रविवार, २३ जून, २०१९

सुंदर सोलापूरची वारी

// श्री स्वामी समर्थ //

       *सुंदर सोलापूरची वारी*

                *विनायक जोशी (vp)*
📱9423005702

अतिशय कमी सामान आणि कमालीच्या असंख्य सुंदर आठवणींचे गाठोडे घेऊन माहेरी म्हणजेच सोलापूरला जायला निघालो. विना थांबा विना वाहक या प्रकारच्या लाल गाडीतून प्रवास असल्यामुळे साडेचार तासाचा प्रवास उत्तम होणार याची खात्री होती .अतिशय सुंदर रस्ता आणि उत्तम हवामान या मुळे जून्या आठवणींची उजळणी झाली.
कॕम्प मध्ये मेन आणि ईस्ट स्ट्रीटला झोकदार हुलकावणी देऊन पुलगेट कडे दुर्लक्ष करुन गाडी निघाली. थोड्याच वेळात सकाळच्या सत्रात सराव करणारे घोडे रेसकोर्स वरती दिसू लागले.या नंतर वानवडी,फातिमा नगर वगैरे करत आणि किर्लोस्करांच्या कारखान्याचे किंवा गीटस् गुलाबजाम या कंपनीचे दर्शन घेत हडपसर गाठले. या नंतर मात्र १५ नंबर आकाशवाणी केंद्र किंवा मांजरी स्टड फार्म येथील घोड्यांची गडबड बघत निघालो.पूर्वीची राजकपूरची बाग किंवा सध्याचे MIT चे गुरुकुल आणि HP च्या अवाढव्य टाक्या बघत लोणी येथे प्रवेश केला. येथून पुढे प्रयागधाम किंवा उरळीचे निसर्गोपचार केंद्र यांना मागे टाकून थेऊरच्या फाट्या वरुनच पेशव्यांच्या गणेशाला वंदन केले.थोड्याच वेळात वेगवेगळ्या केमिकल्स च्या वासाने पाटस- कुरकुंभ कारखान्यांच्या क्षेत्रात प्रवेश केला याची जाणीव झाली. कुरकुंभच्या फिरंगाई देवीचे स्मरण करत आणि हेमंत शितोळेंच्या शेताच्या कडे बघत बघतच भिगवणला पोचलो.बँक आॕफ महाराष्ट्र भिगवण हा बोर्ड आपल्याला १०० किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाल्याची जाणीव करून देतो .या नंतर मात्र बॕक वाॕटरचा प्रचंड जलसाठा आणि वेगवेगळ्या पक्ष्यांचे  थवे दिसू लागले.पळसदेव येथील पाण्याच्या खाली जाणाऱ्या देवळाची स्थिती पहात इंदापूरला पोचलो.येथून पुढे बरोबर दहा किलोमीटर वरती अवाढव्य असे उजनी धरण आणि छोटासा जलविद्युत प्रकल्प यांना मागे टाकून टेंभूर्णीला पोचलो.या ठिकाणाहून भारताच्या उत्तरेला जाण्यासाठी रस्ता असल्यामुळे लांब आकाराच्या ट्रेलर्सची वर्दळ चालू झाली.उजनी धरणापासून रस्त्याच्या डाव्या हाताला सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणारी आणि सुमारे शे- सव्वाशे किलोमीटर लांब असलेली पाण्याची पाईप लाईन आपल्या बरोबरीने धावताना दिसते.मोडनिंब आणि मोहोळ यांना मागे टाकून वडवळच्या नागनाथ महाराजांना नमस्कार करुन बाळ्याच्या खंडोबा पाशी पोचलो.थोड्याच वेळात सोलापूरच्या प्रवेश द्वारावर स्वागता साठी सिध्द असलेल्या दोन मोठ्या पाण्याच्या टाक्या दिसल्या आणि हूरहूर संपून आपल्या गावात प्रवेश केला. शिवाजी पुतळा ,भागवत टाॕकीज ,प्रभात टाॕकीज वरुन डफरीनला वळसा घातला.नुकतीच वयाची शंभरी पार करत असलेल्या  आणि कमालीची सुंदर दगडी इमारत असलेल्या हरीभाई देवकरण या शि.प्र.मंडळींच्या प्रशालेला मानाचा मुजरा केला . शिवाजी रंगभुवन येथून पुढे सोलापूर मधील पहिल्या सोसायटीत म्हणजेच आदर्शनगर येथे प्रवेश केला. *प्रभाकर गणेश जोशी ,९५२ गुरुप्रसाद* या घराच्या बरोबर समोर रिक्षा थांबली. म्हातारे झालेले परंतू अत्यंत कणखर असे दोन औदुंबर , हिरवागार कडुनिंब आणि बेल , शांतपणे उभा असलेला अशोक , लाल फळे अंगावर पांघरुन बसलेला बदाम , आंब्याची झाडे ,स्वतःच्या भाराने वाकलेली करंजी आणि असंख्य पक्षी स्वागतोत्सुक होते. कोणत्याही प्रकारच्या वाहनांचे आवाज येत नसलेल्या या अत्यंत शांत अशा वातावरणात एखाद्या ध्यान मंदिरा सारखे प्रसन्न वाटत होते. नारळाच्या झावळ्यां पासून बनविलेला घरगुती खराटा आमच्या माळी बुवांनी म्हणजेच चंद्रकांत आजोबांनी हातात घेतला आणि घरासमोरचे अंगण स्वच्छ झाडून काढले. दुपारी आमच्या इराने घराच्या आवारातील मोठ्ठी झाडे आणि त्यांच्या पारंब्या , बागेतील गवत , त्यातून धावपळ करणाऱ्या खारी , कोळ्यांची जाळी वगैरे गोष्टीच्या बरोबरीने अनेक  प्रकारच्या फुलांचे बारकाईने निरीक्षण केले. सुर्यास्ताच्या वेळी मात्र  घरट्यात परतलेल्या पक्ष्यांची  धावपळ चालू होती. पन्नास शंभर फूट उंच पसरलेल्या औदुंबराच्या फांद्यातून असंख्य आठवणींची इंद्रधनुष्यी किरणे आवेगाने अंगावर झेपावत होती.

*विनायक जोशी (vp)*
  📱9423005702
मंगलधाम,हिंगणेखुर्द ,लेन नं ४ , पुणे ५१
*electronchikatha.blogspot.com*

हसणे @ International Day Of Happiness

// श्री स्वामी समर्थ //
*International Day Of Happiness*

      *हसणे*

             *विनायक जोशी (vp)*
📱942005702

 आयुष्याची सुरूवात  आणि शेवट रडणे या विधीने करणाऱ्या माणसाला आयुष्य आनंदाने जगण्यासाठी परमेश्वराने दिलेली ही दैवी देणगी आहे. माझ्या सुदैवाने मला हा वारसा आईच्या कडून मिळाला. अत्यंत मोकळेपणानं साध्या साध्या गोष्टीतील आनंद हुडकून त्यावर हसणारे मित्र मिळाले.कोणत्याही कलेत निपुणता मिळविण्यासाठी लागते ती म्हणजे बारकाईनं निरीक्षण करायची शक्ती आणि अत्यंत बळकट अशी स्मरणशक्ती . टायमिंगचा खोलवर अभ्यास .स्वतः वरती होणारे विनोद सहन करायचा खिलाडूपणा हवा. समोरच्या माणसाला नाउमेद करण्यासाठी याचा वापर कधीही करु नये. आपल्या आजूबाजूला  विनोदाची कारंजी उडवणारे सहकारी असतील तर ते मागच्या जन्मीचे पुण्य आहे असे समजावे. अत्यंत एकाग्रतेने काम करण्यासाठी "हसणे" हे फार मोठे टाॕनिक आहे. फक्त ठराविक उच्च अभिरुचीच्या विनोदांनाच हसायला पाहिजे असा कोणताही निश्चय करु नये. गडगडाटी हसायला येणारी भाग्यवान मंडळी अत्यंत निरोगी असतात.या गडगडाटा चे सहावे Harmonics हे रडणे असते. त्या मुळे हसणे आणि रडणे एकत्र झाल्याने आरोग्य छान राहते. सर्व जगाची एकच बोलीभाषा असलेल्या "हसणे " या आनंदाने रहायला प्रवृत्त करणाऱ्या विधीला मनापासून धन्यवाद !!

    *विनायक जोशी (vp)*
   20 March 2019
      📱9423005702
मंगलधाम , हिंगणेखुर्द ,लेन नं ४,पुणे ५१
*electronchikatha.blogspot.com*

गुरूपौर्णिमा ......गुरू ठाकूर

// श्री स्वामी समर्थ //
       *गुरुपौर्णिमा*
   *गुरुजनांचे स्मरण*

*विनायक जोशी (vp)*
📱9423005702

दत्त महाराजांना बावन्न गुरु होते.स्वामी विवेकानंदाना रामकृष्णां सारखे अनुभुति संपन्न गुरु होते.ज्ञानदेवांना निवृत्तिनाथांसारखे जाणकार गुरु होते.शिवाजी महाराजांना रामदास स्वामींसारखे व्यवहार कुशल गुरु होते.या सर्व गुरुजींना आपल्या विद्यार्थ्यांचा वकूब माहिती असल्यामुळे त्यांनी आपल्या शिष्यांना उत्तम प्रतिचे मार्गदर्शन केले.  आपल्याला आनंदी आयुष्य जगण्यासाठी उपयुक्त असे संस्कार ज्यांनी केले अशा आई वडीलांचे किंवा असंख्य लहान अथवा मोठ्या गुरुंचे स्मरण करायचे.  शारीरिक हालचालीं वरती मर्यादा असूनही उत्तम दर्जाचे गणित शिकवणारे गुरुजी असोत किंवा मूलभूत इलेक्ट्रॉनीक्स मनोरंजक प्रकारे शिकवणारे गुरुजी यांची मला प्रकर्षाने आठवण येते. चार्ली चॕप्लिन पासून ते पु.ल.देशपांडे यांच्या पर्यंत सर्वांनी आनदी जीवनाचा भक्कम पाया तयार करुन घेतला .या जगात अत्यंत मोकळेपणानं जगताना कायम आपला तोल सांभाळणारे गुरु किंवा मुक्त तालात जगण्यासाठी प्रेरीत करणारे गुरु , अशा असंख्य गुरुंच्या कडे आपण नक्की  काय मागायचे हे *गुरु ठाकूर* " यांनी छान आणि मोजक्या शब्दांत सांगितले आहे .
  *तू बुद्धी दे , तू तेज दे* !
   *नवचेतना विश्वास दे* !
   *जे सत्य सुंदर सर्वदा* !     
*आजन्म त्याचा ध्यास दे*

*विनायक जोशी ( vp )*
 📱9423005702
 मंगलधाम , हिंगणेखुर्द, लेन नंबर ४ , पुणे५१
*electronchikatha.blogspot.com*

Outstanding Performers..रेणूका ,सुधीर ,क्षितीज

// श्री स्वामी समर्थ //

*वाढदिवस ३१ आॕक्टोंबर*
सुधीरराव , रेणूका , क्षितिज

      *विनायक जोशी (vp)*
📱9423005702

  *सुधीरराव  विद्वांस*
स्वतः विषयी अत्यंत कमी बोलणारे आणि शांतपणाने दीर्घकाळ उत्तम दर्जाचे काम करणारे . संघकार्या बरोबरच   कृषीक्षेत्रात अत्यंत निष्ठेने काम करणारे सुधीरराव. देशी गिर गाईंचे संगोपन आणि वंश सुधारणा या विषयी अतिशय महत्त्वाचे काम करत आहेत.

*रेणूका मंदार सोवनी*
मुलींच्या मध्ये बोर्डाच्या परिक्षेत पहिली आलेली, पिलानी आणि मेलबर्न येथे शिकलेली,सध्या दोन लहान मुलींना सांभाळून उत्तम प्रकारे मेलबर्न येथे काम करणारी रेणूका मंदार सोवनी .........

 *क्षितिज अभय मायदेव*
 अत्यंत हुशार अशा आई वडीलांच्या पेक्षा वेगळे कार्यक्षेत्र निवडणारा, अतिशय सहजपणाने पहिल्याच फटक्यात *CA* ची पदवी खिशात टाकणारा , कामासाठी वेगवेगळ्या देशात जाऊन आपल्या कामाचे क्षेत्र वाढवणारा असा *क्षितिज* सध्या पॕरिस येथील सुप्रसिद्ध *अॕक्सा* कंपनीत कार्यरत आहे .

वरील तिघांच्या मध्ये असलेले साम्य म्हणजे तिघांचेही
 *Outstanding Performances*
 🎂🎁🎈🎉

 *विनायक  आणि कल्याणी  (vp )*
📱9423005702
३१ आॕक्टोंबर २०१८
मंगलधाम, हिंगणेखुर्द , लेन नंबर ४ , पुणे ५१.
*electronchikatha.blogspot.com*

Top Guns ...अजित ,आकाश ,विजय

// श्री स्वामी समर्थ //
        *आकाश आणि अजित*

       *विनायक जोशी (vP)*
📱9423005702

९ मे संध्याकाळी अमेरिकेतून आकाश ने बेलसरकर आणि त्याचा फोटो पाठविला.आकाश TCS मध्ये आहे आणि कंपनीच्या कामासाठी अमेरिकेत गेला होता त्या वेळी बाॕश या कंपनीत काम करणाऱ्या वर्ग मित्राला म्हणजेच अजित बेलसरकरला तो तेथे भेटला....

*१९९५ मे महिना*

कडकडीत दुपारच्या वेळेला धायरीच्या रायकर मळ्या पर्यंत जाऊन परत माणिकबागेकडे जाताना आमच्या कंपनीची पाटी वाचून दोघेही नोकरी आहे का बघायला आले होते. आमच्या येथे संशोधन आणि विकास विभागात फक्त एक जागा होती.अजित बेलसरकरला नोकरी मिळाली .

 *अजित बेलसरकर*

अतिशय खडतर मेहनत आणि एकाग्रता पूर्वक काम करून त्याने आमच्या येथे खूप महत्त्वाचे  प्रोजेक्ट पूर्ण केले.आमच्या कंपनीतून इंडस्ट्रीयल कोट्यातून त्याला IIT खरगपूर येथे प्रवेश मिळाला.त्याच्या नंतर आकाश आमच्या कंपनीत कामाला लागला

*आकाश निलावार*

मितभाषी आणि कामात अतिशय निष्णात . आॕटोमोबाईल क्षेत्रातील अनेक अवघड कामे त्याने लिलया पूर्ण केली. त्याच्या सौम्य वागण्यामुळे आमच्या कंपनीच्या मालकांनी *बाबूजी* ही पदवी त्याला बहाल केली होती.

*१९ मे २०१८*

मागच्याच आठवड्यात अमेरिकेत असलेला आकाश त्याच्या मामे भावाला म्हणजेच सुप्रितला भेटायला इंडिटेक मध्ये आला होता. अत्यंत अनपेक्षित अशी आमची भेट संशोधन आणि विकास विभागात झाली. या विभागातील तरूण मुलांना त्याने मार्गदर्शन केले. पंचवीस वर्षांपूर्वी च्या अनेक आनंददायी प्रसंगांची उजळणी झाली.

माणिक बागेतील कुदळे पाटील अपार्टमेंट येथे राहणाऱ्या आणि याच आवारातील एका आज्जीं मुळे धार्मिक अधिष्ठान लाभलेल्या या विदर्भातील इंजिनियर्सनी म्हणजेच *आकाश निलावार , अजित बेलसरकर आणि विजय बढे* यांनी उत्तम दर्जाच्या कामाने आपला वेगळाच ठसा उमटवला आहे ....

*विनायक जोशी (VP)*
📱9423005702
मंगलधाम , लेन नं ४' हिंगणेखुर्द ,पुणे ५१
electronchikatha.blogspot.com

सखाहरी फ्रिज ..Godrej Coldgold

// श्री स्वामी समर्थ //

     *सखाहरी फ्रिज*
 
    *गोदरेज कोल्डगोल्ड*
    *विनायक जोशी (vp)*
📱9423005702

 १९९२ च्या मे महिन्यात आकाशी रंगाचा १६५ लिटर्स कपॕसिटीचा गोदरेज कंपनीचा हा फ्रिज आमच्या घरात डेरेदाखल झाला. अतिशय उत्तम दर्जाच्या या फ्रिजने गेल्या २६ वर्षात एकदाही कुरकुर केली नाही.दररोज लागणाऱ्या भाज्या , देवपूजेची फुले , दररोजची साय वगैरे गोष्टी किंवा  फ्रिजर मध्ये असलेला लोण्याचा मुक्काम , खालच्या कप्यात असलेले ड्रायफ्रुटस , जास्तीचे दूध वगैरे अनेक गोष्टी गुण्यागोविंदाने रहात आहेत. या फ्रीजचा काॕम्प्रेसर अतिशय कमी आवाज करणारा आणि दणकट आहे. थर्मोस्टॕट सुध्दा वर्षानुवर्षे उत्तम कामगिरी करत आहे. प्रत्येक १५ दिवसांनी एकदा तो डीफ्राॕस्ट मोड मध्ये ध्यानस्थ असा बसलेला असतो. हा अजूनही जसाच्यातसाच चिरतरुण आहे . एका उत्तम अशा स्टँड वरती तो विराजमान झालेला आहे . या फ्रिज मुळे असंख्य वेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या घरगुती आईस्क्रिमची आवर्तने करणे शक्य झाले आहे. आमच्या क्लासच्या मुलांनी किंवा पाहूण्यांनी या फ्रिज मुळे  समाधानाची आणि तृप्ततेची ढेकर दिली आहे ......अशा या आमच्या असामान्य साथीदाराला आता समाधानने निरोप दिला आहे. कमी काम पडेल अशा नवीन घरी त्याला सुखरूप पाठवला आहे....




*विनायक आणि कल्याणी जोशी*
*२ जूलै २०१८*
 📱9423005702
मंगलधाम , हिंगणेखुर्द लेन नं ४ , पुणे ५१
electronchikatha.blogspot.com

Tom & Jerry

// श्री स्वामी समर्थ //
           मैत्र
 *प्रिय*
  *टाॕम आणि जेरी*

      *विनायक जोशी (vp)*
📱9423005702

तुम्हाला दोघांना बघितले आणि जिवलग मित्र म्हणजे काय याचा साक्षात्कार झाला. भविष्याची काळजी न करणारी आणि भुतकाळात न रमणारी अशी तुमची अजरामर जोडी आहे.कायम वर्तमानात रहाणारी.
" जेरी " चे जेरीस आणणे आणि टाॕम ने त्या सर्व हरकतींना उत्साहाने तोंड देणे लाजवाब. तुमच्या कल्पना शक्ती ला मात्र  तोड नाही. तुमच्या गोष्टींमधे उपदेशाचे डोस नाहीत किंवा उगीचच करुण रसाकडे कधीही गेल्या नाहीत. या जगात आम्हाला आनंदाने जगायचे असेल तर आलटून पालटून आम्ही पण कधी "टाॕम" तर कधी "जेरी" व्हायला पाहीजे असे वाटते. एकही शब्द न बोलता सुध्दा जगातल्या सर्व वयोगटातील रसिकांच्या मनावर गेली कित्येक वर्षे तुम्ही राज्य करत आहात. चॕपलिन नावाच्या अशाच एका राजाने तुमच्या बरोबरीने आमच्या वर राज्य केले आहे. तुमच्या सारख्या उत्साहाने जगणाऱ्या मंडळींच्या सहवासामुळे कडक उन्हाळा सुध्दा सुसह्य वाटत आहे .बाकी सर्व ठीक.
हेच पत्र तुमच्या आयांना दाखवा आणि दिवे लागणीला आठवणीने दृष्ट काढून घ्या !!
🐀🐈.....👍👍

    *विनायक जोशी (vp)*
    📱 9423005702
मंगलधाम , हिंगणेखुर्द , लेन नंबर ४ , पुणे ५१
*electronchikatha.blogspot.com*

Top Voice Of Linkedin डाॕ.अजित पाटील

// श्री स्वामी समर्थ //
      *कर्मयोगी*
*नारायण प्रभाकर जोशी*

        *विनायक जोशी (vp)*
  📱9423005702

३ नोव्हेंबर १९६५ या दिवशी सोलापूर मधील वाडिया हाॕस्पिटल येथे जन्माला आलेल्या , गुरूप्रसाद आदर्शनगर येथे राहणाऱ्या, सिध्देश्वर प्रशाला आणि हरिभाई देवकरण हायस्कूल मध्ये शिकलेल्या , दहावीच्या परिक्षेत शाळेत पहिला आणि काॕलेज मध्ये दुसरा आलेला , अत्यंत लहान वयात लार्सन आणि टुब्रो या कंपनीत जनरल मॕनेजर पदावर विराजमान झालेल्या आणि त्या नंतर अल्ट्राटेक मध्ये *VP व Unit Head* अशी पदे भुषवणाऱ्या नारायण प्रभाकर जोशी यांच्या बद्दल डाॕ.अजित पाटील या शालेय जीवनातील मित्राने स्वयंस्फुर्तपणे मांडलेले मत . डाॕ.अजित पाटील यांच्या वरती सरस्वती मातेचा अनुग्रह झालेला आहे त्या मुळे LinkedIn वरती 72 आर्टीकल्स त्यांनी लिहीली आहेत . *The Top Voice of Linkedin 2017* म्हणून त्यांना गौरवण्यात आले आहे.

*डाॕ.अजित पाटील*
 *यांच्या नारायणला शुभेच्छा*

*Dear Narayan,*
 You proved many assumptions as myths in your career. You are the best example of what a talent can do in the corporate world when out in the hard work and sacrifice. You are the role model not only for us but for the next generation. You foiled the belief that only the IIT or IIM degree can help in climbing the corporate ladder. You are our inspiration, you are our pride possession, you are our torch bearer. Narayana we love your talent, modestly and brotherly affection. Remember distance is inversely proportionate to the affection and Kolkata is far from here. Hahaha......
💐🎂💐

*विनायक जोशी (vp)*
 📱9423005702
मंगलधाम , हिंगणेखुर्द , लेन नंबर ४ , पुणे ५१.
*electronchikatha.blogspot.com*

कौशिकी चक्रवर्ती @ मित्र महोत्सव

// श्री स्वामी समर्थ //

*मित्र महोत्सव*

आज सकाळी महाराष्ट्र टाईम्स मध्ये "मित्र महोत्सव" च्या कार्यक्रमाची जाहिरात वाचली . या वेळी सुध्दा दोन दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता *कौशिकी चक्रवर्ती* यांच्याच गाण्यांनी होणार वाचून दोन वर्षापूर्वी कार्यक्रमाची आठवण झाली.....
               *विनायक जोशी (vp)*
📱9423005702

   *अलौकिक मित्र महोत्सव २०१६*

   पंडित भिमसेन जोशी यांच्या बरोबरीने साधारणपणे वीस वर्षे "सवाई गंधर्व महोत्सव" आयोजनात महत्त्वाचा सहभाग असणारे सुप्रसिद्ध डाॕ.गोखले आणि त्यांचे चिरंजीव डाॕ.धनंजय गोखले यांची संस्था म्हणजे "मित्र फाउंडेशन ".
दिनांक २६ आणि २७ नोव्हेंबर रोजी पंडित शिवकुमार शर्मा ,कैवल्यकुमार गुरव ,शुजात खान आणि कौशिकी चक्रवर्ती अशा दिग्गजांचा कार्यक्रम पंडित फार्म्स या ठिकाणी संध्याकाळी  ६ ते १० या वेळात होता. अत्यंत स्वच्छ आणि प्रशस्त बैठक व्यवस्था होती.उत्तम दर्जाची ध्वनी व्यवस्था होती. कार्यक्रम सुरु होण्याच्या आधीच साउंड सिस्टीम अॕरेंजर बरोबरीने कलाकारांचा सराव चालू होता.कार्यक्रमाची सुरुवात डाॕ.गोखले आणि पंडित ह्दयनाथ मंगेशकर यांनी दीप प्रज्वलन करुन केली.या नंतर मात्र पंडित शिवकुमार शर्मा  यांनी अवर्णनीय अशा प्रकारे संतूरवादन केले.सलग सव्वा तास वादन केल्यानंतर दोन मिनीटांचा ब्रेक आणि त्या नंतर साथीदारांच्या बरोबरीने दुसऱ्या रागाच्या तयारीसाठी १० मिनीटे ट्युनिंग. हि १२ मिनीटे चाललेली तयारी पाच हजार रसिक कोणत्याही प्रकारची चुळबुळ न करता अनुभवत होते .ऐंशी वर्षांच्या या कलाकाराने आपल्या वादनाने आणि विनम्र भाषेने कार्यक्रमाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. यांच्या नंतर  कैवल्यकुमार गुरव यांनी आपल्या आवाजाने संपूर्ण वातावरण भारावून टाकले .अत्यंत बारीकसारीक गोष्टी अचूक पणे टिपून मनमोकळेपणाने दाद देणारा रसिक प्रेक्षक असल्यामुळे कलावंत मंडळी सुध्दा वेगवेगळ्या हरकती सादर करत होते.अर्थातच वेळेचे बंधन असल्यामुळे भैरवीने पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता झाली.दुसऱ्या दिवशी शुजात खान यांचे सतार वादन आणि दोन तबल्यावरील साथीदारांना त्यांनी दिलेली स्पेस अत्यंत लक्षणीय होती .शुजात खान यांच्या अत्यंत वेगवान आणि एकदम हळूवार अशा प्रकारच्या वादनाने संपूर्ण सभागृहात निःशब्द अशी शांतता होती.या  कार्यक्रमाचा उत्तरार्ध " कौशिकी चक्रवर्ती " यांच्या गायनाने झाला.पंडित ह्दयनाथ मंगेशकरांच्या समोर पहिल्यांदाच कार्यक्रम सादर करत असल्यामुळे कौशिकी यांनी सर्वोत्तम ते सादर केले . कार्यक्रमात  लोकांच्या आग्रहास्तव " सुंदर ते ध्यान " हे ह्दयनाथांनी संगीतबद्ध केलेले भजन त्यांच्याच परवानगीने सादर केले. या दोन दिवसात रघुनंदन पणशीकर किंवा विभावरी आपटे , राघवेंन्द्र जोशी वगैरे या क्षेत्रातील मंडळी सुध्दा रसिकांच्या रोल मध्ये दिसली.
पंडित फार्म येथील प्रशस्त पार्किंग व्यवस्था , स्वच्छ टाॕयलेटस् , उत्तम दर्जाची आसन व्यवस्था , अत्यंत उत्तम अशी ध्वनी व्यवस्था , या कार्यक्रमात उपस्थित दर्दी रसिक व अनपेक्षित पणे दर्शन झालेले पंडित ह्दयनाथ मंगेशकर आणि तंतूवाद्य किंवा व्होकल काॕर्डसचा वापर हुकूमीपणे वापरणारे विनम्र कलाकार यांच्या मुळे  कमालीचे समाधान मिळाले. पंडित शिवकुमार शर्मा किंवा शुजात खान यांच्या वादना नंतर या असामान्य कलावंतांचे आपण पुलंच्या "रावसाहेबांसारखे कौतुक" करु शकत नाही याची परत एकदा जाणीव झाली................!

*विनायक जोशी (vp )*
  📱9423005702
मंगलधाम , हिंगणेखुर्द ,लेन नं ४ , पुणे ५१
  २९ नोव्हेंबर २०१६
*electronchikatha.blogspot.com*

बिझनेस हेड ...संदीप कुलकर्णी

// श्री स्वामी समर्थ //

    *आनंदयात्री व्यवसाय प्रमुख*

   *संदीप कुलकर्णी*

  *Business Head*
*ULAS Pvt . Ltd.*

              *विनायक जोशी (vp)*
               *१० डिसेंबर २०१८*

  अत्यंत उत्तम आणि उमदे व्यक्तिमत्त्व असलेल्या या मुलाने "ट्रेनी इंजिनियर ते बिझनेस हेड" अशी प्रगतीची वाट अत्यंत आनंदाने व अविरत कष्टाने पार केली आहे. आहे.नाशिक येथे वडिलांची नोकरी असल्यामुळे बालपण व शिक्षण येथेच पूर्ण केले. पहिली नोकरी " बुस्ट " या कंपनीत केली.या नंतरच्या  कारकिर्दीची सुरुवातच माणसांची उत्तम पारख असलेल्या पुण्यातील "UL" कंपनी मध्ये झाली. अत्यंत आक्रमक मार्केटिंग आणि त्याला योग्य असा सातत्यपूर्ण दर्जेदार उत्पादन करणारा विभाग यामुळे" संदीप कुलकर्णी "या नावाला असंख्य देशी आणि विदेशी कंपन्यामध्ये   कमालीची विश्वासार्हता प्राप्त झाली आहे .
कोणत्याही कामाला अथवा माणसाला कमी न लेखणे ,काळानुरुप नवीन नवीन  गोष्टी शिकणे , आपल्या बरोबरीने काम करणाऱ्या माणसांना उत्तम दर्जाचे काम आनंदाने करण्यासाठी कायम प्रेरित  करणे ,कामाचे श्रेय कायमच आपल्या सहकार्यांना देणे ही त्याची सहज प्रवृत्ती आहे.
योगासने या विषयात विशेष गती असलेली *भाग्यश्री* त्याला उत्तम अशी जीवनसाथी म्हणून लाभली आहे. *सायली आणि सार्थक* या दोन मुलांनी त्याला कायम उत्साहाने रहायला प्रेरित केले आहे. असंख्य गाणी त्याला तोंडपाठ आहेत आणि तो उत्तम प्रकारचा गायक सुध्दा आहे. प्रशांत  सारख्या  जिवलग मित्राची आणि सचिन या धाकट्या भावाची त्याला उत्तम साथ आहे. योगासने आणि व्यायामाची आवड असल्यामुळे शारीरिक आणि मानसीक आरोग्य उत्तम राखले आहे.
त्र्यंबकेश्वरा पासून ते पांडव लेण्यां पर्यंत अध्यात्मिक समृद्धीने समृद्ध असे नाशिक हे मुळ गाव असलेल्या आणि शेगावच्या संत गजानन महाराजांच्या  "जय गजानन " या षडाक्षरी मंत्राचा आशिर्वाद लाभलेल्या या आमच्या  साथीदाराची भावी वाटचाल सुध्दा असंख्य लोकांना आनंद देणारी आणि यशोदायी ठरो !!!

*विनायक जोशी (vp )*
  9423005702
मंगलधाम, हिंगणेखुर्द,लेन नंबर ४,पुणे ५१
*electronchikatha.blogspot.com*

व्हॕलेंटाईन्स डे निमित्ताने

// श्री स्वामी समर्थ //
    *व्हॕलेंटाईन्स डे*

 आज प्रेमाच्या कृतज्ञतेचा दिवस म्हणजेच "व्हॕलेंटाईन डे"
             *विनायक जोशी (vp)*
📱9423005702

 माझ्या आयुष्यात आलेल्या असंख्य प्रेमळ मंडळींच्या काही आठवणी.कमालीच्या शिस्तीचे आणि कर्तृत्त्ववान अशा आई-वडिलांची पहिली आठवण , पहिला पणतू म्हणून सोन्याची फुले उधळणाऱ्या पणजीची , आयुष्यभर फक्त आणि फक्त लाडच करत आलेल्या आज्जीची , असंख्य आनंदाची कारंजी उडवणाऱ्या काका मंडळींची , कमालीची तत्त्वनिष्ठता बाळगणाऱ्या मामा मंडळींची , अतिशय सुंदर अशा सोलापूर मधील आदर्शनगर काॕलनीची, याच बरोबर शिक्षण प्रसारक मंडळींच्या शाळेची किंवा  शाळा ही फक्त आणि फक्त खेळण्यासाठी किंवा आनंदाने बागडण्यासाठी असते हे ज्यांच्या मुळे अनुभवता आले त्या शाळेतल्या मित्रांची , वालचंद काॕलेज मधील आमचे आवडते स्मृतीस्थळ म्हणजेच "आम्रपाली हाॕटेल" आणि कोणत्याही प्रकारच्या चिंता न करणाऱ्या  मित्र मंडळींची , पुण्यातील माॕडेल काॕलनी , कँम्प , पाॕलिटेक्निक ,संचेती हाॕस्पिटल, वाकडेवाडी,नारायणपेठ,
पद्मावती,विठ्ठलवाडी या भागातील गेल्या ३५ वर्षातील असंख्य आनंदी माणसांची आणि प्रसंगांची आज आठवण झाली.तळजाई या टेकडीवरच्या निसर्गाची किंवा नायक्रोम नावाच्या विद्यापीठाची आणि त्यामुळे संपर्कात आलेल्या असंख्य लोकांची , सर्व आजीमाजी विद्यार्थ्यांची , वेगवेगळ्या क्षेत्रातील ऋषीतुल्य अशा गुरूंची ,
भाग्याला सुध्दा हेवा वाटावा अशा भावंडांची आणि नातेवाईकांची, कमालीच्या गोड नातींची,
आमच्या अत्यंत आनंदी घराला तथास्तु असा आशिर्वाद देणाऱ्या वास्तूची आणि कोणताही द्वैतभाव शिल्लक नसलेल्या "कल्याणी "या घराच्या गृहलक्ष्मी बरोबरीने साजऱ्या केलेल्या अनेक आनंदी प्रसंगांच्या मालिकांची आजच्या दिवशी म्हणजेच "व्हॕलेंटाईन डे" ला उजळणी झाली !!!

*विनायक जोशी (vp)*
14 February 2019
 📱9423005702
*electronchikatha.blogspot.com*

नादखुळा जिनियस ...मंदार सोवनी

// श्री स्वामी समर्थ  //
     *Tax Free*

🎭🎭       🎭 🎭
१६ मार्च २०१९ या दिवशी क्लेटाॕन व्हिक्टोरीया या मेलबर्न जवळील भागात "टॕक्स फ्री " नावाची अप्रतिम एकांकिका उत्तम पणे सादर करण्यात आली. या एकांकिकेत जन्मतः किंवा अपघाताने अथवा रोगामुळे आंधळे झालेले असे आंधळे नसून आयुष्यात त्यांच्या वर झालेल्या अन्याया बद्दल भाष्य करणारे ते आंधळे आहेत . या आंधळे नसलेल्या चार आंधळ्यांचे भावविश्व अतिशय मार्मिकपणे मांडले आहे . या एकांकिकेत मुळचा कोल्हापूरचा परंतु सध्या मेलबर्नवासीय झालेल्या मंदार सुरेश सोवनी याने एका आंधळ्याची अप्रतिम भूमिका केली होती ......🎭🎭
     *नादखुळा जिनियस*
     *मंदार सुरेश सोवनी*

           विनायक जोशी (vp)
📱9423005702

 ८ सप्टेंबर १९८४ या दिवशी कोल्हापूर मध्ये ताराबाई पार्क येथे हे चुणचुणीत बाळ जन्माला आले.खेळांची प्रचंड आवड . अभ्यास वगैरे किरकोळ गोष्टी परीक्षेच्या आदल्या दिवशी किंवा  शेवटच्या क्षणी . क्रिकेट मधील पहिले शतक " रुबी अपार्टमेंट" मधील बाल मित्रांच्या बरोबर खेळताना मारले.हा नववीत असताना त्याचा केदारदादा १२ वीला बोर्डात ११वा आला. त्या मुळे आता आपण सुध्दा अभ्यास करायाला पाहीजे असे वाटून थोडासा अभ्यास करुन हा सुध्दा बोर्डात ४ था आला. या नंतर मात्र बिट्स पिलानी येथे पुढील शिक्षण .पिलानी येथे त्याच्या बरोबरीने शिकणारी रेणूका दिक्षीत ही अत्यंत गुणी मुलगी आयुष्यातील जोडीदारीण म्हणून त्याच्या आयुष्यात आली. डिजीटल सिग्नल प्रोसेसींग मध्ये अभ्यास करण्यासाठी आणि MS करण्यासाठी मेलबर्न येथे प्रयाण. MS पूर्ण झाल्यावर तेथेच आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करत आहे. Yarrallen cricket club कडून प्रत्येक शनिवारी आणि रविवारी खेळत आहे. मेलबर्न येथील क्रिकेटचा किंवा आॕस्ट्रेलियन ओपन टेनिसचा मनमुराद आनंद आपल्या लहान मुलींच्या बरोबरीने तो घेत आहे .तेथील हौशी मराठी मंडळींच्या बरोबर मराठी नाटकात किंवा छोट्या सिनेमात काम करत आहे. वयाच्या तिसऱ्या वर्षापासून प्रत्येक उन्हाळ्यात सोलापूर मध्ये आपल्या आजी आणि आजोबांच्या कडे दोन महिने रहाणारे हे चलाख व्यक्तिमत्व आता " सिग्नल प्रोसेसींग " मध्ये बऱ्याच जणांना मार्गदर्शन करत आहे .अतितचा " वडा " असो किंवा कोल्हापूरची मिसळ आजही तेवढ्याच आवडीने खाणे आणि कोल्हापूरला  असताना शिवाजी विद्यापीठात जाऊन विद्यार्थ्यांना मुलभूत संकल्पना समजावून सांगणे हे त्याचे आवडीचे काम. पहिलीचा होमवर्क करताना जी सहजता होती तिच MS पूर्ण करेपर्यंत कायम ठेवणाऱ्या या उमद्या आणि खिलाडूवृत्ती असलेल्या दिलदार भाच्याला म्हणजेच " मंदार सोवनी " याला आमच्या कडून प्रत्येक नवीन उपक्रमासाठी अनेक शुभेच्छा !

*विनायक आणि कल्याणी मामी*
📱9423005702
मंगलधाम , हिंगणेखुर्द , लेन नंबर ४ , पुणे ५१
*electronchikatha.blogspot.com*

कायमचा विद्यार्थी

// श्री स्वामी समर्थ //
   *कायमचा विद्यार्थी*

*विनायक जोशी (vp)*
 📱9423005702

एकदा "विद्यार्थी " ही कायम स्वरूपी पदवी तुम्हाला मिळाली की जगातल्या "मानापमान" नावाच्या नाटकातून तुमची कायमची मुक्तता होते. साधारणपणे  प्रत्येक तीन वर्षांनी बदलणाऱ्या आणि नवीन ज्ञानासकट येणाऱ्या  पिढी कडून सध्याचे उपयुक्त ज्ञान घेण्यासाठी तुम्ही मोकळे होता.वासरातील लंगडी गाय होवून कंटाळवाणे तत्त्वज्ञान शिकवत बसण्यापेक्षा आपल्या बरोबर असलेली आणि कानात वारा शिरल्या प्रमाणे बागडणारी तरुण वासरे बघून उत्साहाने राहू शकता.तुमच्या क्षेत्रातील थोडी जरी व्यवहारात उपयोगी पडणारी  कला  तुमच्याकडे असेल तर सध्याचे "गुगल पंडीत" आवर्जून ती शिकायला तयार असतात. देवदयेने उपजतच मिळालेल्या " हसणे " या जागतिक दर्जा प्राप्त भाषेचा मुक्त वापर करता आला तर सोन्याहून पिवळे .
विनाकारण गंभीर चेहरा ठेवून वावरणारी  मंडळी  ही आदरणीय होण्या ऐवजी चेष्टेचा विषय होतात याची पूर्ण जाणीव ठेवून नवीन पिढीचा अर्थातच तरुणाईचा विलक्षण धाडसी आविष्कार बघत प्रवास चालू आहे .!
🤔🤔❎❎
 😃😃√√√
 
*विनायक जोशी (vp)*
   📱9423005702
 मंगलधाम , हिंगणेखुर्द , पुणे ५१
*electronchikatha.blogspot.com*

लिफ्टचे अंतरंग

// श्री स्वामी समर्थ  //
       *लिफ्टचे अंतरंग*

     *विनायक जोशी(vp)*
 📱9423005702

पुण्यातील सुप्रसिद्ध कंपनी "इंडीटेक सिस्टीम्स " आणि या कंपनीचे मॕनेजींग डायरेक्टर "विजय बढे" यांच्या मुळे "लिफ्ट " या विषयी थोडेफार मुलभूत आणि आनंददायी ज्ञान मला मिळाले आहे.
कोणत्याही इमारतीच्या
तळमजल्यापासून सर्वात उंच अशा शेवटच्या मजल्या पर्यंत वेगवान पद्धतीने नेणारा आणि सुरक्षितपणे परत तळमजल्यावर आणणारा मेकॕनिझम म्हणजेच "लिफ्ट ".या मध्ये ज्या खोलीत उभे राहून आपण प्रवास करतो त्याला "कार" असे म्हणतात .या कार मध्ये असंख्य बटणे असलेले एक पॕनल असते त्याला "सीओपी" किंवा कार आॕपरेटींग पॕनल म्हणतात .या मध्ये आपल्याला ज्या मजल्यावर जायचे आहे त्यांची बटणे असतात किंवा याच बरोबर  मॕन्यूयली दरवाजा उघडणे किंवा बंद करणे अथवा लाईट आणि पंखा चालू बंद करण्यासाठी लागणारी बटणे सुध्दा  असतात.या खोलीतूनच  वाॕचमनशी संपर्क साधण्यासाठी इंटरकाॕमची सुध्दा सोय असते.याच कार मध्ये  लिफ्टच्या आॕपरेशन विषयी सतत अपडेट करणारी ध्वनी व्यवस्था असते.या मधून असंख्य उपयुक्त सुचना कायम मिळत असतात. उदाहरणार्थ लिफ्टचा दरवाजा उघडा आहे किंवा पाॕवर फेल झाली आहे तरी थोड्याच वेळात आपण सुरक्षित ठिकाणी जात आहोत वगैरे सुचना मिळतात.या खोलीला काउंटर बॕलन्सिंग करण्यासाठी लोड किंवा वजने लावलेली असतात.या खोलीच्या आत जास्त लोकांनी गर्दी केली तर ओव्हरलोडींग चेक करण्यासाठीची व्यवस्था असते . या खोलीला असलेला दरवाजा म्हणजेच कार गेट आणि त्या बरोबरच बाहेरील बाजूस असलेले लँडींग गेट व्यवस्थित बंद झाले आहे हे कायम तपासले जात असते.लिफ्ट प्रत्येक मजल्यावर ज्या ठीकाणी थांबते त्याला " लँडींग " स्टेशन असे म्हणतात .या प्रत्येक स्टेशनवरती लिफ्ट कारला काॕल देण्यासाठी एक बटण असते आणि लिफ्ट कोणत्या मजल्यावर आहे ते दर्शविणारा दर्शक असतो यालाच "LOP" किंवा लँडींग आॕपरेटींग पॕनल असे म्हणतात . या लिफ्टच्या कारला वेगाने नेणे किंवा सावकाश पणे योग्य त्या ठीकाणी थांबवणे या साठी आधुनिक तंत्रज्ञान वापरलेले असते. लिफ्ट तळमजल्यावर पोचली किंवा  सर्वात वरच्या मजल्यावर गेली कि त्या नंतर मात्र  मर्यादेच्या बाहेर जाऊ नये म्हणून वेगवेगळ्या प्रकारची सुरक्षा प्रणाली कार्यरत होते. लिफ्टच्या साठी लागणारी मोटार , ब्रेक किंवा लिफ्टच्या मूलभूत आॕपरेशनला लागणारी प्रणाली असलेले कंट्रोल पॕनल अशा सर्व गोष्टी एकत्रित ठेवण्यासाठी एक लिफ्टरुम असते. लिफ्ट मधून प्रवास करणाऱ्या मंडळींची सुरक्षितता याला सर्वात जास्त महत्त्व असते. लिफ्ट नावाच्या या इलेक्ट्रोमेकॕनिकल मशिनला अतिशय सुंदर आणि सुरक्षित पणे चालविण्याचे काम मेकॕनिकल आणि इलेक्ट्रॉनीक्स सिस्टीम्स नावाचे  हे दोन मित्र एकमेकांच्या सहाय्याने पार पाडत असतात.लिफ्टचा आणि  लँडींग गेटचा दरवाजा बंद झाला की अत्यंत आनंदाने आणि धक्के विरहीत प्रवास चालू होतो. अतिशय उंच इमारतींच्या आत शिरताना कधीतरी "दिवार" मधील अमिताभच्या संवादाची आठवण येते किंवा "आर्मर आॕफ गाॕड" मध्ये जॕकी चॕनने अत्यंत उंच अशा डोंगराच्या कड्या वरुन मारलेल्या उडीची आठवण येते.
मजा वाटते. सध्याच्या काळाला अनुरूप असे " स्पर्श विरहीत आॕपरेटींग पॕनल" नावाचे आधुनिक तंत्रज्ञान मनाला मात्र "स्पर्श "करुन जाते. थोड्याच वेळात शून्या कडून उंची कडे म्हणजेच प्रगतीच्या दिशेने सुरक्षित आणि वेगवान प्रवास चालू होतो !

 *विनायक जोशी (vp)*
📱9423005702
मंगलधाम , हिंगणेखुर्द, पुणे ५१
*electronchikatha.blogspot.com*

वेळणेश्वर समुद्र

// श्री स्वामी समर्थ  //
      *वेळणेश्वर समुद्र*

    *विनायक जोशी(vp)*
📱9423005702

वेळणेश्वराच्या समुद्राच्या किनाऱ्यावर उभा असताना पहिली आठवण अगस्ती ऋषींची आली.आठ वर्षे जाफराबादच्या समुद्राजवळ राहिलेल्या नारायणला बघून असंख्य लाटा अतिशय वेगाने आणि आनंदाने आमच्या कडे झेपावल्या आणि परत जाताना दीव आणि जाफराबाद मधील आपल्या भावंडांची खुशाली विचारून परतल्या. येणारी प्रत्येक लाट एका वेगळ्याच आणि सर्व समावेशक आनंदाची अनुभूती देत होती.या किनाऱ्यावर कृत्रीम आनंदाच्या कोणत्याही गोष्टी नव्हत्या. सोमरस प्राशन करून येणाऱ्यांना येथे बंदी होती. लखलखणाऱ्या फेसाळलेल्या लाटा आणि पायाखालून सरकणारी बारीक वाळू या दोन्हीही प्रकारांचा मनमुराद आनंद घेत दोन तास कसे गेले ते कळलेच नाही.साधारणपणे पाच वाजता आम्ही काठावर येऊन ओळीने थांबलो.दूर अंतरावरा क्षितीजा वरती ३-४ बोटी एकाचजागी डुलत उभ्या होत्या.त्या बोटीं बद्दल , तेथे असलेल्या पाण्याच्या खोली बद्दल , बोट बॕलन्सिंगचे महत्त्वाचे काम करणाऱ्या कप्ताना बद्दल , दररोज येणाऱ्या भरती आणि ओहोटी बद्दल किंवा पौर्णिमेला आणि अमावस्येला स्वभावातील वेगळेपणा दाखवणाऱ्या समुद्राच्या बद्दल , लांबूनच बोटींना दिशा दाखवणाऱ्या दीपगृहा बद्दल नारायणने स्पष्ट आणि स्वच्छ माहिती सांगितली. संध्याकाळी साडेपाच वाजता त्या अत्यंत तेजस्वी आणि अथांग अशा सागराचा निरोप घ्यायची वेळ आली. "ने मजसी ने परत मायभूमीला" हे महाकाव्य लिहिणाऱ्या प्रखर देशभक्त स्वातंत्र्यवीर सावरकरांची तीव्र आठवण झाली. अनपेक्षित आणि आनंददायी अश्या वेळणेश्वराची एक दिवसाची यात्रा पूर्ण झाली होती.येताना परत एकदा मर्यादा पुरुषोत्तम असून सुध्दा वेळप्रसंगी हातात परशु घेतलेल्या परशुरामांचे दर्शन झाले. बरोबर तीन वर्षांनी एकत्र जमलेल्या कुटुंबातील सर्व आनंदयात्रींनी कमालीच्या उत्साहाने परत कोकणात यायचेच असा ठराव पास केला आणि  कऱ्हाड कडे परत निघालो.......


१२ मे २०१८ संध्याकाळचे ५
*विनायक जोशी (vp)*
📱9423005702
जोशी , जोगदंड , सोवनी , साने

Linux Kernel Master.....Kedar Sovani

// श्री स्वामी समर्थ //
     *केदार सुरेश सोवनी*
*Linux Kernel Master*

*विनायक जोशी (vp)*
 📱9423005702

 २५ एप्रिल १९८१ या दिवशी सौ.सुनीता जोशी- सोवनी या आदर्शनगर सोलापूर येथे माहेर असलेल्या मुलीला वाडिया हाॕस्पिटल मध्ये डाॕ.साठे मॕडम यांच्या अध्यक्षतेखाली एक छानसा मुलगा झाला. तो म्हणजे *केदार*. लहानपणापासून अतिशय चूणचूणीत होता.आपल्या शालेय जीवनातील अनेक उन्हाळी सुट्या त्याने सोलापूर येथील आजोळीच मनसोक्त बागडून घालवल्या आहेत. *अतिशय उच्च दर्जाचा काॕमनसेन्स वापरून आणि आवडती कामे एकाग्रता पूर्वक करून त्याने लहान वयातच अनेक विभागात यश संपादन केले आहे*.

*1*) बारावीला बोर्डात अकरावा.
*2*) BE computer  पुण्यातील PICT मधून पूर्ण केले
*3*) MS Bits Pilani मधून.
*4*) वयाच्या २४ व्या वर्षी जगप्रसिध्द Linux Journal मध्ये पहिला लेख लिहिला.
*5*)ओॲसीस या संस्थेसाठी  Linux OS बद्दलचा शैक्षणिक व्हिडीयो तयार केला.
*6*) पहिला जाॕब कॕलसाॕफ्ट कंपनीत.
*7*) न्युयाॕर्क युनव्हर्सिटीच्या प्राध्यापकांच्या बरोबर थोडे दिवस काम केलै
 *8*) Linux आणि IOT या विषयांचा  प्रचंड अनुभव
*9*) मार्व्हल कंपनीच्या मधून तयार केलेल्या ४० लाखांपेक्षा जास्त चालणारी माॕड्यूल्स बाजारात
*10*) जगप्रसिध्द Apple कंपनीच्या आधुनिक मोबाईलसाठी वायफाय विषयी सल्ला देणाऱ्या टीमचा मेंबर
*11*) GEEK चा रेग्युलर स्पीकर
*12* ) ड्रीम्झ ग्रुपचा फाउंडर मेंबर
*13*) Espressif system येथे Technical Director म्हणून सध्या कार्यरत.

*इरा आणि गौरी* सोवनी यांच्या बरोबरीने अत्यंत आनंदाने पुण्यात वास्तव्य.कामासाठी अमेरिका आणि चीनचे अखंड दौरे चालू असलेल्या या आमच्या भाच्याला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
💐💐🎂🎈🎂💐💐

  *विनायक जोशी (vp ) आणि कल्याणी मामी*
 📱9423005702
मंगलधाम,हिंगणेखुर्द,पुणे ५१
*electronchikatha.blogspot.com*

IIT Kharagpur ... केंकरे सर

// श्री स्वामी समर्थ //
        *केंकरे सर*
   *IIT Kharagpur*

*विनायक जोशी (vp)*
 📱9423005702

 सद्गुरु जग्गी वासुदेव यांचा *Inner Engineering* बद्दलचा व्हिडीयो यू ट्यूब वरती बघितला आणि पहिली आठवण आली ती केंकरे सरांची. साधारणपणे सहा फूट उंची आणि त्याला अनुसरून उत्तम तब्येत. आमच्या कंपनीतील ते पहिले IIT. त्या काळात  शेतकऱ्यांना दुधाच्या ॲटोमॕटीक मशीन्सची आणि पिशव्यांची उपयुक्तता पटवून देतानाची एक व्हिडीयो कॕसेट कंपनीने काढली होती त्या मध्ये त्यांचे दर्शन पहिल्यांदा झाले. कोणीही पाहूणे आले की त्यांना नवीन कामांची माहिती देणे वगैरे कामे त्यांना करावी लागत. त्या काळी मायक्रो प्रोसेसर युगाची नुकतीच सुरवात झाली होती. प्रोसेसर वापरुन पॕकेजींग मशीनचे कंट्रोलर करायचे ठरले.  यावेळी त्यांच्या  हाताखाली माझी नेमणूक झाली. अप्पा बळवंत चौकातून मोठ्ठा फळा आणून आमचा क्लास चालू झाला. अर्थातच  या क्लास मध्ये  ७१ चे युध्द किंवा  त्या मुळे  खरगपुर IIT मध्ये  असलेले black out किंवा त्या काळातील तीन  मजली computation मशीन्स वगैरे विषयाचे ज्ञान सुध्दा मिळत होते. आमच्या दोघांची वेव्हलेंग्थ जमायचे एक कारण म्हणजे अतिशय किरकोळ किंवा फालतू गोष्ट असेल तरीही भरपूर हसणे. नवीन डिझाईन मधील  कोणत्याही गोष्टी बद्दल अतिशय खोल विचार करणे ...वगैरे. या विषयांची आवड त्यांच्याच मुळे वाढली . एखाद्या वेगाने चालू- बंद होणाऱ्या  LED कडे बघून साधारणतः मिली सेकंदां मध्ये  On time सांगणे, एखाद्या गोष्टीला हात लावून अंदाजे त्याचे तापमान सांगणे , Solenoids च्या आवाजावरुन मशीनच्या तब्येती बद्दलचे आडाखे बांधणे  वगैरे गोष्टी त्यांच्या मुळेच शिकता आल्या . थोडक्यात माझ्या  आयुष्यात मशीन्स सुध्दा बोलतात या पर्वाची सुरवात त्या काळात झाली . फ्लो चार्ट काढणे , हँड कोडींग करणे ,वेगवेगळ्या नाॕपची जागा ठेवणे  वगैरे कष्टदायक आणि कंटाळवाण्या गोष्टी ते चिकाटीने करत असत. अत्यंत आनंदाने गडगडाटी हसणाऱ्या आणि अत्यंत परफेक्ट काम करणाऱ्या या माणसामुळे" IIT खरगपुर" ही दिलदार आणि उमद्या मंडळींची संस्था आहे असा कायमचा ठसा उमटला ! आजही नवीन डिझाईन्स  करताना बरीच आकडेमोड करुन एखाद्या कांपोनंटची अव्यवहार्य किंवा अवास्तव अशी व्हॕल्यू येते त्या वेळी केंकरे सरांची आणि त्यांच्या मनमोकळ्या हसण्याची आठवण येते !!!!

*विनायक जोशी (vp )*
📱9423005702
मंगलधाम , हिंगणेखुर्द , पुणे ५१
*electronchikatha.blogspot.com*

रसिकाग्रणी बाळूकाका ...अनंत जगन्नाथ फाटक

// श्री स्वामी समर्थ //
  *रसिक बाळूकाका*

        *विनायक जोशी (vp)*
 📱9423005702

कोणत्याही कलावंताचा आत्मा म्हणजे रसिक असा प्रेक्षक असतो. दैनंदिन आयुष्यात जगण्यासाठी म्हणून कलावंताना मानधनाची पाकिटे घ्यावी लागत असली तरी संतुष्ट अशा रसिकांची मिळणारी दाद ही जास्त अनमोल असते.अशाच एका अत्यंत कलासक्त असलेल्या किंवा जुन्या गाण्यांची ओळन् ओळ पाठ असलेल्या रसिक माणसाची आणि माझी गाठ पडली होती. घरामध्ये अजिबात संगीताचे वातावरण नसताना या सद्गृहस्थाला मात्र या मधील बारकावे अतिशय बारकाईने कळत .गाण्याचा लहेजा  किंवा गाण्याच्या  मधील ठेहराव ,गाण्यातील शब्दांचे योग्य जागी होणारे अचूक लँडींग या बाबतीत कमालीची खोल जाण त्यांना होती. कलाकारांना सुध्दा बऱ्याच वेळेला आपली कला सादर करताना समोरून तसाच उत्तम दर्जाचा प्रतिसाद मिळत गेला तर ती कलाकृती सर्वांचीच भरभरून दाद घेऊन जाते. वेडे रसिक या कॕटेगरी मध्ये बसणारा हा अत्यंत हूशार गृहस्थ व्यवहारी जगापासून फारच दूर होता.लता मंगेशकर यांनी गायलेली बहूतांश गाणी ही त्या मधिल सर्व बारकाव्यां सकट पाठ होती.सकाळी उठल्या पासून त्याच नादात अगदी मध्यरात्र होई पर्यंत .कोणतेही जादा कष्ट न करता सहजपणे डाॕक्टर होईल अशा प्रकारची कुशाग्रता असलेला हा माणूस अभ्यास सोडून वेगवेगळ्या कार्यक्रमाना हजेरी लावत फिरत होता.त्यांचा आदर्श असलेल्या मंगेशकरांच्या " प्रभूकुंज" ला सुध्दा त्यांनी भेट दिलेली होती.मंगेशकर कुटुंबातील तिसऱ्या पिढीची मंडळी सुध्दा या रसिक माणसाला कोठेही भेटली तरी आदराने ओळख देत असत.वेष असावा बावळा , परी अंतरी नाना कळा अशा प्रकारे राहणाऱ्या  या जबरदस्त संगितप्रेमी माणसाला वेळेचे,व्यवहाराचे किंवा शिस्तबद्ध आयुष्याचे अजिबात भान नव्हते .  साचेबध्द , संस्कारी वगैरे प्रकारे आयुष्य जगणाऱ्या आणि त्यालाच यशस्वी म्हणणाऱ्या आमच्या सारख्या सामान्य माणसांची ही "वादळे "अजिबात पर्वा करत नाहीत .ती येतात .त्यांना पाहीजे तशी विन्मुक्त पणे राहतात आणि अचानक एके दिवशी  स्वर्गीय संगित ऐकण्यासाठी स्वर्गाकडे निघून जातात अगदी  आमच्या बाळूकाकांच्या सारखी म्हणजेच *अनंत जगन्नाथ फाटक* या अवलिया सारखी !

*विनायक जोशी (vp )*
 📱9423005702
मंगलधाम , हिंगणेखुर्द , लेन नं ४ , पुणे ५१
*electronchikatha.blogspot.com*

Multitasking ...संजू सरवटे

// श्री स्वामी समर्थ //
     *Multitasking*
        *संजय सरवटे*
       
               *विनायक जोशी(vp)*
📱9423005702

 साधारणपणे तीस वर्षांपूर्वी या मुलाची आणि माझी ओळख विदर्भातील  "आवारपूर" या ठिकाणी लार्सन आणि टुब्रो च्या सिमेंट प्लान्ट मध्ये झाली. बिलासपूर हून आलेला , MSC झालेला , डाॕक्टरेट करण्यासाठी लागणारी तयारी करणारा , उत्कृष्ट चित्रे काढणारा , चारशे ते पाचशे गाण्यांच्या मधील संगीताच्या पीसेसचे सखोल ज्ञान असलेला , शालेय जीवनात आॕडीयो अॕंम्प्लिफायरची पूर्ण कपॕसिटी तपासण्याच्या नादात खिडकीच्या काचांना रामराम करायला लावणारा , कंपनीच्या क्वार्टर मध्ये घरगुती साहित्याचा जास्तीतजास्त वापर करुन TV बनवणारा असा हा चुणचुणीत मुलगा होता. डॕनीश , जर्मन , जॕपनीज वगैरे परदेशी तयार झालेले असंख्य कंट्रोलर्स अहोरात्र चालू स्थितीत ठेवण्याचे महत्त्वाचे काम यांच्या विभागाला करावे लागत असे.प्रोसेस कंट्रोल प्लान्ट मध्ये एक मिनीट जरी प्रोसेस बंद पडली तर लाखो रुपयाचे नुकसान होते याची वस्तुनिष्ठ जाणीव असलेल्या टीमचा तो एक भाग होता. याला एक असे वरदान मिळालेले आहे कि हा मुलगा एकाच वेळेला तीन किंवा चार गोष्टींचा खोलवर विचार करुन प्राॕब्लेम सोडवत असे , अगदी Quad Core Processor सारखे एकाचवेळी पण स्वतंत्रपणे . आवारपूरच्या अत्यंत खडतर अशा हवामानात प्रोसेस प्लाॕन्ट मध्ये काम केलेले हे सर्व डेयर डेव्हिल्स आज वेगवेगळ्या ग्रुपचे AVP, Unit Head वगैरे जबाबदाऱ्या उत्तम प्रमाणे निभावत आहेत . अत्यंत आनंदी बायको निशा आणि सोन्या सारखी दोन मुले ही त्याची मोठ्ठी जमेची बाजू आहे. १९९७ च्या मे महिन्यात तो सोलापूर मध्ये आमच्या घरी आला होता. अर्थातच दोन जिवलग मित्र एकत्र आल्यामुळे सर्वांनी गाणे म्हणण्याची फर्माइश केली. थोड्याच वेळात संजू आणि अल्ट्राटेकचे Unit Head नारायण जोशी या दोघांनी मिळून " हृदयनाथ मंगेशकरांनी संगीत दिलेल्या " जैत रे जैत " मधले "आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखरं..." गाणे म्हणायला सुरवात केली आणि पूर्ण घर चैतन्याने भारुन गेले......   अर्थातच लता मंगेशकर, स्मिता पाटील ,जब्बार पटेल यांच्या सुरेख अशा सिनेमाची आणि या सिनेमातील गाणी आम्हाला म्हणून दाखवणाऱ्या *Reliance Cement चे Vice Precident  संजू सरवटे* या अनेकाग्रतेचा आशिर्वाद लाभलेल्या अवलियाची ही छोटीशी आठवण  !

*विनायक जोशी ( vp )*
 📱9423005702
मंगलधाम , हिंगणेखुर्द , लेन नंबर ४ , पुणे ५१
*electronchikatha.blogspot.com*

मायकेल शुमाकर शहेनशहाची फेरारी

// श्री स्वामी समर्थ //
  *मायकेल शुमाकर*
  *शहेनशहाची फेरारी*

*विनायक जोशी(vp)*
 📱9423005702

 किर्लोस्कर आॕईल इंजिन्स या कंपनीत डिझाईन आणि डेव्हलपमेंट विभागात काम केलेल्या एका अत्यंत आनंदी आणि अधिकारी व्यक्तीने अॕटोमोबाईल या क्षेत्रातील अनेक बारीकसारीक गोष्टींची जवळून ओळख करुन दिली . राॕयल एनफिल्ड या गाडीला असणाऱ्या स्टार्टर ने आमचा या क्षेत्रात श्रीगणेशा झाला . त्यानंतर मात्र पिधमपूर येथील हिंदुस्थान मोटर्स या कंपनीच्या लान्सर गाडीचा गियर बाॕक्स किंवा टाटांच्या इंडिकाचा गियर बाॕक्स आणि वेगवेगळ्या कंपन्यांच्या इंजिन टेस्टिंगला लागणारी मशीन्स , आॕईल सिल्स पासून ते दोन्ही चाकांचा समन्वय साधणाऱ्या मेकॕनिझम्स बरोबरीने अत्यंत आनंदी आणि उत्कंठा वर्धक प्रवास घडला. एकूणच वेगवान असा एयर कटींगचा आवाज , इंजिन्सचा आवाज , फायरिंगचा आवाज वगैरे परिचयाचे झाले . या सर्व बॕकग्राऊंड वरती फाॕर्म्युला वनच्या ट्रॕक वरती पोल पोझीशन साठी सज्ज झालेल्या वीरपुरुषाचे म्हणजेच मायकेल शुमाकरचे पहिले दर्शन झाले. रेसिंग ट्रॕक वरती अत्यंत सहजतेने  चाललेल्या मायकेल शुमाकरच्या फेरारीच्या थरारक करामती बघण्यात पुढील पाच - सहा वर्षे कशी गेली ते कळालेच नाही. कोणत्याही प्रकारच्या हवामानात आणि वेगवेगळ्या देशात अतिशय सहजतेने तेथील सर्किट्स वरती हुकुमत गाजवणारा हा अनभिषिक्त राजा हजारो महामृत्युंजय यज्ञाचे पुण्य घेऊन आल्या सारखा वावरत होता. कोणतीही रेस संपल्यावर हसतमुख पणाने प्रेक्षकांना अभिवादन करणारा मायकेल शुमाकर हा कायम स्मरणात राहिला. फेरारी या कंपनीने "मायकल शुमाकर " नावाची कवचकुंडले उतरवल्यावर मात्र फाॕर्म्युला वनपासून हळूहळू दुरावलो. आता पावसाच्या सिझन मध्ये एखादी यामाह गाडी वेगाने जवळून गेली की जुन्या आठवणी जागृत होतात . रेसिंग ट्रॕक वरती धोधो पाऊस पडत असताना सुध्दा ठिणग्यांची आतषबाजी करत दिमाखात येणारी फेरारी आणि तिच्या बरोबर असलेला शहेनशहा मायकेल शुमाकर हे दोघेही सुखरुपपणाने विजयी व्हावेत म्हणून ती थरारक रेस पूर्ण होईपर्यंत एकाच जागी अस्वस्थपणाने बसून रहायचे दिवस संपुष्टात आले....!

*विनायक जोशी (vp)*
 📱9423005702
मंगलधाम , हिंगणेखुर्द ,
पुणे ५१
*electronchikatha.blogspot.com*

हास्यसम्राट दिपक ते गुरूराज अवधानी

// श्री स्वामी समर्थ //
        *कलावंत*

*दीपक देशपांडे*

   *विनायक जोशी (vp)*
📱9423005702

एका छानशा टुमदार घराच्या बाहेरच्या खोलीत वयोवृध्द असे ह.भ.प आजोबा आपल्या तेजस्वी आणि लुकलुकत्या डोळ्यांनी आपल्या नातवाची करामत बघत होते.याच खोलीत पिठाची गिरणी होती. घरामधील सहा माणसे आणि दळण न्यायला आलेले गिऱ्हाईक यांचा गलबलाट चालू होता.या सर्व आवाजांच्या पेक्षा मोठ्या आवाजात पं.भिमसेन जोशींचे " भाग्यदा लक्ष्मी धरम्मा ....हे गाणे म्हणत अत्यंत एकाग्रतेने एक हाडाचा चित्रकार कॕनव्हास वरती  चित्र काढत होता.अशा प्रकारच्या वातावरणात सर्वोत्कृष्ट काम करणारा कलाकार म्हणजे आजचा हास्य सम्राट  " दीपक देशपांडे " होता.

*अतुल कुलकर्णी*

अशाच एका संध्याकाळी दीपक  बरोबर गप्पा मारत सोलापूर मधील सेवासदन शाळेत गेलो होतो . डाॕ.देगावकरांच्या नाट्य आराधना संस्थेत नाटकाच्या  नेपथ्य व्यवस्थेत दीपक मदत करत होता.आम्ही तेथे पोचलो.दीपकने  एक बाकडे आणि दोन खुर्च्या वगैरे स्टेज वरती मांडामांड केली.थोड्याच वेळात एक तरुण मुलगा आणि मुलगी तेथे आली.स्टेज वरील बाकड्यावर एकमेकांच्या कडे पाठ फिरवून संवाद म्हणू लागली. हा प्रसंग बघायला मी,दीपक आणि शाळेचा शिपाई  होता  .थोड्या वेळाने मी तेथून निघालो .तो चुणचुणीत मुलगा म्हणजे " अतुल कुलकर्णी " होता आणि मुलगी बहूतेक " जवळगेकर " .

*गुरुराज अवधानी*

आदर्शनगर मध्ये आमच्या समोरच्या घरातील एका मुलाला सुध्दा अशीच  नाटकात काम करायची आवड होती .स्टेटबँकेतून कामावरुन घरी आल्यावर कित्येक वर्षे  संध्याकाळी दोन ते तीन तास न चूकता नाटकांच्या तालमीसाठी तो जायचा . तो म्हणजे " गुरुराज अवधानी" !!
परमेश्वराशी सरळ अनुसंधान साधणाऱ्या कलेचा स्पर्श झालेली ही सर्व कलावंत मंडळी आहेत. पैसा ,प्रसिद्धी वगैरे अस्थिर गोष्टी त्या वेळी त्यांच्या गावी ही नव्हत्या .

*विनायक जोशी (vp)*
📱9423005702
मंगलधाम , हिंगणेखुर्द ,लेन नं ४ , पुणे
*electronchikatha.blogspot.com*

अविस्मरणीय फोटोज् ....प्रकाश आमटे ते अमितभ

// श्री  स्वामी समर्थ //
    *अविस्मरणीय फोटो*
 
     *विनायक जोशी (vp)*
  📱9423005702

*डाॕ.प्रकाश आणि डाॕ.मंदा आमटे*

आपल्या आयुष्यात काही फोटो हे पर्मनंट मेमरी मध्ये  जाऊन बसतात. व्हाॕटस अॕपच्या माध्यमातून असाच एक अत्यंत सुंदर फोटो पर्मनंट मेमरी मध्ये दाखल झाला. विमानतळाच्या बाहेर अतिशय साधेपणाने घरुन आणलेला डबा खात बसलेले पदमश्री डाॕ. प्रकाश आमटे आणि डाॕ.मंदाकिनी आमटे यांचा अविस्मरणीय फोटो बघीतला आणि दिवस सार्थकी लागला.

*अमिताभ आणि दिलीप प्रभावळकर*

या निमित्ताने जुन्या आठवणी जागृत झाल्या. काही वर्षांच्या पूर्वी पेपर मध्ये दोन महान कलाकारांचा अतिशय सुरेख फोटो आला होता. लोकप्रिय आणि सुसंस्कृत अशा शहेनशहाने म्हणजेच अमिताभने अभिनयातील बादशहाला म्हणजेच दिलीप प्रभावळकरांना अत्यंत आत्मियतेने केलेला नमस्कार !

*नारायण मुर्ती आणि सुधा मुर्ती*

याच प्रमाणे काही वर्षापूर्वी बंगलोरला राष्ट्रपती  अब्दुल कलाम ईन्फोसिसला भेट देणार होते.त्यांना यायला उशीर झाल्यामुळे मेनगेट च्या बाहेर  गर्दी पासून दूर एका अतिशय साध्या कट्यावर बसून त्यांची वाट बघणारे नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांचा फोटो .

*पु.ल.देशपांडे आणि बाबा आमटे*

नर्मदा बचाव आंदोलन पूर्ण झाल्यावरच परत आनंदवना मध्ये  येणार असा निश्चय करुन गेलेले परंतु आपले अत्यंत प्रिय आणि महाराष्ट्राचे लाडके असे "पुल "तब्बेत बरी नसल्यामुळे हवापालट करण्यासाठी आनंदवनात येणार कळल्यावर आपला निश्चय बाजूला ठेवून आनंदवनात त्यांच्या स्वागताला उभे असलेले  आणि एकमेकांना बघून अत्यंत आनंदाने हसणारे बाबा आमटे आणि पुलंचा फोटो.
         आता हे फोटो बघायला फक्त डोळे नकोत तर निवांतपणा आणि अंतर्मनाची जागृती पाहिजे !

          *विनायक जोशी (vp)*
      📱9423005702
मंगलधाम , हिंगणेखुर्द , लेन ४ , पुणे ५१
*electronchikatha.blogspot.com*

Family Doctor ....Dr.Nene

// श्री स्वामी समर्थ //
     *कर्मयोगी फॕमिली डाॕक्टर*
       *डाॕ.द.म.नेने*
 
    *विनायक जोशी (vp)*
 📱9423005702

सोलापूर मधील वाडिया हाॕस्पिटल मध्ये डाॕ.साठे मॕडम यांच्या अध्यक्षतेखाली माझा जन्म झाला .दहा आॕगस्टला पहाटे २.३० अशी अचूक जन्मवेळ नोंदवायचे काम डाॕ.नेने यांनी केले.त्या काळात डाॕ.दिवाडकर हे आमचे फॕमिली डाॕक्टर होते. या नंतर काही वर्षांनी लष्कर भागातील राम मंदिराच्या शेजारी डाॕ.नेने यांचा दवाखाना चालू झाला . काॕलनी मधील दोन वर्षाच्या मुलापासून ते ऐंशी वर्षांच्या आजोबां पर्यंत सर्वांना आरोग्य संपन्न ठेवण्याची जबाबदारी डाॕ.नेने यांनी लीलया पेलली. मंद स्मित , माफक बोलणे , अचूक निदान आणि अत्यंत कमी फी या चतुःसुत्री मुळे  नेने डाॕक्टरांना सर्वांच्या मनात आणि घरात आदराचे स्थान प्राप्त झाले. नेने डाॕक्टरांच्या दवाखान्याची पायरी चढली की अर्धे अधिक आजार घाबरुन पळून जात असत. दररोजचे तीन डोस असे तीन दिवसांचे औषध घेऊन घरी यायचे.पहिल्या दिवसाचे तीन डोस घेई पर्यंतच आजारातून सुटका झालेली असायची.नेने डाॕक्टरांच्या आश्वासक बोलण्यामुळे ताप ,सर्दी ,खोकल्या पासून ते अगदी मणक्याचे हाड सरकलेले असताना सुध्दा कोणत्याही प्रकारची भीती वाटायची नाही.आजच्या इंटरनेटच्या युगात सुध्दा डाॕ.नेने त्या वेळी वापरत असलेल्या जंक्शन व्हायोलेट किंवा खोकल्याच्या गुलाबी औषधाची अथवा साडेतीन गोळ्यांच्या डोसची आठवण येते.सर्व आजारांना बरे करण्याची ताकद असलेल्या त्या गोळ्यांची कधीही चिकित्सा करावी वाटली नाही किंवा वाटत नाही .याचे एकमेव कारण म्हणजे डाॕ.नेने या  हजारो पेशंट बरे करणाऱ्या तपस्वी माणसाचा अनुभव समृद्ध स्पर्श त्या औषधाला लाभला होता. अनेक  प्रकारच्या डिफीशीयन्सीज दाखवणारी करोडो रुपयांची निर्विकार मशिन्स आता उपलब्ध आहेत .त्या मधून निघणारे रिपोर्टस वाचतानाच भिती वाटते. पेशंटला अजिबात न घाबरवता तपासणाऱ्या डाॕ.द.म.नेने यांची यावेळी आठवण प्रकर्षाने येते . आजही लष्कर मधील राम मंदिरात जायचा योग आला की रामपंचायनातल्या त्या मुर्ती किंवा प्रवचन देणारे गुरुजी ,तेथेच असलेले भुयार आणि याच मंदिराच्या शेजारी लाकडी फोल्डींगचा दरवाजा असलेल्या आणि पन्नास साठ पेशंटनी कायम भरलेल्या दवाखान्याची आणि असंख्य पेशंटस् बरे करणाऱ्या कर्मयोग्याची म्हणजेच "डाॕ.द.म.नेने" या आमच्या त्या वेळच्या "फॕमिली डाॕक्टर" या संस्थेची आठवण येते !!!

*विनायक जोशी ( vp )*
 📱9423005702
मंगलधाम , हिंगणेखुर्द , लेन नं ४ , पुणे ५१
*electronchikatha.blogspot.com*

Inditech ते Inditech electrosystems

// श्री स्वामी समर्थ //

      *INDITECH*
                ते
 *Inditech Electrosystems Pvt Ltd Pune* एका अत्यंत रोमहर्षक प्रवासातील काही स्मृतीचित्रे......
           *विनायक जोशी (vp)*
     📱9423005702

 Indian Technology किंवा भारतीय तंत्रज्ञाना विषयी अभिमान बाळगणाऱ्या *हेमंत शितोळे* आणि *विजय बढे* यांनी १९९८ साली अक्षय्य तृतीयेला विठ्ठलवाडी सारख्या पुण्यभूमीत विश्रांती नगर येथील अक्षय विहार येथे कंपनीची स्थापना केली.......

  *हेमंत शितोळे*
  कुरकुंभ हे मुळ गाव. साताऱ्यातून इंजिनियरींगचे शिक्षण पूर्ण केले. पी.जे. इलेक्ट्राॕनिक्स या अतिशय सुंदर कंपनीत पाच वर्षे कामाचा अनुभव .

 *विजय बढे*
 पुसद येथून इंजिनियरींगचे शिक्षण पूर्ण . M Tech नागपूरातून . पी.जे इलेक्ट्राॕनिक्स या कंपनीत हायर लेव्हल साॕफ्टवेयर कन्सल्टंट म्हणून ३ वर्षे अनुभव.

  *हेमंत शितोळे*
  अमेरिकेत शिक्षणासाठी जायला लागणारा व्हिसा मिळाला नाही , त्यामुळे वरळीच्या समुद्रात त्या विषयाची कागदपत्रे विसर्जीत करून भारतातच उत्तम काम करायचा निश्चय

 *विजय बढे*
  इलेक्ट्रॉनिक्स या विषयाची आवड असल्यामुळे बारावी नंतर सहजपणे मिळालेली मेडीकलची अॕडमिशन नाकारुन किंवा जास्त पगाराच्या नोकऱ्यांच्या मागे न धावता स्वतंत्र व्यवसाय करायचा याच जिद्दीने २६ व्या वर्षी इंडीटेकची स्थापना...
     
  *कामाची सुरुवात*

 हार्डवेयर किंवा कंट्रोलर वापरून वेगवेगळ्या प्रकारचे टायमर्स, प्रोसेस इंडिकेटर्स , बॕटरी चार्जर्स , स्पेशल पर्पज मशिन्सना लागणारे कंट्रोलर्स, इलेक्ट्रॉनिक्स वजन काट्यांचे कंट्रोलर्स वगैरे आॕर्डर प्रमाणे तयार केले .........थोडक्यात येईल ते काम स्विकारुन  कंपनी मध्ये चलनवलन किंवा  उलाढाल चालू ठेवली.......
 
*जुन्या आठवणींची पिंपळपाने*

*Larson & Tubro*
*नारायण जोशी आणि संजय सरवटे*
या L & T मध्ये काम करणाऱ्या तरुण इंजिनियर्सनी कंपनीला भेट दिली. रायपूर जवळील हिरमी येथे सिमेंट परदेशी पाठवण्यासाठी विशेष कारखाना उभा रहात होता. संजय सरवटे यांनी L & T सिमेंट या कंपनीला लागणाऱ्या मशीन्स तयार करून घेतल्या

*OPEL*
       *ओपेल कंपनीचे नाडकर्णी*
 यांनी लिफ्टला लागणारी LOP ची कार्ड्स दुरूस्ती आणि नवीन तयार करण्यासाठी कायम प्रोत्साहन दिले . लिफ्टच्या क्षेत्रात प्रवेश यांच्या मुळेच झाला

*UL Group of companies*
*UL या कंपनीचे उदय जाधव आणि ललीत सहानी*
 यांनी प्रोसेस प्लान्ट मध्ये लागणारी वेगवेगळ्या प्रकारच्या डिजीटल आणि अॕनालाॕग Field Interfacing Modules डेव्हलप करून घेतली.

*AIWA*
*AIWA या नागपूरच्या कंपनीचे प्रविण जैन*
यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या Weighing Systems च्या म्हणजेच साध्या वजन काट्यांपासून ते वेब्रिज पर्यंत अनेक नवीन गोष्टी तयार करून घेतल्या.
 
*Inditech Medical Electronics*
 ब्लड प्रेशर , ईसीजी , पल्सआॕक्सीमीटर या सारखे उत्तम दर्जाचे प्राॕडक्ट तयार केले होते.

 *Captain Pad*

हाॕटेल्स मध्ये अॕटोमॕटिक आॕर्डरिंग सिस्टीम साठी पामटाॕप वापरुन भारतीय पध्दतीची प्रणाली *अभय बढे* या "जावा " मास्टरच्या सहकार्याने २००८ मध्ये तयार केली

       *सिमेंटच्या कंपन्यात लागणारी इलेक्ट्रो मेकॕनीकल मशीन्स* 

 सिमेंटची ब्लेन व्हॕल्यू वेगवान पध्दतीने मोजणारी आधुनिक मशीन्स आणि फ्रीलाइम अॕनालायझर हे अत्यंत क्लिष्ट मशीन तयार केले. 

*आधुनिक कम्युनिकेशन सिस्टीम्स वापरून लिफ्टचे Car Operating Panel (COP) आणि Landing operating Panel (LOP)* तयार केले.

 लिफ्टला लागणारे आणि कमीतकमी वायरींग करावे लागणारे  *P to S किंवा पॕरलल टू सिरीयल* या प्रकारचे COP आणि LOP तयार केले.

लिफ्टला लागणाऱ्या  पूर्ण इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्राॕनिक्स सिस्टीम्स तयार केल्या.

1) टच स्क्रीन किंवा टचलेस COP
2) Prefabricated Cables
3) LMS Lift monitoring system
4) AC Drive interfacing
5) Face recognition system for lift
 6) Tab किंवा टच स्क्रीनचे अत्यंत आधुनीक COP

 अशी असंख्य  दर्जेदार , दणकट आणि उपयुक्त सोल्यूशन्स इंडीटेक जगभर देत आहे.

*Make In India*

 या तत्वाचा वीस वर्षांपूर्वीच अंगीकार केलेल्या
विजय बढे आणि सौ.स्वाती बढे यांच्या इंडीटेक सिस्टीम्सने मोठ्ठी भरारी घ्यायची ठरवली आहे.  थायसनक्रुप या कंपनीचे ३५० एलिव्हेटर्स दुबई विमानतळावर अल्पावधीत आणि यशस्वीपणे बसवणाऱ्या टीम मधील महत्त्वाचे मेंबर आणि अत्यंत अनुभवी असे *श्री .कट्टी सर आणि सीडॕक , विप्रो या ठिकाणी उच्च पदावर काम केलेले श्री . संजय बेलगमवार ( IT)* यांनी  *Inditech Electrosystems Pvt Ltd Pune* या कंपनीत डायरेक्टर्स म्हणून कार्यभार स्विकारला आहे. तरुण आणि सळसळत्या अशा स्टाफच्या सहकार्याने  कायमस्वरूपी प्रगतीच्या दिशेने प्रवास चालू आहे. कंपनीने स्वतःचे स्वतंत्र मार्केटींग डिपार्टमेंट चालू केले आहे. भारतातील प्रमुख शहरातून डीलर्स नेमले आहेत.
*संजय गोविंदवार* हे व्यवहार कुशल आणि अनुभवी असे " आॕपरेशन्स हेड " कंपनीला लाभले आहेत.
इंडीटेक या कंपनीच्या प्रगतीत असंख्य हितचिंतकांच्या शुभेच्छांचा वाटा आहे . त्याच प्रमाणे वेगवेगळ्या प्रसंगात कंपनीच्या बरोबर ठामपणे राहिलेल्या *कमलेश , राहूल , शैलेश, संतोष , वैभव, जोशी मॕडम , प्रतिभा मॕडम.....वगैरे अनेकांचा महत्वपूर्ण वाटा आहे*. विश्रांती नगर मधील चावट पाटलांच्या बंगल्यापासून ते जाधवांच्या वास्तू पर्यंत सर्व वास्तूंनी आणि मालकांनी भरभराटीचा *तथास्तु* असा आशिर्वाद कंपनीला दिला आहे......

  दिनांक १८ /०४ /२०१८ या दिवशी अक्षय्य तृतीयेला कंपनीला वीस वर्षे पूर्ण होत आहेत त्या निमीत्ताने मनःपूर्वक शुभेच्छा
💐💐💐👍👍👍

*विनायक (vp), नारायण , कल्याणी आणि समस्त जोशी परिवार*
📱9423005702
मंगलधाम , हिंगणेखुर्द,पुणे ५१
 *electronchikatha.blogspot.com*

अजित बेलसरकर ...IIT Kharagpur

// श्री स्वामी समर्थ //
  *अजित बेलसरकर*
    *IIT खरगपूर*

*विनायक जोशी(vp)*
 📱9423005702

 Dr.Reddy's lab नावाच्या कंपनीने अत्यंत महत्त्वाचे आणि महागडे असे
 इंजेक्शन बाजारात आणायची तयारी केली होती. या मधील प्रत्येक थेंब अतिशय मौल्यवान होता. या बाटल्या ॲटोमॕटीक मशीन वरती भरुन आमच्या मशीन मध्ये  येणार होत्या .प्रत्येक बाटलीचे २५० मिली सेकंदात वजन करुन सहा पैकी  योग्य अशा conveyor वरुन बाटल्या पुढे पाठवणे या साठी आम्ही मशीन बनवले होते. या निमित्ताने Vial , Ampules वगैरे गोष्टींची माहिती  कळत होती. या साठी अत्यंत वेगवान आणि अचूक असा "मेटलर " या जर्मन कंपनीचा बॕलंन्स वापरला होता. वजना प्रमाणे वेगवेगळ्या सहा ठिकाणी बाटल्या पाठविणे अपेक्षित होते. अर्थातच एका मिनीटात २०० बाटल्या जाणार होत्या .आमची सर्व मदार अत्यंत महाग आणि अचूक अशा जर्मन बॕलंन्स वरती होती. आॕन लाईन वजन सोडून इतर सर्व मेकॕनिझम ची पहिल्यांदा चाचणी घेतली. आमच्या कंपनीमधील एक नवीन आणि चुणचुणीत असा मुलगा न कंटाळता आमच्या आणि जर्मन बॕलंन्सची दोस्ती जमवत होता. सलग दोन महीने काम केल्या नंतर अतिशय उत्तम अशा प्रकारे मशीन चालू लागले. सर्व प्रकारची  चाचणी झाल्यावर मशीन हैद्राबादला रवाना झाले. अतिशय प्रिसिजन अशा या मशीन वरती software  चे काम करणारा अजित बेलसरकर हा या project नंतर पुढील शिक्षणा साठी "IIT खरगपुर" येथे गेला. Discovery चॕनल वरील Mega Factories कार्यक्रमात  अतिशय वेगाने जाणाऱ्या औषधांच्या  बाटल्या बघून आठवण आली ती या आमच्या उत्तम चालणाऱ्या मशीनची व मेटलर या जर्मन बॕलंन्सची आणि अर्थातच सहज पणे "IIT "चा अभ्यासक्रम पूर्ण करुन अमेरिकेत गेलेल्या  पुसदच्या "अजित बेलसरकरची" !!!
(गेली १७ वर्षे तो अमेरिकेत BOSH या कंपनीत उत्तम काम करत आहे )

     *विनायक जोशी (vp)*
   📱9423005702
 मंगलधाम , हिंगणेखुर्द , पुणे ५१ *electronchikatha.blogspot.com*

तेजस्वी Sine Wave

// श्री स्वामी समर्थ //
    *Sine Wave*
        *विनायक जोशी (vp)*
📱9423005702

पहिल्यांदा मला या अत्यंत तेजस्वी अशा 'पणजी' बाईंचे दर्शन झाले त्या वेळेला त्या Resistor , Inductor आणि Capacitor या तीन भिन्न स्वभावांच्या आपल्या सहकार्यांबरोबर नवीन कामा बद्दल चर्चा करत होत्या . Sine या नावातच एक प्रकारचे संगीत असल्यामुळे एक प्रकारच्या सुरेल अशा Harmony चा अनुभव यांच्या दर्शनात मिळत असे. प्रत्येक वीस मिली सेकंदात एक पूर्ण आलाप घ्यायची असामान्य ताकद यांच्यात आहे. सुरवात सावकाश करत Rms नावाच्या पठारावर थोडासा विसावा, तेथूनच Peak नावाचे सुळके पहायचे आणि हळूहळू उतरायला सुरवात. परत Zero Crossing ला आल्या वरती घरच्यांना सांगून खोल दरीत उतरायला सुरवात. या इथे परत वरच्या प्रमाणेच ठहराव आणि खोलीचा अंदाज घेऊन परत Zero crossing या मुक्कामाला यायचे. एका सेकंदात पन्नास वेळा न कंटाळता हा कार्यक्रम चालू.या वेळी सहकारी म्हणून कधीकधी  कोणतेही काम सांगितले तरी संतापाने गरम होणारा Resistor असे,नाहीतर व्यवस्थित ऐकून न घेता काम सुरु करणारा Capacitor असे , किंवा कायम बदलाला कंटाळणारा Inductor असे. चौघेजण मिळून एकत्र आले कि मात्र  अतिशय आनंदाने काम करताना दिसतात. जेंव्हा ऐखादे अवजड काम येते त्या वेळी मात्र न लाजता ही Sine Wave थ्री फेजच्या रुपातील आपल्या लाल ,पिवळ्या आणि निळ्या रंगाच्या तीन बहीणींना बोलावते. या तिघी अत्यंत आनंदाने आपल्या कणखर आणि दणकट अशा 'Earth 'नावाच्या साथीदाराला बरोबर घेऊनच येतात आणि सिंगल फेज बहिणीच्या घराचा आसमंत तेजाने उजळून टाकतात !

   *विनायक जोशी ( vp )*
    📱9423005702
 मंगलधाम, हिंगणे खुर्द पुणे ५१
*electronchikatha.blogspot.com*

Weight Loss ...डाॕ.दिक्षित

// श्री स्वामी समर्थ //

 *डाॕ.जगन्नाथांचा चातुर्मास*

     *विनायक जोशी(vp)*
📱9423005702

*डाॕ.श्रीकांत जिचकर* यांनी शोधून काढलेला आणि *डाॕ.जगन्नाथ दिक्षित* आणि सहकाऱ्यांनी सांगितलेला हा आरोग्यदायी चातुर्मास आहे.
*चातुर्मासात आचरणात आणायची मुख्य त्रिसुत्री  खाली देत आहे*
*१*) दिवसातून ठराविक दोन वेळेला सर्व समावेशक असे जेवण घेणे. जेवण ४५ मिनीटात पूर्ण करणे. आपल्याला खरोखरी भुक लागते अशा दोन वेळांना जेवणे.
 *२*) दिवसभरात केंव्हाही साडेचार किलोमीटर अंतर एका तासात चालणे
 *३*) दोन वेळेला जेवण झाल्यानंतर तोंडाचा वापर हा फक्त पाणी पिण्यासाठी किंवा बोलण्यासाठी करणे.
आपली सेंटीमीटर्स मधील उंची मोजून घेणे आणि त्या मधून शंभर वजा करावेत व साधारणपणे तेवढे आपले वजन असावे असा सल्ला डाॕक्टरांनी दिला आहे.
 *आपल्या दैनंदिन आयुष्यातील कोणतेही खाण्याचे पदार्थ सोडायचे नसल्यामुळे ,थोडासा मनोनिग्रह करून आणि गोड पदार्थ कमी खाऊन हा चातुर्मास सर्वांनी अवश्य करावा*
डायबेटीस अथवा इतर प्रकारच्या मंडळींनी डाॕ.दिक्षितांचे मार्गदर्शन घेऊन आहार ठरवणे योग्य राहिल.

2 July 2018 पासून मी आणि कल्याणी डाॕ.दिक्षित यांचा मार्ग वापरत आहोत.गेल्या ११ महिन्यात माझे वजन १० किलो कमी झाले आहे 👍👍

*विनायक जोशी (vp)*
  📱9423005702
मंगलधाम , हिंगणेखुर्द , लेन नंबर ४ , पुणे ५१
*electronchikatha.blogspot.com*

शनिवार, २२ जून, २०१९

Creativity चा स्पर्श .....सर्जनशीलता

// श्री स्वामी समर्थ //
      *Creativity*
      किंवा *सर्जनशीलता*

  *विनायक जोशी (vp)*
 📱9423005702

अतिशय उच्च दर्जाच्या Creator ने जबरदस्त creativity वापरून केलेले creation म्हणजे आपण आहोत याची जाणीवपूर्वक जाणीव झाली की आनंददायी अनुसंधानाचा प्रवास चालू होतो.
परमेश्वराने प्रत्येक सजीवाला दिलेल्या सर्जनशीलतेचा थोडासा जरी आनंददायी अनुभव आला तर आयुष्य म्हणजे
*आनंदाचे डोही आनंद तरंग* "
           *Creativity*

1) अपूर्णतेकडून पूर्णत्वाकडे
2)अनेकाग्रते कडून एकाग्रतेकडे
3)प्रचंड वेदना देणारी
4) कायम अस्वस्थ ठेवणारी
5)बाह्य संवेदना बंद ठेवणारी
6)खुप गर्दीत सुध्दा एकटेपणा
7)अलौकिक आनंद देणारी
8)अतार्किक अनूभव देणारी
9)क्षणभर दिव्यत्वाची अनुभूती देणारी
10)परमेश्वराशी अनुसंधान
11) ऐहीक गोष्टींची अनासक्ती वाढवणारी
आणि या सर्व असामान्य अनुभवा नंतर *व्यवहारी जगात सामान्य ठेवणारी* गोष्ट म्हणजेच "Creativity "

     *विनायक जोशी (vp)*
  📱  9423005702
 मंगलधाम , हिंगणेखुर्द , पुणे ५१
*electronchikatha.blogspot.com*

एका दगडाची कहाणी

// श्री स्वामी समर्थ //
    *एका दगडाची कहाणी*

       *विनायक जोशी (vp)*
📱9423005702

एका उंच टेकडीवर असलेल्या राममंदीराकडे आम्ही चाललो होतो. उन्हाची वेळ होती .लांबूनच पांढरे शुभ्र मंदीर बघून आनंद वाटत होता. साधारणपणे शंभर पावलांवर चप्पल स्टँड होता. चप्पल काढल्यानंतर पाय भाजू नयेत म्हणून पळत गाभाऱ्यात जायचे ठरविले . दोन चार पावले गेल्यावर पाय अजिबात भाजत नाहीत हे लक्षात आले. त्या मंदिरात मुर्तींसाठी , गाभाऱ्यासाठी किंवा इतर बांधकामासाठी असंख्य वेगवेगळ्या प्रकारचे दगड वापरलेले होते परंतु कडकडीत उन्हात सुध्दा कमालीचा थंड राहणारा हा दगड मला खुप आवडला होता.

१९७८ या वर्षी आमची दहावीची बोर्डाची महत्वाची परीक्षा . काॕलनी मधील आमच्या सर्वांची घरे मोठ्ठी होती.आमचे ८ खोल्यांचे घर होते .अभ्यासासाठी एक छान मोठ्ठी खोली होती . माझ्या पेक्षा सहा आणि आठ वर्षे मोठ्या आणि प्रचंड हूशार अशा दोन बहिणी मार्गदर्शनासाठी होत्या परंतु मी मात्र दहा बारा मित्रांबरोबर आमच्याच काॕलनीतील एका रिकाम्या घरात अभ्यासाला म्हणून  जात होतो...
आमच्या दहावीच्या रिझल्टच्या वेळी शिक्षकांचा संप चालू झाला आणि जून ऐवजी आॕगस्ट मध्ये निकाल लागणार अशी बातमी आली .आमच्या घराच्या जवळच संगमेश्वर हे अतिशय सुंदर काॕलेज होते परंतु आमच्या मित्रांच्या मधील एकाने तीन किलोमीटर अंतरावर वालचंद नावाचे छान काॕलेज आहे आणि फक्त हुशार मुलांना तेथे प्रवेश मिळेल वगैरे माहिती आणली .आम्ही स्वयंघोषित हुशार मंडळींनी तात्पूरती अॕडमिशन वालचंदला घेतली .६५% पेक्षा कमी मार्क मिळाले तर प्रवेश आपोआपच रद्द होणार होता.
अखेर निकाल लागला . मला एकोणसत्तर टक्के मार्क्स मिळाले.वालचंदला अॕडमिशन पक्की झाली.त्या वेळी दहावीला बोर्डात पहिला आलेल्या मगाई या मुलाने आमच्याच काॕलेजला प्रवेश घेतला म्हणून आम्ही  मित्रांनी आनंदोत्सव साजरा केला...

घरात मात्र कमालीचे तणावाचे वातावरण होते . माझ्या वडिलांना मला कमीतकमी ८० ते ८२ % मार्क्स मिळतील अशी अपेक्षा होती. अत्यंत हुशार अशा आई वडिलांच्या आणि भावंडांच्या घरात अभ्यासाची अजिबात आवड नसलेल्या विनायक प्रभाकर जोशी या मुलाला वयाच्या पंधराव्या वर्षी *एक नंबरचा दगड* ही पदवी वडिलांच्या कडून  मिळाली....

या नंतर साधारणपणे तीन वर्षांनी म्हणजेच १९८१ साली नारायण दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यात पहिला आला. त्याला असंख्य बक्षिसे मिळाले .खुप ठिकाणी सत्कार झाले. माझ्या कर्तुत्वाने घरावर पसरलेले निराशेचे मळभ दूर झाले. एका अत्यंत हूशार मुलाचे वडिल म्हणून वडिलांचा आॕफिस मध्ये सत्कार झाला.

माझ्या दहावीच्या निकालानंतर माझ्या आयुष्याचे निर्णय मीच घ्यायची मुभा मला  मिळाली.

बरोबर दहा वर्षांनी म्हणजेच १९८८च्या आॕक्टोबर या महिन्यात वडिल मला न कळत डाॕ.मराठेंना यांना भेटायला आमच्या कंपनीत आले होते. त्या वेळी मला R & D Manager केले आहे हे पत्र त्यांनी वाचले आणि त्या नंतर परत मला दगडाच्या ऐवजी विनायक हे नाव त्यांच्या लेखी प्राप्त झाले....
वेगवेगळ्या मंडळींच्या बद्दल लेखन करताना जिनियस , आनंदयात्री , कर्मयोगी , नादखुळा वगैरे असंख्य आणि समर्पक वेगवेगळी विशेषणे मला सुचली आहेत.
विनायक प्रभाकर जोशी या माणसाच्या बद्दल लिहिताना
*एका दगडाची कहाणी* हेच समर्पक वाटले.
हा दगड अत्यंत स्वाभिमानी आणि कमालीच्या आनंदी स्वभावाच्या आईच्या पोटी जन्माला आलेला आहे . अतिशय स्वच्छ आणि प्रामाणिक अशा वडिलांचे संस्कार लाभलेला , कमालीच्या हूशार आणि प्रेमळ भावंडांच्यात आनंदी आयुष्य जगत असलेला , असंख्य मित्र असलेला अगदी वेगळ्या प्रकारचा दगड .बाह्य रूप साधे असलेला , सहवासात येणाऱ्या सर्वांना  कमालीचा थंडावा देणारा , लोकांना ध्येयाकडे जाताना शांततेची पायवाट म्हणून निरपेक्षपणे बसलेला , अगदी शहदच्या बिर्ला राममंदिरातील  असावा तसा *साधा परंतु वेगळ्या प्रकारचा दगड फक्त*
👍👍👍

 *विनायक प्रभाकर जोशी (vp)*
📱9423005702
मंगलधाम , हिंगणे खुर्द ,लेन नं ४
पुणे ५१
*electronchikatha.blogspot.com*

जागतिक सायकल दिनानिमित्त ....पहिली सायकल

// श्री स्वामी समर्थ //

       *जागतिक  सायकल दिनानिमित्त*
  🚴🚲🚴‍♀🚲🚴

             *विनायक जोशी (vp)*

 पुण्यात आल्यावर आणि नोकरी लागायच्या आधी हडपसरच्या आकाशवाणी केंद्रापासून ते नारायणच्या काॕलेज पर्यंत म्हणजेच GPP पर्यंत दररोज सायकल चालवायचो . अर्थातच मेन स्ट्रिट कँम्प , संचेती हाॕस्पिटल , वाकडेवाडी , मफतलाल बंगला अशा वेगवेगळ्या थांब्यांवर गप्पागोष्टी करत मुक्काम गाठायचा आणि हाच प्रवास ऊलट दिशेने करून रात्री ११.३० वाजता "बेला के फुल" ऐकत १५ नंबरला पार करून माधवनगरला रहायचो. दररोज २५-३० किलोमीटर अत्यंत आनंदाने सायकलींग करायचो परंतु सायकलचे नाव जरी निघाले तरी माझ्या पहिल्या सायकलचीच आठवण येते . तो सायकलचा प्रवास म्हणजे एक प्रचंड आनंदोत्सव होता...

*पहिली सायकल*
आमच्या कडे रॕलीज कंपनीची कॕरीयर वगैरे असलेली उत्तम दणकट सायकल होती.मी ११ वी मध्ये वालचंद काॕलेज सोलापूर येथे प्रवेश घेतला.वालचंद काॕलेज हे आमच्या काॕलनी पासून ३ किलोमीटर दूर असल्यामुळे या सायकलचा ताबा मला मिळाला.सायकल हे तीन माणसांनी अत्यंत आनंदाने चालवायचे वाहन आहे या गोष्टी वरती आम्हा मित्रांचा गाढ विश्वास असल्यामुळे पुढील दोन  वर्षे आम्ही तिबल सीट काॕलेजला जात असू.सायकलच्या नळीवर बसणाऱ्या कडे पुढील दहा फुट अंतरातील गर्दी हटवणे हे काम असे .या साठी ओरडणे किंवा अपशब्द वापरायची मुभा असे.यासाठी कानडी ही उत्तम भाषा आहे. सीटवर बसणारा उंच पाहीजे.सायकल थांबली असताना तिघांचा भार थोडा वेळ त्याला पेलावा लागे . कॕरीयर वर बसणारा हा चढावरती पायडलींगला मदत करणारा आणि उतारावर चपला घासून सायकल चा वेग कमी करण्याची कला अवगत असणारा लागत असे. तिघां मध्ये  उत्तम प्रकारचा समन्वय लागत असे.गर्दी असेल तर आरडाओरडा , रस्ता रिकामा असेल आणि ऊतार असेल तर किंचाळणे आणि सपाट रोड असेल तर किशोर कुमारचे 'झुमरु' या सिनेमा मधील याॕडलिंग चालू असे. सायकल हे चरबी जाळून टाकण्यासाठीचे मशीन आहे वगैरे उदात्त विचारांपासून आम्ही शेकडो योजने दूर होतो. आमच्या काॕलनी पासून वालचंद जवळच्या 'आम्रपाली 'हाॕटेल पर्यंत अतिशय आनंदाने ने आण करणाऱ्या त्या सायकलची ही हुरहुर लावणारी आठवण ....!
🚲🚲🚲

*विनायक जोशी (vp)*
9423005702
मंगलधाम , हिंगणेखुर्द , लेन नंबर ४ , पुणे ५१
electronchikatha.blogspot.com

तळजाईचे वारकरी ....कल्याणी विनायक

// श्री स्वामी समर्थ //
  *तळजाईचे वारकरी*
 
   🦚  *विनायक जोशी (vp)*🐇
📱9423005702

प्रत्येक वारकऱ्याला जसे विठू माऊलींच्या दर्शनाची आस असते तशी आम्हाला दोघांनाही या तळजाई मातेच्या अधिष्ठान लाभलेल्या डोंगराची ओढ आहे. आम्ही बरीच वर्षे येथे जात असलो तरी या डोंगराच्या बाबतीतले अधिकारी नाही आहोत.घरापासून सकाळच्या वेळी निघालो की साधारणपणे दहा मिनीटात बेबी कॕनाॕल आणि मेन कॕनाॕल यांच्या मधून असंख्य पक्षांचे आवाज ऐकत प्रवासाला सुरूवात .घरापासून बरोबर १६००पावलांचे अंतर पार केले की आनंद विहार काॕलनीतून प्रवेश . एक दिर्घ श्वास घेऊन डोंगर चढायला सुरूवात .थोड्या वेळाने छातीतून येणारे लोहाराच्या भात्यासारखे श्वासांचे पडसाद ऐकत मार्ग क्रमण करत रहायचे. या ठिकाणी अत्यंत सुंदर असे दोन डोम आहेत.या मातीच्या रस्त्याच्या कडेने असंख्य फुलांची झाडे आहेत.निवडूंग आहेत.बांबूची मोठी झाडे आहेत.कोरफड आहे. सध्या उन्हाळ्यामुळे या सुंदर जंगलातील असंख्य झाडे निष्पर्ण अवस्थेत ऊभी आहेत . एकावेळी एकच माणूस जाईल अशा असंख्य चिंचोळ्या पायवाटा आहेत .बऱ्याच ठिकाणी थोडी सपाटी आणि चढण असा जंगलातील लपाछपीचा खेळ आहे. डोंगराच्या वरती तळजाई भ्रमण मंडळ वगैरे नियमित  मंडळींचा राबता आहे. प्रत्येक अर्ध्या किलोमीटर  वरती सिमेंटच्या पाण्याच्या टाक्या आहेत.त्या मधील पाणी घेऊन निसर्गनीष्ठ अशी असंख्य मंडळी निरपेक्ष भावनेने  तेथील अनेक झाडांना पाणी घालत असतात.तळजाई देवळाच्या अलिकडे छोटासा पाणवठा आहे त्या ठिकाणी बदकांचा मुक्तविहार चालू असतो. या ठिकाणी एक हत्तीचे पिल्लू आनंदात उभे आहे .जंगलात काही ठिकाणी पशुपक्षांना पाणी मिळावे अशी पक्षीतीर्थ आहेत . थोडा शांत वेळ असेल तर विसाव्याच्या ठराविक  दगडांवर शांतपणे बसायचे. बरोबर दृष्टी समोरे सिंहगडाचे दोन टाॕवर दिसतात.समोर वाहत्या नदीसारखा दिसणारा कॕनाॕल.त्या वरुन जाणारे छोटे छोटे पूल आहेत.मोरांचे आवाज ऐकायचे किंवा ठराविक ठिकाणी रस्ता ओलांडणाऱ्या मोरांच्या जोड्यांची चाहूल घ्यायची .मुंगसांची निर्भय पणे चाललेली धावपळ बघत अथवा वाट चुकलेल्या सशाची धावपळ बघत घराच्याकडे परतायचे. साधारणपणे ७ किलोमीटरची आनंददायी प्रदक्षिणा आपल्याला दिवसभर उत्साहात ठेवते. तळजाईचे वारकरी होण्यासाठीचे काही अघोषीत प्रोटोकाॕल आम्ही पाळले आहेत.
पायात उत्तम दर्जाचे बूट घालायचे.आपल्या बरोबर छोटीशी पाण्याची बाटली ठेवायची .
घरगूती ,कामाच्या , राजकारणाच्या वगैरे गप्पा मारायच्या नाहीत. मोबाईल जवळ बाळगायचा नाही . जंगलातील दररोज बदलणारे जग पहायचे. दाट झाडीतील वेगवेगळे नैसर्गिक आवाज टिपायचे. साधारणपणे सत्तरी पार केलेल्या तरुणांचा उत्साह आणि सातत्य बघत ही टेकडी चढायची .शून्य प्रदूषण असलेल्या या मार्गावरती कोलेस्ट्रोल ,बीपी ,डाएट वगैरे गोष्टींची अजिबात चर्चा न करता फक्त आनंदाने आणि आनंदाची अशी तळजाई यात्रा करत रहायचे.!
🚶🏻🚶🏻‍♀
🦚🐇🦆🦅🐍

*विनायक आणि कल्याणी जोशी (vp)*
 📱9423005702
मंगलधाम , हिंगणे खुर्द ,
लेन नंबर ४, पुणे ५१
*electronchikatha.blogspot.com*

Vinayak Prabhakar Joshi (vp) by : UK

🌹विनायक जोशी 🌹
       *VP* *Sir*

         लेखक   *Umesh Kulkarni*
*General Manager*
      R & D

काही  व्यक्ति ह्या इतराना काही ना काही देण्याकरिताच आपले   आयुष्य सत्कारणी लावतात असे  म्हटल्यास वावगे ठरू नये. अशा पैकी एक आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे श्री. विनायक जोशी .
गेली तिन  दशका हून अधिक असलेला Electronic  क्षेत्रा मधील practicle अनुभव, त्यांच्या बोलण्यातुन, विचारातून, कृतितुन आणि मार्गदर्शनातुन कायम जाणवतो.
श्री. जोशी  VP या नावानेच सर्वाना परिचित आहेत. VP नी आतापर्यंत अनेक मानाकित कम्पन्यान्मधे अनेक जबाबदारीच्या पदांवर काम केलेले आहे।  या दरम्यान त्यांच्या बरोबरीने आणि हाताखाली अनेक अनुभवी तसेच नवोदित Engineers अक्षरश: "घडले".
प्रायवेट इंडस्ट्री मधे कुणी कुणाला शिकवत नाही. किंबहुना हातचे राखून जेवढे ठेवता येइल तेवढी ती व्यक्ति हुशार आणि so called carrier oriented समजली जाते. पण VP यांचा पिंड च मुळी पडला  शिक्षकाचा. जे जे ठावे ! ते ते इतरासी द्यावे ! ह्या उक्ति प्रमाणे जो जो VP यांच्या  सहवासात आला, VP शिकवत गेले आणि घडवत गेले. मी काही देतोय हां अभिनिवेश ना कधी VP  यांच्या  बोलण्यात जाणवतो ना कधी त्यांच्या कृतिमधे. हेच मोठे पण आणि वेगळेपण VP यांच्या  व्यक्तिमत्वा मधे जाणवते.
VP यांचा वाचनाचा व्यासंग फार मोठा आहे. मग ते टेक्निकल असो वा इतर साहित्य असो. वृत्तीने धार्मिक असल्याने प्रकृति  आणि प्रवृत्ति जास्त सहिष्णु. सर्वांगीण वाचन, देवा धर्माची आवड आणि अध्यात्मिक बैठक यामुळे विचार आणि आचार यातील सामर्थ्य आणि परिपक्वता लगेच समजुन येते. मितभाषी स्वभाव, हलके फुलके नर्म विनोद करण्याची शैली याने वातावरणात जर गंभीरता असेल तर ती निवळायला लगेच मदत होते. त्यामुळेच VP यांच्या  बरोबर काम  करणे किंवा त्यांच्या सहवासात असणे कायम प्रेरणादायी असते.
मशीन आणि माणुस दोघाना अतिशय कुशलतेने  हाताळ्ण्याचा हातखंडा.
 यांचे अजुन एक वैशिष्ट्य म्हणजे माणसाची पारख आणि आणि त्याच्या सर्व चांगल्या गुणांचे  VP केवळ कौतुक  करून  थांबत नाहीत,  तर ते इतराना देखिल सांगतात आणि त्या गुणांचा त्याच्या बरोबर इतराना कसा फायदा होइल ते देखिल पाहतात.
VP यांची  लेखन शैली तर प्रतिभावंत लेखकांच्या  तोडीस तोड़ अशी  आहे. वाचनाचा व्यासंग, निरिक्षण शक्ति यामुळे त्यांचे विचार, भावना  त्यांच्या  सहज सोप्या  भाषेतून लेखणी द्वारे  साकार होतात.
माता मह ! पिता मह हे भारतीय संस्कृतीचे उदघोष नुसते करायचे नसतात, तर ते आचरणातहि आणायचे असतात हे VP यांनी  कृतीतून दाखवून  दिले.
ज्या माणसाला कुठे थांबायच हे वेळेत कळ्ते तो खरा सुखी माणुस.
पैशा पेक्षा कामातील आनंदाला प्राधान्य देणारे VP आज consultant म्हणुन कार्यरत आहेत.
जोशी सर तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि आनंदाच्या क्षणांची बरसात कायम होवो ! हीच मनोकामना !

 *उमेश कुलकर्णी*
🌹🙏🙏🙏🙏🌹

तेजस्वी Sine Wave

// श्री स्वामी समर्थ //
    *Sine Wave*
        *विनायक जोशी (vp)*
📱9423005702

पहिल्यांदा मला या अत्यंत तेजस्वी अशा 'पणजी' बाईंचे दर्शन झाले त्या वेळेला त्या Resistor , Inductor आणि Capacitor या तीन भिन्न स्वभावांच्या आपल्या सहकार्यांबरोबर नवीन कामा बद्दल चर्चा करत होत्या . Sine या नावातच एक प्रकारचे संगीत असल्यामुळे एक प्रकारच्या सुरेल अशा Harmony चा अनुभव यांच्या दर्शनात मिळत असे. प्रत्येक वीस मिली सेकंदात एक पूर्ण आलाप घ्यायची असामान्य ताकद यांच्यात आहे. सुरवात सावकाश करत Rms नावाच्या पठारावर थोडासा विसावा, तेथूनच Peak नावाचे सुळके पहायचे आणि हळूहळू उतरायला सुरवात. परत Zero Crossing ला आल्या वरती घरच्यांना सांगून खोल दरीत उतरायला सुरवात. या इथे परत वरच्या प्रमाणेच ठहराव आणि खोलीचा अंदाज घेऊन परत Zero crossing या मुक्कामाला यायचे. एका सेकंदात पन्नास वेळा न कंटाळता हा कार्यक्रम चालू.या वेळी सहकारी म्हणून कधीकधी  कोणतेही काम सांगितले तरी संतापाने गरम होणारा Resistor असे,नाहीतर व्यवस्थित ऐकून न घेता काम सुरु करणारा Capacitor असे , किंवा कायम बदलाला कंटाळणारा Inductor असे. चौघेजण मिळून एकत्र आले कि मात्र  अतिशय आनंदाने काम करताना दिसतात. जेंव्हा ऐखादे अवजड काम येते त्या वेळी मात्र न लाजता ही Sine Wave थ्री फेजच्या रुपातील आपल्या लाल ,पिवळ्या आणि निळ्या रंगाच्या तीन बहीणींना बोलावते. या तिघी अत्यंत आनंदाने आपल्या कणखर आणि दणकट अशा 'Earth 'नावाच्या साथीदाराला बरोबर घेऊनच येतात आणि सिंगल फेज बहिणीच्या घराचा आसमंत तेजाने उजळून टाकतात !

   *विनायक जोशी ( vp )*
    📱9423005702
 मंगलधाम, हिंगणे खुर्द पुणे ५१
*electronchikatha.blogspot.com*

Resistors ...आवडते विरोधक

//श्री स्वामी समर्थ //
 *Resistors*
   *विरोधक*
 
*विनायक जोशी (vp)*
9423005702
तुम्ही आहात म्हणून आम्ही आनंदाने सर्व गोष्टींचा ऊपभोग घेत आहोत. स्वतःच्या अंगावर वेगवेगळ्या रंगाचे पट्टे ओढून आपले वेगळेपण तुम्ही अधोरेखित करता. कोणत्याही निराशे कडे वाटचाल करणाऱ्या Signal ला तुम्ही pull up करता आणि ज्यांचा गर्व वाढला आहे त्यांना मात्र pull down करता. वेळ प्रसंगी तुम्ही स्वतः गरम होता परंतु circuit मधील वातावरण मात्र एकदम cool ठेवता. कोणत्याही गोष्टीला संतुलित ठेवण्यासाठी योग्य विरोध हा लागतोच हे तुमच्या मुळे शिकता आले. तुम्हाला काम करताना अति उष्णतेमुळे त्रास होतो हे माहीत असल्यामुळे तुमची  super conducive material च्या रुपात यायची धडपड आम्ही बघत आहोत.  तुमच्या बरोबर अदृश्य रुपात वावरणारा inductor  फारच थोड्या लोकांना दिसतो. एखादा led लावताना सुध्दा तुमचा योग्य वापर करुन कमीतकमी विजेचा अपव्यय होईल याची जाणीव असलेले मोजके लोक बघायला मिळतात. Reactance , impedance  वगैरे तुमचे नातेवाईक जास्त frequency च्या सर्किट मधे योग्य भूमिका बजावत आहेत. Fuse च्या अवतारात मात्र फार पुण्याचे काम तुम्ही करता . कोणीही आणि कसलाही विरोध केला कि संतापाने आमची लाहीलाही होते परंतू तुमच्या सारख्या कर्तव्य तत्पर विरोधकांना समोर बघून आम्ही मात्र आनंदात आणि एकदम Cool .....असतो !

*विनायक जोशी (vp)*
 9423005702
 मंगलधाम हिंगणे खुर्द पुणे ५१
*analogdesigns.blogspot.in*

आठवणीतील सुंदर गाणी

// श्री स्वामी समर्थ //
     *छानशी गाणी*

   *विनायक जोशी (vp)*
  📱9423005702

  कोणत्याही प्रकारची गाण्यातील समज नसलेल्या माझ्या सारख्या माणसाला सुध्दा शांतपणे पुनःपुन्हा ऐकावी वाटलेली काही गाणी...

*आशाताई भोसले*
 लक्ष्मी रोड येथून सोनी कंपनीची अतिशय उत्तम आवाजाचा दर्जा असलेली सिस्टीम वीस वर्षांपूर्वी विकत आणली. या वरती पहिले गाणे आशाताईंनी गायलेले अप्रतिम असे
*केंव्हातरी पहाटे उलटून रात्र गेली* हे ऐकले. हे उच्च दर्जाचे गाणे छान अशा सिस्टीम वरती ऐकताना अवर्णनीय आनंद मिळाला....

*शंकर महादेवन*
यु ट्यूब वरती श्री.उध्दव ठाकरेंनी पंढरपूरच्या वारी बद्दल तयार केलेला व्हिडियो बघत होतो . बॕकग्राऊंडला शंकर महादेवन यांचे अप्रतिम गाणे होते .ते असंख्य वेळेला ऐकले . प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या प्रकारे विठू माऊलींचे दर्शन होत आहे अशी अनुभूती येत होती ..कमालीची मानसीक शांतता देणारे असामान्य अशा गायकाने गायलेले हे गाणे आहे .....
 *बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल*


*सलिल कुलकर्णी*
सुर्यास्ताची वेळ होती .कल्याणीला आणायला म्हणून तळजाई टेकडीवरच्या जंगलात पोचलो होतो. एका छानशा चढावरून जाताना असंख्य रंगांची उधळण करत परतीच्या प्रवासाला निघालेले सुर्यनारायण दिसले . जंगलातील असंख्य झाडांच्या मधून प्रगटणारा तो सोनेरी सुर्यास्त बघून सलिल कुलकर्णी यांच्या अजरामर अशा उच्च दर्जाच्या प्रेमगीताची आठवण आली...
*संधी प्रकाशात अजूनी ते सोने*


*प्रियांका बर्वे*
दोन दिवसांच्या पूर्वी व्हाॕटसअॕपच्या माध्यमातून एक व्हिडीयो आला . अतिशय शांतपणे नेटकेपणाने , मनापासून व एकाग्रतेने म्हणलेले प्रियांका बर्वेंचे गाणे ऐकत रहावे असे होते . कोणताही सांगितिक गोंगाट नसलेला एक उत्तम भावार्थ असलेले गाणे कमालीच्या ताकदीने म्हणलेले होते.
*केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर*

काहीकाही गाणी ऐकल्यावार ती आपल्या मनाच्या जवळच रेंगाळतात . कळत नकळत खुप वेळा गुणगुणली जातात . अगदी सामान्यज्ञान असलेला माणूस सुध्दा ज्या उत्तम दर्जाच्या गाण्यांनी आनंदीत होतो किंवा ज्या उत्तम प्रकारच्या कलाकृतीचा आनंद सहजपणे घेतो तेंव्हा ती *लक्षात राहणारी गाणी* होतात. रसिकांच्या आत्म्याचा आशिर्वाद लाभलेली एकदम अनमोल ....

*विनायक जोशी (vp)*
9423005702
मंगलाधाम , हिंगणे खुर्द , लेन नंबर ४ , पुणे ५१
*electronchikatha.blogspot.com*

उत्साही गायक "आकाश निलावर"

// श्री स्वामी समर्थ //
       *गायक*
   *आकाश निलावार*

   विनायक जोशी (vp)
📱9423005702

काल संध्याकाळी अतिशय उत्तम अशा पावसांच्या सरी वर सरी पडून गेल्या आणि त्याचा प्रत्यय आज सकाळी तळजाई वरती येत होता . कमालीचे आल्हाददायक वातावरण होते .छोटेछोटे पाणवठे तुडुंब भरले आहेत . सर्व झाडांना नैसर्गिक तजेला आला आहे . जंगलाला नवसंजीवनी प्राप्त झाली आहे . अशा वातावरणात मोरांचे दमदार स्वागतगीत ऐकू येऊ लागले आणि सगळ्या निसर्गाकडे बघून TCS मेडीकल डिव्हीजन लीड करणाऱ्या बाॕसची म्हणजे आकाश निलावारची आठवण आली . परवा संध्याकाळी बोरीवली येथे एका जाहीर कार्यक्रमात त्याने सुरेख गाणे गायले होते ...
ये जमीं गा रही है ,
आसमाँ गा रहा है ,
साथ मेरे ये सारा ,
जहाँ गा रहा है ...

आज सकाळी आकाशचे गाणे गुणगुणत आणि मोरांची साद ऐकत तळजाईची चढण सहज व आनंदाने पार केली...

*विनायक जोशी (vp)*
📱9423005702
मंगलधाम , हिंगणेखुर्द ,
लेन नं ४ , पुणे ५१
*electronchikatha.blogspot.com*

नाना पोकळेंचा धायरी हापूस

" श्री स्वामी समर्थ "
    "आठवणी २०१७"
  *नाना पोकळेंचा*
    *धायरी हापूस*

धायरी ग्राम पंचायत आॕफीसच्या बरोबर समोर पदमावती देवीचे अतिशय सुंदर मंदिर आहे.या मंदिराच्या उजव्या हाताला एक तुळशी वृंदावन आहे आणि त्याच्या बरोबर मागे " नाना पोकळे " यांचा सुरेख दगडी वाडा आहे. नाना स्वतः R & D दिघी येथे नोकरीस होते.१९८१ च्या आसपास त्यांनी बलसाड येथून आंब्याची रोपे आणून धायरी येथील स्वतःच्या शेतात लावलेली आहेत.त्या काळात शेतावर पाण्याची पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे नानांनी आणि काकूंनी लांब अंतरावरुन कळशी किंवा हंड्याने पाणी नेऊन ही झाडे वाढवली आहेत. मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या सुरवातीस हा स्पेशल धायरी हापूस तयार होतो.मागच्या वर्षी पहिल्यांदाच  कोकणातील सराईत मंडळींच्या कडून आंबा ऊतरवून घेतला .या धायरी हापूस बरोबरच रसाळ आणि गोड असा पायरी सुध्दा आहे . कोणत्याही प्रकारे केमीकल्सचा भडीमार न करता पारंपारिक पद्धतीने आंब्याची आढी लावायची  पध्दत आहे . अतिशय योग्य दरात अत्यंत दर्जेदार असा आंबा यांच्या कडे उपलब्ध असतो. अतिशय रसाळ आणि गोड असलेल्या या आंब्याच्या बरोबरच कर्तृत्ववान व पारमार्थिक बैठक असलेल्या आणि मोठ्या वाड्याला योग्य अशा मोठ्या मनाच्या नानांचे आणि काकूंचे आशिर्वाद घेण्यासाठी मी आणि कल्याणी अत्यंत आनंदाने येथे जाऊन आलो . गेली पस्तीस वर्षे पोकळेंच्या शेतात रमलेल्या आणि मे महिन्याच्या अखेरीस तयार होणाऱ्या या धायरी हापूस ची गोडी एकदम खास आहे ...!
🍋🍋🍋

*विनायक जोशी ( vp )*
9423005702
मंगलधाम , हिंगणेखुर्द , पुणे ५१
*electronchikatha.blogspot.com*

पु.ल.देशपांडे नावाचा संस्कार

// श्री स्वामी समर्थ //
  *पु .ल .देशपांडे नावाचा संस्कार*
              विनायक जोशी (vp)
📱9423005702

 सोलापूर मध्ये आमच्या घरात जमलेल्या सर्व पाहुणे मंडळींच्या समोर पदमाकर काकाने " वाऱ्यावरची वरात " हा पुलंचा एकपात्री कार्यक्रम सादर केला आणि माझ्या वरती पहिला आनंददायी आणि विलक्षण असा "पुल" नावाचा संस्कार झाला. पुढील आयुष्यात त्यांनी लिहिलेली ओळन् ओळ " सखाराम गटणे " स्टाईल ने वाचून काढली.
नोकरी मध्ये असताना कोलकता येथे जाण्याचा योग आला त्या वेळी पुलंच्या लेखातून भेटलेल्या शांतिनिकेतन , रविंन्द्रनाथ टागोर,शर्वरीबाबू ,गौरीशंकर घोष ,रामकिंकरदा वगैरे जग प्रसिद्ध व्यक्तींचे कोलकता नजरेसमोर होते.
लेह-लडाख चा विषय निघाला की १९६७ साली लडाख मधील वातावरणात  लढणारे आपले सैनिक , त्या काळातील असुविधा ,सरकारी कारभार  किंवा ग.दि.माडगूळकरांना त्या भूमीवरती स्फुरलेले शौर्य गीत या सर्वांचा उल्लेख असलेला "शूरा मी वंदिले "हा लेख आठवतो.
असामान्य प्रतिभाशक्ती लाभलेल्या या माणसाने स्वाभिमानी आयुष्याबरोबर,
संगीत,चित्रकला,शिल्पकला,नाटक,
सिनेमा ,भाषाशास्त्र ,कविता वाचन या पासून ते वेगवेगळ्या प्रवृत्ती असलेल्या व्यक्तींच्या कडे  निकोप आणि निरोगी पणाने बघायची दृष्टी दिली.
मुंबई वरुन येताना "मेणाच्या पुतळ्यांच्या प्रदर्शनाची जाहिरात लोणावळ्या जवळ वाचली आणि
पुलंनी उल्लेख केलेल्या "रघुनाथराव फडके "या महान कलाकारांने बनवलेले यांत्रिक मेणाचे पुतळे समोर दिसू लागले.
पुलंनी बऱ्याच देशात मोकळेपणानं भटकंती केली आणि अत्यंत सहजतेने आपले सर्व अनुभव लिहून ठेवले . निसर्गाची किंवा तेथील सौंदर्य यांची सहज जपणूक करणाऱ्या परदेशी लोकांच्या बद्दल अतिशय उत्तम आठवणी त्यांनी प्रवास वर्णनात केल्या आहेत.
 *नंदा प्रधान , रावसाहेब , नारायण , अंतू बर्वा , चितळे मास्तर , गौरीशंकर घोष ,शर्वरीबाबू , वसंतराव देशपांडे*...वगैरे असंख्य मंडळींच्या बद्दल हृदयस्पर्शी लेखन त्यांनी केले आहे.
 बिंदू माधव जोशी यांनी ठरविलेल्या "क्रांतीचे गोंधळी" या कार्यक्रमात अटलबिहारी बाजपेयींच्या समोर महाप्रतिभावान अशा" स्वातंत्र्यवीर सावरकरां "बद्दलचे पुलंचे भाषण
यु ट्यूब वरती बघितले  आणि कृतार्तथेने त्रिवार दंडवत घातले !

 *८ नोव्हेंबर २०१८*
 *विनायक जोशी (vp)*
   📱9423005702
मंगलधाम , हिंगणेखुर्द , लेन नंबर ४ , पुणे ५१
*electronchikatha.blogspot.com*

Best Friend Diode

// श्री स्वामी समर्थ //
   Best Friend
       *Diode*

  *विनायक जोशी (vp)*
📱9423005702

कायम आनंदाने राहणारा आणि आपले स्वतःचे काम मनापासून करणारा विश्वसनीय मित्र.
या मित्राची आणि माझी पहिली भेट त्याच्या टिव्ही नावाच्या  मोठ्या घरात झाली. त्या वेळी तो एका व्हाॕल्व्ह नावाच्या काचेच्या घरात शांतपणे खाली मान घालून बसला होता. थोड्याच अंतरावर अतिशय शिघ्र कोपी हाय व्होल्टेज तयार करणारा EHT नावाच्या भावाजवळ तो रहात होता. कधी चुकून मर्यादा ओलांडली गेली तर हा भाऊ रागाने निळी ज्योत अंगावर टाकायचा.
मी जेथे जाईन तेथे हा  Diode आधीच  पोहचलेला असायचा . त्या मुळे नवीन ठिकाणी गेलो तरी परके वाटायचे नाही.
काही कालखंडा नंतर त्याने आपला आकार छोटासा करुन डिजीटल सर्किट्स नावाच्या नवीन जागेत  तो रहायला गेला. सुरवातीस तो 'OR ,And, वगैरे स्वरूपात पहायला मिळू लागला.
  दहिहंडी खेळात असतात तसा चौघांचा group करून Bridge  या नावाने power supply मधे त्याने केंव्हाच प्रवेश केला आहे. आपल्या एका जाडजूड capacitor मित्राला बरोबर घेउन सेकंदाला ५० वेळेला नाचणाऱ्या AC  व्होल्टेजला  दिड पटीने वाढवुन शांत अशा DC मधे जेरबंद करायचे काम तो लिलया करू लागला.
या नंतर मात्र त्याने कमाल केली , तो स्वतः भोवती लाल, निळा,पिवळा असे रंग सोडू लागला.अर्थात नवीन नावाने Led म्हणून . त्याच्या ह्या रुपाने अतिशय लोकप्रियता मिळवली. त्या नंतर रंगीत स्वरूपातील आठ जण एकत्र येऊन अर्थपूर्ण भाषेत बोलायला लागला .अर्थातच Display बनून .
याच्या नंतर सोळा सोळाच्या दोन टीम्स बनवून तो LCD म्हणून वावरू लागला.
याच वेळेला तातडीचे बोलावणे आले म्हणून तो Power Circuit  कडे गेला. याचे प्रमुख काम असायचे Coil मधील राहिलेले Magnetisum काढून टाकणे आणि Driver Transistors ना मृत्यूमूखी पडण्या पासुन वाचवणे. Mosfet मध्ये  मात्र तो आधीच आत जाऊन बसलेला असे Body Diode म्हणून .
   कंट्रोलरचा जगात मात्र  हा  Prom, EPROM, मेमरीज मध्ये लाखोंच्या संख्येने जाऊन बसला आणि स्थिरावला.
तसा तो स्वाभिमानी आहे. त्याला मर्यादे बाहेर काम दिले की रागाने काळानिळा होवून कायमचे काम बंद करतो. उलट दिशेने  येणाऱ्या इलेक्ट्रॉन्सची गर्दी वाढली कि हा दोन्ही दिशेने दरवाजा ऊघडा ठेवून Heart attack येणाऱ्या Transistors कडे  स्थितप्रज्ञपणे बघत बसतो.
मिलमनच्या पुस्तकातून पहिल्यांदा भेटलेला , प्रत्येक वेळेला ऐन मोक्याच्या वेळी मदतीला येणारा , इलेक्ट्रॉनीक्सच्या  क्षेत्रात हात धरुन आत्मविश्वासाने चालायला मदत करणारा आणि परमेश्वरा प्रमाणे चराचरात व्यापून राहिलेल्या *Diode* नावाच्या या मित्राची सुखद आठवण ...

याच्या आईने आपल्या या अत्यंत तेजस्वी अशा मुलाला कोणाची दृष्ट लागू नये म्हणून कॕथोड नावाची पांढरी रिंग त्याच्या गळ्यात घालून ठेवली आहे कायमची ...


     *विनायक जोशी(vp)*
📱9423005702
मंगलधाम , हिंगणेखुर्द ,लेन नं ४, पुणे ५१.
*electronchikatha.blogspot.com*

दादांचे संस्कार

// श्री स्वामी समर्थ //
    *दादांचे संस्कार*

   *चिकाटी , संयम आणि स्थितप्रज्ञता*

विनायक जोशी (vp)
📱9423005702

नारायण जोशी या मुलाने आपल्या वडिलांच्या कडून मिळालेल्या संस्कारांचा सुयोग्य पध्दतीने उपयोग केला आहे .त्या मुळेच तो आत्तापर्यंत उत्तम दर्जाचे काम सातत्याने करत आहे.
नारायणने शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्यानंतर L&T या कंपनीत ट्रेनी इंजिनियर म्हणून १९८४ साली रूजू झाला . या कंपनीत सिनियर इंजिनियर , मॕनेजर म्हणून काम केले .या नंतर Ultratech Cement या कंपनीत GM आणि AVP या पोझीशन्स वरती उत्तम दर्जाचे काम केले . त्या मुळे २०१० साली त्याला Unit Head या बढती बरोबरच कोलकाता येथे अत्यंत आधुनिक असा नवीन सिमेंट कारखाना उभारायची संधी कुमार मंगलम बिर्ला यांनी दिली.  आयुष्यात एकदाच मिळणाऱ्या या संधीचे त्याने सोने केले आणि दानकुनी येथे ५ वर्षात उत्तम चालणारा कारखाना उभा केला . या येथेच एक उत्तम असे सिध्दीविनायकांचे मंदीर बांधले ....वर्षाला हजार बाराशे कोटींची उलाढाल करणाऱ्या या नवीन  कारखान्याची सुत्रे नवीन पिढी कडे सोपवून स्थितप्रज्ञतेने तो पुढील नवीन जबाबदारी घेण्यासाठी दुर्गापूर आणि त्या नंतर रायपुरच्या एक्सपोर्ट युनीट कडे रवाना झाला अत्यंत समाधानाने आणि कृतार्थ भावनेने पुढच्या प्रगतीच्या वाटेवर ...

*विनायक जोशी (vp)*
📱9423005702
  मंगलधाम ,हिंगणेखुर्द ,
लेन नं ४ , पुणे ५१
*electronchikatha.blogspot.com*