// श्री स्वामी समर्थ //
" विद्यार्थी "
साधारणपणे १९८८ साली आमच्या कंपनीमधे सीओईपी मधे इलेक्ट्रिकल साईड ला शेवटच्या वर्गातील शिकणारी मुले प्रोजेक्ट साठी आली होती. तिघेही त्या काळात 'MS' करायसाठी अमेरिकेला जाणार होती. सोलर वरती चालणारी डीसी मोटार हा विषय होता. आम्ही काम चालू केल्यावर थोड्याच दिवसात लक्षात आले की मुलांना फक्त थियरी पार्ट वाचून एक महिन्यात पूर्ण होईल असे वाटणारा हा विषय सहा महिने चालणार होता. फक्त तीन मुलांना समजावून सांगताना प्रचंड दमछाक आणि चिडचिडाट होत होता. शेवटच्या दोन महिन्यात पहिल्यांदा लक्षात आले की या विषयाचे आपले अज्ञान हे संतापाचे मुख्य कारण आहे.त्याच वेळी फर्ग्युसन रोड वरील British Library जाॕईन केली. सोलर सेल आणि सोलर एनर्जी विषयी खुप माहिती मिळाली . शेवटच्या टप्प्यात मुलांनी चांगलाच आत्मविश्वास दाखवला. या सहा महिन्यात एक मुलभूत धडा मिळाला की एखादी गोष्ट किंवा आपण समजावून सांगत असलेला विषय समोरच्या मुलांना समजत नसेल तर तो दोष बहुतांशी आपला आहे.या नंतरच्या काळात इतर वेगवेगळ्या काॕलेज मधील मुलांच्या मुळे मला इलेक्ट्रॉनीक्स मधील गमती जमती कळायला लागल्या. कोणतीही "तत्त्व प्रणाली " आमच्या मुलांना मातृभाषेतून कळेल तरच ती त्यावरती सहजपणे खोल विचार करु शकतात याचा साक्षात्कार झाला. ग्रामीण भागातून न्यूनगंडाचे ओझे घेऊन आलेल्या मुलांच्या बरोबर हसत खेळत वेगवेगळ्या संकल्पना वरती काम करता आले. तुम्हाला काळाबरोबर रहायचे असेल तर तुमच्याकडे असलेले ज्ञान काहीही हातचे न राखता मुलांना देऊन टाका आणि सध्याच्या काळातील गोष्टी समजून घेण्यासाठी त्यांच्या बरोबरीने विद्यार्थी बना !!
विनायक जोशी (vp)
16 August 2015
electronchikatha.blogspot.com
बुधवार, ९ मार्च, २०१६
" कायम फक्त विद्यार्थीच "
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा