शुक्रवार, २० मार्च, २०२०

परमप्रिय विद्यार्थी मित्र मैत्रीणींचा निरोप......सौ.कल्याणी जोशी

// श्री स्वामी समर्थ //

प्रिय विद्यार्थी मित्र - मैत्रीणींनो ,

    दिवाळीच्या अत्यंत आनंदी अशा सुट्टी नंतर आपण हळूहळू दुसऱ्या सत्राचा अभ्यास चालू केला आणि गेले साडेचार महिने अत्यंत कडक अशी मेहनत घेऊन उत्तम असा अभ्यास केला .
 परीक्षा नावाच्या उत्तम दर्जाच्या गोष्टीसाठी आपण सिध्द झालो . परीक्षा म्हणजे आपल्या आकलन शक्तीचे अवलोकन असते , त्याची आपण सर्वांनी मिळून छानशी तयारी केली होती. पण सध्याच्या प्राप्त परिस्थितीत परीक्षा रद्द झाल्यामुळे क्षणभर अपेक्षाभंग झाला .  आपण केलेली अभ्यासाची ही तयारी पुढील वर्षांसाठी मजबूत पाया म्हणून अत्यंत उपयुक्त ठरेल या बद्दल मला नक्कीच विश्वास वाटतो.
 या वर्षीची सुट्टी नेहमीच्या सुट्टीपेक्षा वेगळी आहे . ही सुट्टी तूम्ही घरातल्या घरात चांगल्या प्रकारची पुस्तके वाचून किंवा चांगले चित्रपट पाहून , चित्रकला , संगीत वगैरे गोष्टींची ओळख करुन घेण्यासाठी व्यतित करावी . नॕशनल जियोग्राफीक्स , डिस्कव्हरी किंवा स्पोर्टस चॕनल्स यांचा आनंदी मनाने आणि एकाग्रता पूर्वक आस्वाद घ्यावा . इंग्रजी चे छान वाचन , शब्दसंपदा वाढविणे किंवा संस्कृत सारख्या विषयांचे योग्य आघातांचा वापर करून मोठ्या आवाजात पुनर्वाचन करावे .

असो..... या वेळची सुट्टी  वेगळ्या पध्दतीने घरातच थांबून आणि आरोग्याची काळजी घेत साजरी करावी ....

*सौ.कल्याणी जोशी*
💬9028991058
📱9511612278
 १२५७ , मंगलधाम , विठ्ठलवाडी , हिंगणेखुर्द , लेन नंबर ४ , पुणे ५१
*electronchikatha.blogspot.com*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा