बुधवार, २ नोव्हेंबर, २०१६

कल्पक नेतृत्व " नारायण जोशी "

// श्री स्वामी समर्थ //
   " कल्पक नेतृत्व "
    " नारायण प्रभाकर जोशी "
३ नोव्हेंबर १९६५ या दिवशी" कुंभ" राशीला बरोबर घेऊन जन्माला आला. प्राथमिक शिक्षण सिध्दरामेश्वरांच्या कृपाछत्राखाली म्हणजेच " सिध्देश्वर " शाळेत झाले .नूमवि शाळेचा अनुभव न घेता हायस्कूल शिक्षणासाठी "हरिभाई देवकरण " मध्ये प्रवेश. १९८१ च्या बॕचचा आणि दहावी " बी" तुकडीत शिकणाऱ्या या मुलाने शाळेत पहिला नंबर पटकावला . याच वर्षी पानगल हायस्कूलला हाॕकी मध्ये फायनलला पराभूत केले.या मॕच मुळे आपण कोणत्याही क्षेत्रात कर्णधारपदाची जबाबदारी घेऊन  पूर्वेतिहास बदलू शकतो याची स्पष्ट जाणीव झाली. पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी शाळेच्या पुढील बोळातील ट्रेनिंग सेंटर मध्ये १० वी झाल्यावर त्याने "IQ" टेस्ट दिली. Power Of Imagination चांगली आहे .इलेक्ट्रॉनिक्स मध्ये करीयर करावे असा निकाल मिळाला , म्हणून पुण्यात E&TC या शाखेत प्रवेश घेतला.१९८४ साली काॕलेजचे शिक्षण चालू असतानाच " L&T "या कंपनीत नोकरी मिळाली. या नंतर मात्र लहान वयातच GM झाला. U21 चे MBA केले.या नंतर AVP , Unit Head वगैरे प्रगतीच्या दिशेने प्रवास चालूच आहे.
अतिशय संवेदनशील आणि निःस्पृह माणूस , उत्तम बासरी वाजवणारा , रागदारीचा अभ्यास असलेला ,कायम पाॕझिटिव्ह विचार करणारा ,नवनवीन जबाबदाऱ्या अत्यंत विचारपूर्वक आणि सर्वांना बरोबर घेऊन पार पाडणारा , मानाची खुर्ची किंवा त्या अनुषंगाने झालेल्या ओळखींचा वैयक्तिक जीवनात कधीही गैरवापर न करणारा........वगैरे वगैरे !
१९८१ साली "IQ" टेस्ट मध्ये कल्पना शक्ती चांगली आहे असा कागदोपत्री निर्णय मिळाल्यावर आम्ही दोघांनी कल्पनाशक्ती ला प्रचंड ताण देऊन पुण्यातील सुप्रसिद्ध "अमृततुल्य " चहा जवळ कोठे मिळेल ते शोधले.
हे चहारूपी अमृत घेतल्यानंतर
पेशव्यांच्या गणपतीचे म्हणजेच तळ्यातल्या किंवा  सारसबागेतील गणपतीचे आशिर्वाद घेऊन" नारायण जोशी "यांनी आयुष्यातील नवीन आनंदी पर्वाची सुरवात केली.!
विनायक जोशी (vp )
3 November 2016
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा