बुधवार, १७ जून, २०२०

नॕशनल ब्रदर्स डे.....नारायण प्रभाकर जोशी

// श्री स्वामी समर्थ //

*National Brother's Day*
      २४ मे २०२०

आज २४ मे हा भावांसाठी राखीव असा राष्ट्रीय दिवस. मला असाच एक छान छोटा भाऊ आहे . सध्या तो अल्ट्राटेक सिमेंट या कंपनीत सिनियर व्हाईस प्रेसिडेंट आहे . या अत्यंत छोट्या लेखाचा उत्तरार्ध आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ञ डाॕ.अजित पाटील यांनी कमालीच्या आपलेपणाने केला आहे ...
नान्या ते नारायण जोशी हा प्रवास मला सुध्दा रेखाटायचा आहे . अत्यंत आनंदाने आणि शांतपणे एक आनंदयात्री म्हणून फक्त .....

      *आनंदयात्री*
*नारायण प्रभाकर जोशी*

        विनायक जोशी (vp)
💬9423005702
 📱9834660237

३ नोव्हेंबर १९६५ या दिवशी सोलापूर मधील वाडिया हाॕस्पिटल येथे जन्माला आलेल्या , गुरूप्रसाद आदर्शनगर येथे राहणाऱ्या, सिध्देश्वर प्रशाला आणि हरिभाई देवकरण हायस्कूल मध्ये शिकलेल्या , दहावीच्या परिक्षेत शाळेत पहिला आणि काॕलेज मध्ये दुसरा आलेला , अत्यंत लहान वयात लार्सन आणि टुब्रो या कंपनीत जनरल मॕनेजर पदावर विराजमान झालेल्या आणि त्या नंतर अल्ट्राटेक मध्ये *AVP व Unit Head* अशी पदे भुषवणाऱ्या नारायण प्रभाकर जोशी यांच्या बद्दल डाॕ.अजित पाटील या शालेय जीवनातील मित्राने स्वयंस्फुर्तपणे मांडलेले मत . डाॕ.अजित पाटील यांच्या वरती सरस्वती मातेचा अनुग्रह झालेला आहे त्या मुळे LinkedIn वरती 72 आर्टीकल्स त्यांनी लिहीली आहेत . *The Top Voice of LinkedIn 2017* म्हणून त्यांना गौरवण्यात आले आहे.

*डाॕ.अजित पाटील*
 *यांच्या नारायणला शुभेच्छा*

*Dear Narayan,*

 You proved many assumptions as myths in your career. You are the best example of what a talent can do in the corporate world when out in the hard work and sacrifice. You are the role model not only for us but for the next generation. You foiled the belief that only the IIT or IIM degree can help in climbing the corporate ladder. You are our inspiration, you are our pride possession, you are our torch bearer. Narayana we love your talent, modestly and brotherly affection. Remember distance is inversely proportionate to the affection and Kolkata is far from here. Hahaha......
💐🎂💐

*विनायक जोशी (vp)*
💬9423005702
 📱9834660237
१२५७ 'मंगलधाम , हिंगणेखुर्द , लेन नंबर ४ , पुणे ५१.
*electronchikatha.blogspot.com*

भावलेली काही गाणी

// श्री स्वामी समर्थ //
     *भावलेली गाणी*

   *विनायक जोशी (vp)*
  💬9423005702
📱9834660237

  कोणत्याही प्रकारची गाण्यातील विशेष  समज नसलेल्या माझ्या सारख्या माणसाला सुध्दा शांतपणे पुनःपुन्हा ऐकावी वाटलेली काही गाणी...

*आशाताई भोसले*

 लक्ष्मी रोड येथून सोनी कंपनीची अतिशय उत्तम आवाजाचा दर्जा असलेली सिस्टीम वीस वर्षांपूर्वी विकत आणली. या सिस्टीम वरती आशाताईंनी गायलेले अप्रतिम असे
*केंव्हातरी पहाटे उलटून रात्र गेली* हे गाणे ऐकले.
हे उच्च दर्जाचे गाणे छान अशा सिस्टीम वरती ऐकताना अवर्णनीय आनंद मिळाला....

*शंकर महादेवन*

यु ट्यूब वरती श्री.उध्दव ठाकरेंनी पंढरपूरच्या वारी बद्दल तयार केलेला व्हिडियो बघत होतो . बॕकग्राऊंडला शंकर महादेवन यांचे अप्रतिम गाणे होते .ते असंख्य वेळेला ऐकले . प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या प्रकारे विठू माऊलींचे दर्शन होत आहे अशी अनुभूती येत होती ..कमालीची मानसीक शांतता देणारे असामान्य अशा गायकाने गायलेले हे गाणे आहे .....
 *बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल*


*सलिल कुलकर्णी*

सुर्यास्ताची वेळ होती .कल्याणीला आणायला म्हणून तळजाई टेकडीवरच्या जंगलात पोचलो होतो. एका छानशा चढावरून जाताना असंख्य रंगांची उधळण करत परतीच्या प्रवासाला निघालेले सुर्यनारायण दिसले . जंगलातील असंख्य झाडांच्या मधून प्रगटणारा तो सोनेरी सुर्यास्त बघून सलिल कुलकर्णी यांच्या अजरामर अशा उच्च दर्जाच्या प्रेमगीताची आठवण आली...
*संधी प्रकाशात अजूनी ते सोने*


*प्रियांका बर्वे*

दोन दिवसांच्या पूर्वी व्हाॕटसअॕपच्या माध्यमातून एक व्हिडीयो आला . अतिशय शांतपणे नेटकेपणाने , मनापासून व एकाग्रतेने म्हणलेले प्रियांका बर्वेंचे गाणे ऐकत रहावे असे होते . कोणताही सांगितिक गोंगाट नसलेला एक उत्तम भावार्थ असलेले गाणे कमालीच्या ताकदीने म्हणलेले होते.
*केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर*

काहीकाही गाणी ऐकल्यावार ती आपल्या मनाच्या जवळच रेंगाळतात . कळत नकळत खुप वेळा गुणगुणली जातात . अगदी सामान्यज्ञान असलेला माणूस सुध्दा ज्या उत्तम दर्जाच्या गाण्यांनी आनंदीत होतो किंवा ज्या उत्तम प्रकारच्या कलाकृतीचा आनंद सहजपणे घेतो तेंव्हा ती *लक्षात राहणारी गाणी* होतात. रसिकांच्या आत्म्याचा आशिर्वाद लाभलेली एकदम अनमोल ....

*विनायक जोशी (vp)*
💬9423005702
📱9834660237
१२५७ , मंगलधाम , हिंगणे खुर्द , लेन नंबर ४ , पुणे ५१
*electronchikatha.blogspot.com*

आकाश निलावार आणि आजित बेलसरकर

// श्री स्वामी समर्थ //
        *आकाश आणि अजित*

       *विनायक जोशी (vP)*
💬9423005702
 📱9834660237

*आकाश निलावार*

९ मे संध्याकाळी अमेरिकेतून आकाश ने बेलसरकर आणि त्याचा फोटो पाठविला.आकाश TCS मध्ये आहे आणि कंपनीच्या कामासाठी अमेरिकेत गेला होता त्या वेळी बाॕश या कंपनीत काम करणाऱ्या वर्ग मित्राला म्हणजेच अजित बेलसरकरला तो तेथे भेटला....

*१९९५ मे महिना*

कडकडीत दुपारच्या वेळेला धायरीच्या रायकर मळ्या पर्यंत जाऊन परत माणिकबागेकडे जाताना आमच्या कंपनीची पाटी वाचून दोघेही नोकरी आहे का बघायला आले होते. आमच्या येथे संशोधन आणि विकास विभागात फक्त एक जागा होती.अजित बेलसरकरला नोकरी मिळाली .

 *अजित बेलसरकर*

अतिशय खडतर मेहनत आणि एकाग्रता पूर्वक काम करून त्याने आमच्या येथे खूप महत्त्वाचे  प्रोजेक्ट पूर्ण केले.आमच्या कंपनीतून इंडस्ट्रीयल कोट्यातून त्याला IIT खरगपूर येथे प्रवेश मिळाला.त्याच्या नंतर आकाश आमच्या कंपनीत कामाला लागला

*आकाश निलावार*

मितभाषी आणि कामात अतिशय निष्णात . आॕटोमोबाईल क्षेत्रातील अनेक अवघड कामे त्याने लिलया पूर्ण केली. त्याच्या सौम्य वागण्यामुळे आमच्या कंपनीच्या मालकांनी *बाबूजी* ही पदवी त्याला बहाल केली होती.

*१९ मे २०१८*

मागच्याच आठवड्यात अमेरिकेत असलेला आकाश त्याच्या मामे भावाला म्हणजेच सुप्रितला भेटायला इंडिटेक मध्ये आला होता. अत्यंत अनपेक्षित अशी आमची भेट संशोधन आणि विकास विभागात झाली. या विभागातील तरूण मुलांना त्याने मार्गदर्शन केले. पंचवीस वर्षांपूर्वी च्या अनेक आनंददायी प्रसंगांची उजळणी झाली.

माणिक बागेतील कुदळे पाटील अपार्टमेंट येथे राहणाऱ्या आणि याच आवारातील एका आज्जीं मुळे धार्मिक अधिष्ठान लाभलेल्या या विदर्भातील इंजिनियर्सनी म्हणजेच *आकाश निलावार , अजित बेलसरकर आणि विजय बढे* यांनी उत्तम दर्जाच्या कामाने आपला वेगळाच ठसा उमटवला आहे ....

*विनायक जोशी (VP)*
💬9423005702
 📱9834660237
मंगलधाम , लेन नं ४' हिंगणेखुर्द ,पुणे ५१
electronchikatha.blogspot.com