रविवार, २० नोव्हेंबर, २०१६

Mi Band

// श्री स्वामी समर्थ //
        " Mi Band "
  थोड्या थोड्या वेळाने  १/४ कप चहा किंवा सकाळ संध्याकाळ चालणे किंवा कंपनीतील मुलांच्या बरोबरीने काम करणे हि तीन व्यसने मी अत्यंत आवडीने जोपासली आहेत. चालताना मात्र काही विशिष्ट टप्पे पार करायचे आणि वेळेत घरी परतायचे हा कार्यक्रम चालू असे.स्मार्ट फोन आल्यानंतर मात्र आपण किती अंतर किती वेळात चाललो वगैरे डेटा जमा होऊ लागला परंतु त्यासाठी मोबाइल जवळ ठेवणे सक्तीचे झाले. या नंतर चिनी बनावटीचा "Mi Band" हा पट्टा विकत घेतला.या अंदाजे १० ग्रॅमच्या मनगटात बांधायच्या पट्ट्याने दिवसातील कमीतकमी ३ तास मोबाइल पासून मला दूर राहण्यास मदत केली. सुरवातीला नव्याची नवलाई म्हणून हा पट्टा दिवसातील २२ तास वापरून बघितला .या मध्ये चालण्या बरोबरच दिवसभरात निवांत कधी होतो आणि धावपळ कधी याची नोंद मिळू लागली.अगदी रात्री शांत झोप किती वेळ लागली ते सुध्दा . Mi च्या या बँडला ब्लू टुथची व्यवस्था आहे त्या मधून Mi चे अॕप किंवा Google Fit वगैरे आपापल्या पद्धतीने माहीती घेऊन आपल्याला मार्गदर्शन करतात. सुरवातीला नवीन छंद म्हणून घेतलेल्या या बँडने पावसाळ्यात मात्र छान साथ दिली. दिवसभरात कमीतकमी किती चालायचे हे ध्येय एकदा या बँडला सांगितले आणि दिवसभरात आपण ते ध्येय पार पाडले कि अत्यंत आनंदाने हा सुध्दा व्हायब्रेट होऊन आणि दिव्यांची उघडझाप करुन आपल्या आनंदात सहभागी होतो. Mi Band पेक्षा अत्यंत आधुनिक पध्दतीने चालणारी असंख्य घड्याळे सध्या बाजारात उपलब्ध आहेत परंतु अतिशय माफक दरात हा त्याच्या क्षमतेत आहे तेवढे काम उत्तमपणे पार पाडत आहे.
अत्यंत प्रायमरी अवस्थेतील माझ्या कडील हे पिल्लू म्हणजेच "Mi Band" सध्यातरी एकदम छान प्रकारे कार्यरत आहे .!!!
विनायक जोशी (vp )
१९ नोव्हेंबर २०१६
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा