// श्री स्वामी समर्थ //
प्रिय,
" टाॕम आणि जेरी "
तुम्हाला दोघांना बघितले आणि जिवलग मित्र म्हणजे काय याचा साक्षात्कार झाला. भविष्याची काळजी न करणारी आणि भुतकाळात न रमणारी अशी तुमची अजरामर जोडी आहे.कायम वर्तमानात रहाणारी.
" जेरी " चे जेरीस आणणे आणि टाॕम ने त्या सर्व हरकतींना उत्साहाने तोंड देणे लाजवाब. तुमच्या कल्पना शक्ती ला मात्र तोड नाही. तुमच्या गोष्टींमधे उपदेशाचे डोस नाहीत किंवा उगीचच करुण रसाकडे कधीही गेल्या नाहीत. या जगात आम्हाला आनंदाने जगायचे असेल तर आलटून पालटून आम्ही पण कधी "टाॕम" तर कधी "जेरी" व्हायला पाहीजे असे वाटते. एकही शब्द न बोलता सुध्दा जगातल्या सर्व वयोगटातील रसिकांच्या मनावर गेली कित्येक वर्षे तुम्ही राज्य करत आहात. चॕपलिन नावाच्या अशाच एका राजाने तुमच्या बरोबरीने आमच्या वर राज्य केले आहे. तुमच्या सारख्या उत्साहाने जगणाऱ्या मंडळींच्या सहवासामुळे , आषाढातल्या काळ्या ढगांना दूर सारुन आम्ही "श्रावण मासी हर्ष मानसी " या ओळी गुणगुणत पावसाळ्याचा आनंद लूटत आहोत.!!
हेच पत्र तुमच्या आयांना दाखवा आणि दिवे लागणीला आठवणीने दृष्ट काढून घ्या !!
विनायक जोशी (vp)
electronchikatha.blogspot.com
शनिवार, २२ ऑक्टोबर, २०१६
"Tom & Jery " 76 complete !!!
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा