बुधवार, २३ मार्च, २०१६

अभय मायदेव ( AVP भारत फोर्ज )

// श्री स्वामी समर्थ //
       " अभय मायदेव "
संत दामाजी पंतांच्या पावन भूमीत म्हणजेच मंगळवेढा येथील मायदेवांच्या वाड्यात राहणाऱ्या या अत्यंत हुशार मुलाने १९७८ साली प्रतिकूल परिस्थितीत दहावीच्या परिक्षेत ८१% मार्क्स मिळवून पूर्ण घराला आनंदाचे तोरण बांधले होते.आपल्या तत्त्वनिष्ठ , प्रेमळ आणि कर्तृत्ववान वडीलांची आणीबाणीच्या काळातील ससेहोलपट या मुलांनी बघितली होती.सहजपणे इंजिनियर होणे शक्य असून सुध्दा लवकरात लवकर नोकरीला लागायचे या उद्देशाने वालचंद काॕलेज सांगली येथून  इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स चा डिप्लोमा पूर्ण केला. या नंतर मात्र बजाज टेंपो मध्ये नोकरी केली. मोठ्या भावाच्या खांद्याला खांदा लावून सर्व गाडी थोड्याच वर्षात सुस्थितीत आणली. नोकरीच्या ठिकाणी आणि गुंतवणुकीं मध्ये दूरदृष्टीचा उत्तम वापर केला. योग्य वेळी सोलापूर मधील फडके यांची मुलगी " निशा " त्याच्या आयुष्यात आली.या नंतर मात्र समाधान आणि आनंद यांचे वारे वाहू लागले.थोड्याच दिवसात मायदेवांच्या  कर्तृत्वाचा परीघ वाढवण्यासाठी
"क्षितीजचे " आगमन झाले. क्षितीजने अत्यंत सहजतेने पहिल्याच फटक्यात " CA" ची परीक्षा पास होवून आपल्या हुशारीची चुणुक दाखवली आहे.सध्या तो नोकरी निमीत्त पॕरीस मध्ये आहे. अभयने दोन वर्षापूर्वी भारत फोर्ज मधून AVP या पदावरुन स्वेच्छा निवृत्ती घेतलेली आहे. सध्या पुस्तकांच्या सानिध्यात वाचनाची आवड जोपासत आहे.  LIC मध्ये काम करणारी आनंदी जोडीदारीण आहे.अत्यंत प्रेमळ असे मोठा भाऊ आणि वहिनी  आहेत .जबरदस्त प्रेम करणाऱ्या आणि कायम आधार देणाऱ्या बहीणी त्याच्या बरोबर आहेतच. आयुष्यभर मुलांच्या प्रगतीच्या साठी धडपडणारी 'आई' अत्यंत समाधानाने त्याच्या बरोबर राहत आहे. या सर्व प्रवासात कायम धीरोदात्तपणाने आणि आनंदाने बरोबर असलेले " भाऊ " हे सर्व अत्यंत  समाधानाने बघत आहेत !
विनायक जोशी ( vp )
21  March 2016
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा