// श्री स्वामी समर्थ //
" Soldering "
Soldering ही अतिशय सुंदर आणि अवघड कला आहे. याच्या मधे टिन आणि लीड आहे का ? याच्या मधून बाहेर निघणारा धूर घातक आहे का ? वगैरे प्रश्न
पडायच्या आधीच मी चांगले Soldering करायला शिकलो. १९८३ साली कंपनीमधे कामाला लागल्या नंतर पहिल्याच महीन्यात चारुहास आलेगावकर या मुलाने तयार केलेला one micro second ची अचूकता मोजणारा counter उघडून बघितला . पिसिबी आणि वायरींग soldering चा तो आदर्श नमुना होता.अत्यंत तेजस्वी असा Soldering चा तो अविष्कार होता. बरोबर २० वर्षांनी म्हणजे २००३ मधे त्या काउंटर मधील Soldering तसेच चैतन्य दायी होते. Soldering करताना डाव्या हातात आंगठा आणि पहिल्या बोटात Solder धरायचे आणि करंगळी आणि अनामिके मधे कंपोनंट धरायचा .उजव्या हाताने soldering करायचे.solder चा ठिपका मारणे आणि ते थंड होण्यासाठी वेळ देणे इथेच कलाकार मंडळींचा खेळ चालू होतो. चांगले Soldering म्हणजे काय असा प्रश्न खरगपूर IIT मधून आलेल्या केंकरे सरांना विचारले. शुद्ध मराठीत २५ पाने त्यांनी Soldering बद्दल लिहून दिली होती. दिपक देशपांडे या बहाद्दरांने Soldering केलेले CPU card हे मशिनवर तयार केलेले नाहीये याची खात्री करण्यासाठी विदेशी पाहूणे आमच्या येथे येऊन खात्री करुन गेले. Soldering हे कांपोनंट आणि पीसीबी यांच्या मधील कायमचा विश्वासू दुवा आहे !
विनायक जोशी (vp)
9423005702
6 October 2015
रविवार, ३१ जानेवारी, २०१६
Soldering
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा