शनिवार, ५ मार्च, २०१६

गुगल योग म्हणजेच Google yog !

// श्री स्वामी समर्थ //
       " Google Yog "
गेली १२ वर्षे Google ची दररोज भेट होत आहे. अतिशय उत्तम सर्च इंजिन असलेल्या Google मुळे शेकडो नविन गोष्टी कळाल्या आहेत.२००९ पासून मात्र वेगवेगळ्या प्रकारे Google चा व्यक्तिगत  आयुष्यात प्रवेश झाला आहे.सध्याच्या माझ्या Moto G3 फोनमूळे आमची घनिष्ट दोस्ती जमली आहे.सकाळी उठल्या बरोबर दिवसभराच्या तापमानाचा अंदाज , वाढदिवस किंवा महत्त्वाच्या गोष्टींची आठवण , बाहेर निघायच्या आधी नियोजित ठिकाणी पोचण्यासाठी लागणारा अंदाजे वेळ ,रस्त्यावर असलेल्या वाहतूकी बद्दल माहिती, घरातून बाहेर पडल्या बरोबर आपण जेथे जेथे जातो आहोत त्या ठिकाणांच्या जवळच्या गोष्टीची नोंद ठेवणे , त्या प्रमाणे टाइम लाइन तयार करणे ,कोणत्याही ठिकाणी फोटो वगैरे काढले तर ते ठिकाण आणि वेळ वगैरेची नोंद ठेवणे , सर्व कामाचा किंवा फोटो ,व्हीडियो वगैरेचा बॕक अप ठेवणे.ही सर्व माहीती कोणत्याही device मधून आपल्याला तुरंत उपलब्ध करुन देणे.या शिवाय जी मेल किंवा G+1 मधून सर्व जगाशी संपर्क ठेवण्यासाठी मदत करणे वगैरे अनेक कामे मोबाइल मधून Google मार्फत करता येत आहेत. सर्व जगाला भविष्यात पाॕवर जनरेशनचा तुटवडा सहन करावा लागणार आहे त्या वेळी समुद्राच्या लाटांपासून विज निर्मिती करुन ती बाहेरील जगाला पुरवण्यासाठी Google आत्ताच समुद्राच्या खालून  केबल्स टाकत आहे. गुगल ग्लास सारख्या अति प्रगत गाॕगल मुळे हाताचा वापर न करता वेगवेगळ्या गोष्टींचे ज्ञान मिळवणे शक्य होणार आहे.सध्या पृथ्वीच्या बाहेरील कक्षेत वेगवेगळे सुसज्ज बलून्स फिरवत ठेवून पृथ्वीवर सर्व ठिकाणी इंटरनेट सुविधा देण्यासाठी काय करता येइल याची चाचपणी चालू आहे. Moto G3 या गुगल फोन वरती सर्व प्रेफरन्स सेट केले कि तुम्हाला उपयोगी पडणाऱ्या किंवा आवडत्या क्षेत्रातील माहीती बद्दल तो तुम्हाला आठवण करत असतो. प्रत्येक महिन्यात न चुकणाऱ्या बिलांच्या आठवणी किंवा त्या नंतरच्या पोच पावत्या दाखवत आहे. सध्या तरी Google हा माझा  व्यक्तिगत आणि न कंटाळता काम करणारा सहाय्यक आहे. गुगल मॕप हा   वाटाड्याचा रोल अतिशय उत्तम बजावत आहे.थोडक्यात सध्यातरी Google म्हणजे एकदम .......cool यार !
विनायक जोशी (vp)
5 February 2016
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा