बुधवार, ३० नोव्हेंबर, २०१६

सुरेख - सुनित

// श्री स्वामी समर्थ //
" सुरेख - सुनित "
२९ नोव्हेंबर १९५७ या दिवशी सोलापूर येथे जन्म . कुंभ रास असल्यामुळे समजशक्ती उत्तम . आपल्या मोठ्या बहिणीची काळजी करणे आणि लहान भावंडांची काळजी घेणे हा तिचा शालेय जीवनातील कार्यक्रम होता.लहानपणा पासून अभ्यासा बरोबरच संगीताची सुध्दा उत्तम समज. आमच्या घरात 'संवादीनी' या वाद्या बरोबरीने थोडाफार संवाद साधायचा प्रयत्न तिने केला होता. अगदी लहान वयातच म्हणजे काॕलेजच्या दुसऱ्या वर्षात शिकत असतानाच तिला सातारा येथे " पोस्टा"मध्ये नोकरी मिळाली.ही नोकरी करत करत BCom चे शिक्षण पूर्ण केले.सोलापूर येथे GPO मध्ये बदली झाल्यानंतर कला क्षेत्रात प्रवेश . सारस्वत क्लब येथे बसविलेले " वाहतो हि दुर्वांची जुडी " या नाटकात उत्तम अभिनय करत असे.सांगली येथील यशवंतनगर भागात राहणाऱ्या व कॕनरा बँकेत नोकरी करणाऱ्या आणि अत्यंत जबरदस्त काॕमनसेन्स असलेल्या सुरेश सोवनी यांच्या बरोबर लग्न झाले आणि सुनित ची 'सुरेखा सुरेश सोवनी' झाली.या नंतर तिला युनियन बँकेत कोल्हापूर येथे नोकरी मिळाली. कोल्हापूर मधील गंगावेस येथून अत्यंत आनंदी आणि समाधानी संसाराची सुरुवात.१९८१ आणि १९८४ या काळात' केदार आणि मंदार' या दोन अत्यंत चलाख मुलांचा जन्म झाला. या दोन मुलांनी आपल्या वेगवेगळ्या करामतींनी तिला कायम व्यस्त ठेवले.ताराबाई पार्क येथे स्वतःच्या घरात प्रवेश केला आणि प्रगतीच्या दिशेने प्रवास चालू झाला.नोकरीच्या ठिकाणी किंवा घरातील कोणतेही काम अत्यंत मनापासून करणे हा तिचा नैसर्गिक स्वभाव आहे.आईच्या संस्कारात मुले वाढावीत म्हणून प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना सोलापूरला म्हणजेच मुलांच्या आजोळी ठेवत असे. दोन्ही मुलांच्या काॕलेज जीवनात किंवा पुढील आयुष्यात मिळालेल्या  घवघवीत यशानंतर सुध्दा अत्यंत साधेपणाने किंवा समाधानाने रहायचे संस्कार या जोडीने उत्तम प्रकारे केलेले आहेत.योग्य वयात सर्व गोष्टी झाल्यामुळे आज "नातीं " बरोबर व्यस्त असा दिनक्रम चालू आहे. सोलापूर मधील आदर्शनगर येथे राहणारी , हरीभाई देवकरण शाळेत शिकलेली ,नाटकात काम करणारी ,भावगीत गाणारी ,पोस्टात आणि त्या नंतर बँकेत काम करणारी,आपल्या आनंदी जोडीदाराला उत्तम साथ देणारी , कायम नविन गोष्टी शिकण्याची आवड असलेली , घरातील वृद्ध माणसांची आस्थेने देखभाल करणारी ....वगैरे असंख्य गोष्टी अत्यंत समजूतदारपणे करणाऱ्या आमच्या मोठ्या बहिणीला म्हणजेच
" सुनीत जोशी " किंवा " सौ.सुरेखा सुरेश सोवनी " हिला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
विनायक जोशी (vp )
२९ नोव्हेंबर २०१६
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा