शनिवार, ४ एप्रिल, २०२०

बँकेतील आनंदयात्री ...........विनायक जोशी

// श्री स्वामी समर्थ //
  *बँकेतील आनंदयात्री*

*विनायक जोशी(vp)*
💬9423005702
📱9834660237

सध्या कोरोना मुळे असलेल्या लाॕकडाऊन मध्ये वैद्यकीय विभागाशी संबंधित  सर्व मंडळी , पोलिस , सरकारी कर्मचारी  , अन्नधान्य वितरण करणारे दुकानदार , यांच्या बरोबर बँकेतील कर्मचाऱ्यांनी अखंड सेवा चालू ठेवली या बद्दल समाजाने कायम कृतज्ञ रहायला पाहिजे.

 बँक या संस्थेचे महत्त्वाचे काम काय आहे याची पूर्ण जाणीव असलेले आणि त्या प्रमाणे अत्यंत आनंदाने मनापासून व तत्वनिष्ठेने काम करणाऱ्या असंख्य मंडळींचा सहवास मला लाभला .
अविनाश जोशी हे अत्यंत देखणे आणि कार्यक्षम असे बँक आॕफ बडोदा चे ठाण्यातील मॕनेजर , मुंबईतील फोर्ट शाखे पासून ते नवी मुंबई शाखे पर्यंत पंजाब नॕशनल बँकेत अत्यंत जबाबदारी चे काम कमालीच्या आनंदाने करणाऱ्या अनुराधा जोगदंड , डे बुक टॕली करण्यापासून ते संगणकीय प्रणाली वेगवान पध्दतीने समजून घेणाऱ्या कोल्हापूर येथील युनियन बँकेतील सुरेखा सोवनी , आपल्या टेबलापाशी येणाऱ्या  प्रत्येक माणसाला परिपूर्ण मदत करणारे बँक आॕफ महाराष्ट्र लष्कर शाखेतील प्रमोद पवार , नाटक आणि सिरीयल मध्ये काम करणारे व बँकेतील काम मनापासून करणारे स्टेट बँक आॕफ इंडीया स्टेशन रोड शाखा सोलापूर येथील गुरूराज अवधानी किंवा याच शाखेत काम करणारे गिरीश चक्रपाणी , बँकेच्या दैनंदिन व्यवहारातील अनेक ताणतणावाचे प्रसंग लिलया हाताळणारे कॕनरा बँक कोल्हापूर येथील सुरेश सोवनी , गणेश बँक आॕफ कुरुंदवाड मध्ये वेगवान पध्दतीने आणि सुरेख अक्षरात ड्राफ्ट काढणाऱ्या शैला फाटक ,  रिझर्व्ह बँक आॕफ इंडिया मध्ये उच्च पदावर काम करणारे आणि संगणकाची  चेक क्लियरींग पध्दती निर्दोष होण्यासाठी महत्त्वाचे योगदान देणारे G.R.Bhide , HSBC बँकेत कोअर बँकिंग या विषयावर महत्त्वाचे साॕफ्टवेयर विषयी काम केलेल्या गौरी दामले ,स्टेट बँक आॕफ इंडिया हिंगणे खुर्द ब्रॕचचे धडाडीचे मॕनेजर असलेले पटवर्धन , अशा अनेक कार्यक्षम मंडळींचा गेल्या 30 वर्षात वेगवेगळ्या प्रसंगात सहवास लाभला .  हिंगण्यातील लेन नं ४ मध्ये असलेली उद्यम बँक ही अतिशय उत्तम सहकार्य देणारी बँक आमच्या शेजारीच आहे .गिऱ्हाईक या संस्थेला उत्तम दर्जाची सर्व्हिस देणारी ही वेगवेगळ्या बँकेतील मंडळी बघून बँक या संस्थेबद्दल कायम स्वरूपी आदर वाढला . बँकिग हे माझे क्षेत्र  नसले तरी ते करत असलेले काम आणि त्या मुळे संतुष्ट होणारी गिऱ्हाईक रूपी संस्था मला जवळून अनुभवता आली . नोटा बंदीच्या काळात निवृत्त झालेले असंख्य कर्मचारी स्वयंस्फुर्तीने आपल्या जवळच्या शाखेत जाऊन काम करताना बघून कमालीचा आनंद वाटायचा .
सध्या बँकेतील बहूतांशी कामे ही नेट बँकिग किंवा मोबाईल बँकिग मुळे घरातूनच करता येत असल्यामुळे बँकेत फारसे जावे लागत नाही ..... परंतु कधीतरी अचानक पणे यांच्या पैकी कोणी भेटले की कमालीचा आनंद होतो , गप्पा होतात आणि *आम्ही भाग्यवान आनंद निधान* या काव्यपंक्ती आठवतात.

*विनायक जोशी (vp)*
  💬9423005702
  📱9834660237

 १२५७ ,मंगलधाम , बी-३
हिंगणे खुर्द लेन नं ४
पुणे ५१
*electronchikatha.blogspot.com*

गुरुवार, २ एप्रिल, २०२०

Happy Thoughts ....आनंदी विचार

// श्री स्वामी समर्थ //
     *Happy Thoughts*

      *आनंदी विचार*

  *विनायक जोशी (vp)*
💬9423005702
📱9834660237

Happy Thoughts चे साधक किंवा "खोजी " श्री.नंदकिशोर यांच्या आग्रहामुळे एक दिवसाच्या शिबीराला उपस्थिती लावायची असे आम्ही दोघांनीही ठरविले.कोणत्याही प्रकारचा गृहपाठ न करता किंवा पूर्वग्रह न बाळगता जे जे दिसेल ते मनमोकळे पणाने अनुभवायचे असे ठरवून गेलो.आमच्या हिंगण्यातील घरापासून साधारणपणे पाच किलोमीटर असलेल्या किरकीटवाडीच्या कमानीतून आत शिरलो.या ठिकाणी चावट पाटलांची आठवण आली. येथून पुढील पाच किलोमीटरचा प्रवास हा पूर्णपणे कच्च्या रस्त्यावरून डोंगरावर म्हणजेच नांदोशीच्या " मनन " आश्रमा पर्यंत झाला.रस्त्यावर वेगवेगळ्या ठिकाणी  साधक आश्रमाच्या मार्गाबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी अतिशय  उत्साहाने भर दुपारच्या उन्हात उभे होते. प्रवेशद्वारा पासून अनेक साधक सुहास्य वदनाने स्वागत करत होते.आमची प्राथमिक माहिती नोंदवून घेतल्यानंतर हाॕल मध्ये प्रवेश केला.चार हजार लोक ऐसपैस बसू शकतील अशी ती जागा होती.सर्वत्र शिस्त आणि विनम्रता यांचा उत्तम मिलाफ जाणवत होता. कार्यक्रमाची वेळ  दुपारी १ ते ४ होती. बरोबर एक वाजता अतिशय सोप्या पध्दतीने डोळे मिटून ध्यान धारणा करायला शिकवण्यात आले .या ठिकाणी कोणत्याही विशिष्ट देवाचा ,धर्माचा ,पंथाचा प्रभाव नव्हता. फक्त आनंदाने  आनंदाची उपासना करायची होती.या नंतर Happy Thoughts चे संस्थापक *सरश्री* यांच्या बद्दल सविस्तर अशी माहिती देण्यात आली. बरोबर दोन वाजता "सरश्री " स्वतः स्टेजवर आले आणि पुढील दोन तास आनंदी विचार या विषयी असंख्य दाखले किंवा उदाहरणे देऊन विचार करायला प्रवृत्त केले.या दिवशीचा विषय हा " दिल और दिमाग का तालमेल" हा होता. त्यामुळे मेंदू पासून ते हृदयापर्यंतच्या त्रिकोणाला कशा सुचना द्यायला पाहिजेत याचा उत्तम असा आविष्कार अनुभवता आला. अर्थातच आनंदाने राहण्यासाठी  ब्रेन प्रोग्रामिंग मध्ये मेंदूच्या  बरोबरीने हृदयाचा किंवा भावनांचा सहभाग कसा असावा किंवा त्याच्या मुळे होणाऱ्या सकारात्मक गोष्टी मजेशीर उदाहरणे देऊन त्यांनी  सांगितल्या .असंख्य रोगांचे मूळ असलेल्या नकारात्मक विचारांची विल्हेवाट कशी लावायची याबद्दल मार्गदर्शन केले. सलग दोन तास पाणी सुध्दा न पिता अत्यंत आत्मविश्वासाने आणि ओघवत्या भाषेत एका वेगळ्या जगाची ओळख "सरश्रीं" यांनी करुन दिली.अतिशय उत्तम दर्जाचे असे शरीररुपी हार्डवेअर आमच्याकडे आहेच , त्या मध्ये काळानुरुप योग्य असा प्रोग्राम  लिहायचा किंवा असंख्य आनंदी विचारांचे अपडेट करायला पाहिजे हा विचार करत करत नांदोशीच्या डोंगरावरुन म्हणजेच  मनन आश्रमातून हिंगण्याच्या आमच्या घराकडे म्हणजेच मंगलधाम या आमच्या आनंदाश्रमा कडे समाधानाने परत आलो !

*विनायक आणि कल्याणी जोशी ( vp )*
 💬9423005702
  📱9834660237
मंगलधाम , हिंगणेखुर्द , लेन नं ४ , पुणे५१
*electronchikatha.blogspot.com*

आनंदयात्री ....कल्पना किशोर ठाकूरदेसाई

// श्री स्वामी समर्थ //
      *आनंदयात्री*
*कल्पना किशोर ठाकूरदेसाई*

विनायक जोशी (vP)
💬9423005702
📱9834660237

सोलापूर येथील आदर्शनगर काॕलनीत या अत्यंत आनंदी आणि उमद्या व्यक्तिमत्त्वाचे प्रथम दर्शन झाले. अत्यंत तेजस्वी आणि कर्तुत्ववान अशा कर्नल रानडे यांची मुलगी , सोलापूर येथील मिल मध्ये जनरल मॕनेजर पदावर कार्यरत असणाऱ्या नानांची थोरली सुन , मर्चंट नेव्ही मध्ये कॕप्टन असलेल्या किशोरभाऊंची अर्धांगीनी , वायुदलात वैमानिक असलेल्या अरुणरावांची वहिनी , पल्लवी आणि मंदार यांच्यावर उत्तम संस्कार करणारी आई  आणि आमच्या आईची उत्तम मैत्रीण अशा प्रकारे गेल्या ४० -४२ वर्षांपासूनची आमची ओळख. अतिशय सुस्पष्ट आणि निर्भिड विचारसरणी. याचप्रमाणे आनंदी आणि दिलखुलास स्वभावामुळे त्या ज्या ठिकाणी जातील तेथे आपल्या प्रभावी व्यक्तिमत्वाचा कायमस्वरुपी ठसा उमटवून पुढे जात आहेत. आजही नातवंडांच्या सहवासात काही वेळ किंवा डाॕ.नाडगौडा यांच्याकडे कामा निमित्त जाणे अथवा मैत्रीणींना भेटण्यासाठी क्लब मध्ये जाणे वगैरे गोष्टी हा त्यांचा व्यस्त आयुष्याचा भाग आहे. इंग्रजीचे व्यवस्थित ज्ञान घेऊन किशोरभाऊं बरोबर त्यांनी केलेला इंग्लंडचा दौरा असो किंवा पुण्यातील ऐतिहासिक ट्रॕफिक मधून अतिशय उत्तम रीतीने त्यांनी केलेले कार ड्रायव्हींग वगैरे एकदम लाजवाब होते. भांडारकर रोडवरील अलिशान अपार्टमेंट मध्ये रहात असलेल्या व अत्यंत पाॕझीटीव्ह विचारधारा असलेल्या कल्पना वहिनींना उत्तम आरोग्य दायी अशा भावी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा ....

*विनायक जोशी (vp)*
💬9423005702
 📱9834660237
मंगलधाम , हिंगणेखुर्द ,लेन नंबर ४ , पुणे ५१
*electronchikatha.blogspot.com*

बुधवार, १ एप्रिल, २०२०

गुरुप्रसाद आदर्शनगर सोलापूर

// श्री स्वामी समर्थ //
        *९५२ , गुरुप्रसाद*
 आदर्श नगर , सोलापूर

  *विनायक जोशी (vp)*
💬9423005702
 📱9834660237

*२ एप्रिल १९५९* या दिवशी "गुरुप्रसाद" या आठ खोल्यांच्या आनंदी वास्तूत आज्जी-आजोबा , आई-दादा आणि प्रतिभ , सुनीत यांनी गृहप्रवेश केला.
सोलापूर मधील अतिशय सुंदर अशा आदर्शनगर या काॕलनी मधे आमचे घर आहे. या घराला बेले महाराज , देवअण्णा जोशी , चिदंबरस्वामींचे वंशज दिक्षित यांचे आशिर्वाद लाभले आहेत .या ठिकाणी रामनवमी सारखे उत्सव अत्यंत उत्साहाने पार पडले आहेत . घराच्या आवारात भालदार चोपदारा सारखे उभे असे दोन औदुंबर आहेत.त्यांना खेटून हिरवागार कडूनिंब आहे. औषधी करंजी आहे , लालबुंद बदाम आहे , अशोक आणि आंबा एकमेकांशी स्पर्धा करत आहेत. प्रत्येक सोमवारी लागणारा बेल आहे.आवळा आणि शेवगा एकटेच ऊभे आहेत.सिताफळ आणि काटेरी वाघनखे असलेला गजगा आहे.तगरी ,जास्वंद ,अबोली आणि पारिजातक यांच्या वेगळ्या गप्पा चालू आहेत.दारात तुळशी वृंदावन आहे.सोनचाफा मात्र  स्थितप्रज्ञा सारखा पाहतो आहे. असंख्य पक्षांची घरटी आहे.भरपूर खारी आहेत .कावळे , साळूंक्या आणि पोपट आहेत.सतत रंग बदलणारे सरडे आहेत .रात्री मात्र सर्व पक्षी झोपले की वटवाघुळांचे राज्य चालू होते. औदुंबराच्या पारावर आईच्या असंख्य आठवणी आहेत . देवघरात वडीलांचे अस्तित्व आहे. घराच्या दरवाजात ऊभे राहून कायम कोणाची तरी काळजी करत वाट बघणाऱ्या आजीच्या आठवणी आहेत .या *एकसष्ठी* पूर्ण  केलेल्या घरात आमच्या  सर्वांच्या असंख्य आठवणी आहेत. आजही सोलापूरला गेल्यावर संध्याकाळी ऊदबत्ती लावून भीमरुपी , रामरक्षा वगैरे मोठ्याने म्हणून घेतले किंवा  पहाटेच्या वेळी घराच्या आवारात शुभशकुनी अशी भारद्वाजांची तुकतुकीत जोडी दिसली म्हणजे  सोलापूरला आल्याचे चीज झाले असे वाटते ..........

(या वर्षी २५ एप्रिल ते २५ मे असा वेळ या घराच्या डागडूजीसाठी ठेवला आहे )

   *विनायक प्रभाकर  जोशी ( vp)*
💬9423005702
📱9834660237

९५२ , गुरूप्रसाद ,आदर्शनगर,   सदरबझार , सोलापूर ४१३००३

*electronchikatha.blogspot.com*