// श्री स्वामी समर्थ //
" Earthing "
पावसाळ्यात गुरगुरणाऱ्या ढगांच्या वरती स्वार होवून आणि अत्यंत तेजपूंज आणि लखलखत्या प्रकाशाचे म्हणजेच विजेचे झोत टाकत वरुणदेव जेंव्हा धरती मातेचे दर्शन घ्यायला निघतात तेंव्हा पहिल्यांदा जिची प्रकर्षाने आठवण येते ती म्हणजे ' Earthing'.
प्रशस्त असा काळ्या मातीचा खड्डा खणायचा. त्या मध्ये खडे मिठ ,कोळसा यांच्या वेगवेगळ्या आकारांच्या थरांमध्ये पहुडलेली छानशी तांब्याची जाड पट्टी आणि त्याला जोडलेली जाडवायर वगैरे साहित्य वापरुन छान आणि दणकट असे घर जिच्यासाठी बांधायचे ति म्हणजे सुरक्षित अशी ' Earthing '.
इलेक्ट्रिकच्या शाँक पासून आपले कायम संरक्षण करणारी "Earthing".
एकदा तुम्ही इंजिनियर झालात कि हिला वेगवेगळ्या प्रकारे भेटायला येणाऱ्या लोकांची तुम्हाला ओळख होते. Twisted pair या प्रकारच्या केबल्स मधून दंगा करत जाणाऱ्या छोट्या छोट्या सिग्नल्स च्या रुपातील मुलांनी गोंगाट करुन आजूबाजूच्या मंडळींना त्रास देऊ नये म्हणून 'शिल्ड'नावाच्या मामा बरोबर योग्य अशा मुक्कामाला पाठवून देतात ते ठिकाण म्हणजे Earthing.
प्रत्येक सिग्नलची वेगवेगळ्या प्रकारे खिदमत करायची म्हणून हिला हातात हात घालून
'डेझी चेनच्या' स्वरूपात आलेले आवडत नाही. आपापल्या मामांना म्हणजेच शिल्डला वेगवेगळे घेऊन यायचे आणि जिच्या जवळ सर्वांनी एकत्र येउन भेटायचे ती जागा म्हणजे Earthing .
कायम जाड वायरला मदतीला घेऊन शिस्तबद्ध पध्दतीने जाणे हा तिचा मुळ स्वभाव आहे.
नाजुक उपकरणांसाठी मात्र इलेक्ट्रॉनीक "अर्थ पीट" नावाच्या अतिशय जवळच राहणाऱ्या हिच्या छोट्या बहीणींकडे जावे लागते.
हिच्याकडे थोडेसे जरी दुर्लक्ष केले की असंख्य यंत्रे अकाली बंद पडतात. Earthing किंवा Earth या विषया ची नीट माहिती नसेल तर त्या Engineers च्या करीयर मधे सुध्दा काहीच "अर्थ " उरत नाही.
अनेक यशस्वी चालणाऱ्या मशीन्सना "Down to earth" ठेवणारी अशी ही जबरदस्त "Earth" आहे.
विनायक जोशी (vp)
2 June 2015-
electronchikatha.blogspot.com
सोमवार, १४ मार्च, २०१६
Earthing
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा