मंगळवार, ८ मार्च, २०१६

Differential mechanism of a Car !

// श्री स्वामी समर्थ //
   " रथचक्र "
"Differential mechanism "
कोणताही रथ व्यवस्थित चालणे हे त्याच्या चाकांचा एकमेकांशी असलेल्या सुसंवादा वरती अवलंबून असते. Automobile क्षेत्रात काम करत असताना खूपशा संकल्पना समजल्या . Starter motor, Gear box , engine testing आणि filter या गोष्टी चेक करण्यासाठी लागणाऱ्या simulators वरती  थोडेफार काम केले होते. पूर्ण पणे नवीन डिझाईन केलेल्या एका मोटरची चाचणी बघायची संधी मिळाली. त्या मधे आम्ही टेस्ट केलेला Gear box वापरलेला  होता. अतिशय उत्तम दर्जाचे Test Drivers टेस्ट track वरती गाडी चालवून बघत होते. सरळ आतिशय उत्तम चालणारी हि गाडी वळणावर मात्र विचित्र अनुभव देत होती. स्थिर रहात नव्हती .तिन वेळा टेस्ट घेतल्या परंतू वळणावरती गाडीला कंट्रोल करणे अवघड जात होते. या वेळी गाडीच्या चाकांमधे वळणावर सुसंवाद साधणारा "Differential mechanism" नावाच्या महत्त्वाचा गोष्टीचे दर्शन घडले. या मधेच डाव्या अथवा उजव्या बाजूला गाडी वळवताना दोन चाकांमधील वेगाचे गणित सांभाळायचे अतिशय महत्त्वाचे काम हा मेकँनिझम करतो हे ज्ञान  मिळाले. हा मेकँनिझम व्यवस्थित चालत नव्हता . अर्थातच आमचे पुढचे मशीन  गाडीचे Differential mechanism चेकिंग करण्यासाठी लागणाऱ्या simulator चे होते.
  विनायक जोशी (vp)
  1 October 2015
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा