// श्री स्वामी समर्थ //
" मैत्र जीवाचे "
" National Player "
"स्मॕशर शैला फाटक-कल्याणी जोशी"
कोल्हापूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात म्हणजेच कुरुंदवाड येथिल ही व्हाॕलिबाॕल मधील राष्ट्रीय खेळाडू . शाळेत शिकत असतानाच 'पोहणे 'या प्रकाराने खेळाडू म्हणून सुरवात केली आणि थोड्याच दिवसात जिल्हा पातळीवरील खेळाडू म्हणून नावलौकिक मिळवला.या नंतर मात्र अचानक पणे शारीरिक शिक्षणाच्या सरांच्या सांगण्यावरुन व्हाॕलिबाॕल खेळायला सुरवात केली.कुरुंदवाड मधे उत्तम प्रकारचे मार्गदर्शन मिळू लागले.दररोज काही तास सराव आणि त्याला अनुसरुन सर्व प्रकारचे अत्यंत कडक व्यायाम वगैरे रुटीन चालू झाले.थोड्याच दिवसात जिल्हा पातळी , त्या नंतर विद्यापीठात खेळाडू , त्या नंतर कप्तान , मग महाराष्ट्राची खेळाडू असा आलेख चालू झाला. अभ्यासात हूशार असून सुध्दा खेळासाठी वेळ मिळावा म्हणून काॕमर्स साईड घेतली आणि एम् काॕम झाली.याच वेळी महाराष्ट्रा तर्फे नॕशनलच्या सिलेक्शन साठी कटक ला गेली.त्या ठीकाणी वेगवेगळ्या राज्यातील उत्तमोत्तम खेळाडू आणि त्यांचे द्रोणाचार्यां सारखे प्रशिक्षक जवळून अनुभवता आले. छोटया गावापासून सुरु झालेला हा खेळाचा प्रवास पुढील प्रत्येक पातळीवर गुणात्मक उंची वाढविण्यासाठी उपयोगी ठरत होता.घरच्या मंडळींना तिच्या व्हाॕलिबाॕल मधील प्रगतीचा आलेख वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून येणाऱ्या बातम्यां मधून वाचायला मिळत होता. ती उत्तम दर्जाची
" स्मॕशर " होती. मॕचेस नसताना गावाकडे आली की शाळेच्या मैदानात सराव करायची . संध्याकाळच्या वेळी एका भिंंतीसमोर नेट बांधलेले असे ४-५ बाॕल्स , दोन सहकारी आणि गावातील अनुभवी कोच बरोबर असत .कोणत्याही प्रकारचा कंटाळा न करता " मार्गदर्शक " सांगतील तितक्या वेळेला हवेत उंच ऊडी मारुन योग्य जागी आणि अत्यंत वेगाने" स्मॕश "मारत रहायचे, सलग ५०-६० वेळेला ! तुम्हाला कोणत्याही खेळात प्राविण्य मिळवायचे असेल तर प्रचंड कष्ट करायची तयारी , उत्तम दर्जाचे मार्गदर्शक , चांगले नशिब आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे खिलाडू वृत्ती पाहीजे ....................! खेळाडू हा रोल संपल्यावर ती बँकेत कामाला लागली आणि थोड्या दिवसांनी शैला फाटक ही माझी अत्यंत जवळची मैत्रीण म्हणजेच सौ.कल्याणी विनायक जोशी झाली. तिच्या मुळे राष्ट्रीय खेळाडू बनण्यासाठी लागणारे अथक प्रयत्न किंवा खेळाडूंच्या दृष्टीने असाधारण महत्त्वाचे असलेले राष्ट्रगीत यांची जवळून अनुभुती घेता आली .
विनायक जोशी (vp)
18 January 2017
electronchikatha.blogspot.com
मंगळवार, १७ जानेवारी, २०१७
राष्ट्रीय खेळाडू " कल्याणी जोशी "
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा