सोमवार, ३० मार्च, २०२०

लाॕक डाऊन सहावा दिवस ...मनस्वी कलावंतांच्या जगात

// श्री स्वामी समर्थ //

   *मनस्वी कलावंतांच्या जगात*

विनायक जोशी (vP)
💬9423005702
📱9834660237

 आज अत्यंत सुंदर अशा पहाटे स्वेया साठे या स्टाॕकहोमच्या छोट्याशा मुलीचे ड्रम वादन ऐकले . बर्थ डे गर्ल मृण्मयीचे मंकी मॕन या विषयावरील बोबड कथा ऐकली. वाकडच्या स्वरा पाटीलचे सुरेख चित्र पाहिले , अमेरिकेतील अजित बेलसरकरचे गाणे ऐकले , कोलकत्ता येथील संजू सरवटेने लिहिलेला उत्तम लेख वाचला , ग्रेटर नोएडा दिल्ली येथे राहणारे नारायण जोशी यांचे भावपूर्ण गाणे ऐकले , हास्यसम्राट दीपक देशपांडे यांनी काढलेले ताजे पेंटिंग बघितले , कर्वेनगर येथे राहणारे विजय बढे यांची हिंदी आणि मराठी अशी दोन गाणी ऐकली , संदीप कुलकर्णी यांचा झूंबाडान्स बघितला, इलूचे एकदम भारी पेंटिंग बघितले ,  रंगून येथील रघूनाथ फाटकांचा छान लेख वाचला , मुंबईतील अनिल जोशी यांचा लाॕकडाऊन नंतर या विषयावरचा अभ्यासपूर्ण लेख वाचला , मुंबईतील आकाश निलावार यांची संवादिनी ऐकली .....एकूणच लाॕकडाऊन मुळे अनेक जणांच्या आत मध्ये असलेले लेखक , गायक , चित्रकार , संगीतकार वगैरे कलावंत अनुभवत आहे .अर्थातच या सर्व गोष्टी  स्वतःच्या घरात बसून एकदम शांत चित्ताने......
👍👍👏👏

विनायक जोशी (vP)
💬9423005702
📱9834660237
 मंगलधाम , हिंगणे खुर्द ,लेन नंबर ४ , पुणे ५१
*electronchikatha.blogspot.com*

शनिवार, २८ मार्च, २०२०

परमप्रिय स्नेहीजन २१ दिवस लाॕक डाऊन ...विनायक जोशी

// श्री स्वामी समर्थ //
       *परमप्रिय स्नेहीजन*

विनायक जोशी (vP)
💬9423005702
📱9834660237

भारताचे माननीय पंतप्रधान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे दूरचित्रवाणीच्या माध्यमातून आपल्याला ज्या सूचना देत आहेत त्या कसोशीने पाळणे अत्यंत जरुरीचे आहे ...

 सध्या प्रसार माध्यमांच्या वरती सुध्दा खूप कामाचा ताण आहे याची जाणीव ठेवून तारतम्य बाळगून बातम्या बघणे .

आपण आपल्या घराच्या आसपास असलेल्या परीसरात स्वच्छता पाळणे आणि एकमेकांच्या पासून कमितकमी ८ फूट अंतर ठेवून व्यवहार करणे . भाजी , किराणा वगैरे अत्यावश्यक गोष्टी आणायला जाताना सॕनिटायझरने हात धूणे आणि परत आल्यावरती साबणाने हातपाय स्वच्छ धूणे . बाहेर जाताना घातलेले कपडे दररोज आपले आपण स्वच्छ धूणे ही कामे आळस न करता पार पाडावीत .

सर्व घरांच्या मधील कामवाली नावाची संस्था गैरहजर असल्यामुळे घरातील स्त्री वर्गाला अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने घरातील कामात मदत करणे . आपल्या सर्वांच्या घरातूनच आनंद , समाधान आणि लढण्याची जिद्द तयार होणार आहे त्या मुळे सर्वांनी अत्यंत सकारात्मकपणे घरातील कामांच्याकडे बघणे जरुरीचे आहे .

आर्थिक नियोजन ...
पुढच्या काही दिवसांसाठी आपल्याला कामावरती जाता आले नाही , तरी व्यवस्थित किंवा काटकसरीने पुरतील असे पैशांचे नियोजन करणे . या मध्ये आपल्या कुटुंबातील मंडळींचे आणि वर्षानुवर्षे आपल्या बरोबर असलेल्या अशा कामगार वर्गाचा विचार करणे अत्यंत जरुरीचे आहे .

आपली सर्वांची एकच जात आहे ती म्हणजे आपण भारतीय नागरिक  आहोत हे कायमचे लक्षात ठेवायचे.
विनायक जोशी
💬9423005702
📱9834660237

या कालखंडात
षडरीपूंपैकी क्रोध म्हणजे राग , मद म्हणजे विनाकारण माज किंवा ताठा आणि मत्सर म्हणजे द्वेष यांच्यावर संयम ठेवल्यास आपण भयमुक्त व आरोग्याला हितकारक असे राहू शकू याची नक्की खात्री आहे .

 ज्येष्ठ नागरिक किंवा गरजू मंडळींच्या साठी आपल्याला आपल्या परीने काय करता येईल याचा वस्तुनिष्ठ विचार करायची हीच वेळ आहे .

दररोज आपल्याला जमेल तेंव्हा छान व प्रसन्न चित्ताने  भरपूर व्यायाम करावा ...

 शास्त्रज्ञांनी दूरध्वनीचा शोध हा एकमेकांशी संवाद साधण्यासाठी केला आहे त्या मुळे छानपैकी फोन उचला आणि आनंदी , उत्साहपूर्वक व एकमेकांना आधार वाटेल असे संभाषण  करायला अजिबात हरकत नाही....

👏👏👏👍👍👍

All The Best

*विनायक जोशी (vP)*
💬9423005702
📱9834660237
मंगलधाम , हिंगणेखुर्द , लेन नं ४ , पुणे ५१
*electronchikatha.blogspot.com*

गुरुवार, २६ मार्च, २०२०

पाडवा ते राम नवमी -- गुरूप्रसाद सोलापूर

// श्री स्वामी समर्थ //
       *जय श्रीराम*
    *पाडवा ते रामनवमी*
     १९८६ ते २०११

      *विनायक जोशी (vp)*
 💬9423005702
  📱9834660237

  आमच्या सोलापूर येथील "गुरुप्रसाद" या वास्तूत सलग २६ वर्षे रामनवमीचा उत्सव आईने अत्यंत उत्साहाने आणि कडक शिस्तीत पार पाडला. या उत्सवाच्या आयोजनाची सुरवात दोन महिने आधी म्हणजेच रथसप्तमी पासून सुरु होत असे.पाडवा ते नवमी अशा नऊ दिवसांच्या साठी कार्यक्रम ठरविले जात. प्रत्येक वक्त्या बरोबर त्या दिवशी बोलायचा विषय , वेळ वगैरे बोलणे होई.भारुड किंवा किर्तन असेल तर तबला ,पेटी  किंवा त्यांचे साथीदार आणि त्यांची बिदागी वगैरे ठरवावे लागे.पाडव्याच्या आधी घराची आणि बागेची स्वच्छता रंगरंगोटी वगैरे गोष्टी पूर्ण कराव्या लागत आसत.साठ-सत्तर
लोकांना व्यवस्थित बसता येईल अशी बैठक व्यवस्था तयार ठेवावी लागे.नऊ दिवसांची  छापील कार्यक्रम पत्रिका असे.सर्व कार्यक्रम बरोबर ४ वाजता चालू होत असत आणि साधारणपणे ६.३० वाजता संपत .शेवटच्या दिवशी रामनवमी मात्र बरोबर दुपारी १२ वाजता .पाळणा ,किर्तन असा कार्यक्रम असे.या नऊ दिवसात एकदा तरी  हनुमानजी प्रवचन ऐकायला येऊन जातात अशी श्रध्दा असे .राम नवमीच्या दुसऱ्या दिवशी भंडारा .सर्वांना जेवण आणि उत्सवाची सांगता.
लहानपणी " रामचरित मानस " पासून राम दर्शनाची  सुरवात झाली .पुढे संपूर्ण रामायण वगैरे वाचले. दररोज संध्याकाळी मात्र भिमरुपी , रामरक्षा वगैरे नित्य स्तोत्रे म्हणत असू. रामरक्षा हे जबरदस्त संरक्षक कवच आहे.राम या शब्दाच्या भोवती शेकडो आठवणी आहेत. कधीतरी संध्याकाळच्या वेळी अत्यंत सुरेल आणि भावपूर्ण अशा आवाजात दादांनी म्हणलेले " करुणाष्टक " ऐकू यायला लागते. सुधीर फडके यांनी गायलेले तेजस्वी अशा गीत रामायणाचे स्वर कानावर पडतात आणि या एकवचनी श्रीरामाला मनोभावे हात जोडले जातात .
🙏🙏🙏

*विनायक जोशी ( vp )*
  💬9423005702
   📱9834660237
मंगलधाम,हिंगणेखुर्द,पुणे५१
*electronchikatha.blogspot.com*

ज्ञानयोगी कर्मयोगी विजय देशपांडे सर

// श्री स्वामी समर्थ //
   *ज्ञानयोगी आणि कर्मयोगी*

   *विजय देशपांडे सर*

विनायक जोशी (vP)
💬9423005702
📱9834660237

COEP या अत्यंत प्रतिष्ठित काॕलेज मधून १९७५ साली पदवी प्राप्त केलेले , २६ मार्च १९८२ या दिवशी पाडव्याला स्वतःची एलटेक या नावाने कंपनी चालू करणारे , पाॕवर इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रात सातत्यपूर्ण संशोधनात्मक आणि उपयुक्त असे सलग ४२ वर्षे काम करणारे , उत्कृष्ठ कारखानदार म्हणून सरकार दरबारी गौरविले गेलेले असे चैतन्यमुर्ती म्हणजे देशपांडे सर .

काळाच्या बरोबर कायम राहणारे , आधुनिक तंत्रज्ञानाचा कायम वापर करणारे , आजही पूर्णपणे दिवसभर नवीन नवीन प्रोजेक्टस् वरती काम करत असलेले उत्साही व्यक्तिमत्व म्हणजे देशपांडे सर ..

पाॕवर इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून इंडक्शन हिटींग किंवा सोलर पाॕवर या विषयावर उच्च दर्जाचे आणि नाविन्यपूर्ण काम ते सातत्याने करत आहेत.

भारतात IGBTचा पाॕवर सर्किटस मध्ये सुयोग्य वापराची सुरुवात करणाऱ्या मंडळींच्या मध्ये सर नक्कीच आहेत .

अतिशय सुंदर अशा प्रकारे शक्तिशाली Sine Wave तयार करणारे आणि या वेव्हला आपल्या बरोबरीने घेऊन जाणारे हेवी ट्रान्सफाॕर्मर्स डिझाईन करणारे , आजही स्वतः फील्ड वरती काम करणारे , अत्यंत भारदस्त व्यक्तिमत्व असलेले , मनमोकळेपणाने गडगडाटी हसणारे , अशा ज्ञानयोगी देशपांडे सरांना कर्मयोग नावाची अखंड साधना करत राहण्यासाठी लागणारे आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य  लाभावे ही मनःपूर्वक प्रार्थना आणि एलटेक या कंपनीला वर्धापन दिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
💐💐💐💐💐

*विनायक आणि कल्याणी जोशी (vP)*
💬9423005702
📱9834660237
१२५७ , मंगलधाम , विठ्ठलवाडी हिंगणे खुर्द पुणे ५१
 *electronchikatha.blogspot.com*

Young India ....आशिष दायमा एलटेक मार्केटींग मॕनेजर

// श्री स्वामी समर्थ //
  *Young India*

Work From Home
     Production Unit

विनायक जोशी (vP)
💬9423005702
📱9834660237

आशिष दायमा हा सत्तावीस वर्षांचा तरुण आणि तडफदार इंजिनियर सध्या एलटेक या कंपनीत सेल्स आणि मार्केटींग मॕनेजर म्हणून विजय बढे यांच्या बरोबर  कार्यरत आहे .

पाॕवर इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रात काम करणाऱ्या या कंपनीचे काम आता २१ दिवस बंद राहणार आहे त्या वेळेचा सदुपयोग कसा करत आहे या विषयी त्याने लिहिले आहे...

सकाळी सुर्यनमस्कार , घराची स्वच्छता , आईला मदत , माहेरी असलेल्या बायको आणि १ महिन्याच्या मुली बरोबर व्हिडीयो काॕल , ईडीएक्स अॕप वरील IOT Cource , पत्ते , ल्यूडो वगैरे घरात बसूनचे खेळ ..

आज सकाळी ११ ते १२ मंडलीक सरांचे व्ह्यॕल्यू अॕडीशन चे आॕनलाईन सेशन , १२ ते १ मनिष गुप्तांचे सेशन आणि नंतर जग्गी वासूदेव यांचे Inner engineering बद्दलचे २ तासांचे सहावे सेशन.......
विजय सर आणि कट्टी सरांच्या बरोबर कंपनीच्या आगामी मार्केटींगच्या धोरणां बद्दल विचार विनिमय , एकूणच  आजचा दिवस पूर्ण बिझी
👍👍👍

*विनायक जोशी (vP)*
💬9423005702
📱9834660237
मंगलधाम , विठ्ठलवाडी हिंगणे खुर्द , पुणे ५१ *electronchikatha.blogspot.com*

२१ दिवस भारत बंद ...Golden Days ....विनायक जोशी

//श्री स्वामी समर्थ //
  *Golden Days*

*नवीन वर्षाच्या शुभेच्छा*

विनायक जोशी (vP)
💬9423005702
 📱9834660237

आपल्या कुटुंबातील मंडळींच्या बरोबर सर्व सुख सुविधांच्या सहीत २१ दिवस शांतपणे रहायला मिळते आहे ही अलौकिक गोष्ट आहे .

आपण सर्वजण जे  काम करत आहोत त्यातील बारकावे समजून घेणे , काळानुरुप तंत्रज्ञान शिकणे , त्या विषयातील वेगवेगळ्या अनुभवी , धाडसी , दिर्घोद्योगी मंडळींच्या कामाची किंवा विचारांची पध्दत मोकळेपणाने बघायची संधी या निमित्ताने प्राप्त झाली आहे . एखादी गोष्ट  योग्य वाटली तर आत्मसात करायची  याच बरोबर आपले विचार कागदावर उतरवायची सवय करुन घ्यायची ....

उदा. समजा आपण *इंडिटेक* या लिफ्टच्या इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनीक्स सिस्टीम्सचे टोटल सोल्यूशन देणाऱ्या कंपनीत काम करत आहोत तर आपल्याला लिफ्ट म्हणजे काय , लिफ्ट कशी चालते या मुलभुत गोष्टी माहिती पाहिजेत . या नंतर आपण उत्पादन करत असलेल्या गोष्टी म्हणजे Car operating Panels (COP) किंवा (LOP) , ARD System , Control Panel , AC Drive , RC Brake , Safety Interlocks , IOT Devices , Sensors , Auto Door , Load balancing , UPS , Solar Power ...वगैरे अनेक गोष्टींची छान मनोरंजनात्मक आणि खोल माहीती करुन घ्यावी लागेल.

 आपल्याला जेंव्हा एखाद्या गोष्टीतील ज्ञान मिळायला लागते तसा आत्मानंद सुध्दा वाढायला लागतो . त्या आनंदासाठी आपण अजून खोलवर काम करायला लागतो आणि छान राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय दर्जाचे काम त्यातून तयार होते .

या २१ दिवसात लिफ्टच्या संबधातिल फक्त २१ गोष्टींच्या कडे  वेगवेगळ्या पध्दतीने पहायचा दृष्टिकोन तयार करा त्यामुळे आत्मविश्वासाने काम करायला सुरुवात होईल .
दहा टक्के हूशारी आणि नव्वद टक्के काॕमनसेन्स वापरुन बघा एक वेगळा अनुभव म्हणून फक्त ...

इलेक्ट्रॉनिक्स कांपोनंटस बरोबर अभ्यास करताना त्यांचा स्वभाव समजून घ्या ......
सायकलच्या ट्यूबला असलेल्या हवेच्या व्हाल्व्ह सारखा चालणारा *डायोड* , कोणतेही काम सांगितले कि उतावळेपणा करणारा *कपॕसिटर* , आपल्या मनाप्रमाणेच वागणारा असा स्वभाव असलेला *इंडक्टर* , जास्त ओझ्याचे काम अजिबात कपाळाला आठ्या न घालता करणारे *माॕसफेट* , कायम आपल्याशी संवाद साधायला उत्सूक असलेले *Led*, स्थितप्रज्ञा सारखी राहणारी आणि अत्यंत जरुरीच्या वेळी उपयूक्तता सिध्द करणारी *बॕटरी* , कंट्रोलरला ब्लॕक कॕट कमांडो सारखे सुरक्षितता देणारे *आॕपटो कपलर्स* , खालीवर अशा उठाबशा काढणाऱ्या *स्क्वेयर वेव्हज* , सुरेल संगिता सारख्या *साईन वेव्ह* , सर्वांचे सगळे गुणदोष पोटात घेणारी *पाॕवर अर्थ* , सिग्नल्सना आनंदात घेऊन जाणाऱ्या *Twisted केबल्स* , शून्य स्थिती प्राप्त झाल्यावरच आत्मकोषात जाणारे *SCR* .....वगैरे असंख्य आनंदी मंडळींशी संवाद म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स आणि टेली कम्युनिकेशन आहे .

 आपल्याला एकही डिजीटल पध्दतीचे ज्ञानेद्रीय देवाने दिलेले नाही त्या मुळे छोट्यातील छोटी स्पंदने किंवा Vibrations आपण अनुभव शकतो . Power Of Imagination चा पुरेपूर आनंद देणाऱ्या या क्षेत्रात छान विहार करा आणि हे २१ दिवस सार्थकी लावा
👍👍👍

विनायक जोशी (vP)
💬9423005702
 📱9834660237
  १२५७ , मंगलधाम , विठ्ठलवाडी हिंगणे खुर्द
पुणे ५१
*electeonchikatha.blogspot.com*

शुक्रवार, २० मार्च, २०२०

परमप्रिय विद्यार्थी मित्र मैत्रीणींचा निरोप......सौ.कल्याणी जोशी

// श्री स्वामी समर्थ //

प्रिय विद्यार्थी मित्र - मैत्रीणींनो ,

    दिवाळीच्या अत्यंत आनंदी अशा सुट्टी नंतर आपण हळूहळू दुसऱ्या सत्राचा अभ्यास चालू केला आणि गेले साडेचार महिने अत्यंत कडक अशी मेहनत घेऊन उत्तम असा अभ्यास केला .
 परीक्षा नावाच्या उत्तम दर्जाच्या गोष्टीसाठी आपण सिध्द झालो . परीक्षा म्हणजे आपल्या आकलन शक्तीचे अवलोकन असते , त्याची आपण सर्वांनी मिळून छानशी तयारी केली होती. पण सध्याच्या प्राप्त परिस्थितीत परीक्षा रद्द झाल्यामुळे क्षणभर अपेक्षाभंग झाला .  आपण केलेली अभ्यासाची ही तयारी पुढील वर्षांसाठी मजबूत पाया म्हणून अत्यंत उपयुक्त ठरेल या बद्दल मला नक्कीच विश्वास वाटतो.
 या वर्षीची सुट्टी नेहमीच्या सुट्टीपेक्षा वेगळी आहे . ही सुट्टी तूम्ही घरातल्या घरात चांगल्या प्रकारची पुस्तके वाचून किंवा चांगले चित्रपट पाहून , चित्रकला , संगीत वगैरे गोष्टींची ओळख करुन घेण्यासाठी व्यतित करावी . नॕशनल जियोग्राफीक्स , डिस्कव्हरी किंवा स्पोर्टस चॕनल्स यांचा आनंदी मनाने आणि एकाग्रता पूर्वक आस्वाद घ्यावा . इंग्रजी चे छान वाचन , शब्दसंपदा वाढविणे किंवा संस्कृत सारख्या विषयांचे योग्य आघातांचा वापर करून मोठ्या आवाजात पुनर्वाचन करावे .

असो..... या वेळची सुट्टी  वेगळ्या पध्दतीने घरातच थांबून आणि आरोग्याची काळजी घेत साजरी करावी ....

*सौ.कल्याणी जोशी*
💬9028991058
📱9511612278
 १२५७ , मंगलधाम , विठ्ठलवाडी , हिंगणेखुर्द , लेन नंबर ४ , पुणे ५१
*electronchikatha.blogspot.com*

गुरुवार, १९ मार्च, २०२०

पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांचे आवाहन " कोरोना व्हायरस "

// श्री स्वामी समर्थ //

*पंतप्रधान नरेंन्द्र मोदी*
      यांचे आवाहन

       *कोरोना*

१) संयम बाळगा
२) गर्दीत जाणे टाळा
३) शक्यतो प्रवास करु नका
४)२२ मार्चला जनतेचा कर्फ्यू
५)शक्य तेवढी कामे घरातून करा
६) ज्येष्ठ नागरिकांनी घरातच थांबावे .अगदी जरुरी असेल तरच दवाखान्यात जाणे रुटीन चेकअप वगैरे गोष्टींसाठी
७) जीवनावश्यक वस्तूंचा उगीचच साठा करु नका
८)  कोरोना मुळे उदभवलेल्या आणिबाणीच्या स्थितीत २४ तास काम करणाऱ्या सर्व संस्थांचे आणि मंडळींचे कृतज्ञता पूर्वक धन्यवाद देण्यासाठी २२ मार्चला संध्याकाळी ५ वाजता आपापल्या घरातून प्रोत्साहन द्यायचे ....👏👏👏👏👏

*भारतीय नागरिक*
 *विनायक जोशी (vP)*
   मंगलधाम , हिंगणेखुर्द ,
    पुणे ५१
💬9423005702
📱9834660237
*electronchikatha.blogspot.com*

बुधवार, १८ मार्च, २०२०

आनंदयात्री .....विनायक जोशी

// श्री स्वामी समर्थ //
    *आनंदयात्री*

     *विनायक जोशी (vp)*
 📱9423005702

माझ्याकडे आनंदी स्वभाव नावाचे एक साधे सोप्पे साधन होते . त्याच्या मदतीने मी सहजतेने छान काम करायला सुरूवात केली . आपल्या सहवासात येणारी माणसे किंवा आपण वापरत असलेल्या  वस्तू किंवा वास्तू यांच्या बरोबर प्रेमाने काम करणे एवढे एकच व्रत पाळले . एका वेगळ्या अनुभवाच्या जगात प्रवेश केला . कोणत्याही गोष्टींची अथवा माणसांची भिती सहजपणे संपुष्टात आली .कोणालाही फाॕलो करावे किंवा कोणीही  आपला आदर्श ठेवावा असे वाटले नाही . दररोज  उत्साहाने आणि आनंदाने  काम सुरू करणे आणि काम उत्तम पणे पूर्ण करणे एवढाच दिनक्रम ठेवला . चांगल्या किंवा आनंददायी गोष्टींच्या लाटा मनापासून अनुभवल्या . व्यावहारिक मोजमापाच्या पट्यांच्या जवळ जायचा मोह टाळला . स्वतःला स्वतःचा कंटाळा येईल असा वागलो नाही .आत्मानंद म्हणजे काय याचा शांतपणे अनूभव घेता आला .....
 कोणत्याही संकल्पनेच्या दोन ओळींमधील दडलेला अर्थ सहजपणे  वाचायला यायला लागला की मिळणारी आनंदाची अनुभूती अनुभवली .खूप वर्षे आनंदाने काम केल्यामुळे छान अशा समाधानाच्या अनेक पायवाटा तयार झाल्या. या नंतर मात्र आनंदयात्री बनण्यासाठीचा महामार्ग स्वच्छ आणि स्पष्टपणे दिसायला लागला .एकदा या रस्त्यावरचा प्रवास सुरू झाला म्हणजे त्या नंतर मात्र तुम्हाला कोणाही कडून काहिही नको असते.
फक्त आनंदाचे डोही आनंद तरंग अनुभवायचे आपल्या छोट्याशा समृद्ध घरट्यात शांतपणे...

*विनायक जोशी(vp)*
📱9423005702
मंगलधाम ,हिंगणे खुर्द ,लेन नं ४ , पुणे ५१
*electronchikatha.blogspot.com*

संजू सरवटे व्हाईस प्रेसिडेंट ......Multitasking

// श्री स्वामी समर्थ //
     *Multitasking*
        *संजय सरवटे*
       
               *विनायक जोशी(vp)*
 💬9423005702
 📱9834660237

 साधारणपणे तीस वर्षांपूर्वी या मुलाची आणि माझी ओळख विदर्भातील  "आवारपूर" या ठिकाणी लार्सन आणि टुब्रो च्या सिमेंट प्लान्ट मध्ये झाली. बिलासपूर हून आलेला , MSC झालेला , डाॕक्टरेट करण्यासाठी लागणारी तयारी करणारा , उत्कृष्ट चित्रे काढणारा , चारशे ते पाचशे गाण्यांच्या मधील संगीताच्या पीसेसचे सखोल ज्ञान असलेला , शालेय जीवनात आॕडीयो अॕंम्प्लिफायरची पूर्ण कपॕसिटी तपासण्याच्या नादात खिडकीच्या काचांना रामराम करायला लावणारा , कंपनीच्या क्वार्टर मध्ये घरगुती साहित्याचा जास्तीतजास्त वापर करुन TV बनवणारा असा हा चुणचुणीत मुलगा होता. डॕनीश , जर्मन , जॕपनीज वगैरे परदेशी तयार झालेले असंख्य कंट्रोलर्स अहोरात्र चालू स्थितीत ठेवण्याचे महत्त्वाचे काम यांच्या विभागाला करावे लागत असे.प्रोसेस कंट्रोल प्लान्ट मध्ये एक मिनीट जरी प्रोसेस बंद पडली तर लाखो रुपयाचे नुकसान होते याची वस्तुनिष्ठ जाणीव असलेल्या टीमचा तो एक भाग होता. याला एक असे वरदान मिळालेले आहे कि हा मुलगा एकाच वेळेला तीन किंवा चार गोष्टींचा खोलवर विचार करुन प्राॕब्लेम सोडवत असे , अगदी Quad Core Processor सारखे एकाचवेळी पण स्वतंत्रपणे . आवारपूरच्या अत्यंत खडतर अशा हवामानात प्रोसेस प्लाॕन्ट मध्ये काम केलेले हे सर्व डेयर डेव्हिल्स आज वेगवेगळ्या ग्रुपचे AVP, Unit Head वगैरे जबाबदाऱ्या उत्तम प्रमाणे निभावत आहेत . अत्यंत आनंदी बायको निशा आणि सोन्या सारखी दोन मुले ही त्याची मोठ्ठी जमेची बाजू आहे. १९९७ च्या मे महिन्यात तो सोलापूर मध्ये आमच्या घरी आला होता. अर्थातच दोन जिवलग मित्र एकत्र आल्यामुळे सर्वांनी गाणे म्हणण्याची फर्माइश केली. थोड्याच वेळात संजू आणि अल्ट्राटेकचे Unit Head नारायण जोशी या दोघांनी मिळून " हृदयनाथ मंगेशकरांनी संगीत दिलेल्या " जैत रे जैत " मधले "आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखरं..." गाणे म्हणायला सुरवात केली आणि पूर्ण घर चैतन्याने भारुन गेले......   अर्थातच लता मंगेशकर, स्मिता पाटील ,जब्बार पटेल यांच्या सुरेख अशा सिनेमाची आणि या सिनेमातील गाणी आम्हाला म्हणून दाखवणाऱ्या *Reliance Cement चे Vice Precident  संजू सरवटे* या अनेकाग्रतेचा आशिर्वाद लाभलेल्या अवलियाची ही छोटीशी आठवण  !

*विनायक जोशी ( vp )*
  💬9423005702
  📱9834660237
मंगलधाम , हिंगणेखुर्द , लेन नंबर ४ , पुणे ५१
*electronchikatha.blogspot.com*

अमेय आणि दिप्तीच्या अद्वयची मुंज

// श्री स्वामी समर्थ //
  *अमेय आणि दिप्तीच्या*
     *अद्वयची मुंज*

  विनायक जोशी (vP)
   💬9423005702
   📱9834660237
  २८ जानेवारी २०२०

 सांगलीच्या विश्रामबागेत राहणारा , सिटी हायस्कूल या अतिशय उत्तम शाळेत शिक्षण घेतलेला , बारावीला बोर्डात आलेला , पुण्याच्या PICT मधून Computer engineering सहजपणे पूर्ण करणारा , संगीताची खोल जाण असणारा , उत्तम प्रकारे सिंथेसायझर वाजवणारा , मार्व्हल या कंपनीत संशोधन आणि विकास खात्यात काम केलेला , एसप्रेसिफ या कंपनीत लहान वयातच डायरेक्टर पदावर विराजमान झालेला , पुण्यातील दिप्ती सारखी सुरेख जोडीदारीण लाभलेला , स्वामी समर्थांच्या वरती मनःपूर्वक श्रध्दा असलेला , कायम उत्साहाने आणि आनंदाने प्रत्येक गोष्ट करणारा , फार मोठ्ठा मित्र परीवार असलेला म्हणजे *अमेय इनामदार* . बाणेर येथील व्हिस्परींग विंड येथे अत्यंत आनंदाने आणि समाधानाने राहणाऱ्या  अमेय आणि दिप्ती या  दांम्पत्याला २ जानेवारी २०१२ या दिवशी एक छानसा गोड मुलगा झाला तो म्हणजे *अद्वय किंवा आपला अदू*.

उद्या २९ जानेवारीला मुनोत हाॕल मध्ये अदूची मुंज आहे . या मुंजी मध्ये सहभागी होण्यासाठी मंदार आणि रेणूका यांच्या सारखे अनेक स्नेहीजन विदेशातून येऊन पुण्यात डेरेदाखल झाले आहेत .
इरा , स्वरा , आर्यही , मैत्रेयी , मृण्मयी .....वगैरे असंख्य बालमित्रांमुळे अदूच्या घराला गोकूळाची अवस्था प्राप्त झाली आहे .
एस्प्रेसिफचा ESP32 आणि अॕलेक्सा यांच्या मदतीने DSP या विषयातील तज्ञ मंदार सोवनी हे स्वतःच्या घरात बसून मुंजीची अनेक कामे पार पाडत आहेत . चैतन्य मुर्ती पुष्कराज पाटील ("  ") हे चहाची अनेक आवर्तने करत उद्याचे नियोजन करत आहेत. अमेय , दिप्ती यांच्या बरोबरच सर्व मित्रमंडळी व इनामदार आणि धडफळे परिवार उद्या होणाऱ्या या कमालीच्या आनंददायी सोहळ्यासाठी म्हणजेच *अद्वयच्या* मुंजीसाठी तयार आहेत .....

*विनायक जोशी (vP)*
   💬9423005702
   📱9834660237
 १२५७ , मंगलधाम , फ्लॕट नंबर बी ३, विठ्ठलवाडी हिंगणेखुर्द , पुणे ५१
*electronchikatha.blogspot.com*

अद्वयची सुंदर मुंज......विनायक जोशी

// श्री स्वामी समर्थ //

   *अद्वयची मुंज*

*प्रिय*
*अमेय आणि दिप्ती* ,

 विनायक जोशी (vP)

 मुनोत हाॕलच्या आत प्रवेश केल्या बरोबर स्वागताला आलेला अमेय , याच ठिकाणी असलेले तुळशी वृंदावन आणि सुरेख रांगोळी , फेट्यांची व्यवस्था बघणारे कार्यकर्ते , स्टेज वरती उभा असलेला अनुरुप सेट , मुंजीच्या प्रत्येक प्रसंगांचा  समावेश असलेले रुखवत , आपली पगडी भिरकावून बाल सवंगड्यां बरोबर बागडणारा बटू म्हणजेच अदू , बरोबर मुहूर्तावर लागलेली मुंज , शांतपणे झालेला भेटीगाठींचा कार्यक्रम , अतिशय उत्तम अशी जेवणाची व्यवस्था , सर्व हाॕलमध्ये चाललेली घरच्यांची लगबग , गेली २१ वर्षे मैत्री अबाधीत जपलेली PICT ची गँग आणि त्यांच्या अत्यंत आनंदाने व उत्साहाने कार्यरत असलेल्या बायका , अशाप्रकारे  सर्वांच्या  सहभागामुळे अद्वयच्या मुंजीचा कार्यक्रम कमालीचा सुंदर झाला . भेटीगाठी झाल्या नंतर शांतपणे शास्त्रोक्त विधी उत्तम पार पडले . अगदी निरोपाच्या वेळी दिप्तीने अद्वयच्या मुंजीची कायम स्वरुपी आठवण म्हणून दिलेले चांदीचे नाणे . ज्या वरती सुबक अशी बटूची प्रतिमा आहे आणि तारखेनीशी मुंजीची नोंद ...आपल्या आयुष्यात काही मोजके कार्यक्रम असे असतात कि त्या वेळी ते फक्त शांतपणे बसून अनुभवायचे असतात .आजचा कार्यक्रम त्या पैकी एक होता कमालीचे समाधान देणारा.....
👏👏👏👍👍👍

*विनायक आणि कल्याणी मामी*
💬9423005702
 📱9834660237

*electronchikatha.blogspot.com*

मंगळवार, १७ मार्च, २०२०

इब्राहिम .....रघूनाथ फाटक

*रघूनाथ फाटक*
इब्राहिम :

सिएरा लिओन च्या वास्तव्यात माझ्या गाडीसाठी मी ड्रायव्हर पाहत होतो. रोज एक दोन जण ऑफिसवर यायचे पण माझ्या इम्पोर्टर ला विश्वासु माणुस हवा होता. एका संध्याकाळी मला आमच्या इम्पोर्टर "उमरने" त्याच्या केबिन मध्ये बोलवले आणि कोपऱ्यात उभा असलेल्या इब्राहिम कडे बोट करून सांगितले हा तुझा ड्राइव्हर..

मी आफ्रिकन लोकांना जवळजवळ दहा वर्षे पाहतोय. मला श्रीलंकन आणि तामिळ ह्यातील पण फरक जसा बघितल्यावर पटकन कळतो, तसाच टानंझानिन, केनियन, मोरक्कन, लिबिअन,घानन, क्रिओ किंवा नायजेरियन प्रत्येकाचे एक वेगळा धागा असतो तो समजला की त्याचा देश ओळखता येतो. पण मी जेव्हा पहिल्यांदा इब्राहिमला पाहिले त्यावेळी तो मला रोखून पाहत होता. त्याच्या डोळ्यातील "श्वापदभाव" मला धोक्याची सुचना देत होते...!

मी पहिल्यांदा आफ्रिकन माणसाला बघून टरकलो होतो. सहा सहा फुटी आणि प्रचंड आफ्रिकन सुद्धा मला कधी त्रास दायक कधीच वाटले नाहीत पण इब्राहिम प्रकरण निराळे होते...! सय्यद बडा पण असाच दिसत असेल असं पण वाटलं...!

"हॅलो मिस्टर रघु"  खोल विहिरीत डबा पडल्यावर येणाऱ्या इको सारखा त्याचा आवाज मला आणखीन अस्वस्थ् करत होता. आम्ही शेखहॅन्ड केला.

 मला पाहून "ह्याची खिमा रोटी काय मस्त लागेल" असा सुद्धा विचार इब्राहिम ला  नक्की आला असेल...!

इब्राहिम हा मेंडे कबिल्याचा होता. आफ्रिकेत लोक त्यांच्या त्यांच्या कबिल्यावरून ओळखले जातात.क्रीओ लोक शिक्षणासाठी, फुला लोक व्यापारासाठी, टेमने, मेंडे लोकांची नोकरीसाठी ख्याती होती...!

पगार ठरला, वेळ ठरली आणि साहेब रोज गादीवर कामावर यायला लागले...!

सकाळी सकाळी आमच्या बंगल्याच्या बाहेर एका दगडावर हा ऊन खायला बसायचा...!

अंगमेहनतीने शरीराला प्रचंड पिळ आलेला. एका दमात बोकड मारून खाण्याची आणि पचवायची ताकत होती...!

ह्याला फक्त प्रेमाने जिंकता येईल आणि तेवढा एकच मार्ग शिल्लक होता..! रोज सकाळी त्याला न्ह्यायरी ला पैसे दिले की स्वारी खुष...! भारतातून परत येताना त्याच्यासाठी खुप टीशर्ट आणले, त्याच्या बायकोसाठी एक कुर्ता दिला. त्याला दिलेला मेहंदी कलरचा टी शर्ट त्याला खूपच आवडला.

मला तो "यु इंडियन बॉसी" म्हणायचा...!

पैसे साठवून टॅक्सी घ्यायची त्याची इच्छा होती.
उपेक्षा आणि अपयश हा, ह्या मातीला जडलेला विकार आहे. त्या सतत नशिबी आल्या की एक कोडगेपणा निर्माण होतो जो आफ्रिकन लोकांच्या वागण्या बोलण्यातून दिसतो...!
जिथे आपण काम करतो तिथे चोरी करणे हा त्यांचा स्वभाव. त्यामुळे मग खायच्या वस्तु, कपडे,  डिझेल, मोबाईल, पैसे काहीही चोरायचे..!

एका दिवाळीत त्याला भारतीय मिठाई आणि इतर पदार्थ न देता, मक्याचे एक पोते आणि भरड तांदळाचे एक पोते भेट म्हणून दिले सोबत भरपुर कपडे दिले...!

अनपेक्षित मिळालेल्या प्रेमाने इब्राहिम एकदम बदलला. हा बदल थोड्याच दिवसांसाठी होता. पण तो बदलला...!

एक दिवस त्याला म्हणालो काय करणार पुढे...?

नजर हरवली त्याची ह्या प्रश्नावर. गॉड नोज...!

ज्याच्या पाठीशी काहीतरी आहे त्याला पुढे काय हा प्रश्न पडतो..! उद्याच्या जेवणाला काय असेल हे ज्याला माहीत नाही त्याच्यासाठी हा फारच अवघड प्रश्न होता...!

पुढं त्याने माझे काम सोडले. अडीअडचणीच्या वेळी तो पैसे मागायला यायचा..! मी पण त्याला मदत करायचो...! मी आफ्रिकेतून येताना तो मला बोटीवर सोडायला आला.. बॉसी "आय विल मिस यु" म्हणून घळाघळा रडला...!

बोटीने नांगर उचलला मी किनारा सोडून विमानतळाकडे निघालो आणि हात हलवणारा इब्राहिम दिसेनासा होईस्तो पर्यंत मी त्याच्याकडे पाहत राहलो...!

चैतन्यमुर्ती उमेश चौधरी

// श्री स्वामी समर्थ //

       *चैतन्यमुर्ती*
    *उमेश चौधरी*
     सुरज सुपर शाॕपी

*विनायक जोशी (vP)*
📱9423005702

हिंगण्यातील गल्ली नंबर ३ मध्ये नित्यानंद हाॕलच्या बरोबर समोर *सुरज सुपर शाॕपी* हे साधे , सुटसुटीत , सुंदर असे चौधरी बंधूंचे किराणा मालाचे दूकान आहे . या दुकानातील कमालीचे शांत , मितभाषी , आनंदी , कष्टाळू ,नेमस्त , नम्र , व्यवहारी, अशा अनेक गुणांनी संपन्न असलेले सदगृहस्थ म्हणजे *उमेश चौधरी*

स्वतःचे दुकान चालू करायच्या आधीपासून आम्ही त्याला ओळखतो . इतक्या वर्षात त्याच्या मुळ आनंदी स्वभावात आणि विनम्रपणात काडीचाही बदल झालेला नाही .

देवपूजेसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या रंगाची आणि जिवंतपणाचा स्पर्श लाभलेली अशा फुलांपासून ते गोड सफरचंदां पर्यंत किंवा देशी केळ्यां पर्यंत अथवा लोकवन सोना पासून ते बासमती तुकडा , कोलम वगैरे असंख्य गोष्टी आटोपशीर जागेत आणि दर्शनी भागात सहजपणे उपलब्ध आहेत असे दुकान म्हणजे उमेश यांचे सुरज शाॕपी.

रात्री जेवण झाल्यावर आम्ही दोघेही सहस्रपावली साठी बाहेर पडतो . त्या वेळी कोणत्याही प्रकारचा कंटाळा न करता आपले कर्तव्यकर्म करत असलेल्या आनंदी उमेशचे दर्शन झाले तर आपणही असेच उत्साहाने न कंटाळता काम करायला पाहिजे ही प्रेरणा मिळते....

*विनायक जोशी (vP)*
📱9423005702
मंगलधाम , लेन नं ४ , हिंगणेखुर्द , पुणे ५१
*electronchikatha.blogspot.com*

आभाळमाया ...सरस्वती दातार - आज्जी

// श्री स्वामी समर्थ //
      *आभाळमाया*

     *सरस्वती दातार*

  *विनायक जोशी (vp)*
💬9423005702
📱9834660237

सुप्रसिद्ध  संगीतकार अशोक पत्की यांचा कार्यक्रम आणि देवकी पंडीत यांचा जबरदस्त आवाज. झी टीव्ही वरती गाजलेल्या अनेक मालिकांची शीर्षक गीते सादर होत होती. याच कार्यक्रमात
*जडतो तो जीव*
*लागते ती आस*
*बुडतो तो सूर्य*
*उरे तो आभास*
 हे आभाळमायाचे शीर्षक ऐकून कमालीच्या प्रेमळ अशा व्यक्तीची हूरहूर लावणारी आठवण जागृत झाली .
सहवासाने वृध्दिंगत होते ते प्रेम .
फक्त दर्शन झाले तरी आनंद होतो ते प्रेम. काहिही न बोलता सर्व काही समजते ते म्हणजे प्रेम .चैतन्याचा साक्षात्कार होतो ते प्रेम.
मोठ्ठा चष्मा घालणारी , हातात नावापुरती जपमाळ  धरणारी ,जेवणाच्या मध्ये  मिरचीचा खरडा खाणारी ,कायम कामात असणारी , प्रत्येक वेळेला पगार किती ते विचारणारी आणि चांगला आहे  हे कळल्यावर कमालीची आनंदी होणारी,असंख्य मऊ सुरकुत्या हातावर असलेली,एकही शब्द न बोलता सर्व गोष्टी समजून घेणारी , पुण्यातील लक्ष्मी रोड वरील कुंटे चौकातील दातार वाड्यात माहेर असलेली , लोकमान्य टिळकांना जवळून पाहिलेली ,  १९०३ मध्ये जन्माला आलेल्या आणि आभाळमाये सारखे प्रेम करणाऱ्या  *सरस्वती गणेश जोशी* नावाच्या एका अत्यंत प्रेमळ स्त्री वरती माझे प्रचंड प्रेम होते कारण ती माझी *आज्जी* होती.


*विनायक जोशी (vp)*
  💬9423005702
  📱9834660237
मंगलधाम , हिंगणेखुर्द ,
पुणे ५१
*electronchikatha.blogspot.com*

तळजाईचे वारकरी विनायक जोशी

// श्री स्वामी समर्थ //
  *तळजाईचे वारकरी*
 
   🦚  *विनायक जोशी (vp)*🐇
💬9423005702
 📱9834660237

प्रत्येक वारकऱ्याला जसे विठू माऊलींच्या दर्शनाची आस असते तशी आम्हाला दोघांनाही या तळजाई मातेच्या अधिष्ठान लाभलेल्या डोंगराची ओढ आहे. आम्ही बरीच वर्षे येथे जात असलो तरी या डोंगराच्या बाबतीतले अधिकारी नाही आहोत.घरापासून सकाळच्या वेळी निघालो की साधारणपणे दहा मिनीटात बेबी कॕनाॕल आणि मेन कॕनाॕल यांच्या मधून असंख्य पक्षांचे आवाज ऐकत प्रवासाला सुरूवात .घरापासून बरोबर १६००पावलांचे अंतर पार केले की आनंद विहार काॕलनीतून प्रवेश . एक दिर्घ श्वास घेऊन डोंगर चढायला सुरूवात .थोड्या वेळाने छातीतून येणारे लोहाराच्या भात्यासारखे श्वासांचे पडसाद ऐकत मार्ग क्रमण करत रहायचे. या ठिकाणी अत्यंत सुंदर असे दोन डोम आहेत.या मातीच्या रस्त्याच्या कडेने असंख्य फुलांची झाडे आहेत.निवडूंग आहेत.बांबूची मोठी झाडे आहेत.कोरफड आहे. सध्या उन्हाळ्यामुळे या सुंदर जंगलातील असंख्य झाडे निष्पर्ण अवस्थेत ऊभी आहेत . एकावेळी एकच माणूस जाईल अशा असंख्य चिंचोळ्या पायवाटा आहेत .बऱ्याच ठिकाणी थोडी सपाटी आणि चढण असा जंगलातील लपाछपीचा खेळ आहे. डोंगराच्या वरती तळजाई भ्रमण मंडळ वगैरे नियमित  मंडळींचा राबता आहे. प्रत्येक अर्ध्या किलोमीटर  वरती सिमेंटच्या पाण्याच्या टाक्या आहेत.त्या मधील पाणी घेऊन निसर्गनीष्ठ अशी असंख्य मंडळी निरपेक्ष भावनेने  तेथील अनेक झाडांना पाणी घालत असतात.तळजाई देवळाच्या अलिकडे छोटासा पाणवठा आहे त्या ठिकाणी बदकांचा मुक्तविहार चालू असतो. या ठिकाणी एक हत्तीचे पिल्लू आनंदात उभे आहे .जंगलात काही ठिकाणी पशुपक्षांना पाणी मिळावे अशी पक्षीतीर्थ आहेत . थोडा शांत वेळ असेल तर विसाव्याच्या ठराविक  दगडांवर शांतपणे बसायचे. बरोबर दृष्टी समोरे सिंहगडाचे दोन टाॕवर दिसतात.समोर वाहत्या नदीसारखा दिसणारा कॕनाॕल.त्या वरुन जाणारे छोटे छोटे पूल आहेत.मोरांचे आवाज ऐकायचे किंवा ठराविक ठिकाणी रस्ता ओलांडणाऱ्या मोरांच्या जोड्यांची चाहूल घ्यायची .मुंगसांची निर्भय पणे चाललेली धावपळ बघत अथवा वाट चुकलेल्या सशाची धावपळ बघत घराच्याकडे परतायचे. साधारणपणे ७ किलोमीटरची आनंददायी प्रदक्षिणा आपल्याला दिवसभर उत्साहात ठेवते. तळजाईचे वारकरी होण्यासाठीचे काही अघोषीत प्रोटोकाॕल आम्ही पाळले आहेत.
पायात उत्तम दर्जाचे बूट घालायचे.आपल्या बरोबर छोटीशी पाण्याची बाटली ठेवायची .
घरगूती ,कामाच्या , राजकारणाच्या वगैरे गप्पा मारायच्या नाहीत. मोबाईल जवळ बाळगायचा नाही . जंगलातील दररोज बदलणारे जग पहायचे. दाट झाडीतील वेगवेगळे नैसर्गिक आवाज टिपायचे. साधारणपणे सत्तरी पार केलेल्या तरुणांचा उत्साह आणि सातत्य बघत ही टेकडी चढायची .शून्य प्रदूषण असलेल्या या मार्गावरती कोलेस्ट्रोल ,बीपी ,डाएट वगैरे गोष्टींची अजिबात चर्चा न करता फक्त आनंदाने आणि आनंदाची अशी तळजाई यात्रा करत रहायचे.!
🚶🏻🚶🏻‍♀
🦚🐇🦆🦅🐍

*विनायक आणि कल्याणी जोशी (vp)*
 💬9423005702
 📱9834660237
मंगलधाम , हिंगणे खुर्द ,
लेन नंबर ४, पुणे ५१
*electronchikatha.blogspot.com*

Work From Home पुष्कराज पाटील IBM

// श्री स्वामी समर्थ //
 *Work From Home*
       *पुष्कराज पाटील*

 विनायक जोशी (vP)
💬9423005702
📱9834660237

सध्या खूप जणांना वर्क फ्राॕम होम या प्रकारात मोडणारे काम करावे लागत आहे ...सिंहगड काॕलेजचे पदवीधर , मालेगावचे मुळ रहिवासी असलेले पुष्कराज पाटील हे नोकरीच्या पहिल्या दिवसा पासून वर्क फ्राॕम होम या पध्दतीने काम करत आहेत . IBM मध्ये काम करणारे आनंदी , भारदस्त असे व्यक्तीमत्व असलेले पुष्कराज पाटील यांच्या कडून वर्क फ्राॕम होम आनंदाने कसे करावे या विषयावर अत्यंत मनमोकळेपणाने मार्गदर्शन मिळू शकते आणि  सर्वांनी त्याचा जरुर लाभ घ्यावा .....
पुष्कराज पाटील यांचा वर्क फ्राॕम होम या क्षेत्रात दांडगा अभ्यास असला तरीही त्यांच्या यशस्वी कारकीर्दीत समजूतदार स्वराचा आणि कष्टाळू शिवांगीचा सिंहाचा वाटा आहे हे विसरुन चालणार नाही

*विनायक जोशी (vP)*
💬9423005702

कोरोना १७ मार्च २०२० पुणे

//श्री स्वामी समर्थ //
  *१७ मार्च पुणे*

*विनायक जोशी (vP)*
💬9423005702
📱9834660237

सध्या पुण्यात सकाळी गारवा आणि दिवसभर आभाळ , ऊन असे हवामान आहे . शाळांना सुट्टी असल्यामुळे संपूर्ण शहरातले चैतन्य कमी झाले आहे .
आज मंगळवार पुण्यातील व्यापाऱ्यांनी स्वयं प्रेरणेने तीन दिवस दूकाने बंद ठेवायचा निर्णय घेतला आहे . या मध्ये किराणामालाची किंवा मेडिकल दूकाने समाविष्ट नाहीत.
पुण्यात कोणत्याही प्रकारची घाबरण्या सारखी स्थिती नाही आहे . करोना हा संसर्गजन्य विषाणू  आहे आणि तो वेगाने पसरु नये म्हणून सर्वजण आपापल्या कुवतीनुसार काळजी घेत आहेत . या विषया बद्दल सरकारी सुचनांचे पालन सर्वजण उत्तम रीतीने करत आहे . करोना या विषयावर अत्यंत विपर्यस्त वार्तांकन करणाऱ्या सर्व प्रकारच्या  मिडियाकडे दूर्लक्ष करण्याची सवय आम्ही करुन घेत आहोत.
हा नवीन प्रकारचा विषाणू  आहे आणि लोकसंख्येच्या मानाने उपलब्ध  असणारी सामुग्री यांचा विचार करता सर्वांनी सार्वजनिक ठिकाणी  जाणे टाळावे .
टीव्ही आणि सोशल मिडिया यांच्या वरती वाढवून सांगितल्या जाणाऱ्या बातम्यां कडे समर्थांच्या तटस्थ वृत्तीने बघावे ....( शक्य झाल्यास बातम्या आणि तज्ञ मंडळींच्या चर्चा यांना रामराम करावा )

हजारो मैल दूर असलेला हा संसर्गजन्य विषाणू  आपल्या जवळ आलेला आहे आता
*काळजी करायची नाही तर काळजी घ्यायची आहे सार्वजनिक स्वच्छतेची*

*विनायक जोशी (vP)*
💬9423005702
📱9834660237
 मंगलधाम , हिंगणे खुर्द ,
विठ्ठलवाडी , पुणे ५१
*electronchikatha.blogspot.com*

शुक्रवार, ६ मार्च, २०२०

नायक्रोमचे द्रष्टा पितामह ..श्रीनिवास जोशी सर

// श्री स्वामी समर्थ //
    *नायक्रोमचे*
   *द्रष्टा पितामह*
   
     *श्री . श्रीनिवास जोशी सर*
 

   विनायक जोशी *(vP)*
  💬9423005702
  📱9834660237
 
साधारणपणे १९८४ आॕक्टोंबर या महिन्यात मी पी.जे.इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीत कामाला लागलो आणि नायक्रोम नावाच्या सर्वांग सुंदर विद्यापीठात मला प्रवेश मिळाला .

मेक इन इंडिया या तत्वाला अनुसरून काम करायचे हे कंपनीचे मुलतत्व . अतिशय ध्येयनिष्ठ , नाविन्याची आवड असलेली , काळाच्या पुढे जाऊन विचार करणारी , ग्राहकांना संतुष्ट ठेवण्यासाठी धडपड करणारी कंपनी म्हणजे नायक्रोम .

 *FFS* किंवा फाॕर्म , फिल , सील या तीन गोष्टींचा योग्य समन्वय साधून वेगवान पध्दतीने पाऊचेस तयार करण्यासाठी उपयुक्त अशी मशिन्स तयार करणारी कंपनी म्हणजे नायक्रोम .

*FFS* म्हणजे कायम उच्च गुणवत्तेचा *फाॕर्म*' राखणारी किंवा आपण उत्कृष्ठ दर्जाच्या  मशिन्स उत्पादका कडून मशिन घेतले आहे याचे गिऱ्हाईकाला *फिल* देणारी आणि त्यामुळेच संतुष्ट गिऱ्हाईक असे शिक्कामोर्तब किंवा *सील* प्राप्त झालेली कंपनी म्हणजे नायक्रोम .

 अशा या कंपनीचे सर्वेसर्वा म्हणजे श्रीनिवास जोशी सर . *द्रष्टा*' म्हणजेच काळाच्या पुढचे पाहू शकणारा आणि आपल्या टीमला वेगवान प्रगतीच्या दिशेने जाण्यासाठी प्रवृत्त करणारा आणि *पितामह* म्हणजे सहस्त्रचंद्र दर्शनाचा टप्पा सहजपणे पार केलेला कर्मयोगी किंवा असंख्य प्रकारचे व्यावसायिक उन्हाळे पावसाळे न डगमगता झेलल्यामुळे , परिपक्व समृध्द अनुभव गाठीशी असलेले व्यक्तिमत्व .

Inner Engineering या विषयावरचे जग्गी वासूदेव यांचे पहिल्यांदा व्याख्यान ऐकले त्यावेळी नायक्रोम या कंपनीत असंख्य वेळेला अनुभुती अनुभवलेल्या अनेक प्रसंगांची आठवण आली . फिलींगच्या सोलोनाईडसचा आवाज ऐकून मशिनची आनंदी अवस्था जाणणे किंवा क्लच ब्रेक या दोघांच्या मध्ये समन्वय साधणाऱ्या आर्मिचर प्लेटचा आवाज ऐकून टाळ चिपळ्यांची आठवण येणे वगैरे अनेक आनंददायी गोष्टी येथे शिकता आल्या.

१९८० च्या दशकात नायक्रोम नावाच्या कुटुंबात कार्यरत असणारे माझ्या सारखे अनेकजण आज आत्मिक समाधानाच्या वाटेवर आनंदयात्री म्हणून प्रवास करत आहेत .

 साधारणपणे ४५ देशात ७००० पेक्षा जास्त मशिन्स कार्यरत असलेली कंपनी म्हणजे नायक्रोम आणि अॕटोमॕटीक फाॕर्म फिल सील मशीन्सच्या क्षेत्रात उच्च गुणवत्तेचा मानदंड रोवणारे *नायक्रोमचे पितामह म्हणजेच श्री. श्रीनिवास  जोशी सर यांना ७ मार्च या जन्मदिना निमित्त मनःपूर्वक नमस्कार आणि उत्तम आयुरारोग्य लाभो ह्या शुभेच्छा*

🙏🙏🙏

( नायक्रोमचे जनरल मॕनेजर विश्वनाथ जोशी यांची अचानक भेट झाली आणि *पाऊच डे* ची माहिती कळाली . सुर्यास्ताच्या वेळी तळजाईच्या पठारावर एकटाकी सहजपणे आठवणी लिहिल्या गेल्या )

*विनायक जोशी (vP)*
  💬9423005702
   📱9834660237

  मंगलधाम , विठ्ठलवाडी ,
हिंगणेखुर्द , पुणे ५१
*electronchikatha.blogspot.com*