// श्री स्वामी समर्थ //
" कामाची सुरवात "
कामाच्या सुरवातीलाच अतिशय ताकदवान आणि आनंदी माणसांच्या बरोबर काम करायला मिळाल्यामुळे कामा बद्दलच्या अनेक उत्तम सवयींची पायाभरणी छान प्रकारे झाली.
आम्हाला आम्ही काम करत असलेल्या क्षेत्रातील उत्तम व त्याला अनुषंगाने येणाऱ्या इतर क्षेत्रातील कामचलाऊ ज्ञान घ्यावेच लागत असे. कंट्रोल सिस्टीम्सचा हिस्सा हा पूर्ण मशिन मधे वीस टक्यां पेक्षा कमी असला तरी प्रत्येक गोष्ट अत्यंत कडक पणे तपासून घ्यायची सवय पहिल्या दोन वर्षातच लागली. आपल्या बरोबर काम करणाऱ्या लोकांच्या वेळेची किंमत माहीती असल्यामुळे कोणतीही गोष्ट गृहीत धरून चालत नसे. आपण सर्किट मध्ये वापरत असलेला पंधरा पैशाचा कांपोनंट सुध्दा एखादे चार-पाच लाखांचे मशीन बंद पाडू शकतो याची सर्वांना जाणीव असे.
कोणत्याही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना त्या मशीनची मूळ उपयुक्तता न बिघडवता तिचा वापर करावा लागे. अतिशय विश्वासाने बांधलेल्या " गिऱ्हाईक " या संस्थेला कामाच्या दर्जानेच संतुष्ट करायचे हाच पायंडा होता.
विनायक जोशी (vp)
५ जूलै २०१५
electronchikatha.blogspot.com
सोमवार, २८ मार्च, २०१६
" कामाची सुरवात "
रविवार, २७ मार्च, २०१६
" योग स्पर्श " दिपक देशपांडे
// श्री स्वामी समर्थ //
" योग स्पर्श "
दिपक उर्फ नारायण देशपांडे यांनी बरीच वर्षे इलेक्ट्रॉनीक्सच्या क्षेत्रात काम केले आहे. अतिशय उत्तम दर्जाचे काम करण्याबद्दल त्यांची प्रसिद्धी होती. तांत्रिक काम करत असतानाच एका अनपेक्षित प्रसंगा मुळे त्यांना आयुर्वेद आणि मसाज या विषयी उत्सुकता निर्माण झाली. साधारणपणे २००८ सालापासून मात्र लक्ष्मी रोडवरील शगुनच्या जवळ असलेल्या सुप्रसिद्ध अशा "लिमये" सरांच्या कडे शास्त्रोक्त मसाज करण्याचा सराव चालू केला.कोणतेही काम अत्यंत मनापासून करणे या स्वभावाला अनुसरून थोड्याच दिवसात आजारी लोकांना उपयोगी पडेल अशा पध्दतीचा मसाज करायला शिकले. अर्थातच यातून मिळत असलेल्या समाधानामुळे याच मेडीकल मसाजच्या लाईन मध्येच आयुष्यभर काम करायचे त्यांनी ठरविले . अर्थातच इलेक्ट्रॉनीक्स या अत्यंत आवडीच्या कामाला कायमचा निरोप दिला. त्या नंतर आयुर्वेदीक तज्ञांबरोबर काम करुन "पंचकर्म" या
विषयाचे सुध्दा ज्ञान मिळवले. आजच्या घडीला वेगवेगळ्या प्रकारची औषधी तेले तयार करणे . त्यांचा योग्य वापर करुन रोग्याला आराम वाटेल असा मसाज करणे . सतत स्वतःला अपडेट ठेवणे वगैरे कामे अत्यंत आनंदाने आणि समाधानकारक पध्दतीने ते करत आहेत. "स्वामी समर्थ" यांचे निस्सिम भक्त असल्यामुळे हे काम निष्ठेने आणि श्रद्धा पूर्वक करत आहेत. अत्यंत सज्जन आणि दिलदार असे दिपक देशपांडे आज "योगस्पर्श" च्या माध्यमातून आणि स्वामींच्या आशीर्वादा मुळे असंख्य रूग्णांच्या वेदना कमी करायला मदत करत आहेत !
विनायक जोशी (vp)
२३ जूलै २०१५
electronchikatha.blogspot.com
शनिवार, २६ मार्च, २०१६
" मीनी बाकरवडी " गणेश आणि योगेश
// श्री स्वामी समर्थ //
' मीनी बाकरवडी ''
" गणेश आणि योगेश "
आमच्या येथे मंगलधाम या बिल्डिंग मधे पहिल्या मजल्यावर गणेश रहायला आला.त्याचा मीनी बाकरवडी विकायचा व्यवसाय होता.
साधारणपणे एका छोट्या पिशवीत लहान आकाराच्या ५० -५५ अशा बाकरवड्या असतात. हडपसर मधील कारखान्यातून बाकरवडी घेऊन पुण्यातील २०० ते २५० दुकानात स्कुटर वरून नेऊन देणे हा गणेशचा व्यवसाय होता. गावाकडे अत्यंत ओसाड अशी थोडीफार शेती होती. बाकरवडीच्या व्यवसायात थोडासा जम बसल्यावर त्याने हळूहळू शंकरपाळे वगैरे विकायला सुरवात केली.याचवेळी त्याचा छोटा भाऊ योगेश हा IT ची डीग्री घेऊन पुण्यात आपणही स्वतःचाच व्यवसाय चालू करायचा या तयारीने आला. त्याने ERP सारखेच Excise साठी ऊपयोगी पडणारे software तयार करायला सुरवात केली. त्या निमित्ताने Accounts पासून Taxation पर्यंतच्या वेगवेगळ्या लोकांची मते समजावून घेऊन साधारणतः वर्ष भरात एक चालणारे Module तयार केले.या नंतर गिऱ्हाईकांकडे महत्त्व पटवून देण्यासाठीचे हेलपाटे वगैरे चालू होते.या मध्ये म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.अर्थातच या क्षेत्रात काहीही प्रगती होत नसल्याचे दिसताच फार वेळ न दवडता त्याने इंग्रजी संभाषण आणि व्यक्तीमत्व विकास या विषयीचा क्लास जाॕईन केला.त्या ठिकाणी मिळालेल्या मार्गदर्शनाचा फायदा करुन घेऊन एका Call center मध्ये जाॕब मिळवला. नोकरी मध्ये जाणीव पूर्वक communication skills वाढविण्यासाठी जास्त मेहनत घेतली.त्या नंतर सिंगापूर मधील एका कंपनीमधे out sourcing चे काम होते तेथे जाॕईन झाला. पुढे २-३ वर्षां साठी सिंगापूरला नोकरीसाठी राहीला. या नोकरीमुळे उत्तम प्रकारचे आर्थिक स्थैर्य आले. याच दरम्यान दोघांची लग्ने झाली.योगेश सिंगापूर मध्येच राहिला. या नंतर मात्र दोन्ही भावांनी मिळून पुण्यात दोन स्वतंत्र फ्लॅट घेतले.मंगलधाम या इमारती मध्ये भाड्याने रहाणारे हे दोन भाऊ अतिशय उत्तम पणाने, संयमाने आणि कष्टाने चांगल्या सुस्थितित पोचले. सिंगापूर मध्ये नोकरी करत असलेल्या योगेश चे मोठे बंधू "गणेश शेठ" आता चारचाकी गाडीतून "मीनी बाकरवडी " देऊन गिऱ्हाईकांना संतुष्ट करत आहेत.! दहिवळ दादांच्या वास्तूने त्यांना तथास्तु असा आशीर्वाद दिला आहे !!
विनायक जोशी (vp)
२१ जूलै २०१५
electronchikatha.blogspot.com
शुक्रवार, २५ मार्च, २०१६
" श्री बालाजी " तिरुमलाय !
// श्री स्वामी समर्थ //
// बालाजी प्रसन्न //
" तिरुमलाय "
तिरुपतीला पर्वतावर राहणाऱ्या " बालाजींच्या" इच्छेनुसार मी तीन आठवडे देवस्थानच्या पायथ्याशी कामा निमित्त राहिलो होतो. या ठिकाणी एका कंपनीमध्ये " शेवया " तयार करणारे महाकाय असे इटालियन मशिन होते.या मशिनची आणि आमच्या मशिनची रुजवात घालण्यासाठी मी तेथे गेलो होतो. तिरुपती येथिल प्रचंड उकाडा असलेले हवामान हे मशिनवरील शेवया तयार करणे या साठी अत्यंत उपयुक्त होते. बालाजींचे दर्शन घेण्यासाठी मात्र पर्वतावर म्हणजेच तिरुमलाय या ठिकाणी जावे लागे.आमचे मशिन विकत घेणारे मालक आणि तेथिल इंजिनियर्स बरोबर अतिशय उत्तम संबंध तयार होत असत.याच मंडळींच्या मुळे त्या भागातील बारीकसारीक गोष्टींचे ज्ञान मिळत असे .तेथिल इंजिनियर्स हे माझे अत्यंत प्रेमळ असे गाईड असत. त्या मुळे बारीक सारीक खाचाखोचा सुध्दा कळत. या काळात पाच सहा वेळा वेगवेगळ्या पध्दतीने "बालाजींचे "दर्शन झाले. पाप क्षालन नावाच्या ठिकाणी जाऊन त्या वेळे पर्यंत केलेली बरीचशी पापे धुवून काढली.डोंगरावरच्या जंगलात जाऊन बिबटे , हरीणे वगैरे प्राण्याचे दर्शन घेण्याचा प्रयत्न केला.. प्रसादालयात लाडूंच्या राज्यात मुक्त संचार करता आला. भक्तांनी नवस फेडण्यासाठी कापलेले केस हे मोठमोठया गच्च्यां वरती स्वच्छ करुन वाळायला ठेवलेले असत. उत्तम प्रतिचे विग बनविण्यासाठी त्यांचा होणारा लिलाव किंवा ते घेण्यासाठी येणारे असंख्य व्यापारी भेटले . तिरुमलाय हा डोंगर उतरताना बसच्या ड्रायव्हरना करावी लागत असलेली कसरत किंवा मराठी , कानडी ,तेलगू,मल्याळम आणि हिंदी भाषा जाणणारे तेथील दुकानदार अनुभवता आले. .त्या काळी प्रत्येक नऊ आॕगस्टला हा डोंगर पायी चढणारी श्रीदेवी वगैरे नविन गोष्टींची माहिती मिळत असे.तेथिल स्थानिक मंडळींच्या मुळे हा डोंगर पायी चढायला योग्य वेळ आणि सोपी वाट कोणती यांचे मार्गदर्शन मिळत असे. रात्री श्रम परिहार म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या भातांचे प्रकार असत आणि त्या नंतर अत्यंत जिद्दिने काढलेली चिरंजीवी किंवा रजनीकांतच्या सिनेमाची तिकीटे अशा असंख्य आठवणी आहेत.सिनेमा मध्ये काम करणाऱ्या बहूतेक कलाकारांना घरचाच मेंबर मानायची सर्वमान्य पध्दत तेथे होती.रजनीकांत हा रजनी किंवा श्रीदेवी ला फक्त "श्री " वगैरे नामोल्लेख असे. तिरुपतीमधील या प्रेमळ अशा इंजिनियर्स रुपी वाटाड्यांच्या मुळे " श्री बालाजींचे " उत्तम दर्शन होत असे .असंख्य डोंगरांच्या खोबणीमध्ये बसलेले हे गाव किंवा रेणिगुंठा स्टेशन पासून भाविकांचे येणारे लोंढे , पूर्णपणे टक्कल केलेले असंख्य आनंदी स्त्री-पुरुष असे भक्तगण, कर्कश अशा आवाजाचे हाॕर्न वाजवत अत्यंत वेगाने गाड्या चालवणारे ड्रायव्हर किंवा अतिशय उत्तम असलेली देवस्थान ची बससेवा वगैरे गोष्टी अनुभवता आल्या
कामाच्या निमित्ताने मोजक्याच काळासाठी सहवास लाभलेल्या त्या स्थानिक मंडळींची आणि तिरुमलाय येथे अधिष्ठान ठेवलेल्या डोंगरीच्या देवाची म्हणजेच " बालाजींची " सुखद अशी आठवण !
विनायक जोशी (vp)
२३ जूलै २०१५
electronchikatha.blogspot.com
बुधवार, २३ मार्च, २०१६
अभय मायदेव ( AVP भारत फोर्ज )
// श्री स्वामी समर्थ //
" अभय मायदेव "
संत दामाजी पंतांच्या पावन भूमीत म्हणजेच मंगळवेढा येथील मायदेवांच्या वाड्यात राहणाऱ्या या अत्यंत हुशार मुलाने १९७८ साली प्रतिकूल परिस्थितीत दहावीच्या परिक्षेत ८१% मार्क्स मिळवून पूर्ण घराला आनंदाचे तोरण बांधले होते.आपल्या तत्त्वनिष्ठ , प्रेमळ आणि कर्तृत्ववान वडीलांची आणीबाणीच्या काळातील ससेहोलपट या मुलांनी बघितली होती.सहजपणे इंजिनियर होणे शक्य असून सुध्दा लवकरात लवकर नोकरीला लागायचे या उद्देशाने वालचंद काॕलेज सांगली येथून इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स चा डिप्लोमा पूर्ण केला. या नंतर मात्र बजाज टेंपो मध्ये नोकरी केली. मोठ्या भावाच्या खांद्याला खांदा लावून सर्व गाडी थोड्याच वर्षात सुस्थितीत आणली. नोकरीच्या ठिकाणी आणि गुंतवणुकीं मध्ये दूरदृष्टीचा उत्तम वापर केला. योग्य वेळी सोलापूर मधील फडके यांची मुलगी " निशा " त्याच्या आयुष्यात आली.या नंतर मात्र समाधान आणि आनंद यांचे वारे वाहू लागले.थोड्याच दिवसात मायदेवांच्या कर्तृत्वाचा परीघ वाढवण्यासाठी
"क्षितीजचे " आगमन झाले. क्षितीजने अत्यंत सहजतेने पहिल्याच फटक्यात " CA" ची परीक्षा पास होवून आपल्या हुशारीची चुणुक दाखवली आहे.सध्या तो नोकरी निमीत्त पॕरीस मध्ये आहे. अभयने दोन वर्षापूर्वी भारत फोर्ज मधून AVP या पदावरुन स्वेच्छा निवृत्ती घेतलेली आहे. सध्या पुस्तकांच्या सानिध्यात वाचनाची आवड जोपासत आहे. LIC मध्ये काम करणारी आनंदी जोडीदारीण आहे.अत्यंत प्रेमळ असे मोठा भाऊ आणि वहिनी आहेत .जबरदस्त प्रेम करणाऱ्या आणि कायम आधार देणाऱ्या बहीणी त्याच्या बरोबर आहेतच. आयुष्यभर मुलांच्या प्रगतीच्या साठी धडपडणारी 'आई' अत्यंत समाधानाने त्याच्या बरोबर राहत आहे. या सर्व प्रवासात कायम धीरोदात्तपणाने आणि आनंदाने बरोबर असलेले " भाऊ " हे सर्व अत्यंत समाधानाने बघत आहेत !
विनायक जोशी ( vp )
21 March 2016
electronchikatha.blogspot.com
परदेशी गायी
// श्री स्वामी समर्थ //
" परदेशी गायी "
' Holstein Friesian '
माझा मित्र अजित याच्या मुळे "गायी आणि म्हशींचे " एकत्रित राहण्याचे ठिकाण म्हणजेच " गोठा" या विषयी मुलभूत आणि आनंददायी ज्ञान प्राप्त झाले.कडबा ,पेंड ,आंबोण ,सरकी,
चरवी ,कडबा कुट्टी वगैरे शब्द संग्रह वाढला. यांच्याच गोठ्या मध्ये असंख्य मारक्या म्हशींकडे दुर्लक्ष करत आपल्या वासराला चाटत बसलेल्या एका टपोऱ्या डोळ्यांच्या गायीची प्रथम भेट झाली.त्या वेळेस ती अंगावरच्या माशा शेपटीने उडवत रवंथ करत एखाद्या तत्वज्ञा सारखी बसलेली होती. याचवेळी अजितच्या बाबांनी आधुनिक पध्दतीने दूधाचा व्यवसाय करायचा निर्णय घेतला. अजितच्या बरोबर राहिल्यामुळे या गायींच्या बद्दल जास्त खोलवर ज्ञान मिळत गेले.त्या नंतर अंगावर काळ्या पांढऱ्या ठिपक्यांची रांगोळी मिरवणाऱ्या परदेशी गायी येणार म्हणून तयारी सुरू झाली. यांच्या साठी अतिशय स्वच्छ असा गोठा तयार झाला.त्यांना फक्त "पेंड' आणि दर्जेदार कडबा लागणार होता त्या मुळे कडबा कापायचे मशीन वगैरे आले.थोड्याच दिवसात पहिल्या सहा गायी आल्या. अतिशय आडदांड अशा या गायींना उतरवून घ्यायचा सोहळा काॕलनी मधील समस्त बालचमूंच्या उपस्थितीत पार पडला. पांढऱ्या आणि काळ्या अशा दोन्ही रंगाच्या असंख्य छटा त्यांच्या अंगावर होत्या . विदेशी असल्यामुळे बहुतेक करुन प्रेमळपणा ऐवजी शिष्टाचार पूर्वक गंभिरपणाने त्या वावरत होत्या .
त्यांना दररोज आंघोळ घालावी लागे. दर महिन्याला त्यांची तपासणी चालू असे.काॕलनी मधील मैदानावर पाय मोकळे करायला महिन्यातून एकदा त्यांना न्यावे लागे.हा मात्र अलौकिक असा प्रसंग असे. या वेळी चुकून जरी आपल्या पायावर एखाद्या गायीचा पाय पडला तर चार पाच महिने लंगडी घालतच चालावे लागे. या गायी भरपूर दूध देत असल्यामुळे पायाच्या दोन मांड्या मधे चरवी ठेवून उकीडवे बसून धार काढणे हा अत्यंत दिव्य आणि दमवणारा प्रसंग असे. शेण आणि गोमूत्र यांचा अभूतपूर्व असा वास मात्र देशी गायीं सारखाच असे. साधारणपणे चाॕकलेटी रंगाची, मऊ कातडे असलेली , मालकाला आणि वासराला प्रेमळ पणे चाटणारी अशा गायी ऐवजी मख्खपणे वावरणारी आडदांड आणि भरपूर दूध देणारी हि परदेशी गाय कायमच आम्हाला परकी वाटत असे. या गायी हंबरताना सुध्दा थोडासा जबडा उघडून अनभिज्ञ अशा भाषेत त्यांच्या माहेरची आठवण काढत असत. सोलापूर सोडल्या नंतर गोठा संस्कृती फक्त आठवणींच्या कोपऱ्यात गेली आहे. गोधन ,गोशाला,गोग्रास ,गोबर गॕस,गोमूत्र वगैरे निरर्थक शब्दांची मांदियाळी मात्र जमा झाली आहे .परंतू मालकाचा स्पर्श अचूक ओळखणारी किंवा वांड अशा वासराला वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढून व्यवहार ज्ञान शिकवणारी , सरपटणारे एखादे जनावर गोठ्याच्या जवळ जरी आले तरी हलकल्लोळ करणारी ,खरवसाची आठवण करुन देणारी अशा त्या गायीच्या आठवणी हळूहळू अंधूक होत चालल्या आहेत !
विनायक जोशी (vp)
19 July 2015
electronchikatha.blogspot.com
शनिवार, १९ मार्च, २०१६
श्रीनिवास जाधव शिवाजी पार्क दादर
// श्री स्वामी समर्थ //
" श्रीनिवास जाधव "
" शिवाजी पार्क" दादर या अतिशय उत्तम ठिकाणी बालपण आणि "बालमोहन" मधे शिक्षण .विजय गोखले वगैरे शाळेतील मित्र . बारावीला आगरवाल क्लासेस मध्ये IIT साठी प्रवेश . बेफीकीर अशा तारुण्यामुळे आणि अभ्यासाच्या प्रचंड ताणामुळे अतिशय कमी मार्क्स पडले आणि पूर्ण आयुष्याची दिशा बदलली. या नंतर मात्र मुंबईचा आणि घरच्यांचा निरोप घेऊन पुण्यात शिक्षण पूर्ण केले . पुण्यात नवी पेठेत स्वतःच्या वाडयात जुन्या भाडेकरूंबरोबर नविन आयुष्याची सुरवात.याच वेळेला तो आमच्या कंपनीमधे आला.कामात अतिशय चोख.समोरच्या माणसाशी बोलताना गडगडाटी हसणे आणि आकाशा कडे बघत सिगरेटच्या धुराची वर्तूळे सोडत राहणे हि त्याची खासियत. सदोदीत मित्रांच्या बरोबर परंतु स्वतःच्या मस्तीत राहणारा. कंपनीमधील मुलींचा अत्यंत विश्वासू मित्र .मेल्ट्राॕन मध्ये नोकरी मिळाल्या मुळे तिकडे गेला .मेल्ट्राॕनला घरघर लागल्यामुळे तिथून पूढे बजाज मधे. अनपेक्षितपणे तो काम करत असलेले विभाग बंद पडले.एका अत्यंत उमद्या आणि दिलदार माणसाला मनाविरूद्ध ची फकीरी करावी लागली. जुन्या भाडेकरूंमुळे त्याला स्वतःच्या वाडयात अंधारात दिवस काढावे लागले. एके दिवशी तो वाडा अनपेक्षित पणे विकला गेला. दिवस बदलले. आनंददायी असा संसार चालू झाला.आज त्याची मोठी मुलगी एका छानशा साॕफ्टवेयर कंपनीमधे नोकरी करत आहे. मुलगा सुध्दा उत्तम शिकत आहे.
लहानपणी सर्व गोष्टी पूरक असून सुध्दा पालकांशी मोकळा संवाद नसल्यामुळे या अत्यंत हुशार मुलाला सामान्य जीवन जगावे लागले. गेली २५ वर्षे पेपर मधे येणाऱ्या IIT च्या क्लासेसची जाहिरात वाचली की पहिली आठवण येते अत्यंत तल्लख अशा आणि शिवाजी पार्क दादर येथे राहणाऱ्या ,बालमोहनच्या हुशार विद्यार्थ्याची म्हणजेच "श्री निवास जाधवची " !!!
विनायक जोशी (vp)
७ जूलै २०१५
electronchikatha.blogspot.com
शुक्रवार, १८ मार्च, २०१६
Air Filter
// श्री स्वामी समर्थ //
" Air Filter "
ॲटोमोबाइल क्षेत्रात अत्यंत उपयुक्त काम हे Air Filters करतात. सर्व प्रकारच्या हवामानात गाळलेली हवा इंजिनला देणे हे यांचे मुख्य काम असते.सोलापूर रोड वरील एका कंपनीमधे बरेच प्रकारचे फिल्टर्स तयार होतात. त्या मधील काही filters चेक करण्यासाठी मशीन तयार केले होते . या Filter ना चेक करण्यासाठी जी dust वापरावी लागे ती परदेशातून आयात करावी लागे. या धुळीमधे moist dust , dry dust वगैरे बरेच प्रकार असत. चोवीस तासात वेगवेगळ्या प्रकारची धुळ त्या filter मधून पाठवावी लागे आणि त्या नंतर Filter ची तब्येत चेक करावी लागे. या सर्व लॕब मधे तयार केलेल्या धुळींना या Air Filters ने व्यवस्थित तोंड दिले कि त्या नंतर तो Filter भारतातील कोणत्याही प्रदेशात गाडीमधे चालणार याची खात्री असे. ठराविक वेळाने आणि ठराविक वेळ कमीतकमी Micron ची धूळ फवारून नंतरच या Filter च्या दोन्ही बाजूंचा हवेचा दाब मोजून या Air Filter चा performance ची तपासणी करावी लागे. अत्यंत कमी धूळीची हवा इंजिनला देण्यासाठी हे Air Filter सदैव कार्यरत असतात.!
विनायक जोशी (vp)
16September 2015
electronchikatha.blogspot.com
मंगळवार, १५ मार्च, २०१६
"राहूल भोई " Catch On Fly
// श्री स्वामी समर्थ //
" Catch On Fly "
' राहुल भोई '
एका नावाजलेल्या कंपनीच्या नवीन येणाऱ्या कार मधील गियर बाॕक्सच्या सर्व प्रकारची कडक चाचणी घेण्यासाठी एक मशीन तयार केले होते.नाॕर्मल आॕपरेशन्स , endurance test वगैरे चेकींग करण्यासाठी च्या सर्व गोष्टी व्यवस्थित चालत होत्या . सर्वात शेवटी मोटार Top speed ला नेऊन एकदम इंजीन Gear box पासून वेगळे करायचे आणि १०० HP चा लोड टाकून गियर बाॕक्सचा performance चेक करायचा होता.ही Trial चालू असताना १०० HP ची मोटोर आॕन झाली की MSEB च्या पोल वरचा fuse उडायचा असे २-३ वेळा झाल्यावर आम्ही shop floor वरती चेक न करता मशीन तसेच पाठवायचे ठरवले. थोड्याच दिवसात मुळ कंपनीमध्ये गियर बाॕक्स तयार होणाऱ्या विभागाच्या जवळच आमचे मशीन स्थानापन्न झाले.आमच्या कंपनीमधून "राहूल भोई" नावाचा इंजिनियर कमिशनिंग साठी गेला होता. Gear Box तयार करणारे मशीन विदेशी कंपनीचे होते. नविन गियर बाॕक्स वरती आमच्या मशीनच्या trials चालू झाल्या आणि Top speed मोड मधे सर्व Gear Box reject होत होत्या . अर्थातच गियर बाॕक्स तयार करायचे मशीन विदेशी असल्यामुळे सर्वच जण आमच्या मशीन मध्येच काहीतरी चूक आहे यावरती ठाम होते. राहुल मात्र लाॕजीक पूर्ण पणे माहीत असल्यामुळे अतिशय ठामपणे गियर बाॕक्स मध्येच प्राॕब्लेम आहे हे सांगत होता.दुसऱ्या दिवशी दोन्ही कंपनींच्या तज्ञ लोकांच्या समोर सुध्दा तोच result आला. शेवटी जर्मनी वरुन आलेली Original Gear Box जोडून आमच्या मशिनचे लाॕजीक चेक करायचा निर्णय झाला. या गियर box वरती पूर्ण लाँजीक उत्तम पणे चालले.या नंतर १० वेळेला त्याच गियर box वरती उत्तम result आले. आता ओरीजनल Gear Box आणि भारतात विदेशी मशीन वरती बनवलेली Gear box या मधे काय फरक आहे ते हुडकणे चालू झाले.अर्थातच आमची सन्मानाने सुटका झाली. राहुलचा आत्मविश्वास बघून त्या कंपनीमधे कामासाठी त्याला आॕफर मिळाली.
या संपूर्ण Test ला Catch On Fly म्हणतात आणि लाॕजिकची उत्तम बैठक असलेल्या चोवीस वर्षाच्या
तरुण इंजिनियरला "राहुल भोई" !
विनायक जोशी (vp)
18 July 2015
electronchikatha.blogspot.com
सोमवार, १४ मार्च, २०१६
Earthing
// श्री स्वामी समर्थ //
" Earthing "
पावसाळ्यात गुरगुरणाऱ्या ढगांच्या वरती स्वार होवून आणि अत्यंत तेजपूंज आणि लखलखत्या प्रकाशाचे म्हणजेच विजेचे झोत टाकत वरुणदेव जेंव्हा धरती मातेचे दर्शन घ्यायला निघतात तेंव्हा पहिल्यांदा जिची प्रकर्षाने आठवण येते ती म्हणजे ' Earthing'.
प्रशस्त असा काळ्या मातीचा खड्डा खणायचा. त्या मध्ये खडे मिठ ,कोळसा यांच्या वेगवेगळ्या आकारांच्या थरांमध्ये पहुडलेली छानशी तांब्याची जाड पट्टी आणि त्याला जोडलेली जाडवायर वगैरे साहित्य वापरुन छान आणि दणकट असे घर जिच्यासाठी बांधायचे ति म्हणजे सुरक्षित अशी ' Earthing '.
इलेक्ट्रिकच्या शाँक पासून आपले कायम संरक्षण करणारी "Earthing".
एकदा तुम्ही इंजिनियर झालात कि हिला वेगवेगळ्या प्रकारे भेटायला येणाऱ्या लोकांची तुम्हाला ओळख होते. Twisted pair या प्रकारच्या केबल्स मधून दंगा करत जाणाऱ्या छोट्या छोट्या सिग्नल्स च्या रुपातील मुलांनी गोंगाट करुन आजूबाजूच्या मंडळींना त्रास देऊ नये म्हणून 'शिल्ड'नावाच्या मामा बरोबर योग्य अशा मुक्कामाला पाठवून देतात ते ठिकाण म्हणजे Earthing.
प्रत्येक सिग्नलची वेगवेगळ्या प्रकारे खिदमत करायची म्हणून हिला हातात हात घालून
'डेझी चेनच्या' स्वरूपात आलेले आवडत नाही. आपापल्या मामांना म्हणजेच शिल्डला वेगवेगळे घेऊन यायचे आणि जिच्या जवळ सर्वांनी एकत्र येउन भेटायचे ती जागा म्हणजे Earthing .
कायम जाड वायरला मदतीला घेऊन शिस्तबद्ध पध्दतीने जाणे हा तिचा मुळ स्वभाव आहे.
नाजुक उपकरणांसाठी मात्र इलेक्ट्रॉनीक "अर्थ पीट" नावाच्या अतिशय जवळच राहणाऱ्या हिच्या छोट्या बहीणींकडे जावे लागते.
हिच्याकडे थोडेसे जरी दुर्लक्ष केले की असंख्य यंत्रे अकाली बंद पडतात. Earthing किंवा Earth या विषया ची नीट माहिती नसेल तर त्या Engineers च्या करीयर मधे सुध्दा काहीच "अर्थ " उरत नाही.
अनेक यशस्वी चालणाऱ्या मशीन्सना "Down to earth" ठेवणारी अशी ही जबरदस्त "Earth" आहे.
विनायक जोशी (vp)
2 June 2015-
electronchikatha.blogspot.com
रविवार, १३ मार्च, २०१६
Singing Relay Board गाणारे रीले बोर्ड
// श्री स्वामी समर्थ //
" गाणारे रीले बोर्ड "
बरोबर १२ वर्षापूर्वी हेमंत'कडे गेलो होतो , त्यावेळी त्याच्या टेबलावर PLC ला लागणारा आठ चॕनलचा रीले बोर्ड होता. या रीले बोर्डला आपादमस्तक न्याहाळल्यानंतर थोड्याच वेळात या रिलेंची आणि माझी दोस्ती झाली. या बोर्ड वरती एका ओळीत "रीले " च्या रुपात आठ मुलभुत अशा स्वरांनी ठाण मांडले होते. सा ,रे,ग ,म,प,ध,नी, आणि वरचा 'सा' असे आठ जण उत्साहाने बसलेले होते.या प्रत्येकाच्या जवळ फक्त गातानाच लागणारे हिरवे दिवे होते. कोणीही आपल्या मनाने बेसूर गाऊ नये म्हणून प्रत्येका जवळ भालदार चोपदारा सारखे 'फ्री व्हीलींग 'डायोड ना नेमलेले होते. प्रत्येक स्वराच्या बरोबर "रीले काॕन्टेक्ट" च्या रुपातील दोन जोडप्यांना परवानगी असल्यामुळे सोळा प्रेक्षक आपापल्या मुलांची गाण्यातील तयारी ऐकायला आले होते. आठ जणांचा समूह असल्यामुळे साधारणपणे सर्वांनी मिळून जास्तीत जास्त २५६ हरकती घ्यायला परवानगी होती. सर्व तयारी झाल्यावरती हाॕल मधील "पाॕवर" नावाचा प्रखर दिवा लागला. थोड्याच वेळात "लाॕजीकल कमांड " नावाचा संगीत संयोजक तेथे दाखल झाला. आता सर्वांचे लक्ष संयोजक देत असलेल्या "कमांड" कडे होते. थोड्याच वेळात अतिशय सुंदर आणि तालात असे समुहगान चालू झाले . काही जण स्वतंत्र पणे दिर्घकाळ चालणाऱ्या हरकती , मुरके वगैरे घेऊन आपली तयारी दाखवत होते . हा अतिशय उत्तम चाललेला सोहळा "काॕन्टॕक्ट" च्या रुपातील प्रेक्षकांना माना डोलवायला भाग पाडत होता . या आरोह आणि अवरोहात १२ वर्षे कशी गेली ते कळलेच नाही. विशेष म्हणजे या सर्व "रीले" नावाच्या मंडळींचा हा संगीत महोत्सव कायम चालू असतो.
आपल्या कडे फक्त ऐकायला येणारे "कान" पाहीजेत आणि उत्तम "दृष्टी " !!
विनायक जोशी (VP)
25 July 2015
electronchikatha.blogspot.com