बुधवार, २ मार्च, २०१६

Dancing Birds "pneumatic solenoids"

// श्री स्वामी समर्थ //
'Pneumatic Solenoids'
    " Dancing birds "
आपले दिलेले काम अतिशय चोखपणाने करणारे , अजिबात बढाया न मारणारे, पाच पेक्षा जास्त जण एकत्र आले तर समुहगान गाणारे, फार कमी वेळा आजारी पडणारे, सामान्य व्यक्तिमत्व असून
सुध्दा असामान्य काम करणारे, कोणत्याही परिस्थितीशी पटकन  जुळवून घेणारे असे हे Solenoids आहेत.
तुम्ही Automatic Machines वरती काम करत असाल तर तुमचा आत्मविश्वास आणि प्रतिष्ठा वाढवणारा असा हा कायमचा जोडीदार आहे. तुमच्याकडे ऐकायला येणारे 'कान ' असतील तर आणि मिलीसेकंदांची भाषा तुम्हाला येत असेल तर ५० फुट अंतरावर आणि अत्यंत गजबजाटात सुद्धा तुम्ही एकमेकांशी उत्तम संवाद करु शकता.
आज भारता मध्ये  दररोज लाखो लिटर दुध अत्यंत योग्य प्रमाणात भरण्याचे तो काम न थकता करत आहे.
Compressor आणि 'Air' या आपल्या आई वडिलांबरोबर आणि filter, regulator आणि lubricator या आपल्या मित्र मंडळींबरोबर आनंदात दीर्घकाळ आरोग्य संपन्न राहणारा  असा हा जिगरबाज कलाकार आहे.
तुम्हाला यांच्याशी बोलायचे असेल तर कोणत्याही दुध  डेअरी मधे गेलो असताना  आणि साधारणतः ५० फुट अंतरावरुन सुध्दा  पँकीग मशीन मधील आपला हा मित्र आपल्या सुरेल आणि सातत्यपूर्ण अशा आवाजात आपले स्वागत करताना आढळेल.
  स्वतःच्या मस्तीत जगणारा आणि व्यावसायिक जगात राहून सुध्दा
अव्यावसायिक पणाने राहणारा, अशा या आनंददायी मित्राला म्हणजेच
Pneumatic Solenoid ला त्रिवार सलाम !
             विनायक जोशी (vp)
                02 March 2016
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा