// श्री स्वामी समर्थ //
" बोर्ड टाॕपर्स भाच्चे "
करवीरनिवासीनी " महालक्ष्मी " यांच्या गावात म्हणजेच कोल्हापूर मध्ये राजारामपूरी किंवा टाकाळा येथे माझ्या बहिणीचे म्हणजेच सुरेश आणि सुरेखा सोवनी यांचे अत्यंत शांत आणि समाधानी कुटुंब वास्तव्याला आहे.यांची दोन्ही मुले म्हणजे केदार आणि मंदार आणि दोन्ही सुना म्हणजेच गौरी आणि रेणूका या बारावीच्या परिक्षेत बोर्डा मध्ये आलेल्या आहेत.१९९८ साली सर्वात मोठा मुलगा केदार याने बोर्डात ११ वा येऊन पुढच्या सर्वांना मार्ग खुला करुन दिला.त्या नंतर उरलेल्या सर्वांनी त्याचाच कित्ता गिरवला. मंदार ४ था आला आणि सर्वात धाकटी सुन रेणूका मुलींच्या मध्ये बोर्डात पहिली आली.या चारही जणांनी पुढे तोच फाॕर्म कायम ठेवत उच्च शिक्षण पूर्ण केले. आज या सर्व गोष्टींची आठवण येण्याचे कारण म्हणजे पाच मे या दिवशी बारावीच्या मुलांची असलेली CET ची परिक्षा.या चारही जणांची अभ्यासाची पध्दत वेगवेगळी परंतू तणावपूर्ण नव्हती.
या वर्षीच्या मुलांना सहज सुचना
१) काॕमन सेन्स आणि एकाग्रतेचा वापर करावा.
२)परिक्षेच्या दिवसापर्यंत दैनंदिन कार्यक्रम तोच ठेवावा
३) आपल्याला अचूक उत्तर लिहायचे आहे ,कन्सेप्ट नाही .याचे भान ठेवणे
४)या पंधरा दिवसात थोडे जादा प्रयत्न केले तर पुढील आयुष्य वेगळ्याच लेव्हलवर जाते.
५) अर्थात ही आयुष्यातील शेवटची परिक्षा नाही आहे याची जाणीवपूर्वक जाणीव ठेवणे.
अत्यंत सहजपणाने आनंदाने तुम्ही सर्व या परिक्षेत उत्तम यश मिळवाल याची आम्हाला खात्री आहे.
तुम्हा सर्वांना कायम मनःपूर्वक शुभेच्छा ! All The Best 👍👍
विनायक आणि कल्याणी जोशी
23 April 2016
electronchikatha.blogspot.com
शनिवार, २३ एप्रिल, २०१६
बोर्डातील भाच्चे केदार,गौरी,मंदार ,रेणूका
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा