// श्री स्वामी समर्थ //
*आकाश आणि अजित*
*विनायक जोशी (vP)*
📱9423005702
९ मे संध्याकाळी अमेरिकेतून आकाश ने बेलसरकर आणि त्याचा फोटो पाठविला.आकाश TCS मध्ये आहे आणि कंपनीच्या कामासाठी अमेरिकेत गेला होता त्या वेळी बाॕश या कंपनीत काम करणाऱ्या वर्ग मित्राला म्हणजेच अजित बेलसरकरला तो तेथे भेटला....
*१९९५ मे महिना*
कडकडीत दुपारच्या वेळेला धायरीच्या रायकर मळ्या पर्यंत जाऊन परत माणिकबागेकडे जाताना आमच्या कंपनीची पाटी वाचून दोघेही नोकरी आहे का बघायला आले होते. आमच्या येथे संशोधन आणि विकास विभागात फक्त एक जागा होती.अजित बेलसरकरला नोकरी मिळाली .
*अजित बेलसरकर*
अतिशय खडतर मेहनत आणि एकाग्रता पूर्वक काम करून त्याने आमच्या येथे खूप महत्त्वाचे प्रोजेक्ट पूर्ण केले.आमच्या कंपनीतून इंडस्ट्रीयल कोट्यातून त्याला IIT खरगपूर येथे प्रवेश मिळाला.त्याच्या नंतर आकाश आमच्या कंपनीत कामाला लागला
*आकाश निलावार*
मितभाषी आणि कामात अतिशय निष्णात . आॕटोमोबाईल क्षेत्रातील अनेक अवघड कामे त्याने लिलया पूर्ण केली. त्याच्या सौम्य वागण्यामुळे आमच्या कंपनीच्या मालकांनी *बाबूजी* ही पदवी त्याला बहाल केली होती.
*१९ मे २०१८*
मागच्याच आठवड्यात अमेरिकेत असलेला आकाश त्याच्या मामे भावाला म्हणजेच सुप्रितला भेटायला इंडिटेक मध्ये आला होता. अत्यंत अनपेक्षित अशी आमची भेट संशोधन आणि विकास विभागात झाली. या विभागातील तरूण मुलांना त्याने मार्गदर्शन केले. पंचवीस वर्षांपूर्वी च्या अनेक आनंददायी प्रसंगांची उजळणी झाली.
माणिक बागेतील कुदळे पाटील अपार्टमेंट येथे राहणाऱ्या आणि याच आवारातील एका आज्जीं मुळे धार्मिक अधिष्ठान लाभलेल्या या विदर्भातील इंजिनियर्सनी म्हणजेच *आकाश निलावार , अजित बेलसरकर आणि विजय बढे* यांनी उत्तम दर्जाच्या कामाने आपला वेगळाच ठसा उमटवला आहे ....
*विनायक जोशी (VP)*
📱9423005702
मंगलधाम , लेन नं ४' हिंगणेखुर्द ,पुणे ५१
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा