शुक्रवार, ६ मार्च, २०२०

नायक्रोमचे द्रष्टा पितामह ..श्रीनिवास जोशी सर

// श्री स्वामी समर्थ //
    *नायक्रोमचे*
   *द्रष्टा पितामह*
   
     *श्री . श्रीनिवास जोशी सर*
 

   विनायक जोशी *(vP)*
  💬9423005702
  📱9834660237
 
साधारणपणे १९८४ आॕक्टोंबर या महिन्यात मी पी.जे.इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीत कामाला लागलो आणि नायक्रोम नावाच्या सर्वांग सुंदर विद्यापीठात मला प्रवेश मिळाला .

मेक इन इंडिया या तत्वाला अनुसरून काम करायचे हे कंपनीचे मुलतत्व . अतिशय ध्येयनिष्ठ , नाविन्याची आवड असलेली , काळाच्या पुढे जाऊन विचार करणारी , ग्राहकांना संतुष्ट ठेवण्यासाठी धडपड करणारी कंपनी म्हणजे नायक्रोम .

 *FFS* किंवा फाॕर्म , फिल , सील या तीन गोष्टींचा योग्य समन्वय साधून वेगवान पध्दतीने पाऊचेस तयार करण्यासाठी उपयुक्त अशी मशिन्स तयार करणारी कंपनी म्हणजे नायक्रोम .

*FFS* म्हणजे कायम उच्च गुणवत्तेचा *फाॕर्म*' राखणारी किंवा आपण उत्कृष्ठ दर्जाच्या  मशिन्स उत्पादका कडून मशिन घेतले आहे याचे गिऱ्हाईकाला *फिल* देणारी आणि त्यामुळेच संतुष्ट गिऱ्हाईक असे शिक्कामोर्तब किंवा *सील* प्राप्त झालेली कंपनी म्हणजे नायक्रोम .

 अशा या कंपनीचे सर्वेसर्वा म्हणजे श्रीनिवास जोशी सर . *द्रष्टा*' म्हणजेच काळाच्या पुढचे पाहू शकणारा आणि आपल्या टीमला वेगवान प्रगतीच्या दिशेने जाण्यासाठी प्रवृत्त करणारा आणि *पितामह* म्हणजे सहस्त्रचंद्र दर्शनाचा टप्पा सहजपणे पार केलेला कर्मयोगी किंवा असंख्य प्रकारचे व्यावसायिक उन्हाळे पावसाळे न डगमगता झेलल्यामुळे , परिपक्व समृध्द अनुभव गाठीशी असलेले व्यक्तिमत्व .

Inner Engineering या विषयावरचे जग्गी वासूदेव यांचे पहिल्यांदा व्याख्यान ऐकले त्यावेळी नायक्रोम या कंपनीत असंख्य वेळेला अनुभुती अनुभवलेल्या अनेक प्रसंगांची आठवण आली . फिलींगच्या सोलोनाईडसचा आवाज ऐकून मशिनची आनंदी अवस्था जाणणे किंवा क्लच ब्रेक या दोघांच्या मध्ये समन्वय साधणाऱ्या आर्मिचर प्लेटचा आवाज ऐकून टाळ चिपळ्यांची आठवण येणे वगैरे अनेक आनंददायी गोष्टी येथे शिकता आल्या.

१९८० च्या दशकात नायक्रोम नावाच्या कुटुंबात कार्यरत असणारे माझ्या सारखे अनेकजण आज आत्मिक समाधानाच्या वाटेवर आनंदयात्री म्हणून प्रवास करत आहेत .

 साधारणपणे ४५ देशात ७००० पेक्षा जास्त मशिन्स कार्यरत असलेली कंपनी म्हणजे नायक्रोम आणि अॕटोमॕटीक फाॕर्म फिल सील मशीन्सच्या क्षेत्रात उच्च गुणवत्तेचा मानदंड रोवणारे *नायक्रोमचे पितामह म्हणजेच श्री. श्रीनिवास  जोशी सर यांना ७ मार्च या जन्मदिना निमित्त मनःपूर्वक नमस्कार आणि उत्तम आयुरारोग्य लाभो ह्या शुभेच्छा*

🙏🙏🙏

( नायक्रोमचे जनरल मॕनेजर विश्वनाथ जोशी यांची अचानक भेट झाली आणि *पाऊच डे* ची माहिती कळाली . सुर्यास्ताच्या वेळी तळजाईच्या पठारावर एकटाकी सहजपणे आठवणी लिहिल्या गेल्या )

*विनायक जोशी (vP)*
  💬9423005702
   📱9834660237

  मंगलधाम , विठ्ठलवाडी ,
हिंगणेखुर्द , पुणे ५१
*electronchikatha.blogspot.com*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा