// श्री स्वामी समर्थ //
" RTP "
Remote Terminal Plate
अतिशय सुंदर दिसणारा आणि फक्त connectors असलेला तो पीसीबी होता.त्याची रुंदी ९० मीमी आणि लांबी १०० मीमी होती.उजव्या बाजूला २५ पीन "D" connector होता आणि डाव्या बाजूला जाड अशा field side च्या wires लावण्यासाठी Phoenix चे terminals होते.Field वरील signal switch चे वायरींग करण्यासाठी सोपे जावे म्हणून प्रत्येक signal बरोबरच positive loop पीसीबी वरतीच करुन Phoenix termination वरती काढले होते.थोडक्यात field वायरींग सोपे करणारा आणि PLC च्या I/o module ला prefabricated cable ने जोडणारा असा पीसीबी होता.हा सिंगल साईड पीसीबी होता.या पीसीबी मुळे field वरती जाणाऱ्या प्रत्येक जाड वायरला उपयुक्त असे नामकरणाचे ferrules लावता येत होते. कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनीक कांपोनंट नसलेला अतिशय सोपा आणि किरकोळ वाटणारा पीसीबी होता.थोडे दिवस याच्या बरोबर काम केल्यावर लक्षात आले की अत्यंत आधुनिक अशा PLC किंवा DCS ला उपयुक्त असा हा पीसीबी आहे.या पीसीबी मुळे सध्याच्या काळात DCS मधे चालणाऱ्या खुपशा संकल्पना स्पष्ट झाल्या . कोटयवधी रुपयांची उलाढाल करणारा हा RTP म्हणजे मूर्ती लहान पण कीर्ती महान या म्हणीची सदैव आठवण करुन देणारा आहे आणि राहिल..अतिशय सामान्य व्यक्तीमत्व असलेला असा असामान्य पीसीबी म्हणजे Remote Terminal Plate किंवा RTP होय !
विनायक जोशी (vp )
9423005702
14 November 2015
रविवार, ३१ जानेवारी, २०१६
Remote Terminal Plate
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा