// श्री स्वामी समर्थ //
" मैत्र "
या वर्षीच्या बारावीच्या परीक्षा थोड्याच दिवसांनी सुरु होणार आहेत.या निमित्ताने अठरा वर्षापूर्वी बारावीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या दोन मित्रांची आठवण आली.या दोघांच्या मधे साधारणपणे २६ वर्षांचे अंतर होते.दहावी पर्यंतचे शिक्षण काॕन्व्हेंट मधे घेतलेला मुलगा आणि त्याला सर्व बाबतीत मदत करायला तयार असणारा मित्र यांनी मुलाच्या बारावीची तयारी चालू केली.केमिस्ट्री या विषयासाठी उत्तम क्लास मिळाला होता.बाकीचे विषय मात्र काॕलेज,क्लास आणि स्वतःच्या प्रयत्नांवर अवलंबून होते.दररोज चा अभ्यास दररोज अत्यंत एकाग्रता पूर्वक करायचा आणि त्या नंतर खेळायचे हे रुटीन परीक्षेच्या दिवसा पर्यंत चालू होते. रात्री अभ्यासासाठी जागणे किंवा भल्या पहाटे उठणे हे दोघांनाही आवडत नसे. या मुलाचा अभ्यास चालू असताना त्याचा मित्र त्या खोलीत पेपर वाचन किंवा त्याचे आॕफिसचे काम करत बसलेला असे. शेवटचे दोन महिने मात्र या मुलाने सोडवलेले पेपर दुसऱ्या गावातील किंवा काॕलेज मधील प्रोफेसर मंडळींना दाखवून त्यांची मते जाणून घेणे वगैरे कामे हा मित्र कामावरती सुट्टी घेऊन करत असे. घड्याळ लावून वेळेच्या आत पेपर सोडवून व्हावा या साठी दोघे मिळून चर्चा करत असत.पेपर चांगले गेले तर सांगलीच्या वालचंद काॕलेज मधे मेकॕनिकल साईड ला ॲडमिशन घ्यायची हे ठरलेले होते.परीक्षेच्या काळात मात्र एकदम रिलॕक्स शेड्यूल होते.पेपर सोडवून आल्यावर चूक काय झाली यावर फक्त दोन चार मिनीटे चर्चा .त्यानंतर अर्धा तास मित्रांच्या बरोबर गप्पा आणि त्या नंतर दोन तास दुसऱ्या दिवसाचा अभ्यास.या काळात मित्राने मात्र कामावरती सुट्टी घेतली होती.परीक्षेच्या काळात मुलाच्या आईला काळजी पासून दूर ठेवायचे काम सुध्दा हा मित्र उत्तम प्रकारे पार पाडत होता. परीक्षा झाल्यानंतर मात्र हा मुलगा दोन महीने आजोळी आजी आजोबांकडे सोलापूरला गेला. साधारणपणे जूलै महिन्यात रिझल्ट होता.रिझल्टच्या आदल्या दिवशी सकाळी ११ वाजता बातमी आली त्या प्रमाणे हा मुलगा बोर्डात आलेला होता. संध्याकाळ पर्यंत वेगवेगळे वर्तमानपत्र वाले ,मित्राच्या आॕफिस मधील मंडळी , शेजारील माणसे, नातेवाईक,मुलाचे असंख्य मित्र वगैरे प्रचंड वर्दळ चालू झाली. दुसऱ्या दिवशी काॕलेज मधे बोर्डात आलेल्या सर्व मुलांचे वेगवेगळ्या मंडळींच्या बरोबर फोटो सेशन झाले.मार्कशीट वरील मार्क बघितल्या वर त्याच्या मामाने कळवले त्या प्रमाणे त्या वेळचे पुण्यातील काॕम्प्युटरचे उत्तम काॕलेज 'PICT'येथे अॕडमिशन घ्यायचे ठरले. अगदी लहानपणापासून प्रत्येक बारीकसारीक शंकांचे निरसन करणारा , क्रिकेट पासून ते WWF पर्यंत सर्व खेळ मुलांच्या बरोबर खेळणारा ,काॕमन सेन्सचा असामान्य वापर करणाऱ्या आणि वयाने मोठ्या असलेल्या मित्राचे नाव 'सुरेश सोवनी' आहे आणि बारावीला बोर्डात आलेला त्यांचा मित्र आणि मुलगा 'केदार सोवनी 'यांची ही छोटी गोष्ट आहे. एकमेकांशी मित्रा सारखे राहून सहजपणे यश मिळवणाऱ्या एका मुलाची आणि त्याच्या वडिलांची हि साधी सरळ गोष्ट !
विनायक जोशी (vp )
22 February 2016
electronchikatha.blogspot.com
बुधवार, २२ फेब्रुवारी, २०१७
यशाच्या दिशेने चालणारे " मैत्र "
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा