शनिवार, २ जानेवारी, २०२१

चैतन्यमुर्ती बुलेट

 // श्री स्वामी समर्थ //


     *चैतन्य मुर्ती डाॕबरमन*


           *बुलेट*


     २ जानेवारी २०२१

  


विनायक जोशी

💬9423005702 


बरोबर एक वर्षापूर्वी दक्षिण भारतात तू प्रगट झालास आणि दोन महिने आई जवळ राहून पुण्यातील विठ्ठलवाडी येथील तावडेंच्या आनंदभवन येथे मुक्कामाला जाणे निश्चित झाले .....


अनपेक्षित अशा प्रवासबंदी मुळे तूझा मातृगृही मुक्काम लांबला . याच ठिकाणी तुझ्या सौंदर्यात भर पडावी म्हणून कानाची छोटी शस्त्रक्रिया झाली . या नंतर मात्र कोव्हिड टेस्ट पास करुन पुण्यात आगमन झाले .....


आनंदभवन येथे वावरायला असलेली प्रशस्त जागा आणि घरात दिसलेली श्रीया , साईश आणि साईली यांच्या मुळे आपण या ठिकाणी आनंदाने राहू शकतो याची  तूला मनोमन खात्री पटली ......


दाक्षिणात्य भाषेतून मराठीत यायला थोडा वेळ लागला परंतु  मुलांच्या मुळे तू ते लवकर आत्मसात केलेस 


जर्मन रक्त असलेल्याला डाॕबरमनला ट्रेनर कडून इंग्रजी शिकावे लागणे हा कमालीचा कंटाळवाणा प्रकार तू नाराजी लपवत पार पाडत आहेस ...


तूझा दमदार आवाज ऐकून मंगलधाम मधील सिंबा पवार आणि खंडू पाटील हे चतुष्पाद मित्र आनंदीत झाले आहेत ...


तळजाई ते ट्रेडमिल हा तूझा चालू असलेला प्रवास किंवा घरातील अनेक गोष्टींची तोडफोड , थोडेसे पोट दुखले तर गच्ची वरील ओव्याचे पूर्ण झाड संपविणे वगैरे बाललीला चालू आहेत बघून मजा वाटते .


हे लहानपण परत येत नाही त्यामुळे अत्यंत अनपेक्षित असे अनेक अविष्कार दाखवत तावडेंच्या आनंदभवनात आनंदाने बागडत रहा  ......


विनायक जोशी (vP)

💬9423005702 

electronchikatha.blogspot.com