शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०१६

श्रीमानयोगी आठवण

// श्री स्वामी समर्थ //
       " श्रीमानयोगी "
ह्या पुस्तकाची तरुणपणी खुप पारायणे केली . कंपनीला सलग ३-४ दिवस दांडी मारुन याचे पारायण करत होतो.अफजलखानाला भेटायला जाण्याचा आधीची रात्र किंवा पन्हाळा ते विशाळ गड राजांची धावपळ , पुरंदर वरती मिर्झाराजे तोफांचे गोळे डागत असताना झालेली अगतिकता वगैरे प्रसंग  वाचताना अतिशय तणावपूर्ण वातावरणात वाचन घडत असे. कापुरहोळ वरुन नारायणपुरला जाताना 'पुरंदर" दिसला की राजांच्या त्या आवडत्या गडाला सलाम करायचा ! पुरंदर कडे बघताना डोळे मिटले की हळूहळू घोड्यांचा टापांचे आवाज यायला लागतात , धुळीची वादळे वाहू लागतात आणि अत्यंत वेगाने निष्ठावान मावळे आणि शिवाजीराजे गडावर माॕसाहेबांना भेटायला निघून जातात ....कायमचे !
विनायक जोशी (vp )
18 December 2015
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा