शुक्रवार, ४ मार्च, २०१६

" पारमार्थिक योग आणि गीता पठण "

// श्री स्वामी समर्थ  //
      " पारमार्थिक योग "
गेली ५३ वर्षे माझ्या आजूबाजूला वेगवेगळ्या आकाराचे अनेक  पारमार्थिक प्रवाह अखंड वाहत आहेत. विद्यार्थी - साधक - शिष्य - अनुयायी तसेच शिक्षक -गुरु -स्वामी - महाराज वगैरे किंवा पोथ्या- पुराणे - वेद - श्लोक - ग्रंथ - खंड वगैरे शब्द संपदा फक्त वाढली आहे. याच बरोबर साधनेचे वेगवेगळे प्रकार नामस्मरण , पारायणे किंवा योग - हठयोग या क्रिया वगैरे गोष्टींच्या बद्दल थोडेफार वाचन झाले आहे. योगायोगाने अशाच एका अनपेक्षित क्षणी "डाॕ.मृणाल मायदेव "नावाच्या मुलीने मला
' गीता पठण " या whatts app च्या ग्रुप मधे मॕनेजमेंट कोट्यातून प्रवेश दिला आहे. दररोज सकाळी "गीते" मधील एक श्लोक संस्कृत आणि मराठी मधून अत्यंत स्पष्ट आणि स्वच्छ अशा उच्चारात ऐकायला मिळतो .त्या बरोबरच इंग्रजी मधे त्या श्लोकाचा अर्थ लिखीत स्वरुपात असा त्रिवेणी संगम असतो.या महिन्यात विशेष म्हणजे विश्वरुप दर्शन हा अध्याय नुकताच संपला.सगळ्या विश्वाची माहीती क्षणार्धात आपल्याला देणाऱ्या Google कडे याचा बॕकअप ठेवण्याचे काम चालू आहे. या  उपक्रमा अंतर्गत पूर्णपणे तिन्ही भाषेंच्या माध्यमातून घडणारे हे "गीता दर्शन "पुढील पिढीला अत्यंत उपयुक्त ठरणार आहे . दासबोध अथवा सखोल दासबोधा पासून ते 'गीता दर्शन' पर्यंत च्या वेगवेगळ्या ध्येयनिष्ठ मंडळींचे दर्शन घडते हा सुध्दा अलौकिक  योगच आहे. शंकराचार्यांच्या मठात नारायणला भेटलेले ऋग्वेदा मधील अधिकारी असे "घनपाठी"  गुरुजी असोत किंवा फक्त सहा ओळीं मध्ये 'पुलंनी 'केलेले शंकराचार्यांचे वर्णन .आपण फक्त थक्क होऊन  पहात राहायचे किंवा शांतपणाने वाचायचे बस्स ..........!
विनायक जोशी (vp )
4 March 2016
electronchikatha.blogspot.com

" लान्सर " हिंदुस्थान मोटर्स !

// श्री स्वामी समर्थ //
       " लान्सर "
  Hindustan Motors
युवराज संजय यांनी " मारुती " मोटर्स बनवायच्या कारखान्याच्या   उदघाटनात  या मोटरची अवस्था  Ambassador  सारखी करु नका असा सज्जड दम दिल्यामुळे भारतात नविन तंत्रज्ञान वापरून  छोट्या कार तयार करणाऱ्या विदेशी कंपन्यांना मोकळे पणा मिळू शकला. या आधी Hindustan motors आणि फियाट ची मक्तेदारी होती. इंदोर जवळ पिधमपूर औद्योगिक वसाहतीत "लान्सर" गाडीचा ॲटोमॕटीक गियर बाँक्स टेस्ट करायच्या  मशीनसाठी गेलो होतो.अतिशय उत्तम दर्जा असलेला आणि जबरदस्त पाॕवर transmit करणारा परंतु महागडा असा  मेकँनिझम होता.भारतीय बनावटीची टेस्टींग मशीन्स वापरुन खुपशा पार्टच्या कडक आणि दीर्घकाळ चालणाऱ्या टेस्ट घेणे चालू होते. मारुती या गाडी मुळे ॲटोमोबाईल च्या कारखान्यांमधे नविन काहीतरी करायचे चैतन्य आले होते. लान्सर ही उत्तम सुविधा असलेली परंतु महागडी आणि कमी Average देणारी गाडी होती. या कंपनीमधे तयार होणाऱ्या 'लान्सर 'ला कमी मागणी असल्यामुळे  कमालीची अस्वस्थता तेथे जाणवत होती.
अर्थातच अस्वस्थता हेच प्रगतीचे पहिले पाऊल असल्यामुळे नविन संशोधन चालू झाले .भारतीय ग्राहकांना जागतिक दर्जाच्या गाड्या वापरायला मिळण्याचा दिशेने वाटचाल चालू झाली होती. Hindustan motors बनवत असलेल्या  Ambassador नावाच्या सरकारी पांढऱ्या हत्तीला सन्मानाने निरोप देण्यात आला आणि भविष्या कडे वाटचाल सूरु झाली.!
  विनायक जोशी ( vp)
   9 September 2015
electronchikatha.blogspot.com

गुरुवार, ३ मार्च, २०१६

" रागाची रागदारी "

// श्री स्वामी समर्थ //
     // रागाची रागदारी //
मला येणारे काही राग
१) कोणत्याही शारीरिक कष्टाचा
२) उगीचच हाॕर्न वाजवीत जाणाऱ्यांचा
३) हाॕर्न ऐकून सुध्दा न ऐकल्यासारखे दाखवून चालणाऱ्यांचा
४) स्वतःच्या घरातील कचरा कोठेही  टाकणाऱ्या मंडळींचा
५) ऐकच गोष्ट १० वेळा सांगूनही परत चुका करणाऱ्यांचा
६) संधी मिळेल तेथे उद्धटपणा करणाऱ्यांचा
७) बेशिस्त वाहन चालवणाऱ्यांचा 
८) वेळ न पाळणाऱ्या मंडळींचा
९) विनोद बुद्धी नसलेल्या लोकांचा १०) माणुस असून सुध्दा माणसांशी माणसासारखे न वागणाऱ्या माणसांचा
११) तोंडावर लाचारी करणाऱ्यांचा
.................ज्या वेळी या सर्व रागांच्या वरती न रागवायची कला मला प्राप्त होईल त्यावेळी मी मस्त अशा Air-conditioned मठामधील आदरणीय  "बाबा " झालेला असेन !!
विनायक जोशी (vp )
3 March 2016
electronchikatha.blogspot.com

Resettable Fuse

// श्री स्वामी समर्थ //
" Resettable Fuse"
पांढरे शुभ्र सिरॕमिकचे कपडे घालून बसलेले आणि जाड वायर मुळे ताठ कणा असलेले पणजोबा , वेगवेगळ्या प्रकारच्या धातुच्या पट्यांचा किटकँट असा आवाज करत बसलेले आजोबा , चकचकीत अशा काचेच्या घरात राहणारे  बाबा यांच्या कडून नविन काहीतरी शिकायला म्हणून हा बसलेला आढळला.याच्या बरोबर थोडीशी ओळख झाल्यावर त्याचे अंतरंग बघायला मिळाले. षटकोनी अशा पाॕलीमर वरती कार्बनच्या छोट्या डाँटचा एक ठिपका अशा असंख्य पाँलीमर युक्त  डाॕटची शिस्तबद्ध रांगोळी म्हणजे' रिसेटेबल फ्युज'. एकमेकांना खेटून गप्पा मारणारे कार्बन डाॕट येणाऱ्या जाणाऱ्यांना कमीतकमी विरोध होईल याची काळजी घेतात.मर्यादा ओलांडून जास्त करंट वाहू लागला तर मात्र हे षटकोनी पाॕलीमर रागाने गरम होऊन वाकड्या तिकड्या आकारात आकांड तांडव करत अनिच्छेने एकमेकांच्या पासून दूर जातात. या मुळे कार्बन डाॕट एकमेकांच्या पासून दूरावतात आणि त्या मुळे करंटचा प्रवाह अत्यंत कमी होतो .अशा प्रकारे थोडावेळ गेला कि रागाने लाल झालेले पाॕलीमर शांत थंड होतात आणि आपापल्या कार्बन डाॕटना मदतीला घेऊन परत सुबक रांगोळी काढतात.थोड्या वेळासाठी एकमेकांच्या पासून दूर गेलेले कार्बन डाॕट परत एकदा एकमेकांना बिलगून गुजगोष्टी चालू करतात .पहिल्या सारखाच  झुळुझुळु असा करंट वहात असलेला दिसायला लागतो. समोरच्याने मर्यादा ओलांडली तर रागाने गरम होऊन  तात्पुरते काम थांबवणारा आणि शांत झाल्यावर परत काम सुरु करणारा असा हा " Resettable Fuse "आहे!
विनायक जोशी (vp )
3 March 2016
electronchikatha.blogspot.com

बुधवार, २ मार्च, २०१६

Dancing Birds "pneumatic solenoids"

// श्री स्वामी समर्थ //
'Pneumatic Solenoids'
    " Dancing birds "
आपले दिलेले काम अतिशय चोखपणाने करणारे , अजिबात बढाया न मारणारे, पाच पेक्षा जास्त जण एकत्र आले तर समुहगान गाणारे, फार कमी वेळा आजारी पडणारे, सामान्य व्यक्तिमत्व असून
सुध्दा असामान्य काम करणारे, कोणत्याही परिस्थितीशी पटकन  जुळवून घेणारे असे हे Solenoids आहेत.
तुम्ही Automatic Machines वरती काम करत असाल तर तुमचा आत्मविश्वास आणि प्रतिष्ठा वाढवणारा असा हा कायमचा जोडीदार आहे. तुमच्याकडे ऐकायला येणारे 'कान ' असतील तर आणि मिलीसेकंदांची भाषा तुम्हाला येत असेल तर ५० फुट अंतरावर आणि अत्यंत गजबजाटात सुद्धा तुम्ही एकमेकांशी उत्तम संवाद करु शकता.
आज भारता मध्ये  दररोज लाखो लिटर दुध अत्यंत योग्य प्रमाणात भरण्याचे तो काम न थकता करत आहे.
Compressor आणि 'Air' या आपल्या आई वडिलांबरोबर आणि filter, regulator आणि lubricator या आपल्या मित्र मंडळींबरोबर आनंदात दीर्घकाळ आरोग्य संपन्न राहणारा  असा हा जिगरबाज कलाकार आहे.
तुम्हाला यांच्याशी बोलायचे असेल तर कोणत्याही दुध  डेअरी मधे गेलो असताना  आणि साधारणतः ५० फुट अंतरावरुन सुध्दा  पँकीग मशीन मधील आपला हा मित्र आपल्या सुरेल आणि सातत्यपूर्ण अशा आवाजात आपले स्वागत करताना आढळेल.
  स्वतःच्या मस्तीत जगणारा आणि व्यावसायिक जगात राहून सुध्दा
अव्यावसायिक पणाने राहणारा, अशा या आनंददायी मित्राला म्हणजेच
Pneumatic Solenoid ला त्रिवार सलाम !
             विनायक जोशी (vp)
                02 March 2016
electronchikatha.blogspot.com

मंगळवार, १ मार्च, २०१६

गोधडी

// श्री स्वामी समर्थ //
       " गोधडी "
  गोधडी म्हणजे मायेचे पांघरूण आहे. हिची कमाल म्हणजे हि थंडी मधे ऊब देते आणि ऊन्हाळ्यात गारवा.निराशे मधे आधार देते आणि आनंदात असताना कंट्रोल करते.ही पांघरली कि तुम्ही एकदम लहान मुलासारखे निर्धास्त झोपू शकता सर्व तिच्या वरती सोपवून . ही अनमोल आहे कारण या गोधडीचा जन्म आईने वापरलेल्या नऊवारी काँटन साड्यांमधून झाला आहे !
        शुभरात्री
विनायक जोशी
2 March 2016
electronchikatha.blogspot.com

बालपण देगा देवा !

// श्री स्वामी समर्थ //
      " बालपण देगा देवा "
लहानपणी थोडेफार वाचन केले त्याचे पूर्ण श्रेय मी सोलापूर मधील प्रखर उन्हाळ्याला देईन . जागृत अवस्थेत मित्रांच्या बरोबर अखंड खेळणे किंवा गप्पा यांना कमालीचे महत्त्व होते. उन्हाळ्यात मात्र दुपारच्या वेळी घराबाहेर पडायला बंदी  असे त्या वेळी हाताला लागेल ते पुस्तक वाचायचे. रणजित देसाईंच्या "स्वामी " पासून सुरवात झाली त्या नंतर 'श्रीमानयोगी' आणि 'मृत्यूंजय' वाचून झाले.शालेय जीवनात या पुस्तकांची पारायणे झाली होती. संभाजीं राजांना पकडून नेले तेंव्हा महाराजांची झालेली तगमग असो किंवा शूर असून सुद्धा संधी न मिळणारा 'कर्ण 'मनाच्या कोपऱ्यात कायम मुक्कामाला राहीला. वाचन करणारा माणूस एकटाच हसताना दिसला कि त्याच्या हातात अत्रे किंवा पुल आहेत याची खात्री असे.चिमणराव आणि गुंड्या भाऊ असेच भेटून गेले. गाँर्की ची "आई " मात्र कधीच स्मरणात राहिली नाही. याच काळात  श्री रामचरित मानस किंवा रामायण आणि  महाभारताने सुद्धा हजेरी लावली होती .दहावीच्या परीक्षेनंतर मात्र विवेकानंदांची चारशे पत्रे हे पुस्तक वाचून काढले.जिभकाटे यांचे प्राणायामा बद्दलचे विचार वाचले. आमचे लहानपण आनंदी जाण्यात असंख्य मित्र , घराच्या आवारात असलेली प्रचंड झाडे , टेलिफोन आणि टीव्ही यांची अनुपस्थिती , घरच्यांनी दिलेले स्वातंत्र्य , काँलनी मध्ये असलेली हिरवीगार मोठी खेळाची मैदाने आणि वाचनाची आवड यांचा फार मोठा वाटा आहे .!
विनायक जोशी (vp)
16 october 2015
electronchikatha.blogspot.com