्क दादर येथे राहणाऱ्या चितळे यांच्यामुळे अथांग अशा समुद्राचे पहिले दर्शन झाले . पंचमहाभुतांपैकी पाण्याचे महत्व अधोरेखित करणारा तो अथांग सागर ... नारायण जाफराबाद अल्ट्राटेकला होता त्यावेळी जाफराबादचा समुद्र शांतपणे बघता आला . दीवचा समुद्र बघितला . त्यामुळे वेळणेश्वरला जायच्या आधीची पूर्व तयारी झालेली होती.


वेळणेश्वराच्या समुद्राच्या किनाऱ्यावर पोचलो आणि पहिली आठवण अगस्ती ऋषींची आली.


आठ वर्षे जाफराबादच्या समुद्राजवळ राहिलेल्या नारायणला बघून असंख्य लाटा अतिशय वेगाने आणि आनंदाने आमच्या कडे झेपावल्या आणि परत जाताना दीव आणि जाफराबाद मधील आपल्या भावंडांची खुशाली विचारून परतल्या. येणारी प्रत्येक लाट एका वेगळ्याच आणि सर्व समावेशक आनंदाची अनुभूती देत होती.


या किनाऱ्यावर कृत्रीम आनंदाच्या कोणत्याही गोष्टी नव्हत्या. सोमरस प्राशन करून येणाऱ्यांना येथे बंदी होती. लखलखणाऱ्या फेसाळलेल्या लाटा आणि पायाखालून सरकणारी बारीक वाळू या दोन्हीही प्रकारांचा मनमुराद आनंद घेत दोन तीन तास कसे गेले ते कळलेच नाही.


साधारणपणे सायंकाळी पाच वाजता आम्ही काठावर येऊन ओळीने थांबलो.दूर अंतरावरा क्षितीजा वरती ३-४ बोटी एकाचजागी डुलत उभ्या होत्या.


त्या बोटीं बद्दल , तेथे असलेल्या पाण्याच्या खोली बद्दल , हजारो टन सामानाची चढ उतार करताना बोट बॕलन्सिंगचे महत्त्वाचे काम करणाऱ्या कप्ताना बद्दल , दररोज येणाऱ्या भरती आणि ओहोटी बद्दल किंवा पौर्णिमेला आणि अमावस्येला स्वभावातील वेगळेपणा दाखवणाऱ्या समुद्राच्या बद्दल , लांबूनच बोटींना दिशा दाखवणाऱ्या दीपगृहा बद्दल नारायणने स्पष्ट आणि स्वच्छ माहिती सांगितली. 


संध्याकाळी साडेपाच वाजता त्या अत्यंत तेजस्वी आणि अथांग अशा सागराचा निरोप घ्यायची वेळ आली. "ने मजसी ने परत मायभूमीला" हे महाकाव्य लिहिणाऱ्या प्रखर देशभक्त स्वातंत्र्यवीर सावरकरांची तीव्र आठवण झाली.


अत्यंत अनपेक्षित आणि आनंददायी अश्या वेळणेश्वरांची एक दिवसाची यात्रा पूर्ण झाली होती.


येताना परत एकदा मर्यादा पुरुषौत्तम असून सुध्दा वेळप्रसंगी हातात परशु घेतलेल्या परशुरामांचे दर्शन झाले. बरोबर तीन वर्षांनी एकत्र जमलेल्या कुटुंबातील सर्व आनंदयात्रींनी कमालीच्या उत्साहाने परत कोकणात यायचेच असा ठराव पास केला आणि  कऱ्हाड कडे परत निघालो.......

🐚🐚🐚

 

१२ मे २०१८ संध्याकाळचे ५

*विनायक जोशी (vp)*

 💬9423005702

  📱9834660237 

  १२५७ , मंगलधाम , बी ३ , विठ्ठलवाडी ,हिंगणेखुर्द ,लेन नं ४ , पुणे ५१

*electronchikatha.blogspot.com*

अश्विनी प्रफुल्ल चिटणीस " टेक महिंद्रा"

 // श्री स्वामी समर्थ //


    *Young India*


       *आनंदयात्री*


  *अश्विनी प्रफुल्ल चिटणीस*


     Tech Mahindra

     *11/10/2020*


 विनायक जोशी (vP)

💬9423005702 

📱9834660237


पुण्यातील सिंहगडरोडची सुरुवात ही अत्यंत जबरदस्त अशा रामकृष्ण मठाने होते . तेथून बरोबर ४ किलोमीटर अंतरावर विठ्ठल रखुमाईंच्या कृपाशिर्वादात हिंगणेखुर्द हे अतिशय सुंदर गाव आहे . या गावातील लेन नं ४ मधील कमालीची पाॕझिटीव्ह व्हायब्रेशन्स असलेल्या *१२५७ मंगलधाम* या वास्तूत २००६ च्या वसंतऋतू मध्ये *अश्विनी* रहायला आली आणि प्रगतीच्या दिशेने प्रवास चालू झाला .....


अत्यंत सुरेख अशा अभिनव शाळेत मातृभाषेचा सार्थ अभिमान बाळगत शिक्षण पूर्ण केले . SP काॕलेज मधून BSC सहजतेने पूर्ण केले . माॕडर्न काॕलेज मधून MSC करत असतानाच तीला नोकरी मिळाली ....


*वेबवर्क्स* या कंपनीत कामाची  सुरुवात केली आणि त्या नंतर 


*DB Xento* 


*Capgemini*


 *Tech Mahindra*


असा अनुभव समृद्ध करणारा आनंददायी कामांचा प्रवास चालू आहे . 


भरपूर चालणे , प्राणायाम करणे आणि कम्यूनिकेशन स्किल्स वाढावी म्हणून थोडावेळ नेटफ्लिक्स वरील उत्तम गोष्टी बघणे हा तिचा नित्यक्रम आहे .....


अत्यंत कडक आणि तत्वनिष्ठ अशा त्र्यंबक चिटणीस या आजोबांची ती नात आहे , आज्जीचा प्रेमळपणा तिच्याकडे आला आहे , प्रफुल्ल चिटणीस या बाबांच्या कडून कोणतेही काम चिकाटीने करणे हे ती शिकली आहे , आई ही तीची बेस्ट फ्रेंड आहे , कारखानदार असलेला विजयकाका तिचा आदर्श आहे ......


*अश्विनी चिटणीस* ही मराठमोळी आणि  आनंदी स्वभावाची सरळ मुलगी अत्यंत साधेपणाने गेली आठ वर्षे *IT* क्षेत्रात कठोर मेहनत घेऊन उत्तम काम करत आहे .


नैतिकता पाळून आणि संघर्षमय वाटचाल करुन ज्यावेळी यश मिळते त्याचवेळी आपण *आनंदयात्री* होऊ शकतो याची पूर्ण कल्पना असलेल्या *अश्विनी ज्योस्ना पफुल्ल चिटणीस* या मुलीला आज वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा  ....


*विनायक आणि कल्याणी जोशी*(vP)

💬9423005702 

📱9834660237 


१२५७ , मंगलधाम , बी -३ , विठ्ठलवाडी , हिंगणेखुर्द , पुणे ५१

*electronchikatha.blogspot.com*

शाश्वत समाधान .....Fear , Anger , Stress

 *शाश्वत समाधान*


विनायक जोशी (vP)

💬9423005702 

 

Fear , Anger , Stress या तीन मानसीक बाळांना व्यवस्थित हाताळता यायला पाहिजे असे सदगुरु जग्गी वासुदेव यांचे म्हणणे आहे .....


आपल्या समोरच्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारे न थांबवता किंवा विरोध न  करता त्याची कमितकमी तीन वाक्ये ऐकून घेणे या गोष्टीची सवय मी लावून घेणार आहे . 


आनंददायी गोष्ट असेल तर ताबडतोब आणि एखादी न पटणारी गोष्ट असेल तर थोड्या वेळाने आणि सौम्य भाषेत प्रतिक्रिया देणे या अत्यंत अवघड गोष्टी शिकायच्या आहेत ...


अर्थातच स्वतःच्या उत्तम मानसीक आणि शारीरिक आरोग्यासाठी फक्त ...

👍😀👍...

विनायक जोशी ( vP) 💬9423005702

निखिल फाटक नायपर आसामला प्रवेश अभिनंदन

 //श्री स्वामी समर्थ //

   अभिनंदन 

 *निखिल फाटक*

    12/10/2020


कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड सारख्या छोट्या गावात राहणाऱ्या *निखिल विनायक फाटक* हा.

सांगली येथील उत्तम अशा बिरनाळे काॕलेज मध्ये फार्मसीची पदवी घेत असतानाच त्याने कोल्हापूर येथील 

ANA Academy for NIPER Aspirants या क्लास मध्ये प्रवेश घेतला .


या क्लास मधील

*डाॕ.मच्छिंद्र बोचरे आणि डाॕ. महेश काळे* यांनी नायपरसाठी कमालीच्या उच्च दर्जाचे मोटीव्हेशनल असे सातत्यपूर्ण शिक्षण दिले . परीक्षा झाल्यानंतर रिझल्ट लागल्यावर सुध्दा अतिशय सुंदर पध्दतीने  मार्गदर्शन केले . या बद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन 

💐💐💐👏👏👍🙏


निखिलला पुढच्या वाटचालीसाठी आमच्या कडून मनःपूर्वक शुभेच्छा


विनायक आणि कल्याणी जोशी 

💬📱9423005702

electronchikatha.blogspot.com

विजय बढे इंडिटेक १७ आॕक्टोंबर २०२०

 // श्री स्वामी समर्थ //

     *संवेदनशील तत्वनिष्ठ*


     *विजय पद्माकर बढे*

      17/10/2020

*MD*          Inditech

*Director*  Eltech


   *विनायक जोशी (vP)*

📱9423005702


कोणतीही गोष्ट मनापासून करणारा आणि त्याच्यासाठी वाट्टेल तेवढी मेहनत घ्यायची तयारी असणारा.कामाशिवाय इतर क्षेत्रात सुध्दा रसरशीतपणे भाग घेणारा असा विजय बढे.

 

पोस्ट ग्रॕज्यूएशन करत असताना लाभलेले विजय भटकरां सारखे गुरु असोत किंवा पी.जे.इलेक्ट्रॉनिक्स मधील डाॕ.मराठेंसारखे गुरू किंवा  गाणे शिकवणाऱ्या पुणतांबेकर मॕडम अथवा मॕरेथाॕन रनींगचे धडे ज्यांच्या कडे गिरवत आहे ते JJS ग्रुपचे प्रमोद देशपांडे सर यांचा तो विशेष अनुग्रह लाभलेला शिष्य आहे . CEF या संस्थेच्या डाॕ.मनिष गुप्ता सरांमुळे व्यावसायिक आयुष्याकडे बघायची सम्यक दृष्टी त्याला प्राप्त झाली आहे . 


ब्राह्म मुहुर्तावर साॕफ्टवेयर मधील अल्गोरिदमस् लिहिणे , पहाटेच्या वेळी २१ किलोमीटर रनिंगसाठी लागणारी तयारी करणे , पूर्ण दिवस इंडिटेक आणि एलटेक या दोन्ही कंपन्यात महत्वपूर्ण काम करणे , संध्याकाळी बॕडमिंटन खेळणे , रात्रीच्या प्रहरात गाण्याचा रियाज करणे , संधी मिळेल तेथे मनापासून आपली कला सादर करणे ( बदला घेणे 😜)वगैरे गोष्टी तो सहजपणे करत आहे .

 

प्रोफेसरांचा मुलगा , कायम जिद्दीने साथ देणाऱ्या स्वातीचा जोडीदार , निरंजन आणि वल्लभ या दोन्ही मुलांचा जवळचा मित्र , याचबरोबर संपर्कात आलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळींचा जगन्मित्र असलेला , परमार्थात अधिकारी असलेल्या नाईक आज्जींचा हा शिष्य , आई वडिलांच्या कृपाशिर्वादाने उत्तम मार्गक्रमण करत आहे . परवाच्या गणपती उत्सवात त्याने *या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे* या गाण्यातून आयुष्याकडे तो कसा बघतो आहे हे सांगितले आहे


कर्वेनगर येथील अनुपम हाईटस मध्ये राहणाऱ्या आणि कामासाठी भरपूर प्रवास करणाऱ्या या अत्यंत हुशार आणि शांत व्यक्तिमत्वाला आमच्या कडून वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

💐🍥🎂💐


*विनायक आणि कल्याणी (vP)*

📱9423005702

मंगलधाम , हिंगणेखुर्द लेन नं ४ , पुणे ५१

*electronchikatha.blogspot.com*

वैभवी तेजस जोगदंड स्वागत

 *"वैभवीचे" स्वागत* *नारायणमामा*

From the cleanest city of India for past 3 years officially and literally.From the cultural capital of MP 

From the home of swar saraswati and many well known swar saadhak.

From the historically important landmark of India.

 You bring a different flavour to this group of western maharashtrians who recently has developed Australian, Swedish, Danish, Chinese flavours but basically rooted deeply into  marathi ethos

मंदार सोवनी बद्दल नारायण

 *नारायण जोशी*

सिनियर व्हाईस प्रेसिडेंट अल्ट्राटेक


     *मंदारी बद्दल*

Many in this group engage themselves in Research basic or applied. Also they have proven themselves to be extremely successful in their ongoing journey. They are the creators, motivators, originators and seekers if something more than on their dish of passion. *Mandar Suresh Sovani* is one such who has a big following in his chosen field.

कर्मयोगी बाबा फाटख यांच्या बद्दल नारायण जोशी

 *नारायण जोशी*

  सिनियर व्हाईस प्रेसिडेंट अल्ट्राटेक



   *ति.बाबांचा सत्कार झाला होता त्या दिवशी*


 It looks like Dada saheb Phalke award of pharmacists.

 Probably it may be called as Prabhakar Phatak award.


I don't think someone of his age had determination to serve patients at whatever time of day for more thank 50 years.


Commitment to serve even by swimming across a flooding river at night and bringing the required medicine for the needy patients

Hats off to Kaka 

🙏🙏🙏

मनोज शहा नारायण जोशीं बद्दल

 *मनोज शहा , नारायण जोशी बद्दल १९८१ हरीभाई देवकरण सोलापूर*

मला इथे माझ्या जीवनाचा टर्निंग पॉइंट share करायचा आहे. मी जेव्हा नववीत होतो तेव्हा मला maths ची खूपच भीती वाटायची. सहामहीच्या परीक्षेला तर मी फेल होईन असे वाटले होते. एक दिवस वर्गात मी नारायण च्या शेजारी बसलो होतो. त्या वर्षी नाऱ्याने वर्गात टॉप केले होते. पाठक सरांचा तास सुरू होता.  sir Geometry मध्ये true/ false विचारत होते. एका प्रश्नाला सर्व वर्ग including सर true म्हणाले. तेव्हा नारायणाने false सांगितले. सरांनी explain करण्यास सांगितले. नाऱ्या confidently पुढे येऊन explain केले. सरांनी देखील तो पॉइंट मान्य केला. माझ्यासाठी हे सगळे shocking होते. जेव्हा मी नाऱ्याला विचारले तेव्हा त्याने मला चक्रपाणी सरांबद्दल सांगितले. मग मी त्यांच्याकडे tuition लावली. त्यानंतर माझ्या आयुष्यात संपूर्ण बदल झाला. त्या वर्षी नारायणाने खूपच मदत केली. जेव्हा मला कुणी आयुष्याचा टर्निंग पॉइंट विचारतो तेव्हा मी हाच टर्निंग पॉइंट म्हणून सांगतो. नारायण आणि चक्रपाणी सर हे दोघे माझे टर्निंग पॉइंट आहेत. दुर्देवाने मी कधीच दोघांना सांगितले नाही. आज या निमित्ताने नाऱ्याला तरी सांगू शकलो. Thanks नाऱ्या. नेहमी  परीक्षेत मागे असणारा मी दहावीत ८३% टक्के मिळवू शकलो. बोर्डात मला maths मध्ये 147 मार्कस मिळाले. त्या नंतर बारावीत चांगले मार्क मिळवून मी वालचंद engineering सांगली कॉलेज मध्ये admission मिळवू शकलो.

चक्रपाणी सरांचा मी शतशः ऋणी आहे. 🙏🙏

क्षितिज अभय मायदेव वाढदिवसाच्या शुभेच्छा ३१ आॕक्टोंबर २०२०

 // श्री स्वामी समर्थ //

   *३१ आॕक्टोंबर २०२०*

*क्षितिज अभय मायदेव*


मंगळवेढ्याच्या अभय मायदेव आणि सोलापूरच्या नीशा फडके यांचा हा मुलगा . अभय हा भारत फोर्ज मध्ये AVP होता आणि नीशा LIC मध्ये आॕफिसर . आपण वेगळे काहीतरी करायचे असे ठरवून क्षितिजने CA करायचे ठरविले आणि पहिल्याच फटक्यात CA झाला . सध्या पॕरिस येथील सुप्रसिद्ध अशा *अॕक्सा* या फर्म मध्ये कार्यरत . अनुजा बरोबर सध्या तेथेच अत्यंत आनंदाने वास्तव्य. 

क्षितिजला , वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ....


विनायक आणि कल्याणी काकू

३१ आॕक्टोंबर २०२०

सिध्दिविनायकांचे कृपाशिर्वाद नारायण जोशी यांना

 // श्री स्वामी समर्थ //


   *सिध्दिविनायकांचे कृपाशिर्वाद*

           नारायण प्रभाकर जोशी

     ३ नोव्हेंबर २०२०

 

विनायक जोशी (vp)

💬9423005702 

 

सोलापूर येथील आदर्श नगर या सोसायटीत राहणाऱ्या  नारायण प्रभाकर जोशी या मुलाने १९८१ साली पुण्यात शिक्षणासाठी प्रवेश केला. अर्थातच  पेशव्यांनी स्थापन केलेल्या अत्यंत तेजस्वी अशा तळ्यातला गणपतींचे किंवा सारसबागेतील गणेशांचे कृपाशिर्वाद घेऊनच

 🙏🙏🙏


नारायणने शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्यानंतर L&T या कंपनीत तो कामाला लागला . या कंपनीत सिनियर इंजिनियर , मॕनेजर म्हणून काम केले .या नंतर Ultratech Cement या कंपनीत GM आणि AVP या पोझीशन्स वरती उत्तम दर्जाचे काम केले .


 त्यामुळे २०१० साली त्याला Unit Head या बढती बरोबरच कोलकाता येथे अत्यंत आधुनिक असा नवीन सिमेंट कारखाना उभारायची संधी कुमार मंगलम बिर्ला यांनी दिली.  आयुष्यात एकदाच मिळणाऱ्या या संधीचे त्याने सोने केले . 


दानकुनी येथे ५ वर्षात शंभर एकर जागा विकत घेऊन त्या जागेत अत्यंत आधुनिक पध्दतीने उत्तम चालणारा कारखाना उभा केला . 


*या येथेच कंपनीच्या आवारात सिध्दिविनायकांचे अत्यंत प्रसन्न असे मंदिर शास्त्रोक्त पध्दतीने त्याला बांधता आले.* या साठी आळंदी आणि पुण्यातील शंकराचार्य मठातील घनपाठी गुरुजींनी सर्व प्रकारची धार्मिक सिध्दता करून दिली . या साठी अनेकदा या घनपाठी गुरुजींनी पुणे ते कोलकाता प्रवास केला.....


प्रत्येक वर्षाला अत्यंत मोठ्ठी उलाढाल करणाऱ्या या नवीन कारखान्याची सुत्रे नवीन पिढी कडे सोपवून स्थितप्रज्ञतेने तो पुढील नवीन जबाबदारी घेण्यासाठी दुर्गापूर आणि त्या नंतर रायपुरच्या एक्सपोर्ट युनीट येथून ग्रेटर नोएडा येथे रवाना झाला आहे *सिनियर व्हाईस प्रेसिडेंट म्हणून* .....


श्री गणेशांच्या कृपाशिर्वादाने अत्यंत समाधानाने आणि कृतार्थ भावनेने पुढच्या प्रगतीच्या वाटेवर प्रवास चालू असलेल्या नारायणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 

💐💐🎂🎂💐💐


*विनायक जोशी (vp)*

💬9423005702

  १२५७ , मंगलधाम ,हिंगणेखुर्द ,

लेन नं ४ , पुणे ५१

*electronchikatha.blogspot.com*