// श्री स्वामी समर्थ //
*जागतिक सायकल दिनानिमित्त*
🚴🚲🚴♀🚲🚴
*विनायक जोशी (vp)*
पुण्यात आल्यावर आणि नोकरी लागायच्या आधी हडपसरच्या आकाशवाणी केंद्रापासून ते नारायणच्या काॕलेज पर्यंत म्हणजेच GPP पर्यंत दररोज सायकल चालवायचो . अर्थातच मेन स्ट्रिट कँम्प , संचेती हाॕस्पिटल , वाकडेवाडी , मफतलाल बंगला अशा वेगवेगळ्या थांब्यांवर गप्पागोष्टी करत मुक्काम गाठायचा आणि हाच प्रवास ऊलट दिशेने करून रात्री ११.३० वाजता "बेला के फुल" ऐकत १५ नंबरला पार करून माधवनगरला रहायचो. दररोज २५-३० किलोमीटर अत्यंत आनंदाने सायकलींग करायचो परंतु सायकलचे नाव जरी निघाले तरी माझ्या पहिल्या सायकलचीच आठवण येते . तो सायकलचा प्रवास म्हणजे एक प्रचंड आनंदोत्सव होता...
*पहिली सायकल*
आमच्या कडे रॕलीज कंपनीची कॕरीयर वगैरे असलेली उत्तम दणकट सायकल होती.मी ११ वी मध्ये वालचंद काॕलेज सोलापूर येथे प्रवेश घेतला.वालचंद काॕलेज हे आमच्या काॕलनी पासून ३ किलोमीटर दूर असल्यामुळे या सायकलचा ताबा मला मिळाला.सायकल हे तीन माणसांनी अत्यंत आनंदाने चालवायचे वाहन आहे या गोष्टी वरती आम्हा मित्रांचा गाढ विश्वास असल्यामुळे पुढील दोन वर्षे आम्ही तिबल सीट काॕलेजला जात असू.सायकलच्या नळीवर बसणाऱ्या कडे पुढील दहा फुट अंतरातील गर्दी हटवणे हे काम असे .या साठी ओरडणे किंवा अपशब्द वापरायची मुभा असे.यासाठी कानडी ही उत्तम भाषा आहे. सीटवर बसणारा उंच पाहीजे.सायकल थांबली असताना तिघांचा भार थोडा वेळ त्याला पेलावा लागे . कॕरीयर वर बसणारा हा चढावरती पायडलींगला मदत करणारा आणि उतारावर चपला घासून सायकल चा वेग कमी करण्याची कला अवगत असणारा लागत असे. तिघां मध्ये उत्तम प्रकारचा समन्वय लागत असे.गर्दी असेल तर आरडाओरडा , रस्ता रिकामा असेल आणि ऊतार असेल तर किंचाळणे आणि सपाट रोड असेल तर किशोर कुमारचे 'झुमरु' या सिनेमा मधील याॕडलिंग चालू असे. सायकल हे चरबी जाळून टाकण्यासाठीचे मशीन आहे वगैरे उदात्त विचारांपासून आम्ही शेकडो योजने दूर होतो. आमच्या काॕलनी पासून वालचंद जवळच्या 'आम्रपाली 'हाॕटेल पर्यंत अतिशय आनंदाने ने आण करणाऱ्या त्या सायकलची ही हुरहुर लावणारी आठवण ....!
🚲🚲🚲
*विनायक जोशी (vp)*
9423005702
मंगलधाम , हिंगणेखुर्द , लेन नंबर ४ , पुणे ५१
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा