शुक्रवार, ११ नोव्हेंबर, २०१६

नवोन्मेषी " लक्ष्मी "

// श्री स्वामी समर्थ //
     " नवोन्मेषी लक्ष्मी "
लक्ष्मी पूजनाच्या दिवशी घराघरातून झालेल्या पूजेनंतर काळानुरूप स्वतः मध्ये बदल करायचा निर्णय "लक्ष्मी" ने घेतला.
अतिशय सुस्पष्टपणाने आणि  आश्वासक शांतपणाने भारताच्या पंतप्रधानांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा आपण का बंद करत आहोत या विषयी निवेदन केले .उद्देश अथवा हेतू स्वच्छ होता.याच बरोबर थोडीशी गैरसोय सोडल्यास जनतेचे एका पैशाचेही नुकसान होणार नाही याची ग्वाही होती.
जन-धन योजना, केवायसी किंवा काळा पैसा जाहीर करण्यासाठी व्यवस्थित संधी समस्त नागरिकांना  दिली होती.
भ्रष्टाचार आणि काळा पैसा यांना कंटाळलेल्या जनतेने अत्यंत उत्साहाने  नविन बदलाचे स्वागत केले.
बँके मध्ये काम करणाऱ्या असंख्य अधिकारी मंडळींनी किंवा या क्षेत्रातील तज्ञ लोकांनी अतिशय आश्वासक आणि सकारात्मक लेख लिहून संभ्रमापासून लोकांना दूर ठेवले.
वैद्यकीय व्यवसाया सारख्या आपत्कालीन सेवा देणाऱ्या असंख्य संस्थांनी या काळात मानवतेचा मूलमंत्र जपला आहे.
सोशल मिडीयाने अतिशय उत्तम जबाबदारी या काळात निभावली आहे. आपले पैसे कसे व्यवस्थित राहणार आहेत किंवा बदलून मिळतील वगैरे व्यवस्थित मार्गदर्शन वेगवान रितीने आणि सुलभतेने "व्हाॕटस्अॕप" सारख्या माध्यमातून झाले आहे.
एकशे वीस कोटी जनतेला हळूहळू "पेपरलेस करन्सी" कडे घेऊन जाण्याची हि तयारी आहे . प्रगतीच्या दिशेने निघालेल्या या नविन स्वरुपातील  "लक्ष्मी " चे आपण सर्वांनी अत्यंत आनंदाने स्वागत करायचे आहे !!!
विनायक जोशी (vp)
१० आॕक्टोंबर २०१६
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा