रविवार, २७ मार्च, २०१६

" योग स्पर्श " दिपक देशपांडे

// श्री स्वामी समर्थ //
      " योग स्पर्श "
  दिपक उर्फ नारायण देशपांडे यांनी बरीच वर्षे इलेक्ट्रॉनीक्सच्या क्षेत्रात काम केले आहे. अतिशय उत्तम दर्जाचे काम करण्याबद्दल त्यांची प्रसिद्धी होती. तांत्रिक काम करत असतानाच एका अनपेक्षित प्रसंगा मुळे त्यांना आयुर्वेद आणि मसाज या विषयी उत्सुकता निर्माण झाली. साधारणपणे २००८ सालापासून मात्र  लक्ष्मी रोडवरील शगुनच्या जवळ असलेल्या सुप्रसिद्ध अशा "लिमये" सरांच्या कडे  शास्त्रोक्त मसाज  करण्याचा सराव चालू केला.कोणतेही काम अत्यंत मनापासून करणे या स्वभावाला अनुसरून थोड्याच दिवसात  आजारी लोकांना उपयोगी पडेल अशा पध्दतीचा मसाज करायला शिकले.  अर्थातच यातून मिळत असलेल्या समाधानामुळे याच मेडीकल मसाजच्या लाईन मध्येच आयुष्यभर काम करायचे त्यांनी ठरविले . अर्थातच इलेक्ट्रॉनीक्स या अत्यंत आवडीच्या कामाला कायमचा निरोप दिला. त्या नंतर आयुर्वेदीक तज्ञांबरोबर काम करुन "पंचकर्म" या
विषयाचे सुध्दा ज्ञान मिळवले. आजच्या घडीला वेगवेगळ्या प्रकारची औषधी तेले तयार करणे . त्यांचा योग्य वापर करुन रोग्याला आराम वाटेल असा मसाज करणे . सतत स्वतःला अपडेट ठेवणे वगैरे कामे अत्यंत आनंदाने आणि समाधानकारक पध्दतीने ते करत आहेत. "स्वामी समर्थ" यांचे निस्सिम भक्त असल्यामुळे हे काम निष्ठेने आणि श्रद्धा पूर्वक  करत आहेत. अत्यंत सज्जन आणि दिलदार असे दिपक देशपांडे आज "योगस्पर्श" च्या माध्यमातून आणि स्वामींच्या आशीर्वादा मुळे असंख्य रूग्णांच्या वेदना कमी करायला मदत करत आहेत !
        विनायक जोशी (vp)
          २३ जूलै २०१५
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा