// श्री स्वामी समर्थ //
*एका दगडाची कहाणी*
*विनायक जोशी (vp)*
📱9423005702
एका उंच टेकडीवर असलेल्या राममंदीराकडे आम्ही चाललो होतो. उन्हाची वेळ होती .लांबूनच पांढरे शुभ्र मंदीर बघून आनंद वाटत होता. साधारणपणे शंभर पावलांवर चप्पल स्टँड होता. चप्पल काढल्यानंतर पाय भाजू नयेत म्हणून पळत गाभाऱ्यात जायचे ठरविले . दोन चार पावले गेल्यावर पाय अजिबात भाजत नाहीत हे लक्षात आले. त्या मंदिरात मुर्तींसाठी , गाभाऱ्यासाठी किंवा इतर बांधकामासाठी असंख्य वेगवेगळ्या प्रकारचे दगड वापरलेले होते परंतु कडकडीत उन्हात सुध्दा कमालीचा थंड राहणारा हा दगड मला खुप आवडला होता.
१९७८ या वर्षी आमची दहावीची बोर्डाची महत्वाची परीक्षा . काॕलनी मधील आमच्या सर्वांची घरे मोठ्ठी होती.आमचे ८ खोल्यांचे घर होते .अभ्यासासाठी एक छान मोठ्ठी खोली होती . माझ्या पेक्षा सहा आणि आठ वर्षे मोठ्या आणि प्रचंड हूशार अशा दोन बहिणी मार्गदर्शनासाठी होत्या परंतु मी मात्र दहा बारा मित्रांबरोबर आमच्याच काॕलनीतील एका रिकाम्या घरात अभ्यासाला म्हणून जात होतो...
आमच्या दहावीच्या रिझल्टच्या वेळी शिक्षकांचा संप चालू झाला आणि जून ऐवजी आॕगस्ट मध्ये निकाल लागणार अशी बातमी आली .आमच्या घराच्या जवळच संगमेश्वर हे अतिशय सुंदर काॕलेज होते परंतु आमच्या मित्रांच्या मधील एकाने तीन किलोमीटर अंतरावर वालचंद नावाचे छान काॕलेज आहे आणि फक्त हुशार मुलांना तेथे प्रवेश मिळेल वगैरे माहिती आणली .आम्ही स्वयंघोषित हुशार मंडळींनी तात्पूरती अॕडमिशन वालचंदला घेतली .६५% पेक्षा कमी मार्क मिळाले तर प्रवेश आपोआपच रद्द होणार होता.
अखेर निकाल लागला . मला एकोणसत्तर टक्के मार्क्स मिळाले.वालचंदला अॕडमिशन पक्की झाली.त्या वेळी दहावीला बोर्डात पहिला आलेल्या मगाई या मुलाने आमच्याच काॕलेजला प्रवेश घेतला म्हणून आम्ही मित्रांनी आनंदोत्सव साजरा केला...
घरात मात्र कमालीचे तणावाचे वातावरण होते . माझ्या वडिलांना मला कमीतकमी ८० ते ८२ % मार्क्स मिळतील अशी अपेक्षा होती. अत्यंत हुशार अशा आई वडिलांच्या आणि भावंडांच्या घरात अभ्यासाची अजिबात आवड नसलेल्या विनायक प्रभाकर जोशी या मुलाला वयाच्या पंधराव्या वर्षी *एक नंबरचा दगड* ही पदवी वडिलांच्या कडून मिळाली....
या नंतर साधारणपणे तीन वर्षांनी म्हणजेच १९८१ साली नारायण दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यात पहिला आला. त्याला असंख्य बक्षिसे मिळाले .खुप ठिकाणी सत्कार झाले. माझ्या कर्तुत्वाने घरावर पसरलेले निराशेचे मळभ दूर झाले. एका अत्यंत हूशार मुलाचे वडिल म्हणून वडिलांचा आॕफिस मध्ये सत्कार झाला.
माझ्या दहावीच्या निकालानंतर माझ्या आयुष्याचे निर्णय मीच घ्यायची मुभा मला मिळाली.
बरोबर दहा वर्षांनी म्हणजेच १९८८च्या आॕक्टोबर या महिन्यात वडिल मला न कळत डाॕ.मराठेंना यांना भेटायला आमच्या कंपनीत आले होते. त्या वेळी मला R & D Manager केले आहे हे पत्र त्यांनी वाचले आणि त्या नंतर परत मला दगडाच्या ऐवजी विनायक हे नाव त्यांच्या लेखी प्राप्त झाले....
वेगवेगळ्या मंडळींच्या बद्दल लेखन करताना जिनियस , आनंदयात्री , कर्मयोगी , नादखुळा वगैरे असंख्य आणि समर्पक वेगवेगळी विशेषणे मला सुचली आहेत.
विनायक प्रभाकर जोशी या माणसाच्या बद्दल लिहिताना
*एका दगडाची कहाणी* हेच समर्पक वाटले.
हा दगड अत्यंत स्वाभिमानी आणि कमालीच्या आनंदी स्वभावाच्या आईच्या पोटी जन्माला आलेला आहे . अतिशय स्वच्छ आणि प्रामाणिक अशा वडिलांचे संस्कार लाभलेला , कमालीच्या हूशार आणि प्रेमळ भावंडांच्यात आनंदी आयुष्य जगत असलेला , असंख्य मित्र असलेला अगदी वेगळ्या प्रकारचा दगड .बाह्य रूप साधे असलेला , सहवासात येणाऱ्या सर्वांना कमालीचा थंडावा देणारा , लोकांना ध्येयाकडे जाताना शांततेची पायवाट म्हणून निरपेक्षपणे बसलेला , अगदी शहदच्या बिर्ला राममंदिरातील असावा तसा *साधा परंतु वेगळ्या प्रकारचा दगड फक्त*
👍👍👍
*विनायक प्रभाकर जोशी (vp)*
📱9423005702
मंगलधाम , हिंगणे खुर्द ,लेन नं ४
पुणे ५१
*electronchikatha.blogspot.com*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा