मंगळवार, ३ मे, २०१६

भारतीय रेल्वे

//  श्री स्वामी समर्थ  //
       " भारतीय रेल्वे "
  जेम्स वॕट नावाच्या माणसाने वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध लावून समस्त मानव जातीला गतिमानतेच्या दिशेने चालायला भाग पाडले.मोठा असा भोंगा वाजवून असंख्य ठिकाणाहून वाफ सोडत निघालेले रेल्वे इंजिन जवळून बघणे हा फार थरारक कार्यक्रम असायचा. अप ,डाऊन ,स्लो ,फास्ट ,मेल ,
एक्सप्रेस वगैरे शब्दसंपदा रेल्वे मुळे वाढली. रेल्वे मध्ये पत्रांची वाहतूक करणारा वेगळा डबा असायचा. प्लॕटफार्म ,वेटिंग रुम, रिझर्व्हेशन , टू टायर ,थ्री टायर ,फर्स्ट क्लास ,एसी ,टीसी,जंक्शन,पॕसेंजर ,
सुपरफास्ट पासून ते राजधानी, दुरांतो,गरीबरथ वगैरे फार मोठी व्हरायटी रेल्वे मध्ये आहे.अत्यंत स्वस्त दरात आणि कोणताही भेदभाव न करता येणारा प्रवास हेच रेल्वेचे ब्रीद आहे.अतिशय उत्तम रितीने आणि अत्यंत वेगाने आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यात रेल्वेने कायम आघाडी  ठेवली आहे.कोकण रेल्वे पासून काश्मिर मधील वेगवेगळ्या भूभागात रेल्वेच्या इंजिनियर्सने बिनतोड कामगिरी केली आहे.कोट्यावधी लोकांना कंम्पुटर च्या सहाय्याने सर्व सुविधा अतिशय पाॕवरफुल सर्व्हरच्या माध्यमातून देणारी भारतीय रेल्वे या सरकारी सेवेने आत्मविश्वास आणि विश्वसनीयतेचा मापदंड रोवला आहे.
करोडो लोकांना माफक दरात इच्छित स्थळी नेणारी रेल्वे म्हणजे लाजवाब आहे. प्रत्येक स्टेशन वरती पाॕवरफुल अशी कंट्रोल रुम आणि सिग्नलची सुविधा असते.या निमीत्ताने या राष्ट्रीय संपत्तीचा आपण नीट सांभाळ केला पाहीजे !
स्टेशन वरती रेल्वेच्या गार्डच्या डब्यातील गार्ड आणि स्टेशन वरील सिग्नलमन यांचे कम्युनिकेशन पाहणे फारच आनंददायी असते. बुलेट ट्रेन या विषयी मला फारसे ज्ञान नाही परंतु  अत्यंत  वेगाने जाणाऱ्या आणि ५० डबे असलेल्या मालगाडीच्या शेवटच्या म्हणजे गार्डच्या डब्यात बसायचा थरार एकदा अनुभवाच किंवा दोन विरुध्द दिशेने जाणाऱ्या सुपरफास्ट रेल्वेंचे एखाद्या स्टेशनवर होणारे अत्यंत वेगवान क्राॕसीग आणि त्या वेळी प्लॕटफार्म वरती उडणारी धूळीची वादळे हि भारतीय रेल्वेच्या शक्तीचे प्रदर्शन असते !!!
विनायक जोशी ( vp )
3 May 2016
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा