// श्री स्वामी समर्थ //
Best Friend
*Diode*
*विनायक जोशी (vp)*
📱9423005702
कायम आनंदाने राहणारा आणि आपले स्वतःचे काम मनापासून करणारा विश्वसनीय मित्र.
या मित्राची आणि माझी पहिली भेट त्याच्या टिव्ही नावाच्या मोठ्या घरात झाली. त्या वेळी तो एका व्हाॕल्व्ह नावाच्या काचेच्या घरात शांतपणे खाली मान घालून बसला होता. थोड्याच अंतरावर अतिशय शिघ्र कोपी हाय व्होल्टेज तयार करणारा EHT नावाच्या भावाजवळ तो रहात होता. कधी चुकून मर्यादा ओलांडली गेली तर हा भाऊ रागाने निळी ज्योत अंगावर टाकायचा.
मी जेथे जाईन तेथे हा Diode आधीच पोहचलेला असायचा . त्या मुळे नवीन ठिकाणी गेलो तरी परके वाटायचे नाही.
काही कालखंडा नंतर त्याने आपला आकार छोटासा करुन डिजीटल सर्किट्स नावाच्या नवीन जागेत तो रहायला गेला. सुरवातीस तो 'OR ,And, वगैरे स्वरूपात पहायला मिळू लागला.
दहिहंडी खेळात असतात तसा चौघांचा group करून Bridge या नावाने power supply मधे त्याने केंव्हाच प्रवेश केला आहे. आपल्या एका जाडजूड capacitor मित्राला बरोबर घेउन सेकंदाला ५० वेळेला नाचणाऱ्या AC व्होल्टेजला दिड पटीने वाढवुन शांत अशा DC मधे जेरबंद करायचे काम तो लिलया करू लागला.
या नंतर मात्र त्याने कमाल केली , तो स्वतः भोवती लाल, निळा,पिवळा असे रंग सोडू लागला.अर्थात नवीन नावाने Led म्हणून . त्याच्या ह्या रुपाने अतिशय लोकप्रियता मिळवली. त्या नंतर रंगीत स्वरूपातील आठ जण एकत्र येऊन अर्थपूर्ण भाषेत बोलायला लागला .अर्थातच Display बनून .
याच्या नंतर सोळा सोळाच्या दोन टीम्स बनवून तो LCD म्हणून वावरू लागला.
याच वेळेला तातडीचे बोलावणे आले म्हणून तो Power Circuit कडे गेला. याचे प्रमुख काम असायचे Coil मधील राहिलेले Magnetisum काढून टाकणे आणि Driver Transistors ना मृत्यूमूखी पडण्या पासुन वाचवणे. Mosfet मध्ये मात्र तो आधीच आत जाऊन बसलेला असे Body Diode म्हणून .
कंट्रोलरचा जगात मात्र हा Prom, EPROM, मेमरीज मध्ये लाखोंच्या संख्येने जाऊन बसला आणि स्थिरावला.
तसा तो स्वाभिमानी आहे. त्याला मर्यादे बाहेर काम दिले की रागाने काळानिळा होवून कायमचे काम बंद करतो. उलट दिशेने येणाऱ्या इलेक्ट्रॉन्सची गर्दी वाढली कि हा दोन्ही दिशेने दरवाजा ऊघडा ठेवून Heart attack येणाऱ्या Transistors कडे स्थितप्रज्ञपणे बघत बसतो.
मिलमनच्या पुस्तकातून पहिल्यांदा भेटलेला , प्रत्येक वेळेला ऐन मोक्याच्या वेळी मदतीला येणारा , इलेक्ट्रॉनीक्सच्या क्षेत्रात हात धरुन आत्मविश्वासाने चालायला मदत करणारा आणि परमेश्वरा प्रमाणे चराचरात व्यापून राहिलेल्या *Diode* नावाच्या या मित्राची सुखद आठवण ...
याच्या आईने आपल्या या अत्यंत तेजस्वी अशा मुलाला कोणाची दृष्ट लागू नये म्हणून कॕथोड नावाची पांढरी रिंग त्याच्या गळ्यात घालून ठेवली आहे कायमची ...
*विनायक जोशी(vp)*
📱9423005702
मंगलधाम , हिंगणेखुर्द ,लेन नं ४, पुणे ५१.
*electronchikatha.blogspot.com*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा