रविवार, २९ सप्टेंबर, २०१९

ELTECH FIrst Anniversary

// श्री स्वामी समर्थ //

   *First Anniversary*
         *Eltech*

Eltech Electrodesigns and Energy Systems Pvt . Ltd. Pune

     *विनायक जोशी (vP)*
    📱9423005702
     
    बरोबर एक वर्षापूर्वी   घटस्थापनेच्या दिवशी या उत्तम कंपनीची स्थापना झाली .

 COEP काॕलेज मधून १९७५ साली इंजिनियर झालेले , उत्कृष्ट कारखानदार म्हणून सरकार दरबारी गौरव प्राप्त झालेले , साधारणपणे ४०-४२ वर्षे पाॕवर इलेक्ट्रॉनिक्स या अत्यंत अवघड क्षेत्रात अतिशय उच्च दर्जाचे संशोधनात्मक व उपयुक्त काम करणारे *विजय देशपांडे सर* ..

 इंडिटेक या कंपनीचे मॕनेजींग डायरेक्टर म्हणून कार्यरत असलेले व पाॕवर इलेक्ट्रॉनिक्स या पूर्णपणे नवीन क्षेत्रांतील अनुभव मोकळेपणाने घेण्यासाठी सिध्द असलेले क्रिएटीव्ह डायरेक्टर *विजय बढे*

कोणतीही गोष्ट वेगवान पध्दतीने पूर्णत्वाला नेणारे अत्यंत अनुभवी असे आॕपरेशन हेड *संजय गोविंदवार*

 पाॕवर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये क्रिटीकल कामांसाठी लागणारे साॕफ्टवेयर अचूकपणे लिहिणारी व डायरेक्टर पदाची धूरा आनंदाने सांभाळणारी *रिचा देशपांडे नाडकर*

देशपांडे सरांच्या बरोबरीने अनेक वर्ष  काम केल्यामुळे पाॕवर इलेक्ट्रॉनिक्स मधील वेगवेगळ्या प्रकारची इलेक्ट्रो मेकॕनिकल मशीन्स सहजपणे उभे करणारे *गामा*

 समर्थपणे मटेरियल प्रोक्युरमेंट हे खाते सांभाळणारे अत्यंत अनुभवी असे *कमलेश*

 आपल्या कंपनीच्या प्राॕडक्टस बद्दल सार्थ अभिमान असलेले आणि अभ्यासपूर्ण मार्केटींग करणारे *आशिश दायमा*

..कोणत्याही कामाची जबाबदारी  समजूतदारपणे घेऊन व कामाचा दर्जा कायम सांभाळून सर्व कामे वेळेत पूर्ण करणारी *स्नेहा*

HR या अत्यंत महत्वाच्या खात्याची जबाबदारी उत्तमपणे सांभाळणाऱ्या *भाग्यश्री*

 या सर्वांच्या बरोबरीने कार्यरत असलेली तरूण आणि तडफदार टीम म्हणजेच संतोष , सुमित, धीरज , अक्षय , उध्दव , नीशा , ऐश्वर्या  , सौरभ , तेजस , मानसी , गणेश , वैभव , नीशा ,  प्रवीणा , सविता , पूजा , राहूल , अथर्व ,आकाश , सुनील, ललीत ....वगैरे मंडळी अत्यंत मनापासून काम करत आहे .

जास्त कपॕसिटीचे इनव्हर्टर्स , UPS , Induction Heating systems , Solar Pumps , प्रोसेस कंट्रोल वगैरे अनेक क्षेत्रात कंपनीचा नावलौकिक वाढत आहे .
 कमीतकमी उर्जेचा वापर करुन जास्तीतजास्त कामे साध्य करणारी मशीन्स , नैसर्गिक उर्जेचा पुरेपूर वापर करून क्रयशक्ती वाढवणारी मशीन्स अशा आगळ्या वेगळ्या क्षेत्रात विजयी सलामी देण्यासाठी एलटेक ही कंपनी सुनियोजीत प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे.
एलटेक या कंपनीत कार्यरत असलेल्या वैभव पासून ते देशपांडे सरां पर्यंत सर्वजण कमालीच्या उत्साहाने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहेत . या वाटचालीसाठी आमच्या मनःपूर्वक शुभेच्छा
💐💐💐💐

*विनायक आणि कल्याणी जोशी*
घटस्थापना २९ सप्टेंबर २०१९
📱9423005702
electronchikatha.blogspot.com

गुरुवार, ४ जुलै, २०१९

Devotee

// श्री स्वामी समर्थ //
    *Devotee*

     *विनायक जोशी (vp)*
 📱9423005702

परमार्थाच्या जगात व्रतवैकल्य , उपासतापास , साधना ,पूजा मानसपूजा , निरीच्छपणा वगैरे गोष्टींचा संबंध असल्यामुळे मला या क्षेत्रात गती प्राप्त होणे शक्य नव्हते .
माझ्या कडे प्रेम नावाचे एक साधे सोप्पे साधन होते . त्याच्या मदतीने मी छान काम करायला सुरूवात केली . आपल्या सहवासात येणाऱ्या वस्तू किंवा वास्तू अथवा माणसे यांच्या बरोबर प्रेमाने काम करणे एवढे एकच व्रत सहजपणे पाळले . एका वेगळ्या अनुभवाच्या जगात प्रवेश केला . कोणत्याही गोष्टींची अथवा माणसांची भिती संपुष्टात आली .कोणालाही फाॕलो करावे किंवा कोणी आपला आदर्श ठेवावा असे वाटले नाही . काम चालू करणे आणि काम उत्तम पणे पूर्ण करणे एवढीच साधना चालू ठेवली . चांगल्या किंवा आनंददायी गोष्टींच्या लाटा मनापासून अनुभवता आल्या . व्यावहारिक मोजमापाच्या पट्यांच्या जवळ कधीही जावे लागले नाही . कधीही स्वतःला बोअर केले नाही .आत्मानंद म्हणजे काय याचा शांतपणे अनूभव घेता आला .....
 कोणत्याही संकल्पनेच्या दोन ओळींमधील दडलेला अर्थ सहजपणे  वाचायला यायला लागला की Devotion वाढते .अनेक वर्षे Devotedly काम केले की Blessing's किंवा आशिर्वादांचा पाऊस चालू होतो आणि  Devotee बनण्यासाठीचा रस्ता  स्वच्छ आणि स्पष्ट पणे दिसायला लागतो .त्या नंतर मात्र तुम्हाला काहिही नको असते.....

*विनायक जोशी(vp)*
📱9423005702
मंगलधाम ,हिंगणे खुर्द ,लेन नं ४ , पुणे ५१
*electronchikatha.blogspot.com*

मंगळवार, २ जुलै, २०१९

डाॕ.जगन्नाथ दिक्षित यांनी सांगितलेली जीवनशैली

// श्री स्वामी समर्थ //
  *डाॕ.जगन्नाथ दिक्षित*
         *पध्दतीची जीवनशैली*

*२ जूलै २०१८ ते २ जूलै २०१९*

*विनायक जोशी(vP)*
📱9423005702

*३० जून २०१८*

सलग चार वेळा डाॕ.दिक्षितांचा कार्यक्रम यू ट्यूब वरती बघितला . त्याचे सार लिहून काढले.कल्याणी बरोबर चर्चा करून पुढचे चार महिने दररोज दोन वेळा जेवण आणि सहा किलोमीटर चालणे असा साधारण कार्यक्रम ठरविला आणि हळूहळू वर्षभर चालू राहिला आहे...

*२ जूलै २०१८ पर्यंतचा साधारण दिनक्रम*

 सकाळी ५ वाजता उठणे
 सकाळी ६ ते ७ चालणे
 सकाळी ७.३० न्याहारी.नंतर
(लोसार २५) ही बीपीची गोळी
१० ते १ बैठे काम
१.३० वाजता जेवण
दुपारी ३ ते ५.३० बैठे काम
दिवसभरात पाच वेळा चहा . येता जाता बिस्किटे , फरसाण , चिवडा वगैरे वगैरे
रात्री ८.३० जेवण
रात्री १० वाजता झोपणे
*वजन ८४.३किलो*

*२ जूलै २०१८ ते २ जूलै २०१९ पर्यंतचा  साधारण दिनक्रम*

सकाळी ५ वाजता उठणे
सकाळचा चहा नेहमीचा
सकाळी ९.१५ वाजता व्यवस्थित जेवण त्या नंतर बीपीची गोळी (लोसार २५)
१० ते ४.३० बैठे काम
दुपारी १.३० वाजता एक ग्लास पातळ ताक
दुपारी ३.३० ग्रीन टी
संध्याकाळी ५.१५ ते ६.३० या वेळेत सहा किलोमीटर चालणे.
रात्री ८.१५ वाजता व्यवस्थित जेवण
रात्री ९.१५ वाजता सहस्रपावली हिंगण्यातून.
रात्री १० वाजता झोपणे

*डाॕ.दिक्षित जीवनशैलीचा परिणाम २ जूलै २०१८ ते २ जूलै २०१९ पर्यंत*

पहिल्या ३ महिन्यात ४ किलो वजन कमी . त्या नंतर साधारणपणे महिन्यात एक किलो किंवा अर्धा किलो असे कमी झाले .
*एका वर्षात साधारणपणे १० किलो वजन कमी झाले. पोटाचा घेर दोन इंच कमी झाला* ....

*सध्याचे वजन ७४ किलो*
सुरवातीच्या काळात चातुर्मास आहे असे जाहिर केल्यामुळे दिक्षितांनी सांगितलेली जीवनशैली फाॕलो करणे सोप्पे गेले .

*विनायक जोशी (vP)*
📱9423005702
मंगलधाम , हिंगणेखुर्द ,लेन नं ४ , पुणे ५१
*electronchikatha.blogspot.com*

Doctor's Day

// श्री स्वामी समर्थ //
  *Doctor's Day*
    *मनःपूर्वक कृतज्ञतेचा दिवस*

 *विनायक जोशी(vp)*
📱9423005702

  अतिशय ध्येयनिष्ठ आणि कर्मयोगी अशा अनेक डाॕक्टर्सना मनःपूर्वक अभिवादन
   🙏🙏🙏
सोलापूर येथील डाॕ.दिवाडकर , डाॕ.केळकर ,डाॕ.अलबाळ ,डाॕ.चादोरकर , डाॕ.केमकर ,डाॕ.साठे डाॕ.नेने ,डाॕ.कुमावत ,डाॕ.चक्रपाणी ,डाॕ.बालीगा ,डाॕ.वैद्य ,डाॕ.स्वाती गोडबोले ,डाॕ.मुकुंद राय , डाॕ.रा.ना.जोशी ,
डाॕ.गायकवाड ,
डाॕ.मयेकर ,डाॕ.परळे , डाॕ.उमा प्रधान ,डाॕ.कुलकर्णी ...
       
 पुण्यातील डाॕ चारू आपटे , डाॕ.रणजीत देशमुख ,डाॕ.राजीव जगताप ,डाॕ.गोडसे , डाॕ.स्वामी ,डाॕ.धनंजय गोडसे , डाॕ.भगली, डाॕ.राणा ,डाॕ.मोडक , डाॕ.भावे ,डाॕ.केरकर ......बेळगावचे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डाॕ.दिक्षित ....अशा असंख्य  डाॕक्टर्स मंडळींना आजच्या दिवशी मनापासून शुभेच्छा
💐💐💐💐💐
🥼👨🏿‍⚕👩🏽‍⚕💊💉😷🏥


// श्री स्वामी समर्थ //
     *कर्मयोगी फॕमिली डाॕक्टर*
       *डाॕ.द.म.नेने*
 
    *विनायक जोशी (vp)*
 📱9423005702

सोलापूर येथील वाडिया हाॕस्पिटल मध्ये डाॕ.साठे मॕडम यांच्या अध्यक्षतेखाली माझा जन्म झाला .१९६३ साली दहा आॕगस्टला पहाटे २.३० अशी अचूक जन्मवेळ नोंदवायचे काम डाॕ.नेने यांनी केले.त्या काळात डाॕ.दिवाडकर हे आमचे फॕमिली डाॕक्टर होते. या नंतर काही वर्षांनी लष्कर भागातील राम मंदिराच्या शेजारी डाॕ.नेने यांचा दवाखाना चालू झाला . काॕलनी मधील दोन वर्षाच्या मुलापासून ते ऐंशी वर्षांच्या आजोबां पर्यंत सर्वांना आरोग्य संपन्न ठेवण्याची जबाबदारी डाॕ.नेने यांनी लीलया पेलली. मंद स्मित , माफक बोलणे , अचूक निदान आणि अत्यंत कमी फी या चतुःसुत्री मुळे  नेने डाॕक्टरांना सर्वांच्या मनात आणि घरात आदराचे स्थान प्राप्त झाले. नेने डाॕक्टरांच्या दवाखान्याची पायरी चढली की अर्धे अधिक आजार घाबरुन पळून जात असत. दररोजचे तीन डोस असे तीन दिवसांचे औषध घेऊन घरी यायचे.पहिल्या दिवसाचे तीन डोस घेई पर्यंतच आजारातून सुटका झालेली असायची.नेने डाॕक्टरांच्या आश्वासक बोलण्यामुळे ताप ,सर्दी ,खोकल्या पासून ते अगदी मणक्याचे हाड सरकलेले असताना सुध्दा कोणत्याही प्रकारची भीती वाटायची नाही.आजच्या इंटरनेटच्या युगात सुध्दा डाॕ.नेने त्या वेळी वापरत असलेल्या जंक्शन व्हायोलेट किंवा खोकल्याच्या गुलाबी औषधाची अथवा साडेतीन गोळ्यांच्या डोसची आठवण येते.सर्व आजारांना बरे करण्याची ताकद असलेल्या त्या गोळ्यांची कधीही चिकित्सा करावी वाटली नाही किंवा वाटत नाही .याचे एकमेव कारण म्हणजे डाॕ.नेने या  हजारो पेशंट बरे करणाऱ्या तपस्वी माणसाचा अनुभव समृद्ध स्पर्श त्या औषधाला लाभला होता. अनेक  प्रकारच्या डिफीशीयन्सीज दाखवणारी करोडो रुपयांची निर्विकार मशिन्स आता उपलब्ध आहेत .त्या मधून निघणारे रिपोर्टस वाचतानाच भिती वाटते. पेशंटला अजिबात न घाबरवता तपासणाऱ्या डाॕ.द.म.नेने यांची यावेळी आठवण प्रकर्षाने येते . आजही लष्कर मधील राम मंदिरात जायचा योग आला की रामपंचायनातल्या त्या मुर्ती किंवा प्रवचन देणारे गुरुजी ,तेथेच असलेले भुयार आणि याच मंदिराच्या शेजारी लाकडी फोल्डींगचा दरवाजा असलेल्या आणि पन्नास साठ पेशंटनी कायम भरलेल्या दवाखान्याची आणि असंख्य पेशंटस् बरे करणाऱ्या कर्मयोग्याची म्हणजेच "डाॕ.द.म.नेने" या आमच्या त्या वेळच्या "फॕमिली डाॕक्टर" या संस्थेची आठवण येते !!!

*विनायक जोशी ( vp )*
 📱9423005702
मंगलधाम , हिंगणेखुर्द , लेन नं ४ , पुणे ५१
*electronchikatha.blogspot.com*

रविवार, २३ जून, २०१९

सुंदर सोलापूरची वारी

// श्री स्वामी समर्थ //

       *सुंदर सोलापूरची वारी*

                *विनायक जोशी (vp)*
📱9423005702

अतिशय कमी सामान आणि कमालीच्या असंख्य सुंदर आठवणींचे गाठोडे घेऊन माहेरी म्हणजेच सोलापूरला जायला निघालो. विना थांबा विना वाहक या प्रकारच्या लाल गाडीतून प्रवास असल्यामुळे साडेचार तासाचा प्रवास उत्तम होणार याची खात्री होती .अतिशय सुंदर रस्ता आणि उत्तम हवामान या मुळे जून्या आठवणींची उजळणी झाली.
कॕम्प मध्ये मेन आणि ईस्ट स्ट्रीटला झोकदार हुलकावणी देऊन पुलगेट कडे दुर्लक्ष करुन गाडी निघाली. थोड्याच वेळात सकाळच्या सत्रात सराव करणारे घोडे रेसकोर्स वरती दिसू लागले.या नंतर वानवडी,फातिमा नगर वगैरे करत आणि किर्लोस्करांच्या कारखान्याचे किंवा गीटस् गुलाबजाम या कंपनीचे दर्शन घेत हडपसर गाठले. या नंतर मात्र १५ नंबर आकाशवाणी केंद्र किंवा मांजरी स्टड फार्म येथील घोड्यांची गडबड बघत निघालो.पूर्वीची राजकपूरची बाग किंवा सध्याचे MIT चे गुरुकुल आणि HP च्या अवाढव्य टाक्या बघत लोणी येथे प्रवेश केला. येथून पुढे प्रयागधाम किंवा उरळीचे निसर्गोपचार केंद्र यांना मागे टाकून थेऊरच्या फाट्या वरुनच पेशव्यांच्या गणेशाला वंदन केले.थोड्याच वेळात वेगवेगळ्या केमिकल्स च्या वासाने पाटस- कुरकुंभ कारखान्यांच्या क्षेत्रात प्रवेश केला याची जाणीव झाली. कुरकुंभच्या फिरंगाई देवीचे स्मरण करत आणि हेमंत शितोळेंच्या शेताच्या कडे बघत बघतच भिगवणला पोचलो.बँक आॕफ महाराष्ट्र भिगवण हा बोर्ड आपल्याला १०० किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाल्याची जाणीव करून देतो .या नंतर मात्र बॕक वाॕटरचा प्रचंड जलसाठा आणि वेगवेगळ्या पक्ष्यांचे  थवे दिसू लागले.पळसदेव येथील पाण्याच्या खाली जाणाऱ्या देवळाची स्थिती पहात इंदापूरला पोचलो.येथून पुढे बरोबर दहा किलोमीटर वरती अवाढव्य असे उजनी धरण आणि छोटासा जलविद्युत प्रकल्प यांना मागे टाकून टेंभूर्णीला पोचलो.या ठिकाणाहून भारताच्या उत्तरेला जाण्यासाठी रस्ता असल्यामुळे लांब आकाराच्या ट्रेलर्सची वर्दळ चालू झाली.उजनी धरणापासून रस्त्याच्या डाव्या हाताला सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणारी आणि सुमारे शे- सव्वाशे किलोमीटर लांब असलेली पाण्याची पाईप लाईन आपल्या बरोबरीने धावताना दिसते.मोडनिंब आणि मोहोळ यांना मागे टाकून वडवळच्या नागनाथ महाराजांना नमस्कार करुन बाळ्याच्या खंडोबा पाशी पोचलो.थोड्याच वेळात सोलापूरच्या प्रवेश द्वारावर स्वागता साठी सिध्द असलेल्या दोन मोठ्या पाण्याच्या टाक्या दिसल्या आणि हूरहूर संपून आपल्या गावात प्रवेश केला. शिवाजी पुतळा ,भागवत टाॕकीज ,प्रभात टाॕकीज वरुन डफरीनला वळसा घातला.नुकतीच वयाची शंभरी पार करत असलेल्या  आणि कमालीची सुंदर दगडी इमारत असलेल्या हरीभाई देवकरण या शि.प्र.मंडळींच्या प्रशालेला मानाचा मुजरा केला . शिवाजी रंगभुवन येथून पुढे सोलापूर मधील पहिल्या सोसायटीत म्हणजेच आदर्शनगर येथे प्रवेश केला. *प्रभाकर गणेश जोशी ,९५२ गुरुप्रसाद* या घराच्या बरोबर समोर रिक्षा थांबली. म्हातारे झालेले परंतू अत्यंत कणखर असे दोन औदुंबर , हिरवागार कडुनिंब आणि बेल , शांतपणे उभा असलेला अशोक , लाल फळे अंगावर पांघरुन बसलेला बदाम , आंब्याची झाडे ,स्वतःच्या भाराने वाकलेली करंजी आणि असंख्य पक्षी स्वागतोत्सुक होते. कोणत्याही प्रकारच्या वाहनांचे आवाज येत नसलेल्या या अत्यंत शांत अशा वातावरणात एखाद्या ध्यान मंदिरा सारखे प्रसन्न वाटत होते. नारळाच्या झावळ्यां पासून बनविलेला घरगुती खराटा आमच्या माळी बुवांनी म्हणजेच चंद्रकांत आजोबांनी हातात घेतला आणि घरासमोरचे अंगण स्वच्छ झाडून काढले. दुपारी आमच्या इराने घराच्या आवारातील मोठ्ठी झाडे आणि त्यांच्या पारंब्या , बागेतील गवत , त्यातून धावपळ करणाऱ्या खारी , कोळ्यांची जाळी वगैरे गोष्टीच्या बरोबरीने अनेक  प्रकारच्या फुलांचे बारकाईने निरीक्षण केले. सुर्यास्ताच्या वेळी मात्र  घरट्यात परतलेल्या पक्ष्यांची  धावपळ चालू होती. पन्नास शंभर फूट उंच पसरलेल्या औदुंबराच्या फांद्यातून असंख्य आठवणींची इंद्रधनुष्यी किरणे आवेगाने अंगावर झेपावत होती.

*विनायक जोशी (vp)*
  📱9423005702
मंगलधाम,हिंगणेखुर्द ,लेन नं ४ , पुणे ५१
*electronchikatha.blogspot.com*

हसणे @ International Day Of Happiness

// श्री स्वामी समर्थ //
*International Day Of Happiness*

      *हसणे*

             *विनायक जोशी (vp)*
📱942005702

 आयुष्याची सुरूवात  आणि शेवट रडणे या विधीने करणाऱ्या माणसाला आयुष्य आनंदाने जगण्यासाठी परमेश्वराने दिलेली ही दैवी देणगी आहे. माझ्या सुदैवाने मला हा वारसा आईच्या कडून मिळाला. अत्यंत मोकळेपणानं साध्या साध्या गोष्टीतील आनंद हुडकून त्यावर हसणारे मित्र मिळाले.कोणत्याही कलेत निपुणता मिळविण्यासाठी लागते ती म्हणजे बारकाईनं निरीक्षण करायची शक्ती आणि अत्यंत बळकट अशी स्मरणशक्ती . टायमिंगचा खोलवर अभ्यास .स्वतः वरती होणारे विनोद सहन करायचा खिलाडूपणा हवा. समोरच्या माणसाला नाउमेद करण्यासाठी याचा वापर कधीही करु नये. आपल्या आजूबाजूला  विनोदाची कारंजी उडवणारे सहकारी असतील तर ते मागच्या जन्मीचे पुण्य आहे असे समजावे. अत्यंत एकाग्रतेने काम करण्यासाठी "हसणे" हे फार मोठे टाॕनिक आहे. फक्त ठराविक उच्च अभिरुचीच्या विनोदांनाच हसायला पाहिजे असा कोणताही निश्चय करु नये. गडगडाटी हसायला येणारी भाग्यवान मंडळी अत्यंत निरोगी असतात.या गडगडाटा चे सहावे Harmonics हे रडणे असते. त्या मुळे हसणे आणि रडणे एकत्र झाल्याने आरोग्य छान राहते. सर्व जगाची एकच बोलीभाषा असलेल्या "हसणे " या आनंदाने रहायला प्रवृत्त करणाऱ्या विधीला मनापासून धन्यवाद !!

    *विनायक जोशी (vp)*
   20 March 2019
      📱9423005702
मंगलधाम , हिंगणेखुर्द ,लेन नं ४,पुणे ५१
*electronchikatha.blogspot.com*

गुरूपौर्णिमा ......गुरू ठाकूर

// श्री स्वामी समर्थ //
       *गुरुपौर्णिमा*
   *गुरुजनांचे स्मरण*

*विनायक जोशी (vp)*
📱9423005702

दत्त महाराजांना बावन्न गुरु होते.स्वामी विवेकानंदाना रामकृष्णां सारखे अनुभुति संपन्न गुरु होते.ज्ञानदेवांना निवृत्तिनाथांसारखे जाणकार गुरु होते.शिवाजी महाराजांना रामदास स्वामींसारखे व्यवहार कुशल गुरु होते.या सर्व गुरुजींना आपल्या विद्यार्थ्यांचा वकूब माहिती असल्यामुळे त्यांनी आपल्या शिष्यांना उत्तम प्रतिचे मार्गदर्शन केले.  आपल्याला आनंदी आयुष्य जगण्यासाठी उपयुक्त असे संस्कार ज्यांनी केले अशा आई वडीलांचे किंवा असंख्य लहान अथवा मोठ्या गुरुंचे स्मरण करायचे.  शारीरिक हालचालीं वरती मर्यादा असूनही उत्तम दर्जाचे गणित शिकवणारे गुरुजी असोत किंवा मूलभूत इलेक्ट्रॉनीक्स मनोरंजक प्रकारे शिकवणारे गुरुजी यांची मला प्रकर्षाने आठवण येते. चार्ली चॕप्लिन पासून ते पु.ल.देशपांडे यांच्या पर्यंत सर्वांनी आनदी जीवनाचा भक्कम पाया तयार करुन घेतला .या जगात अत्यंत मोकळेपणानं जगताना कायम आपला तोल सांभाळणारे गुरु किंवा मुक्त तालात जगण्यासाठी प्रेरीत करणारे गुरु , अशा असंख्य गुरुंच्या कडे आपण नक्की  काय मागायचे हे *गुरु ठाकूर* " यांनी छान आणि मोजक्या शब्दांत सांगितले आहे .
  *तू बुद्धी दे , तू तेज दे* !
   *नवचेतना विश्वास दे* !
   *जे सत्य सुंदर सर्वदा* !     
*आजन्म त्याचा ध्यास दे*

*विनायक जोशी ( vp )*
 📱9423005702
 मंगलधाम , हिंगणेखुर्द, लेन नंबर ४ , पुणे५१
*electronchikatha.blogspot.com*