मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०१६

अर्थ क्रांतीकारक "अनिल बोकील"

// श्री स्वामी समर्थ //
       " अर्थक्रांती "
     " अनिल बोकील "
अनिल बोकील यांनी मराठीतून अतिशय उत्तमपणे माझ्या सारख्या सामान्य माणसाला सुध्दा कळेल अशा पध्दतीने पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द करायची कारणे किंवा सध्याच्या  भारतीय अर्थकारणा विषयी समजावून सांगितलेल्या काही गोष्टी...
१) ५०० किंवा १००० रुपयाच्या नोटेचा उत्पादन खर्च अंदाजे ३ रूपये.
२) चलनातील चालू असणाऱ्या नोटेचा आणि सोन्याचा साठा यांचा काहीही संबंध नाही
३) नविन २००० रुपयांची नोट हा तात्पूरता उपाय
४) १०० रुपयांच्या वरच्या नोटा व्यवहारात राहणार नाहीत.
५) जास्तीत जास्त व्यवहार हे बँकेतून आणि पेपर लेस पध्दतीने करण्याचा मानस.
६)बँकेतून होणाऱ्या व्यवहारा वरती टॕक्स आणि त्या मुळे सरकारला डायरेक्ट उत्पन्न .
७) या पुढे जास्तीत जास्त व्यवहार हे नेट बँकिग किंवा कार्डच्या सहाय्याने होणार.
८) पाकिस्तानने काश्मिर मध्ये खोटे चलन वापरून भारतीय सैनिकां विरूद्ध दंगली घडवल्या त्या अतिरेकी कारवायांना आता चाप .
९) माजी पंतप्रधान हे अर्थतज्ञ होते परंतु संसदेत बहुमत नसल्यामुळे त्यांना हे काम शक्य झाले नाही.
१०) पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी सलग ९० मिनीटे " अर्थ क्रांती " विषयी ऐकून घेतले.
  ११) कोणतेही चलन हे व्यवहाराचे फक्त माध्यम असावे .
१२) चलन सर्क्युलेशन मध्ये पाहिजे
१३) पोत्यात अडकलेल्या लक्ष्मीला मोकळा श्वास घेता येणार .
१४) काळा पैसा दोन प्रकारचा. टॕक्स बुडवणाऱ्या मंडळींकडील  किंवा गुन्हेगारी व्यवहारातून तयार होणारा वगैरे ....!
विनायक जोशी (vp)
१५ नोव्हेंबर २०१६
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा