// श्री स्वामी समर्थ //
*Multitasking*
*संजय सरवटे*
*विनायक जोशी(vp)*
📱9423005702
साधारणपणे तीस वर्षांपूर्वी या मुलाची आणि माझी ओळख विदर्भातील "आवारपूर" या ठिकाणी लार्सन आणि टुब्रो च्या सिमेंट प्लान्ट मध्ये झाली. बिलासपूर हून आलेला , MSC झालेला , डाॕक्टरेट करण्यासाठी लागणारी तयारी करणारा , उत्कृष्ट चित्रे काढणारा , चारशे ते पाचशे गाण्यांच्या मधील संगीताच्या पीसेसचे सखोल ज्ञान असलेला , शालेय जीवनात आॕडीयो अॕंम्प्लिफायरची पूर्ण कपॕसिटी तपासण्याच्या नादात खिडकीच्या काचांना रामराम करायला लावणारा , कंपनीच्या क्वार्टर मध्ये घरगुती साहित्याचा जास्तीतजास्त वापर करुन TV बनवणारा असा हा चुणचुणीत मुलगा होता. डॕनीश , जर्मन , जॕपनीज वगैरे परदेशी तयार झालेले असंख्य कंट्रोलर्स अहोरात्र चालू स्थितीत ठेवण्याचे महत्त्वाचे काम यांच्या विभागाला करावे लागत असे.प्रोसेस कंट्रोल प्लान्ट मध्ये एक मिनीट जरी प्रोसेस बंद पडली तर लाखो रुपयाचे नुकसान होते याची वस्तुनिष्ठ जाणीव असलेल्या टीमचा तो एक भाग होता. याला एक असे वरदान मिळालेले आहे कि हा मुलगा एकाच वेळेला तीन किंवा चार गोष्टींचा खोलवर विचार करुन प्राॕब्लेम सोडवत असे , अगदी Quad Core Processor सारखे एकाचवेळी पण स्वतंत्रपणे . आवारपूरच्या अत्यंत खडतर अशा हवामानात प्रोसेस प्लाॕन्ट मध्ये काम केलेले हे सर्व डेयर डेव्हिल्स आज वेगवेगळ्या ग्रुपचे AVP, Unit Head वगैरे जबाबदाऱ्या उत्तम प्रमाणे निभावत आहेत . अत्यंत आनंदी बायको निशा आणि सोन्या सारखी दोन मुले ही त्याची मोठ्ठी जमेची बाजू आहे. १९९७ च्या मे महिन्यात तो सोलापूर मध्ये आमच्या घरी आला होता. अर्थातच दोन जिवलग मित्र एकत्र आल्यामुळे सर्वांनी गाणे म्हणण्याची फर्माइश केली. थोड्याच वेळात संजू आणि अल्ट्राटेकचे Unit Head नारायण जोशी या दोघांनी मिळून " हृदयनाथ मंगेशकरांनी संगीत दिलेल्या " जैत रे जैत " मधले "आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखरं..." गाणे म्हणायला सुरवात केली आणि पूर्ण घर चैतन्याने भारुन गेले...... अर्थातच लता मंगेशकर, स्मिता पाटील ,जब्बार पटेल यांच्या सुरेख अशा सिनेमाची आणि या सिनेमातील गाणी आम्हाला म्हणून दाखवणाऱ्या *Reliance Cement चे Vice Precident संजू सरवटे* या अनेकाग्रतेचा आशिर्वाद लाभलेल्या अवलियाची ही छोटीशी आठवण !
*विनायक जोशी ( vp )*
📱9423005702
मंगलधाम , हिंगणेखुर्द , लेन नंबर ४ , पुणे ५१
*electronchikatha.blogspot.com*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा