nucleus , proton , neutrons वगैरे मंडळींना बाजूला सारुन स्वतःचा दबदबा निर्माण करणाऱ्या electrons ने electronics या नावाने दबदबा निर्माण केला.कायम वेगवेगळ्या orbit मधून वेगाने चकरा मारणे किंवा थोडक्यात म्हणजे अति उत्साहाने कायम हिंडत रहाणे हा याचा स्वभाव आहे. प्रवाहाच्या विरूद्ध किंवा conventional current च्या विरूद्ध दिशेने वाहणे हे याचे वैशिष्ट्य . आपल्या सर्व negative भावांना घेऊन प्रगतीच्या वाटेकडे म्हणजेच positive कडे जाणे हा याचा नित्य नैमित्तिक कार्यक्रम . चराचरात आनंदाचे दिप लावताना स्वतःच्या साठी मात्र कायम तीन करमणूकीची खेळणी वापरत आहे .
- Resistors : electronic मधे या वेगवेगळ्या आकाराच्या गुळगुळीत किंवा खरबरीत अशा घसरगुंड्या म्हणून electrons चा current यांच्या बरोबर खेळत असतो .
- Inductor : electronic current च्या दृष्टीने अतिशय thrilling अशा roller coaster चा अनुभव देणारे असतात. या मधे सर्व electrons अति उत्तेजित होऊन जास्त voltage च्या उड्या मारत असतात. आतिशय वेगाने प्रवास करत असताना एकदम थांबणे आणि उलटया दिशेन प्रवास करणे वगैरे गोष्टी लिलया करत असतात.
- Capacitor : bungee jumping पेक्षा खुप अवघड. Bungee jumping मधे उडी मारायचा आधि निदान खोली दिसत असते. Capacitor based bungee jumping मधे electrons ना capacitor च्या plate ला हात लावल्या नंतरच उघडणाऱ्या दारातून खोलीचा अंदाज येतो.येथे थोडीशी जरी चूक झाली तर डोक्यावर आपटून signal रुपी electrons ground होतात.
विनायक जोशी (vp)
9423005702
1 october 2015
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा