मंगळवार, १५ मार्च, २०१६

"राहूल भोई " Catch On Fly

// श्री स्वामी समर्थ //
" Catch On Fly "
  ' राहुल भोई '
एका नावाजलेल्या कंपनीच्या नवीन येणाऱ्या कार मधील गियर बाॕक्सच्या सर्व प्रकारची  कडक चाचणी घेण्यासाठी एक मशीन तयार केले होते.नाॕर्मल आॕपरेशन्स , endurance test वगैरे चेकींग करण्यासाठी च्या सर्व गोष्टी व्यवस्थित चालत होत्या . सर्वात शेवटी मोटार Top speed ला नेऊन एकदम इंजीन Gear box पासून वेगळे करायचे आणि १०० HP चा लोड टाकून गियर बाॕक्सचा performance चेक करायचा होता.ही Trial चालू असताना १०० HP ची मोटोर आॕन झाली की MSEB च्या पोल वरचा fuse उडायचा असे २-३ वेळा झाल्यावर आम्ही shop floor वरती चेक न करता मशीन तसेच पाठवायचे ठरवले. थोड्याच दिवसात मुळ कंपनीमध्ये गियर बाॕक्स तयार होणाऱ्या विभागाच्या जवळच आमचे मशीन स्थानापन्न झाले.आमच्या कंपनीमधून "राहूल भोई" नावाचा इंजिनियर कमिशनिंग साठी गेला होता. Gear Box तयार करणारे मशीन  विदेशी कंपनीचे  होते. नविन गियर बाॕक्स वरती आमच्या  मशीनच्या trials चालू झाल्या आणि Top speed मोड मधे सर्व Gear Box reject होत होत्या . अर्थातच गियर बाॕक्स तयार करायचे मशीन विदेशी  असल्यामुळे सर्वच जण आमच्या मशीन मध्येच  काहीतरी चूक आहे यावरती ठाम होते. राहुल मात्र लाॕजीक पूर्ण पणे माहीत असल्यामुळे अतिशय ठामपणे गियर बाॕक्स मध्येच प्राॕब्लेम आहे हे सांगत होता.दुसऱ्या दिवशी दोन्ही कंपनींच्या तज्ञ लोकांच्या समोर सुध्दा तोच result आला. शेवटी जर्मनी वरुन आलेली Original  Gear Box जोडून आमच्या मशिनचे लाॕजीक चेक करायचा निर्णय झाला. या गियर box वरती पूर्ण लाँजीक उत्तम पणे चालले.या नंतर १० वेळेला त्याच गियर box वरती उत्तम result आले. आता ओरीजनल Gear Box आणि भारतात विदेशी मशीन वरती बनवलेली Gear box या मधे काय फरक आहे ते हुडकणे चालू झाले.अर्थातच आमची सन्मानाने सुटका झाली. राहुलचा आत्मविश्वास बघून  त्या कंपनीमधे कामासाठी त्याला आॕफर मिळाली.
या संपूर्ण Test ला Catch On Fly म्हणतात आणि लाॕजिकची उत्तम बैठक असलेल्या चोवीस वर्षाच्या
तरुण इंजिनियरला "राहुल भोई" !
      विनायक जोशी  (vp)
         18 July 2015
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा