रविवार, ६ मार्च, २०१६

Incubator किंवा बाळाची पेटी आणि Redundancy

//श्री स्वामी समर्थ //
"  बाळाची पेटी "
" Redundancy "
याचा अगदी सोपा अर्थ म्हणजे अत्यंत वेगाने पर्यायी व्यवस्थेने कारभार हातात घेणे. आमच्या कंपनीत साधारणपणे तीन वर्षे अनुभव घेतला की त्या जोरावर तरूण इंजिनियर्स स्वतःची कंपनी काढावी असा विचार करत.त्या वयात इतर घरगुती जबाबदाऱ्या नसल्यामुळे यश किंवा -अपयश हसतहसत पचवायची तयारी असे. या नविन मंडळींना पहिली आॕर्डर हि Timer किंवा Temperature controller ची मिळत असे. आमच्या एका मित्राला याच काळात महिन्याला ५० अशा Temperature controllers ची order मिळाली.अतिशय आनंदाने आम्ही मार्केटींगच्या माणसाच्या बरोबरीने हे युनिट कोठे वापरतात ते बघायला गेलो. त्या ठीकाणी सर्व मेडिकल फिल्डशी संबंधित मशीन्स तयार होत होत्या . सहजपणे आम्ही आमचा कंट्रोलर कोठे वापरणार याची चौकशी केली. कंट्रोलर एका Baby Incubator ला वापरला जाणार होता. दुसऱ्या दिवशी सारस बागेजवळील एका दवाखान्यात आम्ही त्या प्रकारचे मशीन बघायला गेलो. त्या वेळी त्या मशीनमधे डोळे गच्च मिटून असे साधारणपणे ९ ते १० इंचाचे बाळ झोपलेले होते. हे बाळ बघितले आणि लक्षात आले की हा साधा सरळसोट असा कंट्रोलर वापरणे योग्य नव्हते . इथे प्रत्येक गोष्टींना वेगवान पर्याय वापरणे जरुरीचे होते. Hardware आणि software मधे खुप बदल केले. हा साधा Temp controlled oven नव्हता .इथे Temperature  चुकून सुद्धा फार कमी किंवा जास्त होऊन चालणार नव्हते . या सर्व गडबडीत आम्ही दिलेल्या कोटेशन पेक्षा प्रत्येक युनिटला तीनशे  रूपये जास्त खर्च झाले. या एका कामामुळे कोणतेही काम अति आत्मविश्वासाने हाती न घेता खरोखरच त्याचा वापर काय आहे ते बघूनच पूढे जायचे हे ज्ञान मिळाले.
पुढील आयुष्यात वेगवेगळ्या Designs मधे Redundancy किंवा वेगवान पर्याय हा विषय चर्चेला आला की पहिली आठवण येते त्या पेटीत अत्यंत विश्वासाने  पहुडलेल्या बाळाचीच !
       विनायक जोशी (vp)
          24 July 2015
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा