// श्री स्वामी समर्थ //
" पारमार्थिक योग "
गेली ५३ वर्षे माझ्या आजूबाजूला वेगवेगळ्या आकाराचे अनेक पारमार्थिक प्रवाह अखंड वाहत आहेत. विद्यार्थी - साधक - शिष्य - अनुयायी तसेच शिक्षक -गुरु -स्वामी - महाराज वगैरे किंवा पोथ्या- पुराणे - वेद - श्लोक - ग्रंथ - खंड वगैरे शब्द संपदा फक्त वाढली आहे. याच बरोबर साधनेचे वेगवेगळे प्रकार नामस्मरण , पारायणे किंवा योग - हठयोग या क्रिया वगैरे गोष्टींच्या बद्दल थोडेफार वाचन झाले आहे. योगायोगाने अशाच एका अनपेक्षित क्षणी "डाॕ.मृणाल मायदेव "नावाच्या मुलीने मला
' गीता पठण " या whatts app च्या ग्रुप मधे मॕनेजमेंट कोट्यातून प्रवेश दिला आहे. दररोज सकाळी "गीते" मधील एक श्लोक संस्कृत आणि मराठी मधून अत्यंत स्पष्ट आणि स्वच्छ अशा उच्चारात ऐकायला मिळतो .त्या बरोबरच इंग्रजी मधे त्या श्लोकाचा अर्थ लिखीत स्वरुपात असा त्रिवेणी संगम असतो.या महिन्यात विशेष म्हणजे विश्वरुप दर्शन हा अध्याय नुकताच संपला.सगळ्या विश्वाची माहीती क्षणार्धात आपल्याला देणाऱ्या Google कडे याचा बॕकअप ठेवण्याचे काम चालू आहे. या उपक्रमा अंतर्गत पूर्णपणे तिन्ही भाषेंच्या माध्यमातून घडणारे हे "गीता दर्शन "पुढील पिढीला अत्यंत उपयुक्त ठरणार आहे . दासबोध अथवा सखोल दासबोधा पासून ते 'गीता दर्शन' पर्यंत च्या वेगवेगळ्या ध्येयनिष्ठ मंडळींचे दर्शन घडते हा सुध्दा अलौकिक योगच आहे. शंकराचार्यांच्या मठात नारायणला भेटलेले ऋग्वेदा मधील अधिकारी असे "घनपाठी" गुरुजी असोत किंवा फक्त सहा ओळीं मध्ये 'पुलंनी 'केलेले शंकराचार्यांचे वर्णन .आपण फक्त थक्क होऊन पहात राहायचे किंवा शांतपणाने वाचायचे बस्स ..........!
विनायक जोशी (vp )
4 March 2016
electronchikatha.blogspot.com
शुक्रवार, ४ मार्च, २०१६
" पारमार्थिक योग आणि गीता पठण "
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा