// श्री स्वामी समर्थ //
" बंगलोर १९८६ ते ९१ "
शालेय जीवनात म्हैसूर आणि बंगलोर अशा सहलीला गेलो होतो.त्यावेळी सोन्याचे सिंहासनअसलेला राजवाडा ,वृंदावन गार्डन , नॕशनल पार्क ,विश्वेश्वरैया नावाच्या पुण्याच्या माणसाचा म्युझियम किंवा त्यामधील रेल्वे इंजिनचे माॕडेल वगैरे गोष्टी बघितल्या होत्या. आमच्या कंपनीचे दक्षिण विभागाचे आॕफीस बेंगलोरला झाले आणि रघुवीर नावाच्या अत्यंत दिलदार माणसाने येथिल कारभार हातात घेतला.या माणसाच्या बरोबर बरेचसे बंगलोर मी स्कुटर वरती डबलसीट हेल्मेट घालून आणि फुलपँट घालणाऱ्या पोलीसांकडे बघत बघत पालथे घातले होते.प्रत्येक रस्ता हा " मेन " आणि क्राॕस चे लेबल घेऊन उभा असे.त्या वेळी एकमेव अशी २६ मजली इमारत बेंगलोर मध्ये होती. कोणत्याही हाॕटेल मधे गेलो की इडली अथवा डोशा बरोबर येणाऱ्या चटणी आणि सांबाराच्या बादल्या सर्वांना तृप्त करत होत्या.इंडस्ट्रीयल झोन मधील इलेक्ट्रॉनीक इस्टेट मधे अतिशय टुमदार असे ५०० छोटे छोटे कारखाने बघायला मिळाले. रघुवीरदादा बरोबर असल्यामुळे TIFR असूदे किंवा विधानभवन सर्व ठिकाणी मुक्त संचार करता येत असे.एकूणच बंगलोरचे हवामान , शिस्त ,रस्ते किंवा अतिशय प्रेमाने कानडी बोलणारी माणसे या मुळे कोणताही परकेपणा नव्हता.येथिल बसचा मुख्य स्टँड किंवा त्या ठिकाणी ट्रॕफिकचे नियंत्रण अॕटोमॕटीक सिग्नल्सच्या ऐवजी म्यॕन्युयली करणारे पोलीस . पर्यटकांना समजेल अशा भाषेत बोलणारी बंगलोरी माणसे बघायला मजा येत असे.राजकुमार नावाच्या सुपरस्टारचे भक्त असलेली , साधारणपणे रंगाने सावळी ,डोक्याला भरपूर तेल लावणारी , कानडी हेल वापरुन इंग्रजी बोलणारी , अतिशय किरकोळ विनोदाला सुध्दा भरघोस दाद देणारी , घरामध्ये पांढरी स्वच्छ लुंगी वापरणारी अशा माणसांचे ते बंगलोर होते. IT कंपन्या , परदेशी मालाने खचाखच भरलेले माॕल्स , पानांच्या टपऱ्या असाव्या तसे " पब " वगैरे गोष्टींचे सावट अजून पडलेले नव्हते !
आज विमानाच्या सुविधेमुळे अतिशय जवळ आलेले भपकेबाज बंगलोर त्याच्या मूळ रुपापासून खुपच दूर गेलेले आहे !!!
विनायक जोशी ( vp )
28 January 2016
electronchikatha.blogspot.com
गुरुवार, २८ जुलै, २०१६
बंगलोर ८६ ते ९१
शनिवार, ९ जुलै, २०१६
Digital Signal Processing (DSP)
// श्री स्वामी समर्थ //
' DSP'
" Digital Signal Processing "
सध्या इंजिनियरींगच्या तिसऱ्या वर्षाला असलेली मुले " DSP " या विषयावर अतिशय आत्मविश्वासाने बोलतात . मला स्वतःला पंचवीस वर्षापूर्वी तीन वेगवेगळ्या मंडळींच्या बरोबरीने या विषयावर काम करायला मिळाले.त्या काळात "डिजीटल "या शब्दाला विश्वासाचे कोंदण नव्हते . केंकरे या खरगपूर IITच्या इंजिनियरने AC voltage वरती signals superimpose करण्यासाठी आणि परत Decode करण्यासाठी DSP या प्रकाराचा यशस्वी वापर केला होता.या सर्किटला " चिमणीचे " सर्किट असे नामकरण केले होते. या नंतर अमेरिके वरुन आलेले " मंगेश काळे " यांनी नायक्रोम साठी हाय स्पीड आॕगर कँट्रोलर तयार केला होता.या मध्ये अतिशय वेगवान अशा DC Servo मोटारचा आॕपरेटींग प्रोफाईल DSP वापरुन केला होता.
त्यांच्या कंपनीचा सुरूवातीचा काळ होता. या नंतर मात्र मुंबई IIT चे फडणीस यांनी DSP वापरुन बनविलेल्या "On line check weigher" ची सर्व कामे अत्यंत जवळून बघता आली.
Industrial Signal Processing या विषयावरील भरपूर व्यावहारिक आणि वस्तूनिष्ठ अनूभव घेतल्यानंतरच या तिघांनी Digital Technique ची जोड त्याला दिली होती.
DSP हा शब्द जरी कानावर पडला तरी केंकरे , मंगेश काळे , फडणीस या धडपडणाऱ्या त्यावेळच्या अत्यंत हुशार इंजिनियर्सच्या आठवणी जागृत होतात !!!
विनायक जोशी ( vp )
8 July 2016
electronchikatha.blogspot.com
मंगळवार, ५ जुलै, २०१६
Mathematics - 3 (M3)
// श्री स्वामी समर्थ //
" M-3 "
"Mathematics - 3
श्रध्दा बिडकर नावाच्या अत्यंत गुणी मुलीने तिला इंजिनियरींगच्या गणितात म्हणजेच M-3 ला नव्वद मार्क्स पडले हे अतिशय आनंदाने सांगितले आणि या ऐतिहासिक विषया बद्दल जुन्या आठवणी जाग्या झाल्या. विवेक या आमच्या मित्राने पार्ट टाईम डिग्री वाडीया काॕलेज मध्ये करायचे ठरवले .त्या वेळी M-3 नावाचे हे शिवधनुष्य कसे पेलायचे हा फार मोठा गहन प्रश्न निर्माण झाला होता. पासिंग पुरता बरोबर पेपर कसा लिहता येईल किंवा हा पेपर कमीतकमी कष्टात कसा सोडवता येईल वगैरे योग्य ते संशोधन करुन M-3 चा अडथळा पार केला.या नंतर थोड्या दिवसांनी राहुल भोई या आमच्या मित्राने त्याच्या काॕलेज मधील M-3 च्या फेऱ्यात अडकलेल्या असंख्य विद्यार्थ्यांच्या बद्दल ज्ञान वाढवले . या नंतर मात्र काही वर्षांनी M-3 ची लढाई लढण्यासाठी केदार सज्ज झाला. आमची जेंव्हा भेट होत असे त्या प्रत्येक वेळी M-3 हा विषय ठरलेला असे. काही दिवसांनी त्याची परीक्षा झाली. रिझल्ट लागल्यावर त्याचा फोन आला .काॕलेज मध्ये या विषयात तो दुसरा आला होता. या प्रसंगा नंतर मात्र आज संध्याकाळ पर्यंत कोणत्याही इंजिनियरला मी M-3 म्हणजेच Mathematics -3 बद्दल उपदेश केला नाही !!!
विनायक जोशी (vp )
4 July 2016
electronchikatha.blogspot.com