रविवार, ३१ जानेवारी, २०१६

E & Tc engineers

              //श्री स्वामी समर्थ //
"E & Tc engineers "
माझ्या सहकारी विद्यार्थी मित्र मंडळींचे अभिनंदन ! तुम्ही या शाखे मधे प्रवेश केल्याबद्दल !
communication चा जगात प्रवेश केल्यावर तुम्हाला वेगवेगळ्या  "Baud Rate "ची माणसे भेटतील त्यांचाशी तुमचा "Baud rate "जुळवून घ्या . दररोज वेगवेगळ्या ठीकाणी जाऊन माहिती साठी "start bit "पाठवून तुमची ओळख करुन देत , लगेचच मोजक्या data bytes मधे माहिती विचारा,माहिती मिळाल्या वर माहिती "parity "मधून confirm करुन "stop bit" पाठवा. जिथे जाल तेथील वातावरण बघून योग्य " protocol " वापरा.
Common sense , Power of imagination , Hard work, politeness, Flexible mind या पाच गुणांचा पुरेपुर वापर करा. परमेश्वराने आपल्या  मेंदूला अतिशय वेगवान पध्दतीने माहीती देण्यासाठी भरपूर images frame by frame पाठवणारे डोळे दिले आहेत त्याचा वापर करा. Analytical  विचार करायची सवय लावून घ्या . आपण ज्या भाषेत विचार करतो त्याच भाषेत concepts समजून घ्या . आणि हो आपण १५० वर्षे गुलामीत घालवली आसली तरी आपल्या इंग्रजी मावशीचा ताण घेउ नका. Second year लाच आपले Goal ठरवून त्या  प्रमाणे वाटचाल करा.
  दिवसातले कमीत कमी १ तास मित्रांच्या संगतीत गोंधळ घालण्यात घालवा.

             विनायक जोशी (vp)
             9423005702

PLC

        //श्री स्वामी समर्थ //

" PLC "
Designing चा श्री गणेशा Diode आणि transistors पासून झाला. नंतर TTL , CMOS , 8085 त्यानंतर Z80, आणि मग microcontroller. या आमच्या शेंडेफळा च्या ओळखीने PLC चा प्रवेश झाला.
अर्थात PLC ला लागणारा scan time आणि त्यात नसलेले features ,या मुळे त्या वेळी आमची फारशी दोस्ती जमली नाही. भावाकडे कधी गेलो कि हे शेकडोच्या संख्येने  भेटत.
लाँजीकल विचार करणाऱ्या आणि electronics ची background  नसलेल्यांचा तो खुप लाडका झाला. अतिशय वापरायला सोपा असल्यामुळे हळुवारपणे त्याने आमची मक्तेदारी संपुष्टात आणायला सुरवात केली. काळानुरुप स्वतः मधे बदल केले.आता DCS नावाने तो बरीच मोठी कामे करू लागला.
१९८४ मधे ८ Input/output  असलेला PLC,  २०१४ मधे ३०००० input आणि output असलेल्या DCS च्या स्वरुपात दिसायला लागला !
              विनायक जोशी (vp)
              9423005702
                   ९ जून २०१५

Modulator & Demodulator

// SSS //
"Mod & De-mod"
    " निखल सरांचा तास "
   बेताची उंची , हसरा आणि प्रसन्न चेहरा आणि लहान मुलांना गोष्ट सांगताना असतात तसे शिकवताना मिस्किल भाव.
मोठ्या बोर्डवरती छान दिसणारी Carrier wave काढली. थोडावेळ तिचे गुणविशेष सांगितले . त्या नंतर तिच्या पाठीवर Signal स्वारझाला.
आता छान पैकी दिसणाऱ्या टाँवरवरती ही Carrier आपल्या Signal नावाच्या बाळासकट जाऊन बसली.अगदी झाशीच्या
राणीसारखी.  थोड्या अंतरावर एक छानसा रिसीव्हर काढला.Transmitter मधून येणाऱ्या मंडळींनी paratroopers सारखे बरोबर receiver वरती उड्या
मारायच्या . त्या नंतर एका ferrite च्या भुयारातून IFT  नावाच्या चेकपोस्ट मधून बाहेर पडायचे. आता सरळ कपालभाती करणाऱ्या speaker मधून बाहेर.
सरांचा  modulation आणि De modulation चा त्या दिवसाचा class संपला होता.
           विनायक जोशी (vp)
            9423005702
              १३ जून २०१५

Bi Polar Opto

// श्री स्वामी समर्थ //
" Bi polar opto "
Bi polar याचा शब्दशः अर्थ म्हणजे दोन्ही polarities च्या  signal ला चालणारा. PLC मध्ये digital input module मधे याचा वापर कायम असतो. Field वरून येणारे signal हे + किंवा -  असतील तरी या opto मुळे configuration सोपे जाते. या opto च्या across एक जादा value चा resistance लावावा .तो signal नसताना noise पासून circuits चे protection करतो.
हाच resistance Ac input असताना zero crossing पाशी circuit स्थिर ठेवायसाठी उपयोगी ठरतो. Bi Polar opto मुळे Hi voltage Ac input  चे status अत्यंत कमी अशा Dc  output voltage मधे चेक करता येते.
Bi polar opto on होण्यासाठी लागणारे दोन्ही polarity चे voltage हा Dead band ठरवत असते .
विनायक जोशी (vp)
9423005702
3 November 2015

Remote Terminal Plate

// श्री स्वामी समर्थ //
        " RTP "
Remote Terminal Plate
अतिशय सुंदर दिसणारा आणि फक्त connectors असलेला तो पीसीबी होता.त्याची रुंदी ९० मीमी आणि लांबी १०० मीमी होती.उजव्या बाजूला २५ पीन "D" connector होता आणि डाव्या बाजूला जाड अशा field side च्या wires लावण्यासाठी Phoenix चे terminals होते.Field वरील signal switch चे वायरींग करण्यासाठी सोपे जावे म्हणून  प्रत्येक signal बरोबरच positive loop  पीसीबी वरतीच करुन Phoenix termination वरती काढले होते.थोडक्यात field वायरींग सोपे करणारा आणि PLC च्या I/o module ला prefabricated cable ने जोडणारा असा पीसीबी होता.हा सिंगल साईड पीसीबी होता.या पीसीबी मुळे field वरती जाणाऱ्या प्रत्येक जाड वायरला उपयुक्त असे नामकरणाचे ferrules लावता येत होते. कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनीक कांपोनंट नसलेला अतिशय सोपा आणि किरकोळ वाटणारा पीसीबी होता.थोडे दिवस याच्या बरोबर काम केल्यावर लक्षात आले की अत्यंत आधुनिक अशा PLC किंवा DCS ला उपयुक्त असा हा पीसीबी आहे.या पीसीबी मुळे सध्याच्या काळात DCS मधे  चालणाऱ्या खुपशा संकल्पना स्पष्ट झाल्या . कोटयवधी रुपयांची उलाढाल करणारा हा RTP म्हणजे मूर्ती लहान पण कीर्ती महान या म्हणीची सदैव आठवण करुन देणारा आहे आणि राहिल..अतिशय सामान्य व्यक्तीमत्व असलेला असा असामान्य पीसीबी म्हणजे Remote Terminal Plate किंवा RTP होय !
विनायक जोशी (vp )
9423005702
14 November 2015

इलेक्ट्रॉनीक मैफिल

// श्री स्वामी समर्थ //
   " मैफिल "
एखाद्या उत्तम इलेक्ट्रॉनीक डीझाईन इंजिनियर ने लेआऊट तयार करणाऱ्या साथिदारा बरोबर पीसीबी नावाच्या वाद्याला घेऊन केलेली ही मैफिल आहे. इंजिनियर आणि लेआऊट डीझायनर यांच्या मधे अतिशय उत्तम आणि खोलवर अशी विचारांची देवाणघेवाण हि  प्राथमिक सुरवात.
Printed Circuit Board किंवा PCB या मधे सर्व कांपोनंट अतिशय सुंदर पणे आणि अचूक जागी बसवणे . Testing करताना सोपे जावे म्हणून  वेगवेगळ्या ठिकाणी test points ठेवून प्रत्येक विभागातील मंडळी आलबेल आहेतना ते चेक करणे . Circuit मधे वेगवेगळ्या आकाराच्या grounds चे छोटे छोटे कँनाल star ground पाशी एकत्र करणे.प्रत्येक Ic च्या अगदी जवळच डीकपलींग कपँसिटर भालदार चोपदारा सारखे ऊभे करायचे. पाँवर सप्लाय या कायम उत्तम काम करणाऱ्या परंतु तब्बेतिने गरम असलेल्या मंडळीना इतरांच्या पासून दूर हवेशीर ठिकाणी ठेवायचे.एकदा लेआऊट पूर्ण झाला कि मोठ्या कँमेराच्या बरोबर काम करुन सर्व प्रकारच्या negative आणि positive films काढायच्या .
या नंतर Glass Epoxy बेस असलेल्या आणि काँपर कोटेड पीसीबी वरती आपल्याला पाहिजे असलेल्या circuit ची प्रतिमा छापायची. या नंतर वेगवेगळ्या आकाराची कांपोनंट बसण्यासाठी योग्य मापाची छिद्रे पाडायची. सर्व गोष्टी व्यवस्थित आहे हे तपासून त्या नंतर masking ink नावाचा हिरवा गार शालू  circuit वरती पांघरायचा . या नंतर screen printing च्या सहाय्याने सर्व कांपोनंटचा नामकरण विधी पार पाडायचा. असा हा परिपूर्ण पीसीबी 35 micron किंवा 70 micron च्या काँपर चा थर ज्याला फक्त पीसीबी वरुन हात फिरवून कळतो अशा Design  Engineer च्या हातामधे पडला की उत्तम आणि लक्षात राहणाऱ्या  मैफिलीची सुरवात झाली समजायचे !
विनायक जोशी (vp)
9423005702
6 November 2015

Soldering

// श्री स्वामी समर्थ //
   " Soldering "
Soldering ही अतिशय सुंदर आणि अवघड कला आहे. याच्या मधे टिन आणि लीड आहे का ? याच्या मधून बाहेर निघणारा धूर घातक आहे का ? वगैरे प्रश्न
पडायच्या आधीच मी चांगले Soldering करायला शिकलो.  १९८३ साली कंपनीमधे कामाला लागल्या नंतर पहिल्याच महीन्यात चारुहास आलेगावकर या मुलाने तयार केलेला one micro second ची अचूकता मोजणारा counter उघडून बघितला . पिसिबी आणि वायरींग soldering चा तो आदर्श नमुना होता.अत्यंत तेजस्वी असा Soldering चा तो अविष्कार होता. बरोबर २० वर्षांनी म्हणजे  २००३ मधे त्या  काउंटर मधील Soldering तसेच चैतन्य दायी होते. Soldering करताना डाव्या हातात आंगठा आणि पहिल्या बोटात Solder धरायचे आणि करंगळी आणि अनामिके मधे  कंपोनंट धरायचा .उजव्या हाताने soldering करायचे.solder चा ठिपका मारणे आणि ते थंड होण्यासाठी वेळ देणे इथेच कलाकार मंडळींचा खेळ चालू होतो. चांगले Soldering म्हणजे काय असा प्रश्न खरगपूर IIT मधून आलेल्या केंकरे सरांना विचारले. शुद्ध मराठीत २५ पाने त्यांनी Soldering बद्दल लिहून दिली होती. दिपक देशपांडे या बहाद्दरांने Soldering केलेले CPU card हे मशिनवर तयार केलेले नाहीये याची खात्री करण्यासाठी विदेशी पाहूणे आमच्या येथे येऊन खात्री करुन गेले. Soldering हे कांपोनंट आणि पीसीबी यांच्या मधील कायमचा विश्वासू दुवा आहे !
विनायक जोशी (vp)
9423005702
6 October 2015

Inductor

" श्री स्वामी समर्थ //
      " Inductor "
    Inductor हा स्वतःच्या मस्तीत रहाणारा कलंदर आहे. एखाद्या अबलख घोडया सारखा अतीशय
स्फुर्ती दायक , चलाख आणि शक्यतो कोणालाही स्वार होऊ न देणारा असा आहे. सरळ येणाऱ्या electrons ना सुद्धा आपल्या बरोबर गोलगोल वेगाने फिरवत पुढे रहाणारा आहे. स्वतःच्या भोवती magnetism नावाचे वादळ निर्माण करणारा आहे. स्वतःच्या मधे काही वेळासाठी शक्ती साठवून योग्य वेळी ती उपयोगात आणणारा आहे. तव्यावरची भाकरी फिरवली नाही तर जशी करपते तसेच Inductor चे आहे याला स्थिर ठेवायचा प्रयत्न केला तर तो ताबडतोब Resistor सारखा वागायला लागतो आणि लालीलाल होऊन निषेध प्रगट करतो. माझ्या आयुष्यात Inductor नावाच्या अबलख घोडयावर उत्तम पणे काबू मिळवलेला पहीला स्वार मी बघीतला ते म्हणजे  म्हणजे DB electronic चे भिडे !
विनायक जोशी (vp)
9423005702
28 October 2015

Electronic basic waves

// श्री स्वामी समर्थ //
  " इलेक्ट्रॉनीक लाटा "
१) Sine wave - अतिशय सौम्य आणि समजुतदार.यशाच्या टोकावर असताना किंवा निराशेच्या दरीत सुध्दा स्थिर रहाणारी .सर्व कामांना power full पाठिंबा देणारी.
२) " S" curve - दिसायला साधारणपणे साइन सारखीच परंतू वेगवान .DC servo वगैरे High speed applications मधे उपयुक्त .मेकँनिकल गोष्टींची झीज कमीतकमी व्हावी याची काळजी घेणारी
३) Trapezoid - मोठे पठार असलेली टेकडी. Acceleration आणि deceleration अशा चढ आणि उतारांच्या बरोबरीने काम करणारी .
४) Square wave - अत्याधुनिक अशा Digital electronics चा पाया आसलेली .पूर्णपणे व्यावसायिक वृत्तीने वागणारी. Rising edge किंवा Falling edge अतिशय गडबडीने पार करणारी. धारधार टोके असलेली.
५) Triangular wave - Switching Regulators मधे स्थिर आधार देणारी किंवा साध्या regulator मधे पूर्ण क्षमतेने वापरली जाणारी.
६) Saw tooth - Precision timers चा आत्मा असलेली. एखाद्या feedback voltage ckt चे square wave output मधे रुपांतर करणारी .
  ७) Asymmetric square - sine wave ने झीरो पोझीशन पार केली का हे दरवेळेला सांगणारी. या वरुन फायरींग अँगल अचूक ठेवण्यासाठी मदत करणारी .
अशा वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनीक लाटांच्या मदतीनेच कंट्रोल सर्किट आँपरेट होते.
विनायक जोशी (vp)
9423005702
16 November 2015

Resistors


//श्री स्वामी समर्थ //
" Resistors "
तुम्ही आहात म्हणून आम्ही आनंदाने सर्व गोष्टींचा ऊपभोग घेत आहोत. स्वतःच्या अंगावर वेगवेगळ्या रंगाचे पट्टे ओढून आपले वेगळेपण तुम्ही अधोरेखित करता. कोणत्याही निराशे कडे वाटचाल करणाऱ्या Signal ला तुम्ही pull up करता आणि ज्यांचा गर्व वाढला आहे त्यांना मात्र pull down करता. वेळ प्रसंगी तुम्ही स्वतः गरम होता परंतु circuit मधील वातावरण मात्र एकदम cool ठेवता. कोणत्याही गोष्टीला संतुलित ठेवण्यासाठी योग्य विरोध हा लागतोच हे तुमच्या मुळे शिकता आले. तुम्हाला काम करताना अति उष्णतेमुळे त्रास होतो हे माहीत असल्यामुळे तुमची  super conducive material च्या रुपात यायची धडपड आम्ही बघत आहोत.  तुमच्या बरोबर अदृश्य रुपात वावरणारा inductor  फारच थोड्या लोकांना दिसतो. एखादा led लावताना सुध्दा तुमचा योग्य वापर करुन कमीतकमी विजेचा अपव्यय होईल याची जाणीव असलेले मोजके लोक बघायला मिळतात. Reactance , impedance  वगैरे तुमचे नातेवाईक जास्त frequency च्या सर्किट मधे योग्य भूमिका बजावत आहेत. Fuse च्या अवतारात मात्र फार पुण्याचे काम तुम्ही करता . कोणिही आणि कसलाही विरोध केला कि संतापाने आमची लाहीलाही होते परंतू तुम्हा कोटयवधी विरोधकांना समोर बघून आम्ही मात्र आनंदात आणि एकदम Cool .....असतो !
विनायक जोशी (vp)
9423005702
25 October 2015

रविवार, २४ जानेवारी, २०१६

Electrons

nucleus , proton , neutrons वगैरे मंडळींना बाजूला सारुन स्वतःचा दबदबा निर्माण करणाऱ्या electrons ने electronics या नावाने दबदबा निर्माण केला.कायम वेगवेगळ्या orbit मधून वेगाने चकरा मारणे किंवा थोडक्यात म्हणजे अति उत्साहाने कायम हिंडत रहाणे हा याचा स्वभाव आहे. प्रवाहाच्या विरूद्ध किंवा conventional current च्या विरूद्ध दिशेने वाहणे हे याचे वैशिष्ट्य . आपल्या सर्व negative भावांना घेऊन प्रगतीच्या वाटेकडे म्हणजेच positive कडे जाणे हा याचा नित्य नैमित्तिक कार्यक्रम . चराचरात आनंदाचे दिप लावताना स्वतःच्या साठी मात्र  कायम तीन करमणूकीची खेळणी वापरत आहे .
  1. Resistors : electronic मधे  या वेगवेगळ्या आकाराच्या गुळगुळीत किंवा खरबरीत अशा घसरगुंड्या म्हणून electrons चा current यांच्या बरोबर खेळत असतो .
  2. Inductor : electronic current च्या दृष्टीने अतिशय thrilling अशा roller coaster चा अनुभव देणारे असतात. या मधे सर्व electrons अति उत्तेजित होऊन जास्त voltage च्या उड्या मारत असतात. आतिशय वेगाने प्रवास करत असताना एकदम थांबणे आणि उलटया दिशेन प्रवास करणे वगैरे गोष्टी लिलया करत असतात.
  3. Capacitor : bungee jumping पेक्षा खुप अवघड. Bungee jumping मधे उडी मारायचा आधि निदान खोली दिसत असते. Capacitor based bungee jumping मधे electrons ना capacitor च्या  plate ला हात लावल्या नंतरच उघडणाऱ्या दारातून खोलीचा अंदाज येतो.येथे थोडीशी जरी चूक झाली तर डोक्यावर आपटून signal रुपी electrons ground होतात.
या सर्व खेळांचे वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व खेळ electrons काम करता करता electronic circuits मधे current च्या रुपात स्वतःच खेळत असतात !
विनायक जोशी (vp)
9423005702 
1 october 2015