गुरुवार, ४ जुलै, २०१९

Devotee

// श्री स्वामी समर्थ //
    *Devotee*

     *विनायक जोशी (vp)*
 📱9423005702

परमार्थाच्या जगात व्रतवैकल्य , उपासतापास , साधना ,पूजा मानसपूजा , निरीच्छपणा वगैरे गोष्टींचा संबंध असल्यामुळे मला या क्षेत्रात गती प्राप्त होणे शक्य नव्हते .
माझ्या कडे प्रेम नावाचे एक साधे सोप्पे साधन होते . त्याच्या मदतीने मी छान काम करायला सुरूवात केली . आपल्या सहवासात येणाऱ्या वस्तू किंवा वास्तू अथवा माणसे यांच्या बरोबर प्रेमाने काम करणे एवढे एकच व्रत सहजपणे पाळले . एका वेगळ्या अनुभवाच्या जगात प्रवेश केला . कोणत्याही गोष्टींची अथवा माणसांची भिती संपुष्टात आली .कोणालाही फाॕलो करावे किंवा कोणी आपला आदर्श ठेवावा असे वाटले नाही . काम चालू करणे आणि काम उत्तम पणे पूर्ण करणे एवढीच साधना चालू ठेवली . चांगल्या किंवा आनंददायी गोष्टींच्या लाटा मनापासून अनुभवता आल्या . व्यावहारिक मोजमापाच्या पट्यांच्या जवळ कधीही जावे लागले नाही . कधीही स्वतःला बोअर केले नाही .आत्मानंद म्हणजे काय याचा शांतपणे अनूभव घेता आला .....
 कोणत्याही संकल्पनेच्या दोन ओळींमधील दडलेला अर्थ सहजपणे  वाचायला यायला लागला की Devotion वाढते .अनेक वर्षे Devotedly काम केले की Blessing's किंवा आशिर्वादांचा पाऊस चालू होतो आणि  Devotee बनण्यासाठीचा रस्ता  स्वच्छ आणि स्पष्ट पणे दिसायला लागतो .त्या नंतर मात्र तुम्हाला काहिही नको असते.....

*विनायक जोशी(vp)*
📱9423005702
मंगलधाम ,हिंगणे खुर्द ,लेन नं ४ , पुणे ५१
*electronchikatha.blogspot.com*

मंगळवार, २ जुलै, २०१९

डाॕ.जगन्नाथ दिक्षित यांनी सांगितलेली जीवनशैली

// श्री स्वामी समर्थ //
  *डाॕ.जगन्नाथ दिक्षित*
         *पध्दतीची जीवनशैली*

*२ जूलै २०१८ ते २ जूलै २०१९*

*विनायक जोशी(vP)*
📱9423005702

*३० जून २०१८*

सलग चार वेळा डाॕ.दिक्षितांचा कार्यक्रम यू ट्यूब वरती बघितला . त्याचे सार लिहून काढले.कल्याणी बरोबर चर्चा करून पुढचे चार महिने दररोज दोन वेळा जेवण आणि सहा किलोमीटर चालणे असा साधारण कार्यक्रम ठरविला आणि हळूहळू वर्षभर चालू राहिला आहे...

*२ जूलै २०१८ पर्यंतचा साधारण दिनक्रम*

 सकाळी ५ वाजता उठणे
 सकाळी ६ ते ७ चालणे
 सकाळी ७.३० न्याहारी.नंतर
(लोसार २५) ही बीपीची गोळी
१० ते १ बैठे काम
१.३० वाजता जेवण
दुपारी ३ ते ५.३० बैठे काम
दिवसभरात पाच वेळा चहा . येता जाता बिस्किटे , फरसाण , चिवडा वगैरे वगैरे
रात्री ८.३० जेवण
रात्री १० वाजता झोपणे
*वजन ८४.३किलो*

*२ जूलै २०१८ ते २ जूलै २०१९ पर्यंतचा  साधारण दिनक्रम*

सकाळी ५ वाजता उठणे
सकाळचा चहा नेहमीचा
सकाळी ९.१५ वाजता व्यवस्थित जेवण त्या नंतर बीपीची गोळी (लोसार २५)
१० ते ४.३० बैठे काम
दुपारी १.३० वाजता एक ग्लास पातळ ताक
दुपारी ३.३० ग्रीन टी
संध्याकाळी ५.१५ ते ६.३० या वेळेत सहा किलोमीटर चालणे.
रात्री ८.१५ वाजता व्यवस्थित जेवण
रात्री ९.१५ वाजता सहस्रपावली हिंगण्यातून.
रात्री १० वाजता झोपणे

*डाॕ.दिक्षित जीवनशैलीचा परिणाम २ जूलै २०१८ ते २ जूलै २०१९ पर्यंत*

पहिल्या ३ महिन्यात ४ किलो वजन कमी . त्या नंतर साधारणपणे महिन्यात एक किलो किंवा अर्धा किलो असे कमी झाले .
*एका वर्षात साधारणपणे १० किलो वजन कमी झाले. पोटाचा घेर दोन इंच कमी झाला* ....

*सध्याचे वजन ७४ किलो*
सुरवातीच्या काळात चातुर्मास आहे असे जाहिर केल्यामुळे दिक्षितांनी सांगितलेली जीवनशैली फाॕलो करणे सोप्पे गेले .

*विनायक जोशी (vP)*
📱9423005702
मंगलधाम , हिंगणेखुर्द ,लेन नं ४ , पुणे ५१
*electronchikatha.blogspot.com*

Doctor's Day

// श्री स्वामी समर्थ //
  *Doctor's Day*
    *मनःपूर्वक कृतज्ञतेचा दिवस*

 *विनायक जोशी(vp)*
📱9423005702

  अतिशय ध्येयनिष्ठ आणि कर्मयोगी अशा अनेक डाॕक्टर्सना मनःपूर्वक अभिवादन
   🙏🙏🙏
सोलापूर येथील डाॕ.दिवाडकर , डाॕ.केळकर ,डाॕ.अलबाळ ,डाॕ.चादोरकर , डाॕ.केमकर ,डाॕ.साठे डाॕ.नेने ,डाॕ.कुमावत ,डाॕ.चक्रपाणी ,डाॕ.बालीगा ,डाॕ.वैद्य ,डाॕ.स्वाती गोडबोले ,डाॕ.मुकुंद राय , डाॕ.रा.ना.जोशी ,
डाॕ.गायकवाड ,
डाॕ.मयेकर ,डाॕ.परळे , डाॕ.उमा प्रधान ,डाॕ.कुलकर्णी ...
       
 पुण्यातील डाॕ चारू आपटे , डाॕ.रणजीत देशमुख ,डाॕ.राजीव जगताप ,डाॕ.गोडसे , डाॕ.स्वामी ,डाॕ.धनंजय गोडसे , डाॕ.भगली, डाॕ.राणा ,डाॕ.मोडक , डाॕ.भावे ,डाॕ.केरकर ......बेळगावचे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डाॕ.दिक्षित ....अशा असंख्य  डाॕक्टर्स मंडळींना आजच्या दिवशी मनापासून शुभेच्छा
💐💐💐💐💐
🥼👨🏿‍⚕👩🏽‍⚕💊💉😷🏥


// श्री स्वामी समर्थ //
     *कर्मयोगी फॕमिली डाॕक्टर*
       *डाॕ.द.म.नेने*
 
    *विनायक जोशी (vp)*
 📱9423005702

सोलापूर येथील वाडिया हाॕस्पिटल मध्ये डाॕ.साठे मॕडम यांच्या अध्यक्षतेखाली माझा जन्म झाला .१९६३ साली दहा आॕगस्टला पहाटे २.३० अशी अचूक जन्मवेळ नोंदवायचे काम डाॕ.नेने यांनी केले.त्या काळात डाॕ.दिवाडकर हे आमचे फॕमिली डाॕक्टर होते. या नंतर काही वर्षांनी लष्कर भागातील राम मंदिराच्या शेजारी डाॕ.नेने यांचा दवाखाना चालू झाला . काॕलनी मधील दोन वर्षाच्या मुलापासून ते ऐंशी वर्षांच्या आजोबां पर्यंत सर्वांना आरोग्य संपन्न ठेवण्याची जबाबदारी डाॕ.नेने यांनी लीलया पेलली. मंद स्मित , माफक बोलणे , अचूक निदान आणि अत्यंत कमी फी या चतुःसुत्री मुळे  नेने डाॕक्टरांना सर्वांच्या मनात आणि घरात आदराचे स्थान प्राप्त झाले. नेने डाॕक्टरांच्या दवाखान्याची पायरी चढली की अर्धे अधिक आजार घाबरुन पळून जात असत. दररोजचे तीन डोस असे तीन दिवसांचे औषध घेऊन घरी यायचे.पहिल्या दिवसाचे तीन डोस घेई पर्यंतच आजारातून सुटका झालेली असायची.नेने डाॕक्टरांच्या आश्वासक बोलण्यामुळे ताप ,सर्दी ,खोकल्या पासून ते अगदी मणक्याचे हाड सरकलेले असताना सुध्दा कोणत्याही प्रकारची भीती वाटायची नाही.आजच्या इंटरनेटच्या युगात सुध्दा डाॕ.नेने त्या वेळी वापरत असलेल्या जंक्शन व्हायोलेट किंवा खोकल्याच्या गुलाबी औषधाची अथवा साडेतीन गोळ्यांच्या डोसची आठवण येते.सर्व आजारांना बरे करण्याची ताकद असलेल्या त्या गोळ्यांची कधीही चिकित्सा करावी वाटली नाही किंवा वाटत नाही .याचे एकमेव कारण म्हणजे डाॕ.नेने या  हजारो पेशंट बरे करणाऱ्या तपस्वी माणसाचा अनुभव समृद्ध स्पर्श त्या औषधाला लाभला होता. अनेक  प्रकारच्या डिफीशीयन्सीज दाखवणारी करोडो रुपयांची निर्विकार मशिन्स आता उपलब्ध आहेत .त्या मधून निघणारे रिपोर्टस वाचतानाच भिती वाटते. पेशंटला अजिबात न घाबरवता तपासणाऱ्या डाॕ.द.म.नेने यांची यावेळी आठवण प्रकर्षाने येते . आजही लष्कर मधील राम मंदिरात जायचा योग आला की रामपंचायनातल्या त्या मुर्ती किंवा प्रवचन देणारे गुरुजी ,तेथेच असलेले भुयार आणि याच मंदिराच्या शेजारी लाकडी फोल्डींगचा दरवाजा असलेल्या आणि पन्नास साठ पेशंटनी कायम भरलेल्या दवाखान्याची आणि असंख्य पेशंटस् बरे करणाऱ्या कर्मयोग्याची म्हणजेच "डाॕ.द.म.नेने" या आमच्या त्या वेळच्या "फॕमिली डाॕक्टर" या संस्थेची आठवण येते !!!

*विनायक जोशी ( vp )*
 📱9423005702
मंगलधाम , हिंगणेखुर्द , लेन नं ४ , पुणे ५१
*electronchikatha.blogspot.com*