सोमवार, ७ मार्च, २०१६

Micro-processor चा श्री गणेशा !

// श्री स्वामी समर्थ //
" Microprocessor  "
सलग तीन ते चार वर्षे वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव घेऊन "Din rail" या रॕक मधे बसणारी आणि असंख्य  LED इंडीकेशन्स असलेल्या modules  मुळे इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम च्या problem या विषयातून आम्ही अगदी लवकरच बाहेर पडलो होतो.एका महिन्यात चाळीस कंट्रोलर देऊन सुध्दा कोणत्याही प्रकारच्या complaints येत नव्हत्या. याच वेळेला आमच्या जर्मनीला गेलेल्या टीम ने आपण सुध्दा Micro processor वापरून सिस्टीम तयार करायची अशी घोषणा केली. Hardware आणि Software असा अभ्यास चालू झाला. त्याला लागणारी वेगवेगळ्या प्रकारची संरक्षण प्रणाली वगैरे गृहीत धरून एक controller तयार झाला. त्या वेळी Hand coding नावाच्या सहनशक्ती बघणाऱ्या प्रकाराने सर्व प्रोग्राम  eprom मधे भरावा लागे . प्रोग्राम मध्ये  वेगवेगळ्या ठिकाणी रिकाम्या जागा किंवा  'nop' ठेवावे लागत. खुप सारे call & returns लक्षात ठेवून लिहावे लागत. आम्हाला माहित असलेल्या लाॕजीकसाठीच खुप पेपर वर्क करावे लागे. प्रत्येक' पाॕवर आॕन 'ला योग्य ठिकाणाहून 'प्रोग्राम' सुरु न होणे, मधेच 'रीसेट' होणे , हँग होणे , वगैरे अनाकलनीय असे बरेच प्रकार घडत असत. Software मधील मंडळींना पूर्णपणे मशीन सायकल समजून घ्यावी लागे . नेहमीच्या Cmos बेस्ड अशा कंट्रोलर पेक्षा दुप्पट महाग आवृत्ती म्हणजे नवीन प्रकारचा microprocessor based कंट्रोलर तयार झाला.
या वेळे पर्यंत Software code नावाचे "कोडे "आमची वाटच बघत होते. एका अत्यंत शाश्वत अशा Cmos आणि Opamp च्या शेकडो चालणाऱ्या controllers कडून आम्ही अतिशय sensitive अशा microprocessor कडे फरपटत निघालो होतो.!!
       विनायक जोशी (vp)
       22 July 2015 electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा