शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०१६

"मंत्र जागर "ऋग्वेदी घनपाठी गुरुजींचा

// श्री स्वामी समर्थ //
     " मंत्र जागर "
सारसबागेच्या किंवा तळ्यातल्या गणपतीच्या उजव्या बाजूला असलेल्या कांचीच्या शंकराचार्यांच्या मठातून नारायणचा मंत्र जागर करायचा का असा फोन आला . "ऋग्वेदा" मधील साधारणपणे साडेदहाहजार मंत्र किंवा लाखभर पदे मुखोदगत असलेले आठ"घनपाठी" ब्राह्मण हे मंत्र म्हणायला येणार होते.काल पहाटे पासून अत्यंत उत्साहाने आणिआनंदाने तयारी सुरु केली.कमालीची पाॕझीटीव्ह शक्ती असलेला नारायण आणि त्या नंतर थोड्याच वेळात ब्रह्मवृंद दाखल झाला. आमच्या घराच्या दरवाजावर Tuition असा फलक असल्यामुळे सुरवात "सरस्वती " च्या मंत्रांपासून झाली. त्या नंतर पंचवीस मिनीटे वेगवेगळ्या प्रकारच्या  मंत्रांचा आविष्कार बघायला आणि ऐकायला मिळाला. या नंतर सर्वांची ओळख आणि "वेदां"विषयी सविस्तर माहिती सांगितली . या घनपाठी गुरुजींच्या मधील जे गेली ५० वर्षे हेच मंत्र म्हणत आहेत अशी मंडळी मात्र  एखाद्या थोर शास्त्रीय गायका सारखे  उत्तम रीतीने मंत्रांचे पठण करत होते. गुरुकुल पध्दतीने राहून पंधरा सोळा वर्षे अध्ययन करुन त्या नंतर परीक्षेत पास होणारे हे " घनपाठी " गुरुजी वेगळेच वाटले. आपण ज्या वास्तू मधे राहतो ती वास्तू कायम आपल्याला " तथास्तु " असा आशिर्वाद देत असते याची पूर्ण जाणीव ठेवून आम्ही सर्वांनी म्हणजेच अत्यंत आनंदी असे शेजारी , मी , नारायण आणि कल्याणी यांनी या " ऋग्वेदातील मंत्रांच्या " मधून निघणाऱ्या स्पंदनांचा अनुभव घेतला  . गणपतीच्या काळात मंत्र जागर घरी करायचा ही पद्धत  परत चालू झाली !!!
विनायक जोशी ( vp )
11 september 2016
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा