// श्री स्वामी समर्थ //
*९५२ , गुरुप्रसाद*
आदर्श नगर , सोलापूर
*विनायक जोशी (vp)*
💬9423005702
📱9834660237
*२ एप्रिल १९५९* या दिवशी "गुरुप्रसाद" या आठ खोल्यांच्या आनंदी वास्तूत आज्जी-आजोबा , आई-दादा आणि प्रतिभ , सुनीत यांनी गृहप्रवेश केला.
सोलापूर मधील अतिशय सुंदर अशा आदर्शनगर या काॕलनी मधे आमचे घर आहे. या घराला बेले महाराज , देवअण्णा जोशी , चिदंबरस्वामींचे वंशज दिक्षित यांचे आशिर्वाद लाभले आहेत .या ठिकाणी रामनवमी सारखे उत्सव अत्यंत उत्साहाने पार पडले आहेत . घराच्या आवारात भालदार चोपदारा सारखे उभे असे दोन औदुंबर आहेत.त्यांना खेटून हिरवागार कडूनिंब आहे. औषधी करंजी आहे , लालबुंद बदाम आहे , अशोक आणि आंबा एकमेकांशी स्पर्धा करत आहेत. प्रत्येक सोमवारी लागणारा बेल आहे.आवळा आणि शेवगा एकटेच ऊभे आहेत.सिताफळ आणि काटेरी वाघनखे असलेला गजगा आहे.तगरी ,जास्वंद ,अबोली आणि पारिजातक यांच्या वेगळ्या गप्पा चालू आहेत.दारात तुळशी वृंदावन आहे.सोनचाफा मात्र स्थितप्रज्ञा सारखा पाहतो आहे. असंख्य पक्षांची घरटी आहे.भरपूर खारी आहेत .कावळे , साळूंक्या आणि पोपट आहेत.सतत रंग बदलणारे सरडे आहेत .रात्री मात्र सर्व पक्षी झोपले की वटवाघुळांचे राज्य चालू होते. औदुंबराच्या पारावर आईच्या असंख्य आठवणी आहेत . देवघरात वडीलांचे अस्तित्व आहे. घराच्या दरवाजात ऊभे राहून कायम कोणाची तरी काळजी करत वाट बघणाऱ्या आजीच्या आठवणी आहेत .या *एकसष्ठी* पूर्ण केलेल्या घरात आमच्या सर्वांच्या असंख्य आठवणी आहेत. आजही सोलापूरला गेल्यावर संध्याकाळी ऊदबत्ती लावून भीमरुपी , रामरक्षा वगैरे मोठ्याने म्हणून घेतले किंवा पहाटेच्या वेळी घराच्या आवारात शुभशकुनी अशी भारद्वाजांची तुकतुकीत जोडी दिसली म्हणजे सोलापूरला आल्याचे चीज झाले असे वाटते ..........
(या वर्षी २५ एप्रिल ते २५ मे असा वेळ या घराच्या डागडूजीसाठी ठेवला आहे )
*विनायक प्रभाकर जोशी ( vp)*
💬9423005702
📱9834660237
९५२ , गुरूप्रसाद ,आदर्शनगर, सदरबझार , सोलापूर ४१३००३
*electronchikatha.blogspot.com*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा