// श्री स्वामी समर्थ //
" आनंद यात्री "
" नंदू देशपांडे "
२ डिसेंबर १९६५ या दिवशी सोलापूर मधील ९५१ आदर्शनगर या पत्यावर परमेश्वराने एका कमालीच्या आनंदी आणि समाधानी मुलाला प्रवेश दिला. परसा मध्ये असलेला विशालकाय औदुंबर , घरातील ह.भ.प आजोबा , पाच बहीणी , आई - वडील आणि शेजारच्या घरातील १ महिन्याच्या नारायणने प्रचंड आनंदोत्सव साजरा केला. एकुलता एक मुलगा असल्यामुळे बालपण अतिशय लाडाकोडात गेले . शालेय शिक्षण हरिभाई देवकरण प्रशाले मध्ये पूर्ण केले आणि त्या नंतर तंत्र विज्ञान शाखेत पुढील शिक्षण घेतले.पुण्यात काही काळ नोकरी केली .आईच्या नैसर्गिक जबरदस्त प्रेमामुळे पुढील आयुष्य सोलापूर मध्ये व्यतित केले.लहानपणी सुरेल स्वरात रडणारा , दिवाळी मध्ये भरपूर फटाके उडवणारा , हाॕकी सारख्या खेळात विशेष प्राविण्य मिळवलेला , नारायणचा जिवलग मित्र ,भविष्याची अनाठायी काळजी न करणारा ,किर्ती सारखा आनंदी जोडीदार लाभलेला, अत्यंत सुंदर आणि हूशार अशा दोन मुलींचा पिता आणि जवळचा मित्र , वृध्दावस्थेतील आई वडिलांची श्रावण बाळासारखी नेटाने सेवा करणारा , आमच्या आईचा मानस पुत्र असलेल्या या सरळमार्गी अशा नंदूला आज वाढदिवसाच्या दिवशी संपूर्ण जोशी परिवारातर्फे मनःपूर्वक शुभेच्छा !
विनायक जोशी परिवार
२ डिसेंबर २०१६
electronchikatha.blogspot.com
शुक्रवार, २ डिसेंबर, २०१६
आनंदयात्री " नंदू देशपांडे "
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा