शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०१६

"जिनीयस मंदार सोवनी"

// श्री स्वामी समर्थ  //
          " जिनीयस "
        " मंदार सुरेश सोवनी "
८ सप्टेंबर १९८४ या दिवशी कोल्हापूर मध्ये ताराबाई पार्क येथे हे चुणचुणीत बाळ जन्माला आले. इंग्रजी मधून शिक्षण घेता यावे म्हणून convent मध्ये  घातले.खेळांची प्रचंड आवड . अभ्यास वगैरे किरकोळ गोष्टी शेवटच्या क्षणी . क्रिकेट मधील पहिले शतक रुबी अपार्टमेंट मधील  " बोहरींच्या " मुलांच्या बरोबर खेळताना मारले.हा नववीत असताना त्याचा केदारदादा १२ वीला बोर्डात ११वा आला. त्या मुळे आता आपण अभ्यास करायाला पाहीजे असे वाटून थोडासा अभ्यास करुन हा सुध्दा बोर्डात ४ था आला. या नंतर मात्र बिट्स पिलानी येथे पुढील शिक्षण .पिलानी येथे त्याच्या बरोबरीने शिकणारी रेणूका दिक्षीत ही अत्यंत गुणी मुलगी आयुष्यातील जोडीदारीण म्हणून त्याच्या आयुष्यात आली. पहिली नोकरी पुण्यात श्री .उडपीकरांच्या "वेव्हलेट "या कंपनीत केली .त्यानंतर मात्र डिजीटल सिग्नल प्रोसेसींग मध्ये अभ्यास करण्यासाठी आणि MS करण्यासाठी मेलबर्न येथे प्रयाण. MS पूर्ण झाल्यावर तेथेच आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करत आहे.सध्या Ivanhoe melbourne या अत्यंत शांत जागी बायको आणि आपल्या दोन लहान पिल्लां बरोबर रहात आहे.Yarrallen cricket club कडून प्रत्येक शनिवारी आणि रविवारी खेळत आहे.तेथील मराठी मंडळींच्या बरोबर मराठी नाटकात किंवा छोट्या सिनेमात काम करत आहे. वयाच्या तिसऱ्या वर्षापासून प्रत्येक उन्हाळ्यात सोलापूर मध्ये आपल्या आजी आणि आजोबांच्या कडे दोन महिने रहाणारे हे चलाख व्यक्तिमत्व आता " सिग्नल प्रोसेसींग " मध्ये बऱ्याच जणांना मार्गदर्शन करत आहे .अतितचा " वडा " असो किंवा कोल्हापूरची मिसळ आजही तेवढ्याच आवडीने खाणे आणि कोल्हापूरला  असताना शिवाजी विद्यापीठात जाऊन विद्यार्थ्यांना मुलभूत संकल्पना समजावून सांगणे हे त्याचे आवडीचे काम. पहिलीचा होमवर्क करताना जी सहजता होती तिच MS पूर्ण करेपर्यंत कायम ठेवणाऱ्या या उमद्या आणि खिलाडूवृत्ती असलेल्या दिलदार भाच्याला म्हणजेच " मंदार सोवनी " याला आमच्या कडून अनेक शुभेच्छा !
विनायक आणि कल्याणी मामी
8 September 2016
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा